डॉ. वीलंड हॉल्फेल्डर हे म्युनिकमधील Google Safety Engineering Center चे प्रमुख आहेत

"डेटा सुरक्षा सोपी असावी."

Google हे २०१९ पासून म्युनिकमध्ये Google Safety Engineering Center (GSEC) येथे इंटरनेटवरील डेटा गोपनीयता आणि डेटा सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करत आहे. साइट लीड वीलंड हॉल्फेल्डर हे GSEC येथील नवीन घडामोडी, त्यांच्या टीमची काम करण्याची पद्धत आणि डिजिटल उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून म्युनिकचे स्थान या विषयांवर बोलत आहेत.

डॉ. हॉल्फेल्डर, Google Safety Engineering Center म्हणजे GSEC हे २०१९ मध्ये म्युनिकमध्ये सुरू झाले. या केंद्रामध्ये काय काम केले जाते?

GSEC हे Google चे जागतिक गोपनीयता आणि सुरक्षा इंजिनिअरिंग हब आहे. इथे आम्ही नवीन उत्पादने तयार करतो, वापरकर्त्यांच्या गरजा जाणून घेतो आणि इंटरनेट सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी आमच्या भागीदारांसोबत आमचे ज्ञान आणि काम शेअर करतो.

जर्मनीमध्ये डेटा गोपनीयता आणि सुरक्षा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इथे Google Safety Engineering Center ची स्थापना करताना ती स्थानिक परंपरा तुमच्यासाठी कितपत महत्त्वाची ठरली?

ती तर खूपच महत्त्वाची होती. आम्ही युरोपच्या मध्यभागी डेटा गोपनीयता आणि सुरक्षा यांसाठी डेव्हलपमेंट टीम सेट अप केल्या हा योगायोग नव्हता. ऑनलाइन गोपनीयता आणि सुरक्षेबद्दल युरोपमधील लोक काय विचार करतात याचे प्रतिनिधित्व जर्मनी बऱ्याच काळापासून करत आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा म्युनिकमध्ये Google चे इंजिनिअरिंग ऑफिस उघडले, तेव्हा येथील पहिल्या टीम्समध्ये या टीम होत्याच. दहा वर्षे म्युनिकमध्ये या टीम उभ्या केल्यानंतर, आम्हाला त्यांची व्याप्ती वाढवायची होती, विविध पार्श्वभूमी असलेल्या वापरकर्त्यांसोबत आणि मुख्य स्टेकहोल्डरसोबत संवाद साधायचा होता आणि त्यांच्यासोबत समरस व्हायचे होते. म्हणूनच या मुद्द्यांवर बारकाईने लक्ष देणाऱ्या अशा म्युनिकमध्ये GSEC उभे करण्यात आले. आमची सर्व उत्पादने ही युरोपियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (GDPR) च्या अटींची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी आम्ही लक्ष दिले आहे. ही जाणीव आणि जागरूकता इतर देशांमध्ये पसरत आहे. खरेतर, डेटा गोपनीयता आणि सुरक्षा या गोष्टी आता जगभरात अधिकाधिक लक्ष वेधून घेत आहेत.

GSEC हे ४० पेक्षा जास्त देशांमधील कर्मचाऱ्यांसोबत काम करण्याचे आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे.

आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर काम करण्यासाठी आपल्याकडे वैविध्यपूर्ण दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. आमचे कर्मचारी आमच्या वापरकर्त्यांप्रमाणेच शक्य तितके वैविध्यपूर्ण असतील, तरच हे शक्य आहे. मात्र, आम्हाला जे ध्येय गाठायचे आहे त्याच्या जवळपासही आम्ही या क्षणी पोहोचलेलो नाही. उदा. काँप्युटर सायन्स क्षेत्रातील महिलांना शिष्यवृत्ती देऊन किंवा महिला विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमच्या स्थानिक विद्यापीठासोबत भागीदारी करून, लिंगआधारित समावेशकता आणि त्यापलीकडे जाऊन वैविध्यपूर्ण टीम तयार करणे या आमच्या दीर्घकालीन ध्येयासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

GSEC येथील सामान्य दिवस कसा असतो?

