सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता आणि सुरक्षा तयार करणे

म्युनिकमधील Google Safety Engineering Center हे गोपनीयता आणि सुरक्षितता इंजिनिअरिंगसाठी जागतिक केंद्र आहे. वायलंड हॉल्फेल्डर आणि स्टेफन मिकलिट्झ हे इंजिनिअर स्पष्ट करतात की Google त्यांच्या उत्पादनांमध्ये पारदर्शकता आणि नियंत्रण कसे तयार करते.

वायलंड हॉल्फेल्डर यांना Google येथील नवीन जॉबसाठी स्वीकृतिपत्र मिळाले त्या वेळी ते अमेरिकेमध्येच राहत होते. ते जर्मनीहून सिलिकॉन व्हॅलीला गेले होते आणि तेथे Mercedes-Benz आणि इतर कंपन्यांसाठी १२ वर्षांपासून काम करत होते. २००८ मध्ये सर्व काही बदलले. हॉल्फेल्डर यांचे अमेरिकन मित्रमैत्रिणी आणि सहकारी त्यांचे नवे पद व नियोक्ता यांबद्दल उत्साहात होते. मात्र, त्यांचे भविष्यातील कार्यस्‍थळ माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया नव्हते – ते म्युनिक, जर्मनी होते. तेथे त्यांच्या बातमीबाबत बरेचदा कमी उत्साह दाखवला गेला. हॉल्फेल्डर यांनी “Google” या नावाचा उल्लेख केल्यावर, नेहमीच्या अभिनंदनपर संदेशांप्रमाणेच त्यांना काही वेळा त्यांच्या जर्मन मित्रमैत्रिणींकडून नाराजीच्या कटाक्षांचा आणि प्रश्नार्थक मुद्रांचा सामनादेखील करावा लागला. मात्र, युरोपिअन – आणि विशेषतः जर्मन – त्यांच्या डेटाच्या बाबतीत किती संवेदनक्षम असू शकतात हे हॉल्फेल्डर यांना माहीत आहे.

Google च्या इंजिनिअरिंग केंद्राचे साइट लीड असलेले हॉल्फेल्डर म्युनिक ऑफिसच्या कँटीनमध्ये बसले आहेत, जे तिथल्या अभिरुचीपूर्ण सजावटीमुळे आणि जमिनीपासून छतापर्यंत असणार्‍या खिडक्यांमुळे बरेचसे एखाद्या रेस्टॉरंटसारखे भासते. तिथल्या नेहमीच्या गलबल्यामधून ऐकू येणार्‍या विविध संभाषणांवरून हे स्पष्ट होते की इंग्रजी ही म्युनिकच्या “Googlers” च्या संवादाची भाषा आहे. सिलिकॉन व्हॅलीचा प्रभाव इथेच संपत नाही – २०१६ मध्ये सुरू झालेल्या या विटांच्या इमारतीमध्ये फिटनेस स्टुडिओ, कॉफी बार, बिलियर्ड रूम आणि लायब्ररी आहे. या शाखेमध्ये जगभरातील सुमारे ७५० कर्मचारी काम करतात, ज्यांपैकी बहुतेक कर्मचारी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. Google च्या माउंटन व्ह्यू येथील मुख्यालयातील सहकार्‍यांसोबत व्हिडिओ काँफरन्स फक्त संध्याकाळपासून होणे शक्य असल्यामुळे, त्यांचे कामाचे तास बरेचदा संध्याकाळी उशिरापर्यंत असतात.

वापरकर्त्यांना, त्यांचा डेटा कसा वापरला जातो या बाबतीत पूर्ण पारदर्शकता आणि नियंत्रण मिळावे हे मुख्य ध्येय आहे

तरीही Google च्या म्युनिक ऑपरेशनमधील वातावरण अत्यंत जर्मन भासते – स्थानिक सबवे स्टेशनसारखे दिसण्यासाठी डिझाइन केलेल्या काँफरन्स रूम किंवा उत्कृष्ट बाव्हेरियन लाकडी पॅनल असलेल्या रूम यांसारख्या अनेक खेळकर तपशिलांना याचे अंशतः श्रेय आहे. मात्र हॉल्फेल्डर यांच्यासाठी या जागेतील सर्वात सामान्य जर्मन गोष्ट म्हणजे ते ज्याला अभिमानाने “आमचा स्थानिक लाभ” म्हणतात, ते म्युनिक येथील त्यांचे इंजिनिअर. “येथे म्युनिकमध्ये,” हॉल्फेल्डर स्पष्ट करतात, “आम्ही Google साठी – आणि जगभरातील वापरकर्त्यांसाठी – डेटा गोपनीयतेच्या क्षेत्रात उत्पादने आणि सेवा तयार करत आहोत.” वापरकर्त्यांना, त्यांचा डेटा कसा वापरला जातो या बाबतीत पूर्ण पारदर्शकता आणि नियंत्रण मिळावे हे मुख्य ध्येय आहे. या टास्कवर काम करण्यासाठी, लोकांकरिता जर्मनी हे आदर्श स्थान आहे.

