सहकार्यातून अधिक प्रभावी इंटरनेट सुरक्षा देऊ करणे

Google गेली कित्येक वर्षे जगभरातील संस्था, स्पर्धक कंपन्या आणि भागीदारांसोबत आपले ज्ञान, सुरक्षा तंत्रज्ञाने आणि अनुभव शेअर करते आहे. सुरक्षेला अधिकाधिक धोके निर्माण होत असल्याने वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि अधिक सुरक्षित इंटरनेटची निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारचे उद्योगव्यापी सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

आपले सुरक्षितता उपाय शेअर केल्याने आपल्याला एकत्रितपणे इंटरनेट आणखी सुरक्षित बनवण्यात मदत होते

 • सुरक्षित ब्राउझिंग सोबत धोकादायक सायटी, अॅप्स आणि जाहिरातींपासून तुमचे संरक्षण करणे

  वेब वापरकर्ते धोकादायक वेबसायटींना भेट देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना इशारा देऊन मालवेअर आणि फिशिंग प्रयत्नांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आमचे Safe Browsing तंत्रज्ञान तयार केले आहे. सुरक्षित ब्राउझिंग फक्त Chrome वापरकर्त्यांचेच नाही, तर इतर बऱ्याच गोष्टींचे संरक्षण करते. सुरक्षित ब्राउझिंग फक्त Chrome वापरकर्त्यांचेच नाही, तर इतर बऱ्याच गोष्टींचे संरक्षण करते. प्रत्येकाला इंटरनेट आणखी सुरक्षितरीत्या वापरता यावे यासाठी आम्ही हे तंत्रज्ञान Apple चा Safari आणि Mozilla चा Firefox यांसारख्या इतर ब्राउझरमध्ये मोफत वापरण्यासाठी इतर कंपन्यांना उपलब्ध करून दिले आहे. आजच्या घडीला ३ अब्जांपेक्षा जास्त डिव्हाइस सुरक्षित ब्राउझिंग ने संरक्षित केलेली आहेत. वेबसाइट मालकांच्या सायटींमध्ये सुरक्षितता दोष असतात तेव्हा आम्ही त्यांनादेखील इशारा देतो आणि त्यांच्या समस्या झटपट सोडवण्यासाठी मोफत टूल देऊ करतो.

 • इंटरनेट ब्राउझ करताना HTTPS एंक्रिप्शन तुम्हाला सुरक्षित ठेवते

  आमच्या सेवांना HTTPS एंक्रिप्शनचे साहाय्य दिल्याने तुम्ही सायटींशी कनेक्ट करू शकता आणि कोणीही मध्येच हिरावून न घेता क्रेडिट कार्ड नंबरसारखी तुमची खाजगी माहिती तुम्ही एंटर करू शकता याची खात्री केली जाते. या अतिरिक्त सुरक्षिततेसाठी इतर वेबसायटींना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही डेव्हलपरसाठी साधने आणि स्‍त्रोत ऑफर करतो. HTTPS एन्क्रिप्शन एक निकष आहे जे आमच्या शोध परिणामांमध्ये वेबसायटींना रँक करताना Google शोध अल्गोरिदम वापरते. हे [HSTS preloading] वापरणाऱ्या .google किंवा .app सारख्या टॉप-लेव्हल डोमेनसाठी देखील वापरले जाते (https://security.googleblog.com/2017/09/broadening-hsts-to-secure-more-of-web.html), जे या डोमेनवर HTTPS च्या वापराची अंमलबजावणी करते.

 • डेव्हलपरसाठी सुरक्षितता टूल उपलब्ध करून देणे, ज्यामुळे ते सुरक्षितता धोके रोखण्यात मदत करू शकतील

  आमचे तंत्रज्ञान शेअर केल्याने ते इतरांसाठी मूल्य पुरवू शकेल असे आम्हाला वाटते तेव्हा आम्ही ते शेअर करतो. उदाहरणार्थ, आम्ही आमचे Google क्लाउड सुरक्षितता स्कॅनर डेव्हलपरसाठी मोफत उपलब्ध करून देतो, ज्यामुळे ते त्यांची वेब अॅप्लिकेशन सुरक्षितता धोक्यांसाठी App Engine मध्ये स्कॅन आणि विश्लेषित करू शकतात.

 • प्रोजेक्ट शील्ड बातम्या वेबसायटींना बंद केले जाण्यापासून रोखते

  Project Shield ही वितरित सेवा देण्यास नकार (DDoS) हल्ल्यांपासून बातम्या, मानवाधिकार आणि निवडणूक सायटींचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी आमचे तंत्रज्ञान वापरणारी सेवा आहे. हे हल्ले म्हणजे वेबसायटी काढून घेण्याचे आणि मतदारांना खोट्या ट्रॅफिकने दडपून टाकून त्यांना अत्यावश्यक माहिती अॅक्सेस करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न असतात. वेबसाइटचा आकार किंवा हल्ल्याचा आकार काहीही असो, प्रोजेक्ट शील्ड नेहमीच मोफत असते.

