तुम्ही नियंत्रक आहात

गोपनीयतेच्या बाबतीत एकच गोष्ट सर्वांना लागू होत नाही हे आम्हाला माहीत आहे, म्हणून आम्ही तुमच्या Google खात्यामध्ये प्रभावी, वापरण्यास सोपी गोपनीयता टूल बिल्ड करतो. ती तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेल्या गोपनीयता सेटिंग्जवर आणि आम्ही कोणत्या प्रकारचा डेटा गोळा करतो आणि आमच्या सेवांवर वापरतो यांवर नियंत्रण मिळवून देतात.

Google वर डेटा कसा वापरला जातो ते नियंत्रित करा

 • तुमच्या Google खात्यात सेव्ह केलेला डेटा नियंत्रित करा

  तुम्हाला तुमची माहिती, गोपनीयता आणि सुरक्षितता सेटिंग्ज सर्व एकाच ठिकाणी सापडू शकते – तुमचे Google खाते. आम्ही डॅशबोर्ड आणि माझी अॅक्टिव्हिटी सारखी वापरण्यास सोपी टूल तयार केली आहेत, जी Google सेवांवरील तुमच्या अॅक्टिव्हिटीवरून गोळा केलेल्या डेटावर तुम्हाला पारदर्शकता देते. अॅक्टिव्हिटी कंट्रोल आणि जाहिरात सेटिंग्ज यांसारखी शक्तिशाली गोपनीयता नियंत्रणेदेखील आहेत, जी तुम्हाला संपूर्ण Google तुमच्यासाठी आणखी चांगले काम कसे करू शकते हे ठरवण्यासाठी डेटाचे संकलन आणि वापर सुरू किंवा बंद करू देतात.

 • तुमच्या गोपनीयता तपासणीसोबत तुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज निवडा

  फक्त काही मिनिटांत, आम्ही गोळा करत असलेला डेटा तुम्ही व्यवस्थापित करू शकता, तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत काय शेअर करता किंवा काय सार्वजनिक करता ते अपडेट करू शकता आणि तुम्हाला आमच्याकडून कोणत्या जाहिराती पहायच्या आहेत ते अॅडजस्ट करू शकता. ही सेटिंग्ज तुम्ही तुम्हाला हवे तितक्या वेळा बदलू शकता आणि तुम्हाला तुमची सद्य सेटिंग्ज लक्षात ठेवण्यात मदत करण्यासाठी नियमित रिमाइंडर मिळवणेदेखील निवडू शकता.

 • सोपी सुरू/बंद नियंत्रणे तुम्हाला तुमच्या खात्यावर कोणता डेटा सेव्ह केला जावा ते निवडू देतात

  नकाशे मधील आणखी चांगल्या प्रवास पर्यायांपासून शोध मधील आणखी जलद परिणामांपर्यंत, आम्ही तुमच्या खात्यावर सेव्ह करत असलेला डेटा Google सेवांना तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनवू शकतो. अॅक्टिव्हिटी कंट्रोल वापरून, तुमचा Google सेवांवरील अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमच्या खात्यासोबत कोणत्या प्रकारची अॅक्टिव्हिटी संबद्ध व्हावी हे तुम्ही ठरवू शकता आणि तुमची शोध व ब्राउझिंग अॅक्टिव्हिटी, स्थान इतिहास आणि तुमचा फोन, लॅपटॉप किंवा टॅबलेटवरील माहिती यांसारख्या विशिष्ट प्रकारच्या डेटाचे संकलन थांबवू शकता.

 • माझी अॅक्टिव्हिटी येथील तुमच्या खात्यावर कोणता डेटा सेव्ह केला जातो ते पहा आणि तो नियंत्रित करा

  माझी अॅक्टिव्हिटी हे असे मध्यवर्ती ठिकाण आहे जेथे तुम्हाला तुम्ही शोधलेली, पाहिलेली आणि आमच्या सेवा वापरून पाहिलेली प्रत्येक गोष्ट सापडू शकते. तुम्हाला तुमची मागील अॅक्टिव्हिटी आठवणे आणखी सोपे बनवण्यासाठी, आम्ही तुम्हाला विषय, तारीख आणि उत्पादन यांनुसार शोधण्यासाठी टूल देतो. तुम्हाला तुमच्या खात्याशी संबद्ध असायला नको असलेल्या विशिष्ट अॅक्टिव्हिटी किंवा एंट्री विषयदेखील तुम्ही कायमचे हटवू शकता.

