आम्ही तुमची
वैयक्तिक माहिती खाजगी, सुरक्षित आणि संरक्षित ठेवतो.
Google मध्ये, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि उद्योगातील अग्रेसर सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चर, डेटाविषयक जबाबदार कार्यपद्धती आणि तुम्हाला नियंत्रण करू देणारी, वापरण्यास सोपी असलेली गोपनीयता टूल वापरून तिचे संरक्षण करतो.
जगातील सर्वात प्रगत सुरक्षा
यासोबत सुरू होते.
धोके तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ते आपोआप थांबवण्यासाठी डिझाइन केलेली बिल्ट-इन सुरक्षा वापरून तुमच्या गोपनीयतेचे संपूर्ण Google वर संरक्षण केले जाते.
तुमचा डेटा ट्रांझिटमध्ये असताना प्रगत एंक्रिप्शन तो सुरक्षित ठेवतो
एंक्रिप्शन आमच्या सेवांना सुरक्षिततेची उच्च पातळी आणि गोपनीयता प्रदान करते. तुम्ही ईमेल पाठवता, व्हिडिओ शेअर करता, वेबसाइटला भेट देता किंवा तुमचे फोटो स्टोअर करता तेव्हा, तुम्ही तयार केलेला डेटा तुमचे डिव्हाइस, Google सेवा आणि आमची डेटा केंद्रे यांमध्ये फिरतो. HTTPS आणि ट्रांसपोर्ट लेअर सिक्युरिटी यांसारख्या आघाडीच्या एंक्रिप्शन तंत्रज्ञानासह, सुरक्षिततेचे अनेक स्तर वापरून आम्ही या डेटाचे संरक्षण करतो.
प्रोअॅक्टिव्ह सुरक्षा इशारे तुमच्या खाजगी माहितीचे संरक्षण करण्यात मदत करतात
ज्याबद्दल तुम्हाला माहीत व्हावे असे काही - जसे की, संशयास्पद लॉगिन किंवा दुर्भावनापूर्ण वेबसाइट, फाइल किंवा अॅप - आम्हाला आढळल्यास, आम्ही तुम्हाला स्वतःहून सूचित करू आणि तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे संरक्षित राहण्यात मदत करण्यासाठी मार्गदर्शन करू. आम्हाला तुमच्या खात्यात एखादी संशयास्पद गोष्ट आढळल्यास, आम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये किंवा फोनवर सूचना पाठवू जेणेकरून, तुम्हाला तुमच्या खात्याचे एका क्लिकने संरक्षण करता येईल.
धोके आपोआप शोधले आणि ब्लॉक केले जातात
सुरक्षित ब्राउझिंग हे दररोज तुमच्या डिव्हाइसह चार अब्ज डिव्हाइसेसचे संरक्षण करते. इंटरनेट सर्वांसाठी सुरक्षित करण्याकरिता, Apple चे Safari आणि Mozilla चे Firefox यांसह, इतर कंपन्यांनी त्यांच्या ब्राउझरमध्ये वापरावे यासाठी आम्ही हे तंत्रज्ञान विनामूल्य केले आहे. त्यामुळे तुम्ही Google वर आणि त्यापलीकडेही ब्राउझ करता तेव्हा संरक्षित असता.
जी तुम्हाला नियंत्रण करू देतात.
तुमच्या Google खात्या मध्ये कोणता डेटा सेव्ह केला जातो ते नियंत्रित करा
गोपनीयतेचा विषय येतो तेव्हा, एकच उपाय सर्वांसाठी लागू होत नाही हे आम्ही जाणतो. म्हणूनच तुमच्यासाठी योग्य असणारी गोपनीयता सेटिंग्ज निवडण्यात आम्ही तुम्हाला मदत करतो. तुम्हाला तुमचा डेटा सेव्ह करायचा, हटवायचा किंवा ऑटो-डिलीट करायचा असल्यास, आम्ही तुम्हाला ते करण्यासाठी टूल देतो.
डेटाविषयक जबाबदार कार्यपद्धतींनी संरक्षण केले जाते.
तुम्ही दररोज वापरत असलेली उत्पादने आणि सेवा आणखी उपयुक्त बनवण्यात डेटा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा डेटा जबाबदारपणे हाताळण्यासाठी आणि कठोर प्रोटोकॉल व नाविन्यपूर्ण गोपनीयता तंत्रज्ञानांसह तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
आणखी मार्ग एक्सप्लोर करा.
-
बिल्ट-इन सुरक्षाऑटोमॅटिक सुरक्षा संरक्षणांबद्दल अधिक जाणून घ्या.
-
गोपनीयता नियंत्रणेतुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज निवडा.
-
डेटाविषयक कार्यपद्धतीजबाबदार डेटाविषयक कार्यपद्धतींसह आम्ही तुमच्या गोपनीयतेचा कसा आदर करतो त्याबद्दल अधिक जाणून घ्या.
-
सुरक्षेशी संबंधित टिपाऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी झटपट टिपा आणि सर्वोत्तम कार्यपद्धती शोधा.
-
जाहिराती आणि डेटातुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर दिसणार्या जाहिरातींबद्दल अधिक जाणून घ्या.