सर्व अॅप्स सर्व मुलांसाठी योग्य नसतात. Family Link सोबत, फक्त तुम्हाला योग्य वाटत असलेले रेटिंग असलेली अॅप्स तुमच्या मुलाला ब्राउझ करू देण्यासाठी तुम्ही Google Play स्टोअरमध्ये अॅप्स फिल्टर करू शकता. तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर तुमच्या मुलाला Google Play स्टोअर वरून डाउनलोड करायची असलेली अॅप्स मंजूर किंवा ब्लॉक करू देणाऱ्या सूचनादेखील मिळू शकतात.
आशयाचे किंवा मनोरंजनाचे कोणते भाग तुमच्या मुलासाठी योग्य असू शकतील हे ठरवण्यात तुम्हाला मदत होण्यासाठी, Google Play वर कुटुंब स्टार बॅज शोधा. कुटुंब स्टार असे सूचित करतो की त्यांचे अधिक काळजीपूर्वक परीक्षण केले गेले आहे आणि मुलांना लक्षात ठेवून ती डेव्हलप केली गेली आहेत. तुम्ही त्याची आशय रेटिंग, परवानग्या आणि त्यामध्ये जाहिराती किंवा अॅपमधील खरेदी आहे का याचेदेखील परीक्षण करू शकता.
फक्त स्क्रीन वेळेचे प्रमाण नव्हे, तर स्क्रीन वेळेची गुणवत्ता व्यवस्थापित करण्यात देखील आम्हाला पालकांची मदत करायची आहे. म्हणूनच आमच्याकडे Family Link मध्ये बिल्ट-इन वैशिष्ट्ये आहेत जी तुम्हाला प्रत्यक्षातील शिक्षकांच्या शिफारशींसह उत्तम आशय शोधण्यात मदत करतात, ज्यामुळे तुमची मुले तुम्हाला चांगला वाटणाऱ्या दर्जेदार आशयाचा आनंद घेऊ शकतात.