तुम्हाला ऑनलाइन आणखी सुरक्षित राहण्यात मदत करण्यासाठी टिपा

अधिक क्लिष्ट पासवर्ड तयार करणे, तुमच्या डिव्हाइसचे रक्षण करणे, फिशिंगला आळा घालणे आणि इंटरनेट सुरक्षितरीत्या ब्राउझ करता येणे यासाठी आम्ही काही टिपा आणि सूचना एकत्र केल्या आहेत.

तुमची खाते सुरक्षा वाढवा

 • सुरक्षितता तपासणी करा

  तुमच्या Google खात्याचे संरक्षण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सुरक्षितता तपासणी करणे. तुमच्या Google खात्याची सुरक्षितता मजबूत करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी पर्सनलाइझ केलेल्या आणि कृतीत आणण्यासारख्या सुरक्षितता शिफारशी देण्यासाठी आम्ही हे पायरी-दर-पायरी टूल तयार केले आहे.

 • क्लिष्ट पासवर्ड तयार करा

  सशक्त, युनिक पासवर्ड तयार करणे हे तुमच्या ऑनलाइन खात्यांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही उचलू शकत असलेले एक सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. तुम्ही विसरणार नाही, परंतु इतरांना अंदाज लावण्यास कठीण असलेल्या शब्दांची मालिका वापरून तुम्ही हे करू शकता. किंवा एखादे लांब वाक्य घ्या आणि प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षरांनी पासवर्ड तयार करा. पासवर्ड आणखी जास्त क्लिष्ट बनवण्यासाठी, तो किमान आठ वर्णांचा ठेवा कारण तुमचा पासवर्ड जितका मोठा असेल तितका तो आणखी क्लिष्ट असेल.

  सुरक्षितता प्रश्नांची उत्तरे तयार करण्यास सांगितल्यास, अंदाज लावणे आणखी कठीण बनवण्यासाठी खोटी उत्तरे वापरणे विचारात घ्या.

 • प्रत्येक खात्यासाठी युनिक पासवर्ड वापरा

  तुमचे Google खाते, सोशल मीडिया प्रोफाइल आणि रिटेल वेबसायटी यांसारख्या एकापेक्षा जास्त खात्यांमध्ये लॉग इन करण्यासाठी एकच पासवर्ड वापरल्याने तुमचा सुरक्षितता धोका वाढतो. हे तुमचे घर, कार आणि कार्यालय लॉक करण्यासाठी एकच चावी वापरण्यासारखे आहे – एका गोष्टीचा अॅक्सेस मिळवल्यावर, बाकी सर्व अॅक्सेस करता येते. प्रत्येक खात्यासाठी युनिक पासवर्ड वापरल्याने हा धोका दूर होतो आणि तुमचे खाते आणखी सुरक्षित राहते.

 • एकापेक्षा जास्त पासवर्डचा माग ठेवा

  तुमच्या Google खात्यामध्ये आहे त्यासारखाच पासवर्ड व्यवस्थापक तुम्ही साइट आणि अ‍ॅप्सवर जे पासवर्ड वापरता त्यांचे संरक्षण करण्यास आणि त्याचा ट्रॅक ठेवण्यास मदत करतो. Google चा पासवर्ड व्यवस्थापक तुम्हाला सुरक्षित आणि सहजरीत्या साइन इन करता यावे म्हणून तुम्ही सेव्ह केलेले पासवर्ड वापरतो.

 • 2-टप्पी पडताळणी सोबत हॅकरपासून रक्षण करा

  तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी तुमच्या वापरकर्तानावाच्या आणि पासवर्डच्या वर तुम्हाला दुय्यम घटक वापरण्याची गरज ठेवून ज्यांना तुमच्या खात्याचा अॅक्सेस असू नये अशा कोणालाही बाहेर ठेवण्यात 2-Step Verification मदत करते. उदाहरणार्थ, Google च्या बाबतीत हा विश्वासू डिव्हाइसकडील लॉग इन स्वीकारण्यासाठी Google ऑथेंटिकेटर अॅपने किंवा तुमच्या Google अॅपमधील सूचनेने जनरेट केलेला सहा अंकी कोड असू शकतो.

  फिशिंगपासून अतिरिक्त संरक्षणासाठी, तुम्ही भौतिक सिक्युरिटी की खरेदी करू शकता जी तुमच्या काँप्युटरच्या USB पोर्टमध्ये घालता येते किंवा निअर फील्ड कम्युनिकेशन किंवा ब्लूटूथ वापरून तुमच्या मोबाइल डिव्हाइसशी कनेक्ट होते. अत्यंत लक्ष्यित हल्ल्यांचा धोका आहे असे ज्याला वाटते त्या कोणाहीसाठी – कार्यकर्ते, पत्रकार किंवा राजकीय मोहीम टीमसह – Advanced Protection Program २-टप्पी पडताळणी चे एकमेव स्वरूप म्हणून भौतिक सिक्युरिटी कीचा वापर अमलात आणून फिशिंगपासून Google चे सर्वात मजबूत रक्षण पुरवते.

