आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही विकत नाही

तुम्हाला Google उत्पादनांमध्ये, भागीदार वेबसाइटवर आणि मोबाइल अॅप्सवर सुसंबद्ध जाहिराती दिसाव्यात यासाठी आम्ही डेटा वापरतो. या जाहिराती आमच्या सेवांना निधी मिळवून देत असल्या आणि पर्यायाने त्या सर्वांसाठी मोफत करण्यात मदत करत असल्या तरी त्यासाठी आम्ही आमच्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती विकत नाही हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला दिसणाऱ्या जाहिरातींवर तुमचे नियंत्रण असावे यासाठी आम्ही तुम्हाला अतिशय प्रभावी जाहिरात सेटिंग्ज उपलब्ध करून देतो.

Google जाहिराती कसे काम करतात हे समजून घेणे

 • तुमच्यासाठी जाहिराती आणखी सुसंगत आणि उपयुक्त बनवण्यासाठी आम्ही डेटा वापरतो

  आमच्या सेवा आणखी उपयुक्त बनवण्यासाठी आणि सुसंगत जाहिराती दाखवण्यासाठी आम्ही डेटा वापरतो, ज्यामुळे आमच्या सेवा प्रत्येकासाठी मोफत बनवण्यात मदत होते. जाहिरातदारांना किंवा इतर तृतीय पक्षांना वैयक्तिकरीत्या तुमची ओळख पटू न देता, आम्ही तुमचे शोध आणि स्थान, तुम्ही वापरलेल्या वेबसायटी आणि अॅप्स, तुम्ही पाहिलेले व्हिडिओ व जाहिराती आणि तुमचा वयोगट व लिंग यांसारखी तुम्ही आम्हाला दिलेली प्राथमिक माहिती यांचा समावेश असलेला डेटा वापरू शकतो.

  तुमच्या जाहिरात सेटिंग्जवर अवलंबून आणि तुम्ही साइन इन केलेले असल्यास, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर आणि जाहिराती दाखवण्यासाठी आमच्याशी भागीदारी करणाऱ्या सायटींवर पाहत असलेल्या जाहिरातींना हा डेटा माहिती देतो. म्हणून तुम्ही तुमच्या अॉफिसमधील काँप्युटरवर एखाद्या प्रवास वेबसाइटला भेट दिल्यास, तुम्हाला त्या रात्री तुमच्या फोनवर पॅरिसच्या विमानभाड्याबद्दलच्या Google दाखवत असलेल्या इतर जाहिरातीदेखील दिसू शकतात.

 • जाहिराती दाखवण्यासाठी आम्हाला जाहिरातदारांकडून पैसे मिळतात

  आमच्या सेवा आणि आमच्याशी भागीदारी करणाऱ्या सायटी आणि अॅप्स दोन्हींवर how we make money with advertising याबद्दल आम्हाला पारदर्शक रहायचे आहे. काही प्रकारच्या जाहिरातींसाठी, जाहिरातदार आम्हाला फक्त त्या जाहिराती दाखवण्यासाठी पैसे देतात आणि इतर प्रकारांसाठी, ते आम्हाला त्या जाहिराती प्रत्यक्षात कशा परफॉर्म करतात यासाठी पैसे देतात. कोणीतरी एखादी जाहिरात पाहते किंवा तिच्यावर टॅप करते किंवा एखादे अॅप डाउनलोड करणे किंवा विनंती फॉर्म भरणे यांसारखी कृती करते त्या प्रत्येक वेळेचा त्यामध्ये समावेश होतो.

 • आम्ही जाहिरातदारांना त्यांच्या मोहिमांनी किती चांगले काम केले ते दाखवतो

  आम्ही जाहिरातदारांना त्यांच्या जाहिरातींच्या परफॉर्मंसबद्दलचा डेटा देतो, परंतु तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती उघड न करता आम्ही तसे करतो. तुम्हाला जाहिरात दाखवण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर, आम्ही तुमची वैयक्तिक माहिती संरक्षित आणि गोपनीय ठेवतो.

तुम्हाला तुमच्या Google जाहिरात अनुभवावर नियंत्रण मिळवून देणे

 • तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी Google कोणती माहिती वापरते ते नियंत्रित करा

  जाहिरात सेटिंग्ज मध्ये, तुमच्यासाठी जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी आम्ही कोणता डेटा वापरतो ते नियंत्रित करणे सोपे बनवतो. यामध्ये तुम्ही तुमच्या Google खात्यावर जोडलेली माहिती, तुम्हाला कशात रस आहे याचा तुमच्या अॅक्टिव्हिटीच्या आधारे आम्ही केलेला अंदाज आणि जाहिराती दाखवण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी करणाऱ्या इतर जाहिरातदारांशी परस्परसंवाद यांचा समावेश आहे.