Google खाते आणि Google Chrome ब्राउझर यांसारख्या Google उत्पादनांवर दररोज २०० पेक्षा जास्त गोपनीयता इंजिनियर इथे काम करतात. आम्ही याची आवड असलेल्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण आणि Differential Privacy Codelabs (डिफरेंशियल प्रायव्हसी कोडलॅब) यांसारख्या इव्‍हेंट असलेल्या कार्यशाळादेखील चालवतो. हे माझ्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे, कारण परिस्थिती झपाट्याने बदलते आहे आणि इंटरनेटशी संबंधित सुरक्षा या विषयाबद्दल आणखी माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

म्युनिकचे ध्येयवाक्य : Google Safety Engineering Center च्या आतील घडामोडींची झलक

तुम्ही अशी कोणती कामे करता, जी इंटरनेट वापरकर्ते दररोज वापरतात?

जर तुम्ही Google उत्पादने वापरता, तर उदाहरणार्थ, तुम्ही याबद्दल कधी तरी विचार केला असेल की पर्सनलायझेशनसाठी (उदाहरणार्थ, आणखी चांगले शोध परिणाम देण्यासाठी) कोणत्या प्रकारचा डेटा वापरला जातो. विविध उत्पादनांवर Google ने तुमच्यासाठी आणखी चांगले काम करावे, यासाठी तुमचे Google खाते तुमची माहिती, गोपनीयता आणि सुरक्षा व्यवस्थापित करण्यात तुम्हाला मदत करते. तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी कोणता डेटा वापरला जावा यासाठी तुम्ही अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल आणि जाहिरात सेटिंग्ज यांचा वापर करू शकता, अशाने सर्व Google उत्पादने तुमच्यासाठी आणखी चांगले काम करू शकतील. यासाठीच आम्ही गोपनीयता तपासणी तयार केली आहे, जी तुमच्या Google खात्यामध्ये तुमची गोपनीयता प्राधान्ये तुम्हाला झटपट सेट करू देते. Chrome आणि Android साठी आम्ही Password Manager तयार केले आहे, जे तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा तुम्ही वापरता त्या प्रत्येक वेबसाइट व ॲपसाठी पासवर्ड आपोआप तयार करून तो स्टोअर करते. वापरकर्ते सुरक्षेशी संबंधित समस्यांसाठी त्यांच्या पासवर्डचे विश्लेषण करण्यासाठी Password Checkup देखील वापरू शकतात. आम्हाला माहीत असलेल्या डेटा लीकमध्ये त्यांचे पासवर्ड धोक्यात आले आहेत का याची माहिती त्यांना मिळू शकते. त्यानंतर, पासवर्ड कसे बदलावे याबद्दल त्यांना सूचना दिल्या जातात. या पासवर्ड संरक्षण टूल्सवर GSEC ने केलेल्या कामाचा मला विशेष अभिमान आहे.

असे का ते तुम्ही स्पष्ट करू शकता का?

फिशिंग वेबसाइट या Password Manager ला फसवू शकत नाहीत आणि प्रत्येक वेबसाइटसाठी तुम्ही नवीन, क्लिष्ट पासवर्ड तयार करू शकता, जे स्वतः लक्षात ठेवण्याची गरज नसते. यामुळे हॅकरना पासवर्डचा अंदाज लावता येत नाही–आणि ते तुम्हाला अनेक साइटवर एकच पासवर्ड वापरण्याची चूक करू देत नाही.

त्यामुळे काय समस्या येऊ शकते?

असे समजू या, की माझ्या पत्नीसाठी मी एका वेबसाइटवर फुलांची ऑर्डर दिली आणि घाईघाईने त्या साइटवरील माझ्या ग्राहक खात्यावर असा पासवर्ड टाकला, जो मी इतर साइटवरदेखील वापरतो. हॅकर त्या फुलांच्या दुकानाचा सर्व्हर अ‍ॅक्सेस करू शकत असल्यास आणि त्यांनी हा पासवर्ड मिळवल्यास, तोच पासवर्ड वापरून माझे ईमेल खाते किंवा Google खाते देखील अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते का हे ते लगेच पाहू शकतात. इतकेच नाही, तर मी वापरत असलेल्या इतर खात्यांसाठी ते पासवर्ड बदलू शकतात. Password Manager हे प्रत्येक साइटसाठी आपोआप क्लिष्ट आणि नवीन पासवर्ड तयार करते ज्यामुळे तुम्ही ऑनलाइन सुरक्षित राहता.

