वन-स्टॉप नियंत्रण केंद्र : Google खाते

वापरकर्त्यांना Google सोबत कोणता डेटा शेअर करणे आवडेल आणि त्यांना स्वतःकडे काय ठेवायचे आहे, हे त्यांना ठरवू देणारी टूल तयार करण्यासाठी स्टेफन मिकलिट्झ आणि यान हॅनेमन यांनी अनेक वर्षे काम केले आहे

आपण Google साठी काम करतो असे स्टेफन मिकलिट्झ लोकांना सांगतात तेव्हा, त्यांना बरेचदा प्रश्न विचारला जातो, “तुम्हाला इतक्या जास्त डेटाची गरज का असते?” त्यांचे उत्तर असते : “डेटामुळे Google उत्पादने तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनू शकतात — जसे की, तुमचे शोध परिणाम योग्य भाषेत डिलिव्हर करणे किंवा घरी जाण्यासाठी सर्वात जलद मार्गा सुचवणे. मात्र, Google तुमचा डेटा कसा स्टोअर करते आणि आम्ही तो आमची उत्पादने तुमच्यासाठी अनुकूल करण्यासाठी वापरावा किंवा नाही, हे तुम्ही निवडू शकता हे मी नेहमी सांगतो. माझ्यावर विश्वास ठेवण्याआधी लोकांना सामान्यतः ते स्वतः पाहायचे असते!”

"आम्हाला सेवा पर्सनलाइझ करायची होती आणि लेआउट आणखी स्पष्ट करायचा होता."

यान हॅनेमन

मिकलिट्झ हे २००७ पासून Google येथे काम करत आहेत. ते म्युनिक येथील पहिल्या कर्मचार्‍यांपैकी एक होते आणि त्यांनी लगेचच ऑनलाइन सुरक्षा व डेटा गोपनीयता यांच्याशी संबंधित विषयांवर आघाडी घेतली. २०१० पासून, मिकलिट्झ यांनी ऑनलाइन सुरक्षा आणि गोपनीयता वाढविण्यासाठी करण्यासाठी अनेक अत्यंत महत्त्वाच्या Google उत्पादनांच्या जागतिक डेव्हलपमेंटमध्ये पुढाकार घेतला आहे. २००८ साली जर्मनीमध्ये या विभागाचे मुख्यालय स्थापित करणे हा Google ने घेतलेला एक स्मार्ट निर्णय होता असे त्यांना वाटते. “जेथे गोपनीयतेची सर्वात सखोल चर्चा केली जाते अशा ठिकाणी Google ला यायचे होते,” मिकलिट्झ सांगतात.

तेव्हापासून बरेच काही घडले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, २५ मे २०१८ रोजी, युरोपिअन युनियनचे साधारण डेटा संरक्षण विनियम (GDPR) अंमलात आले. GDPR हे वैयक्तिक डेटाचा वापर आणि स्टोरेज नियंत्रित करते. मिकलिट्झ यांना २०१६ मधील तो क्षण आठवतो जेव्हा त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सर्वप्रथम कायद्याची कलमे वाचली होती. “आम्ही तयार केलेली अनेक नियंत्रणे आणि टूल GDPR शी आधीच उत्तम प्रकारे सुसंगत होती -- पण आम्हाला आणखी कठोर श्रम करावे लागणार हेदेखील स्पष्ट होते,” ते सांगतात. आता, ते माझ्यासोबत कॉफरन्स रूमपर्यंत चालत येत आहेत, जेथे त्यांना त्यांचे सहकारी यान हॅनेमन भेटणार आहेत.

इंजिनिअरिंग संचालक स्टेफन मिकलिट्झ (डावीकडे) यांच्यावर Google येथील जागतिक गोपनीयता आणि सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांनी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक येथे कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आणि ते २००७ च्या उत्तरार्धापासून Google च्या म्युनिक ऑफिसमध्ये काम करत आहेत.

Google ने त्यांचे Google Dashboard हे पहिले डेटा गोपनीयता टूल २००९ मध्ये लाँच केले. त्याच्या डेव्हलपमेंटची जबाबदारी मिकलिट्झ आणि त्यांच्या टीमवर होती. गेल्या काही वर्षांत त्यामध्ये अतिरिक्त फंक्शन जोडली गेली आहेत. २०१३ पासून, निष्क्रिय खाते व्यवस्थापक वापरून वापरकर्ते त्यांची Google डिजिटल लेगसी व्यवस्थापित करू शकत आहेत; २०१४ मध्ये सुरक्षा तपासणी, त्यानंतर २०१५ मध्ये गोपनीयता तपासणी जोडली गेली. ही नवीन टूल वापरकर्त्यांना त्यांची डेटा गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज यांबद्दल क्रमाक्रमाने तपशीलवार माहिती देतात.