  तुमची अॅक्टिव्हिटी आम्ही तुम्हाला काय दाखवतो त्यावर प्रभाव टाकते, परंतु तुम्ही नेहमी नियंत्रक असता. उदाहरणार्थ, तुम्ही सॉकर चाहते आहात असे आम्हाला वाटू शकते कारण तुम्ही YouTube वर नुकत्याच झालेल्या सामन्यातील हायलाइट पाहिले होते किंवा Google शोध वर “माझ्या जवळची सॉकर मैदाने” पाहिले होते. आणि तुम्ही एखाद्या भागीदार जाहिरातदाराच्या साइटवर वेळ घालवला असल्यास, आम्ही त्या भेटीच्या आधारे जाहिराती सुचवू शकतो.

  जाहिरात पर्सनलायझेशन सुरू असताना, तुम्ही कोणतीही माहिती – वय आणि लिंग, अनुमानित रस किंवा एखाद्या जाहिरातदाराशी मागील परस्परसंवाद – निवडू शकता, ते का वापरले जात आहे त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता, ते बंद करू शकता किंवा पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती पूर्णपणे बंद करू शकता. तुम्हाला तरीही जाहिराती दिसतील, परंतु त्या कमी सुसंगत असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

 • तुम्हाला जाहिराती दाखविण्यासाठी आम्ही कोणता डेटा वापरतो ते जाणून घ्या

  आम्ही तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी वापरत असलेला डेटा तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आम्हाला तुमची मदत करायची आहे. “ही जाहिरात का” हे एखादी जाहिरात तुम्हाला का दिसत आहे ते जाणून घेण्यात तुम्हाला मदत करणारे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कॅमेऱ्याची जाहिरात पाहत आहात कारण तुम्ही कॅमेरे शोधले होते, फोटोग्राफी वेबसायटींना भेटी दिल्या होत्या किंवा याआधी कॅमेऱ्याच्या जाहिरातींवर क्लिक केले होते. किंवा तुम्हाला एखादी रेस्टॉरंटची जाहिरात दिसल्यास, ती तुमच्या स्थानामुळे किंवा तुमच्या मोबाइल अॅप अॅक्टिव्हिटीमुळे दिसत आहे हे तुम्हाला कळू शकते. तुम्हाला उपयुक्त वाटतील अशा गोष्टीची जाहिरात दाखवण्यासाठी अशा प्रकारचा डेटा आम्हाला मदत करतो. पण लक्षात ठेवा, आम्ही यापैकी कोणतीही वैयक्तिक माहिती कधीही जाहिरातदारांसोबत शेअर करत नाही.

  तुम्ही हे वैशिष्ट्य आमच्या शोध, YouTube, Gmail, Play, आणि शॉपिंग यांसारख्या सेवांवर माहिती आयकनमार्फत अॅक्सेस करू शकता. आमच्या सेवा वापरणाऱ्या भागीदार सायटींवर किंवा अॅप्समध्ये तुम्ही पाहत असलेल्या बहुतेक जाहिरातींसाठी, तुम्ही त्यासारख्याच आयकनमार्फत “ही जाहिरात का” अॅक्सेस करू शकता.

 • तुम्हाला पाहायच्या नसलेल्या जाहिराती काढा

  आमच्या भागीदार वेबसायटी आणि अॅप्समधून आम्ही दाखवत असलेल्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्याबरोबर काढू शकता. जाहिरातीच्या कोपऱ्यातील X निवडून, तुम्हाला सुसंगत वाटत नसलेल्या जाहिराती तुम्ही काढू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला नवीन कार विकत घेण्यात रस असताना कारच्या जाहिराती उपयुक्त ठरल्या असत्या, पण तुम्ही तुमच्या नवीन वाहनात आनंदाने सफर करत असताना, तुम्हाला Google कडून तुम्ही नुकत्याच विकत घेतलेल्या कारच्या आणखी जाहिराती पाहायच्या नसू शकतात.

  तुम्ही साइन इन केलेले असल्यास आणि तुमच्या जाहिरात सेटिंग्जच्या आधारे, तुमच्या सर्व साइन इन केलेल्या डिव्हाइसवर आमच्यासोबत भागीदारी केलेल्या वेबसाइट आणि अॅप्सवर हे नियंत्रण अमलात येईल. तुमच्याकडे Chrome आणि इतर बहुतांश ब्राउझरमध्ये पॉप-अप जाहिराती बंद करण्याचा पर्यायदेखील आहे.