वीलंड हॉल्फेल्डर, म्युनिकमधील Google च्या ऑफिससमोर

"आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर काम करण्यासाठी आपल्याकडे वैविध्यपूर्ण दृष्टिकोन असणे गरजेचे आहे."

वीलंड हॉल्फेल्डर, Google येथे इंजिनिअरिंग विभागाचे उपाध्यक्ष आणि साइट लीड

आणखी सुरक्षित उपाय वापरले जाऊ शकतात का?

होय, तुमच्याकडे Google खाते असल्यास, तुम्ही २ टप्पी पडताळणी देखील वापरू शकता. याचा अर्थ असा, की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाइसवर तुमच्या खात्यामध्ये साइन इन कराल, तेव्हा आम्ही तुमच्या फोनवर पाठवू तो कोड तुम्हाला वापरावा लागेल. त्यामुळे परदेशातील एखाद्या व्यक्तीने तुमचा पासवर्ड हॅक केल्यास, तुमचे खाते अ‍ॅक्सेस करता येण्यासाठी त्यांना त्या दुसऱ्या टप्प्यातील माहितीची गरज असेल. उदाहरणार्थ, माझ्या खात्यामध्ये ऑनलाइन स्वरूपात इतकी महत्त्वाची माहिती आहे, की त्या अतिरिक्त सुरक्षेशिवाय मला झोपच लागली नसती.

तुम्ही GSEC येथे या प्रकारची नवीन उत्पादने नेमकी कशी तयार करता?

आम्ही लोकांना आमच्या "वापरकर्ता अनुभव संशोधन लॅब" मध्ये येण्यासाठी किंवा ऑनलाइन मुलाखतींसाठी आमंत्रित करतो आणि अशा प्रकारे ते इंटरनेटचा वापर कसा करतात किंवा गोष्टी कशाप्रकारे शोधतात हे आम्हाला समजते. यामुळे त्यांच्या गोपनीयतेच्या प्राधान्यांसंदर्भात आणखी जाणीवपूर्वक निर्णय घेण्यासाठी त्यांना सामान्यपणे कोणत्या टूलची आणि मदतीची गरज असेल हे समजून घेण्यात आम्हाला मदत होते. “तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत Chrome ब्राउझर कशाप्रकारे वापरता ते आम्हाला सांगू शकता का?” यासारखे प्रश्न आम्ही लोकांना विचारतो आणि त्यांना आमची उत्पादने वापरण्यास सांगतो, अशाने ते त्यांना कसा प्रतिसाद देतात हे आम्हाला कळते. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण यामुळे आमची माहिती योग्य ठिकाणी आहे का किंवा इंटरफेस आणि बटणे उपयुक्त आहेत की नाहीत हे समजून घेण्यात आम्हाला मदत होते. यामुळे आमची उत्पादने ही आमच्या वापरकर्त्यांच्या गरजांची पूर्तता करत असल्याची आम्हाला खात्री करता येते. आम्हाला असे वाटते की वेबवर सुरक्षित वाटावे यासाठी तुम्ही सुरक्षा तज्ञ असण्याची गरज नाही.

इतर गोष्टींबरोबरच तुम्ही सध्या तृतीय पक्ष कुकींची गरज संपवण्यावर काम करत आहात. कुकी म्हणजे काय?

इंटरनेटच्या सुरुवातीपासूनच कुकींचा वापर केला जातो आहे. त्या लहान फाइल असतात, ज्यांचा वापर वेबसाइट पुरवठादार तुमच्या कॉंप्युटरवर स्थानिकरीत्या माहिती स्टोअर करण्यासाठी करतात. कुकी अजूनही इंटरनेटवर महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, प्रथम पक्ष कुकी या तुम्हाला ऑनलाइन खात्यामध्ये लॉग इन केलेले राहण्यासाठी किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवरील शॉपिंग कार्ट ऑपरेट करण्यासाठी वापरल्या जातात. उपयुक्त जाहिराती दाखण्यासाठी तृतीय पक्ष कुकीदेखील आहेत. तुम्ही एखादी विशिष्ट वस्तू ऑनलाइन शोधली आहे हे तृतीय पक्ष कुकी रेकॉर्डदेखील करू शकतात. म्हणजे तुम्ही एका साइटवर बॅकपॅक शोधत आहात हे कुकीला माहिती असू शकते आणि त्यानंतर दुसऱ्या साइटवरून त्यासारख्या बॅकपॅकची जाहिरात तुम्हाला दाखवली जाऊ शकते.