Google उत्पादनांच्या डेटा गोपनीयता मानकांसाठी जागतिक पातळीवर जबाबदार असलेले इंजिनिअरिंगचे संचालक स्टेफन मिकलिट्झ हेदेखील म्युनिक ऑफिसमध्ये काम करतात. ते २००७ मध्ये टीममध्ये सामील झाले असून, ते म्युनिकच्या मूळ Googlers पैकी एक आहेत. मिकलिट्झ आणि त्यांच्या टीमने मूळ "माझे खाते" सेवा तयार केली होती, जी नंतर Google खाते झाली. Google सोबत खाते असलेल्या कोणालाही, त्याचप्रमाणे Google चे शोध इंजिन किंवा YouTube वापरणार्‍यांना हे डिजिटल कॉकपिट वापरता येते. Google खाते वापरकर्त्यांना सेटिंग्ज सहजपणे व्यवस्थापित करू देते. वापरकर्ते त्यांच्या डेटाचे बाह्य हल्ल्यापासून किती चांगल्या प्रकारे संरक्षण केले गेले आहे हे पाहण्यासाठी सुरक्षा तपासणी देखील रन करू शकतात आणि त्यांची कोणती वैयक्तिक माहिती Google च्या सर्व्हरवर स्टोअर केली जावी आणि कोणती केली जाऊ नये हे ठरवण्यासाठी गोपनीयता तपासणी वापरू शकतात.

"येथे म्युनिकमध्ये, आम्ही Google साठी – आणि जगभरातील वापरकर्त्यांसाठी – डेटा गोपनीयतेच्या क्षेत्रात उत्पादने आणि सेवा तयार करत आहोत."

वायलंड हॉल्फेल्डर

“या प्रकारच्या सर्व प्रश्नांसाठी एक मध्यवर्ती हब तयार करणे अशी कल्पना होती,” मिकलिट्झ म्हणतात. “आम्हाला सेटिंग कॉन्फिगरेशनच्या सर्व पर्यायांसोबत सर्व उत्तरे दोन पेजवरच बंडल करायची होती – पण सर्वात महत्त्वाच्या पायर्‍यांवर लक्ष केंद्रित करायचे होते जेणेकरून वापरकर्त्यांवर माहितीचा भडिमार होणार नाही.” जेथे पेयांचा भरपूर साठा असलेला सहा फूट उंच फ्रिज ठेवलेला आहे अशा, “मायक्रोकिचन” म्हणून ओळखल्या जाणार्‍या, Google च्या एका स्टाफ किचनेटमधून मिकलिट्झ यांनी नुकतीच कॉफी आणली आहे. काचेच्या दारांमुळे सर्वात वरच्या दोन रांगा स्पष्टपणे पाहता येतात, ज्यांमध्ये मिनरल वॉटरच्या बाटल्या भरलेल्या आहेत. फ्रिजमधील बाकीच्या वस्तू फ्रॉस्टेड ग्लासमागे लपल्या आहेत. सर्वप्रथम आहेत स्पार्कलिंग ज्यूस, त्यानंतर सर्वसाधारण ज्यूस, त्यानंतर सर्वात शेवटी आइस टी आणि अनारोग्यकारक फसफसती पेये सर्वात खालच्या शेल्फवर आहेत. “आम्हा इंजिनिअर लोकांना कोणतीही गोष्ट योगायोगावर सोडणे आवडत नाही,” मिकलिट्झ म्हणतात.

वायलंड हॉल्फेल्डर (उजवीकडे) हे Google जर्मनी येथे इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे सहकारी, स्टेफन मिकलिट्झ हे २०१० पासून Google च्या गोपनीयता आणि सुरक्षा टीमचे नेतृत्व करीत आहेत. यामुळे कंपनी डेटा कसा हाताळते हे जाणून घेण्यात स्वारस्य असलेल्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.