तुमच्या डिव्हाइसचे संरक्षण करा

 • सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवा

  सुरक्षितता भेद्यतांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुमचे वेब ब्राउझर, ऑपरेटिंग सिस्टम, प्लग-इन आणि दस्तऐवज संपादक यांवर नेहमी अद्ययावत सॉफ्टवेअर वापरा. तुम्हाला तुमचे सॉफ्टवेअर अपडेट करण्याच्या सूचना मिळाल्यावर शक्य तितक्या लवकर ते अपडेट करा.

  तुम्ही नेहमी उपलब्ध असलेली नवीनतम आवृत्ती रन करता याची खात्री करण्यासाठी तुम्ही नियमितपणे वापरत असलेल्या सॉफ्टवेअरचे परीक्षण करा. Chrome ब्राउझरसह काही सेवा स्वतःला आपोआप अपडेट करतील.

 • तुमच्या फोनपासून संभाव्य हानिकारक अॅप्स दूर ठेवा

  तुमची मोबाइल अॅप्स नेहमी तुमचा विश्वास असलेल्या स्रोतांवरून डाउनलोड करा. Android डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी, Google Play स्टोअर वरून तुम्हाला अॅप्स डाउनलोड करता येण्याआधी Google Play संरक्षण त्यांवर सुरक्षितता तपासणी रन करते आणि इतर स्रोतांकडील संभाव्य हानिकारक अॅप्ससाठी तुमचे डिव्हाइस वेळोवेळी तपासते.

  तुमचा डेटा संरक्षित ठेवण्यासाठी:

  • तुमच्या अॅप्सवर एक नजर टाका आणि वापरात नसलेली अॅप्स हटवा. तुमच्या अॅप स्टोअर सेटिंग्जवर जा आणि ऑटो-अपडेट सुरू करा
  • तुमचे स्थान आणि फोटो यांसारख्या संवेदनशील डेटावर फक्त तुमचा विश्वास असलेल्या अॅप्सनाच अॅक्सेस द्या.
 • स्क्रीन लॉक वापरा

  तुम्ही तुमचा काँप्युटर, लॅपटॉप, टॅबलेट किंवा फोन वापरत नसल्यास इतरांनी तुमच्या डिव्हाइसमध्ये जाऊ नये यासाठी तुमची स्क्रीन लॉक करा. आणखी सुरक्षेसाठी तुमचे डिव्हाइस स्लीपवर जाईल तेव्हा अापोआप लॉक होईल अशा पद्धतीने सेट करा.

 • तुमचा फोन हरवल्यास तो लॉक करा

  तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर तुम्ही केवळ काही पायऱ्यांचा अवलंब करून तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी तुमचे Google खाते ला भेट द्या आणि तुमचा फोन शोधा निवडा. तुमच्याकडे Android किंवा iOS यांपैकी कोणतेही डिव्हाइस असल्यास, तुम्ही तुमचा फोन कुठूनही शोधू आणि लॉक करू शकता जेणेकरून इतर कोणी तुमचा फोन वापरूशकणार नाही आणि तुमची वैयक्तिक माहिती अॅक्सेस करू शकणार नाही.

फिशिंगचे प्रयत्न टाळा

 • संशयास्पद URL किंवा लिंक नेहमी प्रमाणित करा

  फिशिंग म्हणजे तुम्हाला फसवून पासवर्डसारखी महत्त्वाची वैयक्तिक माहिती उघड करण्यास लावण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. याची अनेक स्वरूपे असू शकतात, म्हणून संशयास्पद ईमेल किंवा वेबसायटी कशा ओळखाव्यात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, एखादा हॅकर वैध दिसणारे एखादे लॉग इन पेज तयार करू शकतो, परंतु प्रत्यक्षात ते खोटे असते आणि तुमचा पासवर्ड उघड झाल्यावर हॅकर तुमचे खाते अॅक्सेस करू शकतो किंवा तुमचे मशीन इन्फेक्ट करू शकतो.

  फिशिंग केले जाणे टाळण्यासाठी:

  • शंकास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका.
  • तुम्ही तुमचा डेटा वैध वेबसाइट किवा अॅपमध्ये एंटर करत आहात याची खात्री करण्यासाठी URL नेहमी परत तपासा.
  • कोणतीही माहिती सबमिट करण्यापूर्वी, साइटची URL “https” ने सुरू होत आहे याची खात्री करा.
 • तोतयागिरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवा

  तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ईमेल पाठवल्यास परंतु मेसेज विचित्र वाटत असल्यास, त्यांचे खाते हॅक झाले असू शकते. ईमेल वैध असल्याचे तुम्ही निश्चित करू शकत नसल्यास मेसेजला उत्तर देऊ नका किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

  यांसारख्या गोष्टींवर लक्ष ठेवा:

