आमची गोपनीयता आणि सुरक्षितता तत्त्वे

आम्ही सर्वांसाठी उपयुक्त अशी गोपनीयता देऊ करतो. सर्वांसाठी विनामूल्य आणि अॅक्सेस करता येण्यासारखी उत्पादने आणि सेवा तयार करणे ही आमची जबाबदारी आहे. हे विशेषतः तंत्रज्ञानाची प्रगती आणि गोपनीयता विकसित होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आमच्या वापरकर्त्यांचा डेटा खाजगी, संरक्षित आणि सुरक्षित ठेवण्याकरिता आमची उत्पादने, आमच्या प्रक्रिया आणि आमच्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी या तत्त्वांचा अंगीकार करतो.

 1. १. वापरकर्त्यांचा आदर राखणे. त्यांच्या गोपनीयतेचा आदर राखणे.

  वापरकर्त्यांचा आदर म्हणजेच त्यांच्या गोपनीयतेचा आदर असे आम्हाला वाटते. आम्ही आजवर केलेल्या कामात आणि पुढे जातानाही सगळ्याच्या मुळाशी हेच तत्त्व अंगीकारलेले आहे. लोक जेव्हा आमची उत्पादने वापरतात, तेव्हा त्यांची माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल हा विश्वास बाळगतात आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवणे हे आमचे काम आहे. यासाठी आम्ही कोणता डेटा कसा वापरतो आणि त्याचे रक्षण कसे करतो याबाबत नेहमीच दक्ष असतो.

 2. २. आम्ही कोणता डेटा का संकलित करतो याबद्दलचे स्पष्ट धोरण.

  Google उत्पादने कशी वापरावीत याबद्दल लोकांना माहितीवर आधारित निर्णय घेता यावा यासाठी आम्ही कोणता डेटा का आणि कशासाठी संकलित करतो आणि तो कसा वापरावा हे समजणे सोपे करतो. ही माहिती समजण्यास सोप्या पद्धतीने मुक्तपणे आणि प्रक्रिया करण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध करून देणे म्हणजे पारदर्शकता.

 3. ३. आमच्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती कधीही कोणालाही न विकणे.

  शोध आणि नकाशे यासारखी Google उत्पादने शक्य तितकी उपयुक्त बनवण्यासाठी आम्ही डेटा वापरतो. जास्तीत जास्त उपयुक्त जाहिराती दाखवण्यासाठीही आम्ही डेटा वापरतो. या जाहिराती आमच्या सेवांना निधी मिळवून देत असल्या आणि पर्यायाने त्या सर्वांसाठी मोफत करण्यात मदत करत असल्या तरी त्यासाठी आम्ही आमच्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती विकत नाही हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे.

 4. ४. लोकांना त्यांच्या गोपनीयतेवर नियंत्रण मिळवून देणे सोपे करा.

  गोपनीयतेचा विषय आला की एकच पर्याय सर्वांसाठी लागू होत नाही हे आम्ही जाणतो. प्रत्येक Google खात्यामध्ये चालू/बंद होणारे डेटा कंट्रोल आहेत, त्यामुळे आमच्या वापरकर्त्यांना त्यांच्यासाठी योग्य अशी गोपनीयता सेटिंग्ज निवडता येतात. तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाते, तसतसे आमचे गोपनीयता कंंट्रोल देखील विकसित होत जातात. त्यामुळे आमच्या वापरकर्त्यांना त्यांच्या गोपनीयतेची निवड स्वत: करता येते.

 5. ५. डेटाचे पुनरावलोकन करणे, डेटा हलवणे आणि हटवणे सोपे करा

  वापरकर्त्याने आमच्यासोबत शेअर केलेल्या माहितीचा अॅक्सेस त्याला कधीही आणि कोणत्याही कारणासाठी हवा असल्यास मिळाला पाहिजे असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही लोकांना त्यांचा डेटा अॅक्सेस करणे, त्याचे पुनरावलोकन करणे, डेटा डाउनलोड करणे आणि वाटल्यास तो इतर सेवेवर हलवणे किंवा पूर्णपणे हटवणे सोपे करून दिले आहे.

 6. ६. आमच्या उत्पादनांमध्ये सर्वात मजबूत सुरक्षिततेचे तंत्रज्ञान तयार करा.

  आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा आदर राखणे म्हणजेच डेटाच्या संरक्षणाबाबत त्यांचा विश्वास सार्थ ठरवणे. आमच्या वापरकर्त्यांसाठी प्रत्येक Google उत्पादन आणि सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही जगातील सर्वात प्रगत सुरक्षेच्या पायाभूत सुविधा अमलात आणतो आणि त्यांचा उपयोग करतो. याचाच अर्थ, वाढते ऑनलाइन धोके आमच्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना शोधणे आणि त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही आमचे बिल्ट- इन सुरक्षा तंत्रज्ञान सातत्याने मजबूत करत आहोत.

 7. ७. सर्वांसाठी प्रगत ऑनलाइन सुरक्षितता मिळवण्यासाठी उदाहरणाद्वारे लीड करा.

  वापरकर्त्यांना ऑनलाइन सुरक्षित ठेवणे हे Google पुरतेच मर्यादित न राहता त्याचा विस्तार संपूर्ण इंटरनेटवर झाला आहे. आपण आज वापरत असलेले सुरक्षितता मानके तयार करणारी Google ही पहिली कंपनी होती आणि आम्ही नवीन सुरक्षितता तंत्रज्ञानामध्ये सतत अभिनव बदल घडवत आहोत जी प्रत्येकजण वापरू शकतो. आम्ही आमच्या सुरक्षितता शिकवण, अनुभव आणि टूल जगभरातील भागीदार, संस्था आणि स्पर्धक यांच्याशी शेअर करतो, कारण इंटरनेटमधील विस्तारीत सुरक्षिततेसाठी उद्योगाच्या विस्तारीत कोलॅबोरेशनची आवश्यकता असते.

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.