आम्ही तयार केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये संरक्षण बिल्ड करणे

Google सेवांना जगातील अतिप्रगत इन्फ्रास्ट्रक्चरचे संरक्षण लाभले आहे. या बिल्ट-इन सुरक्षेमुळे अॉनलाइन धोक्यांना हेरून त्यांना रोखले जाते. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित आहे याबद्दल तुम्ही खात्री बाळगू शकता.

सतत अपडेट केल्या जाणाऱ्या सुरक्षितता तंत्रज्ञानांसह तुम्हाला आणखी सुरक्षित ठेवणे

 • एंक्रिप्शनमुळे फिरतीवर असतानाही डेटा गोपनीय आणि सुरक्षित ठेवला जातो.

  एंक्रिप्शन आमच्या सेवांना आणखी वरच्या पातळीची सुरक्षितता आणि गोपनीयता पुरवते. तुम्ही ईमेल पाठवता, व्हिडिओ शेअर करता, वेबसाइटला भेट देता किंवा तुमचे फोटो स्टोअर करता तेव्हा, तुम्ही तयार केलेला डेटा तुमचे डिव्हाइस, Google सेवा आणि आमची डेटा केंद्रे यांमध्ये फिरतो. सुरक्षिततेच्या अनेक पातळ्यांनी, HTTPS आणि ट्रांसपोर्ट लेअर सिक्युरिटी यांसारख्या आघाडीच्या एंक्रिप्शन तंत्रज्ञानाने आम्ही या डेटाचे संरक्षण करतो.

 • आमचे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर डेटाचे २४/७ संरक्षण करते

  कस्टम डिझाइन केलेल्या डेटा केंद्रांपासून खंडांमध्ये डेटा ट्रांसफर करणाऱ्या समुद्राखालील फायबर केबलपर्यंत, आम्ही जगातील एक सर्वात सुरक्षित आणि विश्वसनीय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेट करतो. आणि तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी तसेच तुम्हाला गरज असेल तेव्हा तो उपलब्ध करून देण्यासाठी त्याचे सतत निरीक्षण केले जाते. प्रत्यक्षात, आम्ही एकापेक्षा जास्त डेटा केंद्रांवर डेटा वितरित करतो, ज्यामुळे आग लागणे किंवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी, तो आपोआप आणि अखंडपणे स्थिर आणि सुरक्षित स्थानी स्थलांतरित केला जाऊ शकतो.

 • Gmail तुमचे संशयास्पद ईमेलपासून संरक्षण करते आणि तुम्हाला धोक्यांचा इशारा देते

  अनेक मालवेअर आणि फिशिंग हल्ल्यांची सुरुवात ईमेलपासून होते. इतर कोणत्याही ईमेल सेवेपेक्षा Gmail तुमचे स्पॅम, फिशिंग आणि मालवेअरपासून आणखी चांगले संरक्षण करते. मशिन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून, वापरकर्त्याने स्पॅम म्हणून मार्क केलेल्या ईमेलची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी Gmail अब्जावधी मेसेजच्या पॅटर्नचे विश्लेषण करते आणि ९९.९ टक्के संशयास्पद किंवा धोकादायक ईमेल तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ब्लॉक करण्यासाठी ते मार्कर वापरते.

  संभाव्य धोकादायक ईमेल आल्यावर इशारा पाठवणे, संशयास्पद ईमेलसाठी तुम्हाला मॅन्युअली “स्पॅमची तक्रार” करू देणे यांसारखी इतर संरक्षणे Gmail देऊ करते आणि गोपनीय मोड, जो तुमच्या मेसेजची एका सेट केलेल्या कालावधीनंतर मुदत संपवतो आणि मिळवणाऱ्यांसाठी तुमचा संदेश फॉरवर्ड, कॉपी, डाउनलोड किंवा प्रिंट करण्याचा पर्याय काढतो

 • ऑटोमॅटिक Chrome अपडेट तुमचे मालवेअर आणि फसव्या सायटींपासून संरक्षण करतात

  सुरक्षितता तंत्रज्ञाने नेहमी बदलत असतात, म्हणून तुम्ही वापरत असलेल्या ब्राउझरची आवृत्ती अद्ययावत आहे याची खात्री करण्यासाठी Chrome नियमितपणे तपासणी करते. यामध्ये नवीनतम सुरक्षितता दुरुस्त्या, मालवेअर आणि फसव्या सायटींपासून संरक्षण आणि बरेच काही समाविष्ट आहे. हे आपोआप अपडेट होत असल्याने Chrome सुरक्षा तंत्रज्ञानाचे संरक्षण मिळवणे सोपे आहे.

