तुम्ही तयार केलेल्या गोष्टींना लोक कसा प्रतिसाद देतात हे समजून घेणे.

वापरकर्ता अनुभव संशोधक हे याविषयी संशोधन करतात की लोक उत्पादने कशी वापरतात. आरने डी बूइज हे वापरकर्ता अनुभव आणि ऑनलाइन गोपनीयता या विषयांमधील तज्ज्ञ आहेत. स्टेफन मिकलिट्झ हे गोपनीयता आणि सुरक्षेचे इंजिनिअरिंग संचालक आहेत व गोपनीयता आणि सुरक्षा यांसंबंधित टूल तयार करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

आरने डी बूइज, Google येथे वापरकर्ता अनुभव संशोधक म्हणून तुम्ही याचे विश्लेषण करता की लोक गोपनीयता आणि सुरक्षा यांसंबंधित टूल कशी वापरतात. त्यातून तुम्हाला काय समजले आहे?

आरने डी बूइज, Google UX संशोधन व्यवस्थापक : हे स्वाभाविक वाटेल, पण ऑनलाइन असताना सुरक्षित आणि संरक्षित वाटणे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांना त्यांचा डेटा खाजगी ठेवायचा आहे. अलीकडील वर्षांमध्ये, इंटरनेटचा आकार आणि जटिलता वाढली आहे, ते कितपत सुरक्षित आहेत, त्यांची गोपनीयता पुरेशी संरक्षित आहे की नाही याविषयी लोक साशंक आहेत. आपण सर्वजण सध्या ज्या प्रमाणात इंटरनेट वापरतो आणि डेटा गळती व आणखी बऱ्याच गोष्टींविषयी बातम्या वाचतो हे लक्षात घेता, हे प्रश्न वाजवी आहेत.

संभाषण करताना : आरने डी बूइज, UX संशोधक (डावीकडे) आणि स्टेफन मिकलिट्झ, सॉफ्टवेअर इंजिनिअर

आणि गोपनीयता व सुरक्षा यांच्या बाबतीत लोक ऑनलाइन असताना प्रत्यक्षात कसे वागतात?

डी बूइज: मागील दोन वर्षांमध्ये आम्ही जगभरातील अनेक देशांमधील लोकांशी संवाद साधून संशोधन केले आहे आणि आम्हाला सर्वांनी असेच सांगितले की गोपनीयता खरोखरच महत्त्वाची आहे. आजपर्यंतचे वास्तव हे आहे की लोक सहसा गोपनीयतेसंबंधित माहिती वाचण्यासाठी किंवा त्यांची गोपनीयता सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करण्यासाठी फार वेळ देत नाहीत. इतर संशोधनांमधून असे दिसते की लोक अपरिचित वेबसाइटवर त्यांचे संपर्क तपशील टाकण्यापूर्वी फार संकोच करत नाहीत – जसे की, एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी. त्यामुळे, आम्ही डेटा कसा वापरतो याविषयी स्पष्टता ठेवली असल्याची आणि लोकांनी त्यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या मार्गांनी त्यांचा ऑनलाइन अनुभव व्यवस्थापित करण्याकरिता, वापरण्यासाठी सोपी असतील अशी नियंत्रणे आम्ही त्यांना दिली असल्याची खात्री करण्याची जबाबदारी Google सारख्या कंपन्यांकडे आहे.

"लोकांना समजेल अशा पद्धतीने ते त्यांना समजावणे हे आमचे काम आहे."

आरने डी बूइज

स्टेफन मिकलिट्झ, डेटासंबंधित गोपनीयता आणि सुरक्षा यांची खात्री करण्यासाठी जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही यावरून कोणते निष्कर्ष काढाल?

मिकलिट्झ : वापरकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या डेटावर नियंत्रण देणाऱ्या सेवा तयार करत राहणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. डेटासंबंधित गोपनीयता आणि सुरक्षा हे सहसा असे विषय असतात, ज्यांसंबंधी समस्या आल्याशिवाय लोक त्यांची गांभीर्याने दखल घेत नाहीत – उदाहरणार्थ, त्यांचे खाते हॅक होणे किंवा एखाद्या वाईट घटनेविषयी बातम्यांमध्ये वाचणे. महत्त्वाची गोष्ट ही आहे, की अशा वेळी त्यांची ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी कशी तपासावी आणि आवश्यकता असल्यास त्यांचे पासवर्ड कसे बदलावेत हे लोकांना माहीत असते.

डी बूइज: प्रत्यक्षात, कोणीही सकाळी उठून स्वतःशी हा विचार करत नाही, की “मी आता माझ्या Google खात्या मधील माझी गोपनीयता सेटिंग्ज तपासायला हवीत.” या गोष्टी अशा प्रकारे घडत नाहीत. डेटासंबंधित गोपनीयता आणि सुरक्षा या त्या गोष्टींपैकी आहेत ज्यांची दखल आपल्यापैकी बहुतांश लोक उशिरा घेतात. म्हणूनच, अलीकडील वर्षांमध्ये आम्ही लोकांना त्यांची सेटिंग्ज नियमितपणे तपासण्याविषयी सूचित करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी चांगली उत्पादने तयार करण्यात तुम्हाला मदत करणारी इनसाइट प्रत्यक्षात कशी मिळवता?