उद्योगात अग्रणी सुरक्षिततेतील नावीन्य आणि पारदर्शकता

 • आमच्या सर्वाधिक शक्तिशाली सुरक्षिततेने धोक्यात असणाऱ्या वापरकर्त्यांचे लक्ष्य केलेल्या हल्ल्यांपासून संरक्षण करणे

  सुरक्षिततेबाबत सर्वात जास्त जागरूक असलेल्या वापरकर्त्यांनादेखील फिशिंग घोटाळे किंवा इतर अत्याधुनिक आणि अत्यंत लक्ष्यित हल्ले फसवू शकतात. धोरण तयार करणारे, मोहीम टीम, पत्रकार, कार्यकर्ते, आघाडीचे व्यावसायिक किंवा ज्यांना आपल्याला अत्याधुनिक डिजिटल हल्ल्यांपासून धोका आहे असे वाटणाऱ्या इतर कोणत्याही लोकांसारख्या लक्ष्यित हल्ल्यांपासून सर्वात जास्त धोका असलेल्यांच्या वैयक्तिक Google खात्यांच्या संरक्षक योजनांसाठी डिझाइन केलेला सर्वाधिक शक्तिशाली सुरक्षितता प्रगत संरक्षण प्रोग्राम Google देऊ करते.

 • आणखी सुरक्षित इंटरनेट जोपासण्यासाठी आमच्या पद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वांबद्दल डेटा शेअर करणे

  २०१० पासून आम्ही Transparency Report प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये फिशिंग आणि मालवेअर शोध आणि सुरक्षित ब्राउझिंग सारखे सुरक्षितता उपक्रम यांसारख्या गोष्टींवरील आकडेवारी समाविष्ट आहे. वेबसायटी आणि ईमेलसाठी उद्योगाने एंक्रिप्शनचा केलेला अवलंब यावरील डेटादेखील आम्ही शेअर करतो. आम्ही हे फक्त आमची प्रगती आमच्या वापरकर्त्यांसोबत शेअर करण्यासाठी करत नाही, तर सर्वांसाठी आणखी सुरक्षित इंटरनेटच्या हितासाठी आणखी शक्तिशाली सुरक्षितता मानकांचा अवलंब करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्याकरितादेखील करतो.

उद्योगक्षेत्रात सुरक्षितता उंचावण्यासाठी दर्जात सुधारणा करणे

 • सुरक्षितता भेद्यता उघड करण्यासाठी सुरक्षितता रिवॉर्ड तयार करणे

  Google मध्ये, आम्ही आमच्या सेवांमधील भेद्यता शोधण्यासाठी स्वतंत्र संशोधकांना पैसे देणाऱ्या भेद्यता रिवॉर्ड उपक्रमांची सुरुवात केली. आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यात आम्हाला मदत करणाऱ्या सर्व अत्याधुनिक बाह्य कंट्रिब्युशनना रिवॉर्ड देण्यासाठी, प्रत्येक वर्षी आम्ही संशोधन अनुदान आणि बग बाउंटीच्या रूपात लाखो डॉलरचे पुरस्कार देतो. आम्ही सध्या Chrome आणि Android सह आमच्या अनेक उत्पादनांसाठी भेद्यता रिवॉर्ड देतो.

  स्वतंत्र संशोधकांचे साहाय्य घेण्याव्यतिरिक्त, आमच्याकडे प्रोजेक्ट झीरो नावाची इंजिनीयरची टीमदेखील आहे, जी इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमधील सुरक्षिततेतील दोषांचा माग ठेवते आणि त्यांवर उपाय करते.

 • अधिक प्रगत सुरक्षा उपाययोजनांसाठी आघाडीच्या संशोधकांसोबत काम करणे

  सुरक्षा, गोपनीयता आणि गैरवर्तनविरोधी तंत्रज्ञानांमध्ये सतत सुधारणा करण्यासाठी आम्ही शिक्षणतज्ञ, उद्योगजगत आणि अशासकीय संस्थांसोबत (NGO) मिळून काम करतो. या सहकार्यातून सर्व ठिकाणच्या वापरकर्त्यांना प्रगत उपाययोजना मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करतो. Google संसाधने सर्वांना उपलब्ध करून देण्यात आम्हाला जाणकारांच्या तज्ञतेचे साहाय्य लाभते.

 • तुमचे साइन इन शक्य तेवढे सुरक्षित ठेवण्यासाठी ऑथेंटिकेशन मानके उंचावणे

  आम्ही अत्यंत प्रभावी साइन इन आणि अॉथेंटिकेशन मानकांचे सह-निर्माण किंवा त्यांचा अंगीकार करण्यात नेहमीच आघाडीवर राहिलो आहोत. आम्ही केंद्रीकृत वेब मानके विकसित करून तंत्रज्ञाने शेअर करतो आणि इतर कंपन्यांसोबत सहयोग करतो. FIDO Alliance नावाच्या एका ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेसोबत केलेल्या भागीदारीअंतर्गत आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना खात्याचा सपरक्षित अॅक्सेस मिळावा यासाठी नवी उद्योग मानके सेट केली आहेत आणि त्यांचा अंगीकार केला आहे.

 • सर्वांना आणखी चांगली सुरक्षितता देण्यासाठी पोहोच आणि ऑनलाइन सुरक्षा पुरवणे

  जगभरातील लोकांना ऑनलाइन सुरक्षित कसे रहावे हे शिकण्यात मदत करण्यासाठी आम्ही शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण आणि टूल पुरवतो. आमची पोहोच टीम दर वर्षी ऑनलाइन सुरक्षा संसाधने आणि प्रशिक्षणासोबत १० कोटीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचते – ज्यांमध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक, वयस्कर लोक आणि अपंगत्व असलेल्या लोकांचा समावेश आहे.

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.