 • विशिष्ट जाहिरातदारांच्या जाहिराती बंद करा

  Google उत्पादने आणि इंटरनेट दोन्हींवर, तुमच्या जाहिरात अनुभवावर तुमचे नियंत्रण आहे. काही वेळा, तुम्ही जाहिरातदारांच्या सायटींना भेट दिल्यावर ते तुम्हाला जाहिराती दाखवतात आणि ते तुम्हाला परत येण्यासाठी प्रोत्साहन देतात – जसे की, तुम्ही याआधी खरेदी करत असलेल्या बुटांची एखादी जाहिरात पाहता तेव्हा. तुम्हाला कोणत्याही कारणाने त्या पहायच्या नसल्यास, आमच्या Google मालमत्ता वर, जसे की शोध, YouTube आणि Gmail वर तुम्हाला फॉलो करणाऱ्या ठराविक जाहिरातदाराच्या त्या जाहिराती तुम्ही बंद करू शकता. इंटरनेटवर तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी आमच्याशी भागीदारी करणाऱ्या सायटी आणि अॅप्सवर तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींनादेखील हे सेटिंग लागू होते.

  साइन इन केलेले असताना आणि तुमच्या जाहिरात सेटिंग्ज मध्ये, जाहिराती दाखवणाऱ्या Google सेवांवरील विशिष्ट जाहिरातदारांच्या जाहिरातीदेखील तुम्ही बंद करू शकता.

तुमच्यासाठी जाहिराती अधिक उपयुक्त बनवण्याकरिता डेटा वापरणे

 • वैयक्तिकरीत्या आणखी सुसंगत बनण्यासाठी शोध जाहिराती तुमची अॅक्टिव्हिटी वापरतात

  तुम्ही Google शोध वापरता तेव्हा, सुसंगत शोध परिणामांसोबत जाहिराती दिसू शकतात. बहुतेक वेळा, या जाहिराती तुम्ही नुकतेच केलेले शोध आणि तुमचे स्थान यांनी सूचित केलेल्या असतात. उदाहरणार्थ, तुम्ही “सायकली” शोधल्यास, तुम्हाला तुमच्या जवळच्या सायकल विक्रेत्यांच्या जाहिराती दिसू शकतात.

  इतर बाबतींत, आणखी उपयुक्त जाहिराती दाखवण्यात मदत करण्यासाठी आम्ही तुमचे मागील शोध किंवा तुम्ही भेट दिलेल्या सायटी यांसारखा अतिरिक्त डेटा वापरतो. तुम्ही आधीच “सायकली” शोधल्या असल्यामुळे, तुम्ही आता “सुट्ट्या” शोधल्यास, तुम्हाला सायकलीने सुट्टीवर जाण्याच्या ठिकाणांच्या शोध जाहिराती दिसू शकतात.

 • Gmail जाहिराती तुमच्या अॅक्टिव्हिटीवर आधारित असतात

  तुम्ही Gmail मध्ये पाहत असलेल्या जाहिराती तुमच्या Google खात्याशी संबंधित डेटावर आधारित आहेत. उदाहरणार्थ, YouTube किंवा शोध यासारख्या इतर Google सेवांमधील तुमची अॅक्टिव्हिटी तुम्ही Gmail मध्ये पाहत असलेल्या जाहिरातींच्या प्रकारावर परिणाम करू शकते. जाहिराती दाखवण्यासाठी Google तुमच्या इनबॉक्समधील कीवर्ड किंवा मेसेज वापरत नाही. तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी कोणीही तुमचे ईमेल वाचत नाही.

 • Google Play जाहिराती तुम्हाला आवडू शकतील असे अॅप्स शोधण्यात तुम्हाला मदत करतात

  आमच्या Google Play स्टोअर मध्ये तुम्हाला Google आणि इतर डेव्हलपरकडील लाखो अॅप्स सापडू शकतात. तुम्ही Android डिव्हाइसवर ब्राउझ करता तेव्हा, तुमच्या शोध संज्ञा, तुम्ही इंस्टॉल केलेली किंवा वापरलेली अॅप्स किंवा अॅपच्या तुम्ही वापरत असलेल्या अॅपशी असलेल्या सारखेपणाच्या आधारे जाहिराती दिसू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही “प्रवास अॅप्स” शोधल्यास, तुम्हाला प्रवासयोजना अॅपची जाहिरात दिसू शकेल.