हॉल्फेल्डर आणि मिकलिट्झ यांच्यानुसार, उद्योगक्षेत्रातील इतर कोणतीही कंपनी तिच्या वापरकर्त्यांच्या डेटाचे ऑनलाइन हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी इतके श्रम करत नाही. आणि हे खरे आहे, की Google चे सर्व्हर इंफ्रास्ट्रक्चर हे जगातील एक सर्वात सुरक्षित सर्व्हर इंफ्रास्ट्रक्चर समजले जाते. सुरक्षा सिस्टीम गुंतागुंतीची आहे आणि त्यामध्ये अनेक पातळ्या आहेत. डेटा हा कमाल सुरक्षा कारागृहांसारख्या इमारतींमध्ये असलेल्या जगभरातील डेटा केंद्रांमध्ये एंक्रिप्ट स्वरूपात स्टोअर केला जातो. “आमच्या बायोमेट्रिक पद्धतीने संरक्षित केलेल्या एखाद्या डेटा केंद्रामधील एखाद्या व्यक्तीला तुमचे ईमेल असलेली हार्ड ड्राइव्ह आढळली तरीदेखील त्यांना तिच्यासोबत काहीही करता येणार नाही,” हॉल्फेल्डर स्पष्ट करतात. “तिच्यावरील सर्व माहिती विविध डेटा केंद्रांवर वितरित स्वरूपात ठेवली जाते – आणि ती एंक्रिप्ट केलेली असते.” तसेच, या सर्व उपाययोजना करूनदेखील हॅकरना Google च्या इंटरफेसमध्ये किंवा उत्पादनांमध्ये कमकुवतपणा आढळल्यास, या माहितीच्या मोबदल्यात कंपनी भरघोस रिवॉर्ड देते. म्हणूनच सुरक्षेशी संबंधित असुरक्षिततेचा गैरफायदा घेण्यापेक्षा त्याबद्दल आम्हाला सांगणे हे भावी सायबर गुन्हेगारांसाठी अधिक फायदेशीर आहे.

"गोपनीयता आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित सर्व प्रश्नांसाठी एक मध्यवर्ती हब तयार करणे अशी कल्पना होती."

स्टेफन मिकलिट्झ

हॉल्फेल्डर आणि मिकलिट्झ यांच्या संभाषणामधून दोन विशेष महत्त्वाचे संदेश घेता येतात. पहिला संदेश, Google सोबत ईमेल खाते सेट अप करणार्‍या किंवा क्लाउडवर फोटो अपलोड करणार्‍या कोणाही व्यक्तीला माहीत असले पाहिजे की त्यांचे सर्व मेसेज आणि फोटो शक्य तेवढे सुरक्षित असतात. दुसरा संदेश, वेबवर शोधण्यासाठी आणि सर्फ करण्यासाठी Google वापरणार्‍या कोणाही व्यक्तीला हे स्वतः ठरवता येते की Google ला कोणता डेटा गोळा करण्याची आणि वापरण्याची अनुमती असावी. “स्वतःपुरते सांगायचे झाले तर, माझ्या मोबाइल फोनने मला रहदारीसंबंधी अपडेट देणे आणि हायवेवर रहदारी ठप्प झाल्यामुळे मला माझी फ्लाइट चुकवायची नसल्यास, आता निघाले पाहिजे असे सांगणे हे सर्व मला आवडते,” हॉल्फेल्डर म्हणतात. “मात्र, हे फंक्शन सुरू करायचे किंवा नाही हे प्रत्येकाला स्वतः ठरवता येते.”

Google Chrome जिंजरब्रेड हार्ट: म्युनिक येथील Google च्या जागेमधील खोल्यांचे स्वरूप खेळकर, थोडेसे उपरोधिक आहे.

हेच जाहिरातींच्या बाबतीतही खरे आहे, ज्यांमधून Google सर्वाधिक पैसे मिळवते. जाहिराती तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनवण्यात डेटा मदत करू शकतो -- जेणेकरून तुम्ही नवीन राखाडी रंगाचा सोफा शोधत असल्यास, तुम्हाला त्या आवश्यकतेला प्रतिसाद देणार्‍या जाहिराती दिसतात. काही लोकांना हे उपयुक्त वाटते; इतरांना ते चीड आणणारे वाटते. मिकलिट्झ स्पष्ट करतात की हे जाहिरात पर्सनलायझेशन वैशिष्ट्य सहज बंद करता येऊ शकते. “अर्थातच Google खाते मार्फत,” ते पुढे सांगतात. हे वैशिष्ट्य बंद करणार्‍या वापरकर्त्यांना तरीही जाहिराती दिसतील, पण त्या यापुढे त्यांच्या स्वारस्यांशी अनुकूल केल्या जाणार नाहीत. “जाहिराती वापरकर्त्यांसाठी आणखी उपयुक्त बनवण्याकरिता आम्ही डेटा वापरतो,” हॉल्फेल्डर पुस्ती जोडतात. “मात्र, आम्ही कोणताही वैयक्तिक डेटा विकत नाही.”

फोटोग्राफ: मिर्झिक आणि यारिश

सर्वांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात Google कसे मदत करते ते एक्सप्लोर करा.