प्रत्येकासाठी तंत्रज्ञान तयार करणे याचा अर्थ जो कोणी ते वापरतो त्या प्रत्येकाला संरक्षण देणे आहे.

आम्ही जे काही करू ते वापरकर्त्याचा आदर राखून करू याच विश्वासावर Google ची स्थापना करण्यात आली होती. इंटरनेट दिवसेंदिवस अधिक व्यापक होत चालले आहे हे पाहता आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अॉनलाइन संरक्षण पुरवण्यासाठी आमची सुरक्षा तंत्रज्ञाने आणि गोपनीयता टूल यांच्यात सातत्याने सुधारणा करत राहतो.

तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काय करतो ते पाहा

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुम्हाला ऑनलाइन संरक्षण पुरवतो.

आम्ही तयार केलेली प्रत्येक गोष्ट प्रभावी बिल्ट-इन सुरक्षिततेच्या तंत्रज्ञानाने संरक्षित असते जी स्पॅम, मालवेअर आणि व्हायरस यासारखे धोके तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी ते शोधते आणि ब्लॉक करते. आम्ही ही सुरक्षा तंत्रज्ञाने आमचे भागीदार आणि स्पर्धकांसह शेअर करून सुरक्षा मानकांना आणखी उंचीप्रत नेतो आणि प्रत्येकाला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतो.

अधिक जाणून घ्या

तुमची गोपनीयता

आम्ही सर्वांसाठी उपयुक्त अशी गोपनीयता देऊ करतो.

डेटामुळे Google सेवा अधिक उपयुक्त होण्यात मदत होते, पण आम्ही हा डेटा कसा वापरावा याबद्दलची प्रत्येकाची निवड वेगवेगळी असते. आम्ही कोणता डेटा संकलित करतो, तो कसा वापरतो आणि का वापरतो याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत राहू. आम्ही तुमच्या Google खात्यामध्ये अतिशय प्रभावी डेटा कंट्रोल अंतर्भूत केलेले आहेत. त्यांच्या साहाय्याने तुम्ही तुम्हाला योग्य वाटतील ती गोपनीयता सेटिंग्ज निवडू शकता.

अधिक जाणून घ्या

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.

आजची पिढी खऱ्या अर्थाने वेगळी आहे. ती तंत्रज्ञान अापलेसे करतच मोठी होत आहे. हे पाहता तुमच्या कुटुंबासाठी काय योग्य ठरेल हे जाणून तंत्रज्ञान वापरण्यात आणि वापरावर मर्यादा घालण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही जाणकार आणि शिक्षणतज्ञांसोबत काम करत आहोत.

अधिक जाणून घ्या