 • आणखी सुसंगत बनण्यासाठी YouTube जाहिराती तुमची शोध आणि पाहण्याची अॅक्टिव्हिटी वापरतात

  तुम्ही YouTube वर व्हिडिओ पाहता तेव्हा, तुम्हाला व्हिडिओ पेजवर किंवा संबंधित व्हिडिओ म्हणून होम पेजवर आधीच जाहिराती प्ले होताना दिसू शकतात. तुम्ही पाहिलेले व्हिडिओ, तुम्ही शोधलेल्या गोष्टी किंवा ठिकाणे किंवा तुम्ही वापरत असलेली अॅप्स यासारख्या डेटावर जाहिराती आधारित असू शकतात.

  उदाहरणार्थ, तुम्ही “गृह सजावट” शोधल्यास किंवा स्वतःच करा व्हिडिओ पाहिल्यास, तुम्हाला गृह सुधारणा मालिकेसाठी एखादी जाहिरात दिसू शकेल. या जाहिराती तुम्ही पाहत असलेल्या व्हिडिओंच्या निर्माणकर्त्यांना साहाय्य करण्यात मदत करतात.

  अनेक YouTube जाहिराती तुम्हाला पहायच्या नसल्यास तुम्ही त्या वगळू शकता किंवा जाहिरातमुक्त YouTube चा आनंद घेण्यासाठी तुम्ही YouTube Premium चे सदस्यत्व घेऊ शकता.

 • खरेदीविषयक जाहिराती तुम्हाला हवी असलेली उत्पादने शोधण्यात मदत करतात

  तुम्ही Google शोध वर एखादे उत्पादन शोधता तेव्हा, काही वेळा आम्ही सुसंगत शोध परिणामांसोबत शॉपिंग जाहिराती दाखवतो. तुम्ही शोधत असलेले तुम्हाला झटपट सापडणे आणि ते तुम्हाला ऑनलाइन किंवा जवळपासच्या दुकानात खरेदी करता येणे तुमच्यासाठी सोपे करण्यासाठी उत्पादने विकणारे व्यवसाय शॉपिंग जाहिराती वापरतात. या जाहिराती तुम्ही नुकतेच शोधलेले उत्पादन, तुमचे स्थान आणि तुम्ही याआधी ब्राउझ केलेली ऑनलाइन दुकाने यांवर आधारित असतात.

  उदाहरणार्थ, तुम्ही “लेदर काउच” शोधल्यास, तुम्हाला फोटो, किमती आणि तुमच्या जवळच्या लेदर काउच विकत असलेल्या फर्निचरच्या दुकानांची स्थाने असलेल्या जाहिराती दिसू शकतात.

 • भागीदार वेबसाइट आणि अॅप्स तुमच्यासाठी आणखी उपयुक्त जाहिराती तयार करण्यासाठी तुमची ऑनलाइन अॅक्टिव्हिटी वापरतात

  जाहिराती दाखवण्यासाठी अनेक वेबसायटी आणि मोबाइल अॅप्स आमच्यासह भागीदार आहेत. या भागीदारांच्या सायटी आणि अॅप्सवर आम्ही जाहिराती दाखवतो तेव्हा, तुम्ही काय वाचत आहात किंवा पाहत आहात, आमच्या वापरकर्त्यांनी आमच्यासोबत शेअर केलेल्या वैयक्तिक माहितीवर आधारित प्रेक्षकांचे “प्रकार” आणि तुमच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटींबद्दल आम्ही गोळा करत असलेला डेटा यांवर त्या आधारित असतात: उदाहरणार्थ, “प्रवासात रस असलेल्या ३५ ते ४४ वर्षे वयोगटातील स्त्रिया”.

  तुमच्या Google खात्यामध्ये लॉग इन केलेले असताना तुम्ही भेट दिलेल्या सायटी किंवा Chrome ब्राउझिंग अॅक्टिव्हिटी यांवर आधारित जाहिरातीदेखील आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या ऑनलाइन शॉपिंग कार्टमध्ये जोडलेल्या, परंतु खरेदी न करण्याचे ठरवलेल्या हायकिंग शूजची एखादी जाहिरात तुम्हाला दिसू शकते. मात्र, आम्ही हे तुमचे नाव, ईमेल अॅड्रेस किंवा बिलिंग माहिती यांसारखी वैयक्तिक माहिती उघड न करता करत असतो.

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.