आम्ही कोणता डेटा गोळा करतो आणि का ते समजून घेणे सोपे करणे

तुम्ही Google सेवा वापरता तेव्हा तुम्हाला तुमचा डेटा आमच्याकडे सुरक्षित राहिल अशी खात्री वाटते. या विश्वासाला जागून आम्ही कोणता डेटा गोळा करते आणि तुम्हाला आमच्या सेवांचा आणखी उत्तम अनुभव यावा यासाठी त्या कशा प्रकारे वापरतो याबद्दल पारदर्शकता बाळगणे ही आमची जबाबदारी आहे.

आम्ही वापरत असलेल्या डेटाबद्दल पारदर्शक असणे

 • तुम्ही आमच्या सेवा वापरत असताना आम्ही गोळा करत असलेली माहिती

  तुम्ही आमच्या सेवा वापरता तेव्हा – उदाहरणार्थ, Google वर शोध घेताना, Google नकाशे वर दिशानिर्देश मिळवताना किंवा YouTube वर व्हिडिओ पाहताना – या सेवांनी आपल्यासाठी आणखी चांगले काम करण्याकरिता आम्ही डेटा गोळा करतो. यामध्ये हे समाविष्ट असू शकते:

  • तुम्ही शोधत असलेल्या गोष्टी
  • तुम्ही पाहत असलेले व्हिडिओ
  • तुम्ही पाहत किंवा क्लिक करत असलेल्या जाहिराती
  • तुमचे स्थान
  • तुम्ही भेट देत असलेल्या वेबसायटी
  • Google सेवा अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही वापरत असलेली अॅप्स, ब्राउझर आणि डिव्हाइस
 • तुम्ही तयार करता किंवा आम्हाला पुरवता ती माहिती

  तुम्ही Google खात्यासाठी साइन अप करता तेव्हा, तुम्ही आम्हाला वैयक्तिक माहिती पुरवता. तुम्ही साइन इन केलेले असल्यास, तुम्ही आमच्या सेवा वापरताना तयार केलेली माहिती आम्ही गोळा करतो आणि तिचे संरक्षण करतो. यात हे समाविष्ट असू शकते:

  • तुमचे नाव, वाढदिवस आणि लिंग
  • तुमचा पासवर्ड आणि फोन नंबर
  • Gmail वर तुम्ही लिहिलेले आणि मिळवलेले ईमेल
  • तुम्ही सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडिओ
  • तुम्ही ड्राइव्हवर तयार केलेले दस्तऐवज, पत्रके आणि स्लाइड
  • तुम्ही YouTube वर केलेल्या टिप्पण्या
  • तुम्ही जोडलेले संपर्क
  • कॅलेंडर इव्हेंट

Google सेवा तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनवण्याकरिता डेटा वापरणे

 • Google नकाशे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी लवकरात लवकर कसे पोहोचवते.

  तुम्ही Google नकाशे अॅपचा वापर करता तेव्हा, तुमचा फोन तुमच्या स्थानाबद्दल अॅनोनिमस डेटाचे बिट परत Google कडे पाठवतो. रहदारी पॅटर्न ओळखण्यासाठी हे तुमच्या जवळपासच्या लोकांकडील डेटासोबत एकत्रित केले जाते. उदाहरणार्थ, बरीच वाहने एकाच रस्त्यावरून धीम्या गतीने जात असताना नकाशे ते शोधू शकते आणि तुम्हाला प्रचंड रहदारी असल्याची माहिती देऊ शकते. त्यामुळे नकाशे तुम्हाला एखाद्या अपघाताची माहिती देते आणि तुम्हाला एखादा शॉर्टकट दाखवते, ते इतर चालकांकडून गोळ्या केलेल्या माहितीच्या आधारे असते हे तुम्हाला समजले असेलच.

 • तुमचे शोध Google कसे ऑटोकंप्लीट करते

  तुम्हाला माहीत आहे तुम्ही काहीतरी शोधताना चुकीचा शब्द टाइप होतो – आणि तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कुठल्यातरी प्रकारे Google ला कळते? ते तुमच्यासाठी दुरुस्त करण्यासाठी आमचे शब्दलेखन दुरुस्ती मॉडेल याआधी अशीच चूक केलेल्या लोकांकडील डेटा वापरते. त्यामुळेच तुम्ही “Barsalona” टाइप केल्यावर तुम्हाला “Barcelona” म्हणायचे असण्याची सर्वात जास्त शक्यता आहे ते आम्हाला कळते.

  तुमचा शोध इतिहासदेखील Google ला तुमचे शोध ऑटोकंप्लीट करण्यात मदत करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही याआधी “Barcelona flights” शोधले असल्यास, तुम्ही टायपिंग पूर्ण करण्याच्या आधीदेखील आम्ही शोध बॉक्समध्ये हे सुचवू शकतो. किंवा तुम्ही एखाद्या सॉकर टीमचे चाहते असल्यास आणि अनेकदा “Barcelona scores” शोधत असल्यास, आम्ही ते लगेच सुचवू शकतो.

