डेटा तुमच्यासोबत कसा न्यावा

तुमच्या कॉम्प्युटरवर वैयक्तिक डेटा डाउनलोड करायचा आहे किंवा तो वेगळ्या नेटवर्क पुरवठादाराला ट्रान्सफर करायचा आहे का? Google Takeout वापरून दोन्ही गोष्टी करता येऊ शकतात असे Google चे स्टेफन मिकलिट्झ आणि ग्रेग फेअर याबाबत सांगत आहेत

श्री. मिकलिट्झ, श्री. फेअर, तुमच्यावर Google Takeout ची जबाबदारी आहे. हे नेमके कशासाठी आहे?

स्टेफन मिकलिट्झ, Google च्या गोपनीयता आणि सुरक्षा टीमचे इंजिनिअरिंग संचालक : Google Takeout हे तुम्हाला Google Drive वर स्टोअर केलेले फोटो, संपर्क, ईमेल, कॅलेंडर एंट्री किंवा संगीत फाइल तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करण्याची किंवा त्या दुसऱ्या नेटवर्क पुरवठादारला ट्रान्सफर करण्याची सोय देते.

ग्रेग फेअर, Google Takeout चे उत्पादन व्यवस्थापक : आमची दोन मुले आहेत आणि बहुतांश आई-वडिलांप्रमाणे आमच्याकडेही त्यांचे खूप फोटो आहेत – अगदी नेमके सांगायचे तर ६०० गिगाबाइट फोटो आहेत. आमचे हे सर्व फोटो असलेली हार्ड ड्राइव्ह क्रॅश झाली तेव्हा, मी त्यावरील सर्व फोटो Google Photos वरदेखील सेव्ह केले असल्यामुळे मला खूप हायसे वाटले होते. त्यानंतर मी नवीन हार्ड ड्राइव्हमध्ये फोटो सहज डाउनलोड करण्यासाठी Google Takeout वापरू शकलो.

ग्रेग फेअर
स्मार्टफोन

Google उत्पादन व्यवस्थापक ग्रेग फेअर यांच्यावर Google Takeout ची जबाबदारी आहे, हे टूल वापरकर्त्यांना Google वरून त्यांचा डेटा फक्त डाउनलोडच करू देत नाही, तर तो इतर नेटवर्क पुरवठादारांकडे ट्रान्सफरदेखील करू देते.

लोक Takeout कशासाठी वापरतात?

फेअर : मुख्यतः Google Drive वर त्यांनी स्टोअर केलेल्या सर्व डेटाचा बॅकअप घेण्यासाठी ते Takeout वापरतात.

मिकलिट्झ : हे काहीसे विचित्र वाटते, कारण हा डेटा आमच्या घरातील स्टोरेज डिव्हाइसच्या तुलनेत Google Drive वर प्रत्यक्षात जास्त सुरक्षित आहे.

फेअर : घरी मांजर हार्ड ड्राइव्हवर लघवी करू शकते किंवा मुले ती तोडू शकतात किंवा विस्तवामुळे ती खराब होऊ शकते. Google मध्ये, प्रत्येक फाइल वेगवेगळ्या सर्व्हरवर अनेक वेळा स्टोअर केली जाते. ती याहून अधिक सुरक्षित असू शकत नाही.

श्री. फेअर, तसे असूनही तुम्ही तुमच्या डेटाचा हार्ड ड्राइव्हवर बॅकअप घेताच!

फेअर : याचे कारण म्हणजे माझी पत्नी इमेज संपादनाशी संबंधित प्रोग्राम वापरते, त्यासाठी क्लाउडवर इमेज असणे हे व्यावहारिक नाही.

"Google मध्ये, प्रत्येक फाइल वेगवेगळ्या सर्व्हरवर अनेक वेळा स्टोअर केली जाते. ती याहून अधिक सुरक्षित असू शकत नाही."

ग्रेग फेअर

असं.

मिकलिट्झ : पण मी असे प्रोग्रॅम वापरत नाही, पण तरीही माझ्या सर्व फोटोंचा बॅक-अप मी हार्ड ड्राइव्हवर सेव्ह करतो. हा माझा डेटा आहे, त्यामुळे मला त्याची प्रत्यक्ष प्रत हवी आहे.

यामध्ये काही “विचित्र” आहे असे तुम्हाला का वाटते?

मिकलिट्झ : आपले फोटोशी खूप वैयक्तिक आणि भावनिक संबंध असतात. ते अनेक आठवणींशी निगडित असतात. एक वापरकर्ता म्हणून माझे फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी मी एकाच कंपनीवर अवलंबून राहू शकत नाही – त्या कंपनीमध्ये मी काम करत असलो तरीदेखील. त्यामुळेच Google Takeout यांसारख्या पोर्टेबिलिटी सेवा खूपच महत्त्वाच्या आहेत, कारण त्या आमच्या वापरकर्त्यांना त्यांचा डेटा क्लाउडवर असला तरीही, तो कधीही पुन्हा मिळवण्याची सोय देतात.

Google साठी पोर्टेबिलिटी हा विषय कधीपासून महत्त्वाचा बनला आहे?