२०१५ मध्ये "माझे खाते" लाँच केले गेले, ज्यामुळे सर्व Google सेवा एकत्र आल्या. पहिल्यांदाच, वापरकर्त्यांना वन-स्टॉप नियंत्रण केंद्र मिळाले, ज्यामुळे Google त्यांचा कोणता वैयक्तिक डेटा सेव्ह करत होते ते पाहणे, त्यांना कोणती माहिती हटवायची आहे याबाबत स्वतः निर्णय घेणे आणि डेटा सेव्ह करणारी फंक्शन व ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करणे बंद करणे हे त्यांना शक्य झाले. वापरकर्त्यांना पर्सनलाइझ केलेल्या जाहिरातींची निवड रद्द करता येणेदेखील शक्य झाले. "माझे खाते" मधील सोयी लाँच झाल्याच्या क्षणापासून सातत्याने वाढत आहेत आणि त्यामध्ये सुधारणा होत आहेत.

"Google ला कोणती माहिती ठेवण्याची अनुमती आहे हे प्रत्येक वापरकर्त्याला निवडता येणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे."

स्टेफन मिकलिट्झ

जून २०१८ मध्ये या सेवेमध्ये मोठे बदल केले गेले आणि "माझे खाते" हे Google खाते झाले. स्टेफन मिकलिट्झ यांच्यासोबत, उत्पादन व्यवस्थापक यान हॅनेमन यांनी रीलाँचची जबाबदारी पार पाडली होती. हॅनेमन यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्समधील PhD पदवी आहे आणि ते २०१३ पासून Google च्या म्युनिक ऑफिसमध्ये काम करत आहेत. त्यांनी "माझे खाते" तयार करण्यात मदत केली होती आणि सध्या ते Google खाते ची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना “मिस्टर Google खाते” हे टोपणनाव दिले आहे.

हॅनेमन त्यांचा स्मार्टफोन वापरून Google खाते च्या नवीन डिझाइन विषयी सांगतात. “आम्हाला सेवा पर्सनलाइझ करायची होती आणि विशेषतः लहान स्क्रीन असलेल्या मोबाइल डिव्हाइसवर वापरण्यासाठी लेआउट आणखी स्पष्ट करायचा होता.” स्टेफन मिकलिट्झ त्यांचा स्वतःचा स्मार्टफोन उचलतात आणि अ‍ॅप्लिकेशन उघडतात. “उदाहरणार्थ, मी सेवा रन करतो तेव्हा सॉफ्टवेअर मला सुरक्षा तपासणी करण्याचा पर्याय देऊ करते,” ते स्पष्ट करतात. “माझ्या Google खाते च्या सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी Google कडे काही सूचना आहेत का हे मला येथे लगेच पाहता येते.”

यान हॅनेमन (डावीकडे) हे यापूर्वी "माझे खाते" म्हणून ओळखल्या जाणार्‍या Google खाते चे उत्पादन व्यवस्थापक आहेत. ही सेवा वापरकर्त्यांसाठी वन-स्टॉप नियंत्रण केंद्र आहे, ज्यामुळे त्यांना त्यांची सुरक्षा आणि डेटा गोपनीयता तपासता येते.

मिकलिट्झ आणि हॅनेमन यांचे उत्पादन डेव्हलपमेंटशी संबंधित बरेचसे काम हे जगभरातील लोक प्रत्येक सेवेचा वापर कसा करतात आणि त्यांच्या सर्वसाधारण प्रवृत्ती काय असतात याबाबतच्या Google सर्वेक्षणांवर आधारित असते. “वैयक्तिक डेटाच्या वापराबाबत युरोपिअन – विशेषतः जर्मन – लोक बरेचदा अमेरिकन लोकांपेक्षा अधिक संशयी असतात,” हॅनेमन म्हणतात. “याचा संबंध अर्थातच आमच्या इतिहासाशी आहे.” सर्वच वापरकर्त्यांचा त्यांचा डेटा स्टोअर करण्यास विरोध नसतो. “विमानतळावर जाण्यासाठी निघण्याची वेळ झाली आहे याची स्मार्टफोनने आठवण करून देणे हे काही लोकांना अत्यंत व्यावहारिक वाटते,” हॅनेमन म्हणतात. “इतर लोक ऑटोकंप्लीट वैशिष्ट्याची प्रशंसा करतात, जे शोध इंजिनला शोधाच्या शब्दांच्या उर्वरित भागाचे पूर्वानुमान करू देते. आमची उत्पादने लोकांसाठी अनुकूल करण्यासाठी लोक आम्हाला त्यांचा डेटा वापरू देतात तेव्हाच ही आणि इतर अनेक वैशिष्ट्ये शक्य होतात.

स्टेफन मिकलिट्झ नमूद करतात की गोपनीयतेचा विषय येतो, तेव्हा एकच, एकसमान निराकरण असू शकत नाही. याचे अंशतः कारण म्हणजे प्रत्येकजण स्वतंत्र व्यक्ती असते आणि वापरकर्त्यांच्या गरजा काळानुसार बदलतात. “Google ला कोणती माहिती ठेवण्याची परवानगी आहे हे प्रत्येक वापरकर्त्याला निवडता येणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ते शक्य करण्यासाठी, आम्ही आमची टूल सातत्याने अद्ययावत ठेवत असतो.”

फोटोग्राफ: कॉनी मिरबाख

सायबरसुरक्षेशी संबंधित प्रगती

जगातील इतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत जास्त लोकांना आम्ही ऑनलाइन कसे सुरक्षित ठेवतो ते जाणून घ्या.

अधिक जाणून घ्या