डी बूइज : यासाठी अनेक पर्याय आहेत. Google खाते यांसारखे अ‍ॅप्लिकेशन लोक कसे नेव्हिगेट करतात याचे विश्लेषण करण्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षणे उपयुक्त असतात. तुम्हाला मते आणि भावना जाणून घ्यायच्या असल्यास, वैयक्तिक मुलाखतींमधून जास्त माहिती मिळते. सांस्कृतिक फरकांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, आम्ही जगभरात सर्वेक्षणे आयोजित करतो – रस्त्यावर, मार्केट संशोधन स्टुडिओमध्ये किंवा वापरकर्त्यांच्या घरीदेखील. शेवटचा पर्याय जास्त उपयुक्त आहे, कारण त्यामध्ये लोकांना त्यांच्या स्वतःच्या डिव्हाइस आणि डेटाचा अ‍ॅक्सेस असतो, ज्यामुळे त्यांचे वापरकर्ता म्हणून असलेले खरे वर्तन आणखी स्पष्टपणे समोर येते.

आरने डी बूइज (डावीकडील) यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्रोनिंगन येथून प्रायोगिक मानसशास्त्रात एमए ही पदवी मिळवली आहे आणि आइंडहोवन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथून इंजिनिअरिंगमध्ये प्रोफेशनल डॉक्टरेट मिळवली आहे. ते म्हणतात: “UX संशोधक हे वापरकर्त्यांच्या आवश्यकतांची दखल घेतली जात असल्याची खात्री करतात.”

तुम्ही आम्हाला एखादे उदाहरण देऊ शकता का?

डी बूइज: एकदा, Google खात्याविषयी बोलण्यासाठी, माझे काही सहकारी जपानमधील एका महिलेला भेटायला तिच्या घरी गेले होते. तिला आमच्या सेवेविषयी माहीत नव्हते आणि तिने ती उघडल्यावर स्वाभाविकपणे तिचा मॉनिटर आमच्यापासून दूर फिरवला. पण, Google खाते कसे काम करते, तिला कशा प्रकारे माहिती हटवता येते आणि डेटाचा वापर Google कसा करते हे निवडता येते या गोष्टी जाणून घेतल्यावर तिला सुखद धक्का बसला.

स्टेफन मिकलिट्झ, तुम्हीदेखील अशा मुलाखतींचे निरीक्षण केले आहे का?

मिकलिट्झ: हो! उदाहरणार्थ, आताच्या Google खात्याच्या प्रोटोटाइपवर आम्ही काम करत होतो तेव्हा आम्हाला त्याची चाचणी करून त्याला लोक कसा प्रतिसाद देतात हे पाहायचे होते. पहिला सहभागी पेज उघडून बराच वेळ काहीही न करता स्क्रीनकडे पाहत राहिला. त्यानंतर दुसरी व्यक्ती आली आणि तिनेही तेच केले. माझ्या मनात आले, “ठीक आहे, मला वाटले होते तसे हे घडत नाही.” त्या वापरकर्त्यांना Google Dashboard समजला नव्हता हे स्पष्ट होते.

"विकासाच्या प्रक्रियेमध्ये UX संबंधित संशोधनाची भूमिका महत्त्वाची आहे."

स्टेफन मिकलिट्झ

त्याचा परिणाम म्हणून तुम्ही वापरकर्ता इंटरफेसमध्ये काही बदल केले का?

मिकलिट्झ: अनेक वेळा! उत्पादन हे लोकांनी सहजरीत्या अ‍ॅक्सेस करण्यासारखे आणि त्यांना ते समजण्यासारखे होईपर्यंत आम्ही त्यावर काम करत होतो.

UX संबंधित संशोधनाने तुम्हाला सेवेमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात मदत केली आहे असा याचा अर्थ होतो का?

मिकलिट्झ: विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, आता Google खाते चा भाग असणाऱ्या निष्क्रिय खाते व्यवस्थापक यावर आम्ही काम करत होतो तेव्हा आम्हाला त्याची जाणीव झाली. वापरकर्ते ठराविक कालावधीसाठी निष्क्रिय राहिल्यास, त्यांच्या डेटाचे काय व्हावे हा निर्णय त्यांना यामुळे घेता येतो. हे उत्पादन पूर्णतः नवीन होते; आमच्या स्पर्धकांपैकी कोणीही यासारखे काहीही यापूर्वी सादर केले नव्हते. मग आम्ही प्रोटोटाइप तयार केला, त्याची चाचणी केली आणि दुसरा प्रोटोटाइप तयार केला. लोकांनी ज्याला उत्तम प्रतिसाद दिला ते उत्पादन तयार होण्यापूर्वी आम्ही या प्रक्रियेची अनेकदा पुनरावृत्ती केली.

तुमच्या संशोधनामुळे लक्षणीय बदल घडणे हे नक्कीच अत्यंत समाधानकारक असेल.

डी बूइज: तीच या कामाविषयीची सर्वात चांगली गोष्ट आहे. वापरकर्त्यांच्या आवश्यकतांची दखल घेतली जात असल्याची आम्ही खात्री करत आहोत.

फोटोग्राफ: कॉनी मिरबाख

सर्वांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात Google कसे मदत करते ते एक्सप्लोर करा.