फेअर : मागील एका दशकापासून. आम्ही वैयक्तिक डेटा पोर्टेबिलिटी सेवा तयार करून सुरुवात केली. त्यानंतर २०११ मध्ये, Google ने त्यासाठी केंद्रीकृत साधन लॉंच केले : Takeout. तेव्हापासून आम्ही अधिकाधिक Google सेवा यात इंटिग्रेट केल्या आहेत आणि आज Takeout हे ४० पेक्षा अधिक सेवांना सपोर्ट करते.

अनेक वापरकर्ते त्यांचा डेटा त्यांच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करतात, पण ते क्वचितच तो इतर सेवांवर ट्रान्सफर करतात. असा असमतोल का आहे?

फेअर: आज वापरकर्ते Google वरून Dropbox, Box किंवा Microsoft Office 365 वर डेटा ट्रान्सफर करू शकतात आणि त्याउलटही करू शकतात. आमचे अनेक स्पर्धक अद्याप ही सुविधा देत नाहीत. ते बदलण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही २०१७ मध्ये डेटा ट्रान्सफर प्रोजेक्‍ट लाँच केला आणि या प्रोजेक्टची जुलै २०१८ मध्ये अधिकृत घोषणा केली . हा एक ओपन-सोर्स प्रोजेक्ट आहे जो कंपन्यांना पोर्टेबिलिटी फंक्शनसाठी विनामूल्य कोड देतो आणि एका सेवेमधून दुसऱ्या सेवेमध्ये सुरळीतपणे डेटा ट्रान्सफर करण्याची सोय करतो.

मिकलिट्झ : समजा एक स्टार्ट-अप कंपनी उत्तम नवीन सेवा डेव्हलप करते. एका छोट्या कंपनीसाठी स्वतःचे पोर्टेबिलिटी टूल तयार करणे खूप महागडे ठरू शकेल. त्याऐवजी ती कंपनी डेटा ट्रान्सफर प्रोजेक्‍ट मध्ये जाऊन संबंधित कोड स्वतःच्या सॉफ्टवेअरमध्ये ट्रान्सफर करू शकते.

Google येथे जागतिक गोपनीयता आणि सुरक्षेची जबाबदारी इंजिनिअरिंग संचालक स्टेफन मिकलिट्झ (उजवीकडे) यांची आहे. त्यांनी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक येथे कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आणि ते २००७ च्या उत्तरार्धापासून Google च्या म्युनिक ऑफिसमध्ये काम करत आहेत.

पण मी दुसरा नेटवर्क पुरवठादार बदलण्यात तुमचे काय स्वारस्य काय?

फेअर: तुम्ही तुमचा डेटा इतरत्र वापरू शकत नाही असे तुम्हाला वाटते म्हणून नव्हे, तर Google सेवा सर्वोत्तम आहेत आणि म्हणूनच तुम्ही त्या वापराव्यात असे आम्हाला वाटते.

साधारण डेटा संरक्षण विनियम (GDPR), जे मे २०१८ मध्ये अमलात आणले गेले, त्यामध्ये डेटा पोर्टेबिलिटीविषयीच्या तरतुदी आहेत. या अटींची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला तुमचे डेटा डाउनलोड करण्याचे टूल कस्टमाइझ करावे लागले होते का?

फेअर : आम्ही २०१६ मध्ये हे नियम पहिल्यांदा वाचले तेव्हा आमच्या लक्षात आले, की आम्ही आधीपासूनच पोर्टेबिलिटीबद्दल चांगले काम करत होतो. त्यावेळी सुद्धा, आम्ही या विषयावर जोमाने काम करून काही कालावधी उलटलेला होता.

मिकलिट्झ : आमच्या मते या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे होते आणि चांगली गोष्ट ही आहे की तसे होत आहे. अजूनही, पोर्टेबिलिटी हा असा विशिष्ट भाग आहे ज्यामध्ये अनेक वापरकर्त्यांना स्वारस्य नाही. पण आम्हाला आशा आहे की काही वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलेल.

"माझ्याकडे आहेत त्याप्रमाणेच माझ्या मुलांकडे सुद्धा त्यांच्या बालपणाचे फोटो असावेत."

स्टेफन मिकलिट्झ

का?

मिकलिट्झ: लोकांनी त्यांचा डेटा क्लाउडवर स्टोअर करण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. पण असे समजू या, एखादी कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि तुमचा डेटा त्या कंपनीच्या सर्व्हरवर स्टोअर केला आहे. तुम्ही हा डेटा पुन्हा मिळवू शकता का याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. हे डेटाच्या टिकाऊपणाच्या विषयाशीदेखील संबंधित आहे. मी माझ्या पालकांचे जुने, पिवळे पडलेले फोटो बघू शकतो, तसेच माझ्या मुलांकडेही त्यांच्या बालपणीचे फोटो असावेत.

डिजिटल फोटोदेखील अ‍ॅनालॉग फोटोप्रमाणेच टिकले पाहिजेत असे तुम्हाला वाटते का?

मिकलिट्झ: होय. व्यापक अर्थाने हादेखील डेटा संरक्षणाचा एक पैलू आहे – मी आज स्टोअर केलेला डेटा मला ५० वर्षांनंतर वापरता यावा.

फोटोग्राफ: कॉनी मिरबाख

सायबरसुरक्षेशी संबंधित प्रगती

जगातील इतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत जास्त लोकांना आम्ही ऑनलाइन कसे सुरक्षित ठेवतो ते जाणून घ्या.

अधिक जाणून घ्या