कुटुंबस्नेही अनुभवाचे निर्माण

तुमच्या कुटुंबाला आमच्या उत्पादनांचा पूरेपूर अनुभव घेता यावा यासाठी आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये स्मार्ट फिल्टर, साइट ब्लॉकर आणि आशय रेटिंग अशी खास वैशिष्ट्ये देऊ केली आहेत.

मुलांसाठी आशय आणि अनुभव शोधणे

 • लहान मुलांसाठी YouTube सोबत शिक्षणाचे आणि गमतीचे जग शोधा

  मुलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण असावे म्हणून जगभरातील मुलांसाठी ऑनलाइन व्हिडिओंमार्फत त्यांचे रस एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही लहान मुलांसाठी YouTube तयार केले. पालक नियंत्रणांच्या संचामधून गमतीचे कौटुंबिक अनुभव निवडणे आम्ही तुमच्यासाठी आणखी सोपे बनवतो:

  • तुमची मुले व्हिडिओ पाहण्यात किती वेळ घालवू शकतात त्यावर मर्यादा घालण्यासाठी टायमर सेट करा.
  • तुमच्या मुलांना फक्त विश्वासू तृतीय पक्षांनी किंवा लहान मुलांसाठी YouTube टीमने निवडलेली चॅनेलची संकलने पाहू द्या.
  • तुमच्या मुलांनी “ते पुन्हा पहा” मध्ये नुकतेच काय पाहिले त्यावर लक्ष ठेवा.
  • लहान मुलांसाठी YouTube टीमने पडताळणी केलेल्या चॅनेलच्या आणखी मर्यादित अनुभवासाठी शोध बंद करा.
  • तुमच्या मुलाच्या अॅपमध्ये व्हिडिओ दिसण्यापासून थांबवण्यासाठी ते ब्लॉक करा.
  • अॅपमध्ये असावेत असे तुम्हाला वाटत नसलेले व्हिडिओ परीक्षणासाठी फ्लॅग करा.

  लहान मुलांसाठी YouTube मधील व्हिडिओ कुटुंबासाठी अनुकूल ठेवण्यासाठी एकत्रपणे, आम्ही फिल्टर, वापरकर्ता फीडबॅक आणि मानवी परीक्षणकर्ते यांचे मिश्रण वापरतो. परंतु कोणतीही सिस्टम परिपूर्ण नसते आणि अयोग्य व्हिडिओ निसटून आत येऊ शकतात, त्यामुळे आम्ही सातत्याने आमच्या संरक्षक योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आणखी जास्त पालक नियंत्रणे देण्यासाठी काम करत आहोत.

 • Google Play वर कुटुंबांसाठी एक स्वागतशील जागा तयार करणे

  तुमच्या मुलासाठी काय योग्य आहे हे ठरवण्यात तुम्हाला मदत होण्यासाठी, परीक्षणे वाचा आणि अॅप्स आणि गेमवर कुटुंब स्टार बॅज शोधा. कुटुंब स्टार असे सूचित करतो की आशयाचे अधिक काळजीपूर्वक परीक्षण केले गेले आहे आणि मुलांना लक्षात ठेवून तो डेव्हलप केला गेला आहे. त्यामध्ये आशयासाठी सुचवलेला वयोगटदेखील आहे.

  तुमच्या मुलासाठी काय योग्य आहे हे ठरवण्यासाठी एखाद्या अॅपची प्रगल्भता समजून घेण्याकरिता आशय रेटिंग तपासा आणि त्या रेटिंगच्या आधारे फिल्टर सेट करा. एखाद्या अॅपमध्ये जाहिराती, अॅपमधील खरेदी आहेत का किंवा त्याला डिव्हाइस परवानगीची गरज आहे का हे तुम्हाला माहीत करून घ्यायचे असल्यास, तुम्ही अॅपच्या स्टोअर पेजवरील अतिरिक्त माहिती विभाग तपासू शकता.

 • Google असिस्टंट वापरून तुमच्या कुटुंबासोबत आनंद घेण्यासाठी अनुभव शोधा

  तुमच्या असिस्टंट कडे संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करण्यासाठी अॅक्टिव्हिटी आहेत – कुटुंबाच्या गेम नाइटमध्ये मदत करण्यापासून ते संगीत खुर्ची खेळण्यापर्यंत सर्व काही. कुटुंबांसाठी असिस्टंट कार्यक्रमामध्ये सध्या ५० पेक्षा जास्त गेम, अॅक्टिव्हिटी आणि गोष्टी आहेत. यांतील प्रत्येक अॅक्टिव्हिटीचे आमच्या विश्वास आणि सुरक्षा टीमने परीक्षण केले आहे आणि तिला मंजुरी दिली आहे, म्हणून त्या कुटुंबाला अनुकूल असतील हे तुम्ही जाणताच.