 • डॅशबोर्ड मध्ये तुमच्या Google खात्यामधील डेटा पहा आणि व्यवस्थापित करा

  तुम्ही वापरत असलेल्या Google उत्पादनांचे आणि त्या प्रत्येकातील डेटाचे अवलोकन करणे आम्ही सोपे बनवतो, सर्व काही एकाच ठिकाणी. तुम्ही तुमच्या मागील महिन्यातील Google अॅक्टिव्हिटीचे पुनरावलोकन करू शकता; तुमच्याकडे किती ईमेल, दस्तऐवज आणि फोटो आहेत ते पाहू शकता आणि Gmail सेटिंग्जबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. गरज असल्यास तुम्हाला सुसंगत उत्पादन सेटिंग्ज आणि संबंधित मदत केंद्र लेखांचा झटपट अॅक्सेसदेखील मिळतो.

 • तुमचा डेटा डाउनलोड करा सोबत तुमचा आशय कुठेही न्या

  तुमचे फोटो. तुमचे ईमेल. तुमचे संपर्क. तुमचे बुकमार्कदेखील. तुमच्या Google खात्यामध्ये सेव्ह केलेल्या डेटावर तुमचे नियंत्रण आहे. म्हणूनच आम्ही तुमचा डेटा डाउनलोड करा तयार केले – जेणेकरून तुम्ही त्याची प्रत बनवू शकता, त्याचा बॅकअप घेऊ शकता किंवा तो दुसऱ्या सेवेवरदेखील हलवू शकता.

  तुम्ही Google Photos, Drive, Calendar आणि Gmail यासह Google सेवांमधून एकाहून अधिक फॉरमॅटमध्ये डेटा डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही तो डेटा थेट Dropbox, Microsoft OneDrive आणि Box यासारख्या सेवांमध्ये एक्सपोर्ट करू शकता.

 • इतरांना तुमच्याशी संपर्क साधणे सोपे बनवण्यासाठी कोणती प्राथमिक माहिती शेअर करायची ते ठरवा

  Hangouts, Gmail आणि फोटो यांसारख्या Google सेवांवर तुम्हाला शोधण्यात आणि तुमच्याशी संपर्क साधण्यात इतरांना मदत करण्यासाठी तुमचे नाव, ईमेल आणि फोन नंबर यांसारखी तुमची वैयक्तिक माहिती तुम्ही व्यवस्थापित करू शकता.

 • तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी Google कोणती माहिती वापरते ते नियंत्रित करा

  जाहिरात सेटिंग्ज मध्ये, तुमच्यासाठी जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी आम्ही कोणता डेटा वापरतो ते नियंत्रित करणे आम्ही सोपे बनवतो. यामध्ये तुम्ही तुमच्या Google खात्यावर जोडलेली माहिती, तुम्हाला कशात रस आहे याचा तुमच्या अॅक्टिव्हिटीच्या आधारे आम्ही केलेला अंदाज आणि जाहिराती दाखवण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी करणाऱ्या इतर जाहिरातदारांशी परस्परसंवाद यांचा समावेश आहे.

  तुमची अॅक्टिव्हिटी आम्ही तुम्हाला काय दाखवतो त्यावर प्रभाव टाकते, परंतु तुम्ही नेहमी नियंत्रणात असता. उदाहरणार्थ, तुम्ही सॉकर चाहते आहात असे आम्हाला वाटू शकते कारण तुम्ही YouTube वर नुकत्याच झालेल्या सामन्यातील हायलाइट पाहिले होते किंवा Google शोध वर “माझ्या जवळची सॉकर मैदाने” पाहिले होते. आणि तुम्ही एखाद्या भागीदार जाहिरातदाराच्या साइटवर वेळ घालवला असल्यास, आम्ही त्या भेटीच्या आधारे जाहिराती सुचवू शकतो.

  जाहिरात पर्सनलायझेशन सुरू असताना, तुम्ही कोणतीही माहिती – वय आणि लिंग, अनुमानित रस किंवा एखाद्या जाहिरातदाराशी मागील परस्परसंवाद – निवडू शकता, ते का वापरले जात आहे त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता, ते बंद करू शकता किंवा पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती पूर्णपणे बंद करू शकता. तुम्हाला तरीही जाहिराती दिसतील, परंतु त्या कमी सुसंगत असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

 • गुप्त मोडमध्ये गुप्तपणे इंटरनेट ब्राउझ करा

  तुमचा ऑनलाइन इतिहास तुमच्या शोध परिणामांना आणखी उपयुक्त बनवण्यात मदत करू शकतो, मात्र काही वेळा तुम्हाला खाजगीपणे ब्राउझ करायचे असू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा काँप्युटर तुमच्या जोडीदारासोबत शेअर करत असल्यास, तुम्ही शोधत असलेल्या वाढदिवसाच्या भेटीतल्या सरप्राइझची गंमत तुमच्या ब्राउझिंग इतिहासामुळे निघून जाणे तुम्हाला नको असेल. अशा क्षणांसाठी, Chrome ला तुमचा ब्राउझिंग इतिहास सेव्ह करण्यापासून रोखण्यासाठी तुमच्या काँप्युटरवर किंवा मोबाइल डिव्हाइसवर गुप्त विंडो उघडा.

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.