ऑनलाइन जगात सुरक्षितपणे नेव्हिगेट करणे

Google मधील लीना रोहू यांच्यावर जर्मनीतील Google Digital Garage प्रोग्रॅमची जबाबदारी आहे. हा प्रोग्रॅम डेटा सुरक्षेविषयी प्रशिक्षण अभ्यासक्रमांसकट अनेक सोयी देतो.

मिस रोहू, डेटा गोपनीयता आणि डेटा सुरक्षेविषयीचे ज्ञान हे कंपनीप्रमाणेच वैयक्तिक पातळीवरदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही या क्षेत्रातील कोणते प्रशिक्षण अभ्यासक्रम पुरवता?

ज्यांना स्वतःच्या करिअरमध्ये प्रगती करायची आहे किंवा त्यांच्या कंपनीची भरभराट करण्यात मदत करायची आहे अशा लोकांना आम्ही Google Digital Garage येथे डिजिटल कौशल्यांविषयी प्रशिक्षण देतो. अभ्यासक्रमामध्ये डिजिटल मार्केटिंगसंबंधी मूलभूत गोष्टींपासून कामामधील उत्पादनक्षमता वाढवण्याबाबत विषय आहेत. डेटा गोपनीयता आणि डेटा सुरक्षेविषयीच्या आमच्या अभ्यासक्रमांमध्ये आम्ही २-टप्पी पडताळणी ही दोन पायऱ्या असलेली लॉग इन प्रक्रिया समजावतो. फिशिंग म्हणजे काय आणि तुम्ही त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकता हेदेखील आम्ही समजावतो. वेबसाइटमध्ये HTTPS कसे इंटिग्रेट करावे हे जाणून घेण्यासाठी व्यवसायांचे मालक Digital Garage चे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.

अभ्यासक्रम कसे चालवले जातात?

तुम्ही म्युनिक, हँबर्ग किंवा बर्लिन येथील आमच्या एखाद्या ठिकाणावरून सामील होत असाल अथवा Digital Garage चा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरत असाल तरीही – आमचे सर्व अभ्यासक्रम हे निःशुल्क आहेत. प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुमारे दोन तासांचे असतात आणि त्यांच्याविषयीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला इतर सहभागींशी बोलण्याची व नवीन लोकांशी ओळख करण्याची संधी मिळते.

सहभागी कोणती नवीन कौशल्ये शिकतात?

अर्थातच, फक्त दोन तासांमध्ये कोणीच तज्ज्ञ होऊ शकत नाही. पण मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठी आणि तुम्ही खाजगी व व्यावसायिक पातळीवर डिजिटल जगात आणखी सुरक्षिततेने कसे नेव्हिगेट करू शकता याबाबत चांगला अंदाज निर्माण करण्यासाठी इतका वेळ पुरेसा आहे.

आता नोंदणी करा आणि सामील व्हा

डिजिटल युगासाठी तुम्हाला तयार करण्याकरिता Google Digital Garage निःशुल्क अभ्यासक्रम पुरवते. अभ्यासक्रमाच्या ठिकाणांपैकी कुठेही किंवा तुमच्या घरून तुमच्या वैयक्तिक अथवा व्यावसायिक विकासाला हातभार लावा.

जर्मनीमधील अभ्यासक्रमांसाठी, zukunftswerkstatt.de ला भेट द्या

युनायटेड किंगडममधील अभ्यासक्रमांसाठी, learndigital.withgoogle.com/digitalgarage ला भेट द्या

इटलीमधील अभ्यासक्रमांसाठी, learndigital.withgoogle.com/digitaltraining ला भेट द्या

फ्रांसमधील अभ्यासक्रमांसाठी, learndigital.withgoogle.com/ateliersnumeriques ला भेट द्या

स्पेनमधील अभ्यासक्रमांसाठी, learndigital.withgoogle.com/activatunegocio ला भेट द्या

नेदरलॅंड्समधील अभ्यासक्रमांसाठी, learndigital.withgoogle.com/digitalewerkplaats ला भेट द्या

फोटोग्राफ: इव्हा हॅबर्ले

सायबरसुरक्षेशी संबंधित प्रगती

जगातील इतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत जास्त लोकांना आम्ही ऑनलाइन कसे सुरक्षित ठेवतो ते जाणून घ्या.

अधिक जाणून घ्या