तुमच्या कुटुंबाचा अनुभव ऑनलाइन व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला टूल देणे

 • सुरक्षितशोध फिल्टरनी Google शोध वर भडक साइट ब्लॉक करा

  सुरक्षितशोध हे सेटिंग पोर्नोग्राफी आणि ग्राफिक हिंसा टाळण्यासाठी Google शोध परिणामांवरून भडक इमेज, व्हिडिओ आणि वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी डिझाइन केले आहे. पण लक्षात घ्या, की ते परिपूर्ण टूल नाही आणि ते असूनही तुम्हाला भडक परिणाम दिसू शकतात. असे झाल्यास तुम्ही त्याची तक्रार करू शकता. अशा प्रकारचा फीडबॅक आम्हाला सुरक्षितशोध सेटिंग अधिक चांगले बनवण्यात मदत करतो.

 • प्रतिबंधित मोडने YouTube वर प्रौढ व्हिडिओ ब्लॉक करा

  YouTube प्रतिबंधित मोड सेटिंग सुरू करून, तुमच्या किशोरवयीन मुलांनी पाहू नये असे तुम्हाला वाटत असलेला संभाव्य प्रौढ आशय काढून टाकण्यात आम्ही मदत करू शकतो. आमच्या परीक्षणकर्त्यांच्या टीमने वयानुसार प्रतिबंधित केलेले व्हिडिओ फिल्टर करण्यासोबतच, आमची ऑटोमेटेड सिस्टम व्हिडिओचा मेटाडेटा, शीर्षक आणि व्हिडिओमध्ये वापरलेली भाषा यांसारखे संकेत देखील पाहते. प्रतिबंधित मोड सुरू केलेला असताना, नको असलेली चर्चा टाळण्यासाठी तुम्ही पाहत असलेल्या व्हिडिओंवरील टिप्पण्यादेखील तुम्हाला पाहता येणार नाहीत.

 • Google Wifi सोबत डिव्हाइस टाइम आउट सेट करा आणि अयोग्य आशय ब्लॉक करा

  तुमची मुले योग्य आशय पाहत आहेत याची खात्री करण्यात Google Wifi तुम्हाला मदत करते. वाईट गोष्टी टाळण्यात मदत करण्यासाठी, पोर्नोग्राफी किंवा ग्राफिक हिंसा असलेल्या सायटींसारख्या लाखो भडक वेबसाइट तुमच्या मुलाच्या डिव्हाइसवरून आपोआप ब्लॉक करण्याकरिता Google Wifi प्रगत साइट ब्लॉकिंग देऊ करते. गृहपाठाची वेळ, बाहेर खेळण्याची वेळ किंवा झोपण्याची वेळ यांसारख्या महत्त्वाच्या क्षणांदरम्यान तुम्ही वाय-फाय पॉजदेखील शेड्युल करू शकता. Google Wifi सोबत येणारी लेबल वैशिष्ट्ये वापरून, तुम्ही तुमच्या नेटवर्कवरील प्रत्येक डिव्हाइससाठी वेगवेगळी फिल्टर आणि पॉजदेखील लागू करू शकता.

आणखी सुरक्षित, आणखी संरक्षित ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांना टूल देणे

 • G Suite शैक्षणिक मध्ये सुरक्षितता निर्माण करणे

  G Suite शैक्षणिक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना डिव्हाइसवर सुरक्षितपणे परस्परसंवाद साधण्यात मदत करते. G Suite शैक्षणिक कोअर सेवांमध्ये जाहिराती नसतात आणि प्राथमिक ते माध्यमिक (K-12) शाळांमधील G Suite शैक्षणिक वापरकर्त्यांसाठी, जाहिराती लक्ष्य करण्याकरिता आम्ही कोणतीही वापरकर्ता वैयक्तिक माहिती वापरत नाही. योग्य अॅक्टिव्हिटींभोवती धोरणे सेट करण्यात अॅडमिनिस्ट्रेटरना मदत करण्यासाठी आम्ही टूलदेखील पुरवतो आणि शालेय Google खाती वापरणाऱ्या विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यात मदत करतो. शाळांमधील G Suite शैक्षणिक वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवांबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी शाळांना टूल आणि संसाधने पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

 • Chromebooks वर्गांसाठी सुरक्षित आहेत याची खात्री करणे

  लाखो विद्यार्थी वर्गामध्ये Chromebooks – Google चे लॅपटॉप – वापरतात. शाळा निवडेल त्यानुसार विद्यार्थ्यांना जास्त किंवा कमी कार्यक्षमता किंवा अॅक्सेस देण्यासाठी आम्ही अॅडमिनिस्ट्रेटरना गट सेटिंग्ज व्यवस्थापित करू देतो. आमची गोपनीयता आणि सुरक्षा वैशिष्ट्ये मुलांचा वैयक्तिक डेटा संरक्षित ठेवण्यात मदत करतात आणि त्यांनी गेल्या चार वर्षांत Chromebooks ना यू.एस. के-१२ शाळांची आणि इतर देशांतील अनेक शाळांची टॉप निवड बनवण्यात मदत केली आहे.

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.