असे का होते?

इंटरनेट हा खुला आणि बहुतांशी विनामूल्य असलेला प्लॅटफॉर्म आहे. वेबसाइट ऑफर करत असलेल्या गोष्टींना प्रामुख्याने जाहिरातींद्वारे आर्थिक मदत होते आणि जाहिरात जितकी अधिक उपयुक्त असेल, तितकी ती वापरकर्त्यांसाठी आणि पुरवठादारांसाठी चांगली असते.

तृतीय पक्ष कुकी वापरून वापरकर्त्यांच्या ऑनलाइन हालचालींना ट्रॅक करता येते. यापुढे हा प्रकार थांबवण्याचे मार्ग तुम्ही सध्या तयार करत आहात. असेच ना?

होय, आम्ही सध्या “प्रायव्हसी सॅंडबॉक्स" तयार करत आहोत, यामुळे भविष्यात जाहिरातदार माझ्या कुकीने मला ओळखू शकणार नाहीत. तृतीय पक्ष कुकी वापरकर्त्यांच्या अपेक्षांनुसार नसल्याची जाणीव संपूर्ण वेब समुदायामध्ये बहुतेकांना झाली आहे. वापरकर्ते हे त्यांचा डेटा कसा वापरला जातो याबद्दलची पारदर्शकता, त्यासंदर्भात निवड करण्याची आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता यांच्यासह, आणखी जास्त गोपनीयतेची मागणी करत आहेत आणि हे स्पष्टच आहे, की या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेबची व्यवस्था विकसित होणे गरजेचे आहे. क्रॉस-साइट ट्रॅकिंग बंद करण्यासाठी, वेबने तृतीय पक्ष कुकी आणि ब्राउझर फिंगरप्रिंटिंगसारख्या इतर गुप्त तंत्रांचा वापर थांबवणे फार गरजेचे आहे. पण गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून, वेबच्या अनेक मुख्य क्षमतादेखील याच तंत्रांवर अवलंबून आहेत. महत्त्वाच्या क्षमता वेबने गमावू नये असे आम्हाला वाटते, जसे की प्रकाशकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात आणि वेब दीर्घकाळ सुरू ठेवण्यात मदत करणे, काँटेंटचा अ‍ॅक्सेस सर्वांना असल्याची खात्री करणे, लोकांना त्यांच्या वैयक्तिक डिव्हाइसवर सर्वोत्तम अनुभव देणे, खऱ्या वापरकर्त्यांना बॉट व फसवणूक करणार्‍यांपासून वेगळे करणे आणि अशा बऱ्याच गोष्टी यात आहेत. प्रकाशकांना पाठिंबा देण्यासोबतच वापरकर्त्यांसाठी वेब आणखी जास्त खाजगी आणि सुरक्षित बनवणे, हे प्रायव्हसी सॅंडबॉक्स उपक्रमासाठी आमचे ध्येय आहे.

Google ही समस्या कशाप्रकारे सोडवत आहे?