 • तुमच्यावर परिणाम करण्याआधीच हानिकारक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती ब्लॉक करणे

  ज्यांमध्ये मालवेअर आहे, ज्या तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करत असलेला आशय झाकतात, नकली मालाचा प्रचार करतात किंवा इतर प्रकारे जाहिरात धोरणांचे उल्लंघन करतात अशा जाहिराती तुमच्या सुरक्षिततेवर आणि ऑनलाइन अनुभवावर परिणाम करू शकतात. आम्ही ही समस्या गंभीरपणे घेतो. लाइव्ह परीक्षणे आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर ब्लॉकच्या संयोगामधून प्रत्येक वर्षी आम्ही अब्जावधी जाहिराती ब्लॉक करतो – सरासरी, १०० प्रति सेकंद. आक्षेपार्ह जाहिरातींची तक्रार करण्यासाठी आम्ही तुम्हाला टूलदेखील देतो आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या जाहिराती दिसाव्यात ते नियंत्रित करतो. इंटरनेट सर्वांसाठी सुरक्षित बनवण्यात मदत करण्यासाठी आम्ही आमचे ज्ञान आणि आम्ही अंगिकारतो त्या सर्वोत्तम पद्धती शेअर करतो.

 • आम्ही शासनास डेटाचा थेट अॅक्सेस देत नाही.

  आम्ही वापरकर्ता डेटा किंवा कालखंड संग्रहित करणार्या वापरकर्ता डेटा किंवा आमच्या सर्व्हरवर "बॅक दरवाजा" प्रवेश देऊ शकत नाही. याचा अर्थ असा नाही की कोणतीही सरकारी संस्था, यू.एस. किंवा अन्यथा आमच्याकडे आमच्या वापरकर्त्यांच्या माहितीवर थेट प्रवेश आहे. आम्हाला मिळालेल्या वापरकर्ता डेटाच्या कोणत्याही विनंत्यांचे आम्ही पुनरावलोकन करतो, विनंती मोठ्या प्रमाणात विस्तृत होते तेव्हा पुश करा आणि आमच्या पारदर्शकता अहवालातील आमच्या डेटा विनंत्यांबद्दल उघडता.

 • Google Play संरक्षण सोबत तुमचे Android डिव्हाइस, अॅप्स आणि डेटा सुरक्षित ठेवणे

  तुमच्या Android डिव्हाइसमध्ये बिल्ट-इन Google Play संरक्षण आहे. ते तुमचे डिव्हाइस, डेटा आणि अॅप्स सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागून सतत काम करत असते. तुम्ही तुमची अॅप्स कुठूनही डाउनलोड करत असा, आम्ही तुमची अॅप्स ती डाउनलोड करण्याआधी, त्यादरम्यान आणि त्यानंतर स्कॅन करतो

 • पर्सनलाइझ केलेल्या सुरक्षितता सूचना तुम्हाला संभाव्य समस्यांचा इशारा देतात आणि सुरक्षित राहण्यात तुम्हाला मदत करतात

  ज्याबद्दल तुम्हाला माहीत व्हावे असे काही आम्हाला सापडल्यास आम्ही तुम्हाला स्वतःहून सूचित करू, जसे की संशयास्पद लॉग इन किंवा हानिकारक वेबसाइट, फाइल किंवा अॅप, आणि तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे संरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन पुरवू. उदाहरणार्थ, Gmail वर, तुम्ही तुमची सुरक्षितता धोक्यात आणू शकणारी एखादी अटॅचमेंट डाउनलोड करण्याआधी किंवा कोणीतरी तुमच्या खात्यामध्ये तुमच्याशी संबद्ध नसलेल्या डिव्हाइसवरून लॉग इन केल्यास आम्ही तुम्हाला चेतावणी देऊ. आम्हाला तुमच्या खात्यात काही संशयास्पद सापडल्यावर, आम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये सूचना पाठवू जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्याचे एका क्लिकमध्ये संरक्षण करता येईल.

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.