 • तुम्हाला पहायचे असलेले व्हिडिओ YouTube कसे शोधते

  तुम्ही याआधी काय पाहिले आणि त्यासारखाच पाहण्याचा इतिहास असलेल्या लोकांनी याआधी काय पाहिले याच्या आधारे तुम्हाला आवडू शकतील अशा व्हिडिओंची YouTube शिफारस करते. प्रत्येकजण काय पाहत आहे याच्या आधारे काय लोकप्रिय आणि ट्रेंडिंग आहे याबद्दलदेखील आम्हाला संकेत मिळतात. हे आम्हाला विविध जॉनरचे – जसे की पॉप म्युझिक ट्रॅक, कसे करावे ट्युटोरियल आणि बातम्या – व्हिडिओ सुचवण्यात मदत करते.

 • Chrome ऑटोफिल तुमच्यासाठी फॉर्म कसे पूर्ण करते

  प्रत्येक वेळी तुम्ही खरेदी करता किंवा ऑनलाइन खात्यासाठी साइन अप करता तेव्हा, तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीसह फॉर्म भरण्यात वेळ घालवता. तुम्ही Chrome वापरता तेव्हा, तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल अॅड्रेस आणि पेमेंट माहिती यांसारख्या गोष्टी आम्ही सेव्ह करू शकतो, ज्यामुळे आम्ही हे फॉर्म तुमच्यासाठी ऑटोकंप्लीट करू शकतो. तुम्ही कधीही विशिष्ट ऑटोफिल भाग संपादित करू शकता किंवा हे सेटिंग पूर्णपणे बंद करू शकता.

 • तुमची स्वतःची माहिती शोधण्यात Google शोध तुम्हाला कशी मदत करते

  Google शोध Gmail, Google फोटो, कॅलेंंडर, आणि बऱ्याच गोष्टींवरील उपयुक्त माहिती मिळवू शकते आणि ती तुमच्या खाजगी शोध परिणांमामध्ये दाखवू शकते, ज्यामुळे तुम्हाला स्वतः शोध घ्यावा लागत नाही. “माझ्या डेंटिस्टची नियोजित भेट”, “मला माझे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो दाखवा” किंवा “माझे हॉटेलचे आरक्षण कुठे आहे” यांसारख्या गोष्टी शोधा. तुम्ही साइन इन केलेले असेपर्यंत, आम्ही इतर Google सेवांमधून ही माहिती काढतो आणि ती तुम्हाला फक्त एका पायरीमध्ये देतो.

 • Google असिस्टंट तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यात कशी मदत करेल

  तुम्ही घरी असा किंवा फिरतीवर, असिस्टंट तुम्हाला नेहमीच मदत करेल. तुम्ही असिस्टंटला प्रश्न विचारता किंवा काय करायचे ते सांगता, तेव्हा असिस्टंट तुम्हाला जे हवे ते देण्यासाठी इतर Google सेवांवरील डेटा वापरेल. उदाहरणार्थ, तुम्ही “जवळपास कोणती कॉफीची दुकाने आहेत?” किंवा “मला उद्या छत्री लागेल काय?” असे विचारले, तर तुम्हाला सर्वात सुसंगत उत्तर देण्यासाठी असिस्टंट नकाशे आणि शोध यांवरील माहिती, त्याचप्रमाणे तुमचे स्थान, रस आणि प्राधान्ये यांचा वापर करेल. तुमच्या असिस्टंट सोबतच्या परस्परसंवादावरून गोळा केलेला डेटा पाहण्यासाठी किंवा हटवण्यासाठी तुम्ही कधीही तुमच्या Google खात्यामधील माझी अॅक्टिव्हिटी टूलला भेट देऊ शकता.

तुमची गोपनीयता विचारात घेऊन उत्पादनांची निर्मिती करणे

 • गोपनीयतेचे परीक्षण ही आमच्या उत्पादन डेव्हलपमेंटमधील महत्त्वाची पायरी आहे

  आम्ही आमच्या अंतर्गत गोपनीयता टीमवर आणि कोणत्याही नवीन उत्पादन लाँचसाठी व्यापक परीक्षण प्रक्रियेवर अवलंबून राहतो. आम्ही गोपनीयतेला सर्वाधिक महत्व देण्यासाठी उत्पादन डेव्हलपमेंटच्या प्रत्येक पातळीवर समर्पित आहोत – इंजिनीअरिंग ते उत्पादन व्यवस्थापन. लोक दररोज आनंद घेत असलेल्या Google उत्पादनांवर विश्वास ठेवू शकतील याची खात्री करण्यात हे मदत करते.

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.