  • पैशांसाठी तातडीची विनंती
  • दुसऱ्या देशात अडकून पडल्याचा दावा करणारी व्यक्ती
  • त्यांचा फोन चोरीला गेला आहे आणि त्यावर कॉल करता येत नाही असे सांगणारी व्यक्ती
 • वैयक्तिक माहितीसाठीच्या विनंत्यांपासून सावध रहा

  पासवर्ड, बँक खाते किंवा क्रेडिट कार्ड नंबर किंवा अगदी तुमची जन्मतारीख यांसारखी वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या संशयास्पद ईमेल, झटपट मेसेज किंवा पॉप-अप विंडोंना उत्तर देऊ नका. तुमचा विश्वास असलेल्या तुमच्या बँकेसारख्या साइटकडून मेसेज आला तरी कधीही लिंकवर क्लिक करू नका किंवा उत्तराचा मेसेज पाठवू नका. तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी थेट त्यांच्या वेबसाइट किंवा अॅप वर जाणे आणखी चांगले असते.

  लक्षात ठेवा, वैध सायटी आणि सेवा तुम्हाला ईमेलने पासवर्ड किंवा आर्थिक माहिती पाठवण्याची विनंती करणारे मेसेज पाठवणार नाहीत.

 • ईमेल घोटाळे, खोटी बक्षिसे आणि भेटवस्तूंपासून सावध रहा

  अनोळखी लोकांकडून आलेले संदेश नेहमीच संशयास्पद असतात, विशेषतः ते खरे असल्याची खूप चांगली बतावणी करत असल्यास – जसे की तुम्ही काहीतरी जिंकले आहे असे घोषित करणे, सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्दल बक्षीस देऊ करणे किंवा पैसे कमावण्याच्या झटपट मार्गांचा प्रचार करणे. संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका आणि शंकास्पद फॉर्म किंवा सर्वेक्षणांमध्ये कधीही वैयक्तिक माहिती एंटर करू नका.

 • डाउनलोड करण्यापूर्वी फायली परत तपासा

  काही अत्याधुनिक फिशिंग हल्ले इन्फेक्ट झालेले दस्तऐवज आणि पीडीएफ अटॅचमेंटमधून होऊ शकतात. तुम्हाला एखादी संशयास्पद अटॅचमेंट आल्यास, ती उघडण्यासाठी आणि तुमचे डिव्हाइस इन्फेक्ट केले जाण्याचा धोका कमी करण्यासाठी Chrome किंवा Google ड्राइव्ह वापरा. आम्हाला व्हायरस सापडल्यास, आम्ही तुम्हाला चेतावणी दाखवू.

सुरक्षित नेटवर्क आणि कनेक्शनवर ब्राउझिंग

 • सुरक्षित नेटवर्क वापरा

  सार्वजनिक किंवा मोफत वाय-फाय नेटवर्क वापरताना सावधगिरी बाळगा, ज्यांसाठी पासवर्ड लागतो अशा नेटवर्कच्या बाबतीतदेखील. ही नेटवर्क एंक्रिप्ट केलेली नसू शकतात, त्यामुळे तुम्ही सार्वजनिक नेटवर्कशी कनेक्ट करता तेव्हा, आजूबाजूचे कोणीही तुम्ही भेट देत असलेल्या वेबसायटी आणि तुम्ही सायटींमध्ये टाइप करत असलेली माहिती यासारख्या तुमच्या इंटरनेट अॅक्टिव्हिटीचे निरीक्षण करू शकते. सार्वजनिक किंवा मोफत वाय-फाय हा तुमचा एकमेव पर्याय असल्यास, Chrome ब्राउझर तुम्हाला एखाद्या साइटशी तुमचे कनेक्शन सुरक्षित आहे का याची माहिती अॅड्रेस बारमध्ये देईल. घरातदेखील, तुमचे वाय-फाय नेटवर्क एंक्रिप्ट केलेले आहे याची खात्री करून आणि क्लिष्ट पासवर्ड सेट करून तुमच्या ब्राउझिंग अॅक्टिव्हिटीच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करा.

 • संवेदनशील माहिती एंटर करण्याआधी सुरक्षित कनेक्शन शोधा

  तुम्ही वेब ब्राउझ करत असताना – आणि विशेषतः पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर यासारखी संवेदनशील माहिती एंटर करण्याचा विचार करत असताना – तुम्ही भेट देत असलेल्या सायटींचे कनेक्शन सुरक्षित असल्याची खात्री करा. ती सुरक्षित URL असल्यास, Chrome ब्राउझर URL भागामध्ये राखाडी रंगाचा पूर्णपणे लॉक केलेला आयकन दाखवेल. HTTPS तुमचे ब्राउझर किंवा अॅप तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाइटशी सुरक्षितपणे कनेक्ट करून तुमचे ब्राउझिंग सुरक्षित ठेवण्यात मदत करते.

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.