प्रायव्हसी सॅंडबॉक्स उपक्रम याचा भाग म्हणून, आम्ही असे नवीन तंत्रज्ञान तयार करण्यासाठी वेब समुदायासोबत काम करत आहोत, ज्यामुळे साइटना उपयुक्त जाहिराती पुरवण्याचा आणि त्यांच्या व्यवसायासाठी पैसे मिळवण्याचा मार्ग देण्यासोबतच, वापरकर्त्यांची माहिती खाजगी ठेवता येईल व फिंगरप्रिंटिंगसारखी आक्रमक ट्रॅकिंग तंत्रे टाळता येतील. या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही एका नवीन प्रायव्हसी सॅंडबॉक्स Topics API या प्रस्तावाचे पूर्वावलोकन केले जे आवडींवर आधारित जाहिरातींसाठी आहे. Topics API हे फीडबॅकशी संबंधित नियामक, गोपनीयतेचे समर्थक आणि डेव्हलपर यांवर आधारित FloC च्या ऐवजी वापरले जाते. यामुळे जाहिरातदार लोकांना त्यांच्या आवडींवर आधारित उपयुक्त जाहिराती दाखवू शकतात, जसे की त्यांनी भेट दिलेल्या वेबसाइटवरून अंदाज लावून “खेळ” संबंधित जाहिराती दाखवणे. हे सर्व काही वापरकर्त्यांच्या गोपनीयतेसाठी सर्वाधिक सुरक्षित प्रकारे केले जाते. यापूर्वी वापरकर्त्यांना ओळखण्यासाठी कुकी वापरल्या गेल्या आहेत, पण Topics मागील कल्पना ही आहे, की तुमच्या ब्राउझिंगचा इतिहास हा तुमच्या ब्राउझर किंवा डिव्हाइसच्या बाहेर जाणार नाही आणि तो जाहिरातदारांसकट कोणासोबतही शेअर केला जाणार नाही. यामुळे संपूर्ण वेबवर ट्रॅक न करता जाहिरातदार हे उपयुक्त जाहिराती आणि काँटेंट दाखवणे पुढे सुरू ठेवू शकतील.

आम्ही FLEDGE आणि मापनाशी संबंधित APIs यांच्यासह प्रायव्हसी सॅंडबॉक्सच्या इतर प्रस्तावांच्या बाबतीतदेखील उत्तम प्रगती करत आहोत, तसेच आमचे प्रस्ताव हे संपूर्ण व्यवस्थेसाठी योग्यरीत्या काम करतील अशाप्रकारे तयार केले जात असल्याची खात्री करण्यासाठी यू.के. च्या कॉम्पिटिशन अँड मार्केट्स ऑथोरिटी (CMA) सह सहयोग करत आहोत.

अलिकडील काही वर्षांमध्ये, म्युनिक हे डिजिटल स्टार्ट-अप आणि इतर तांत्रिक कंपन्यांसाठी लोकप्रिय ठिकाण बनले आहे. Google म्युनिकचे साइट लीड म्हणून तुमचा अनुभव काय आहे?

म्युनिकमध्ये मोठे बदल होत आहेत. Apple, Amazon आणि Google, याशिवाय डेटा विश्लेषणांशी संबंधित सेवा पुरवणाऱ्या Celonis या युनिकॉर्न कंपनीसारख्या इतर उत्तम कंपन्या, या सर्व इथे गुंतवणूक करून त्यांच्या कामाचा विस्तार इथे करत आहेत. या भागामध्ये इतर अनेक चांगले तांत्रिक व्यवसाय असल्यामुळे इतर ठिकाणांच्या तुलनेत या ठिकाणी मोठ्या संख्येने बिझनेस-टू-बिझनेस (बी२बी) कंपन्या आलेल्या आहेत. आमच्याकडे स्थानिक उद्योजकता केंद्रे चालवणारी LMU आणि TUM यांसारखी काही उत्कृष्ट विद्यापीठेदेखील आहेत. त्यासोबतच, बाव्हेरियाचे राज्य सरकार हे त्यांच्या “हाय-टेक अजेंडा” या प्लॅनच्या माध्यमाने खूपच पाठिंबा देत आहे. उदाहरणार्थ, आम्हाला आर्टिफिशियल इंटॅलिजन्स आणि क्वांटम काँप्युटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली दिसत आहे – ही फार चांगली गोष्ट आहे. इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील दीर्घकालीन प्रादेशिक परंपरा व कौशल्य यांसोबतच, या प्रदेशाचे मजबूत अर्थकारण, चांगला राजकीय पाठिंबा, उत्कृष्ट शैक्षणिक संस्था आणि उच्च दर्जाची जीवनशैली या सर्व बाबींमुळे म्युनिक हे एक उत्तम ठिकाण झालेले आहे.

दोन वर्षांपूर्वी बाव्हेरियाच्या राजधानीमध्ये GSEC ची सुरुवात झाली.

म्युनिकमधील Google च्या नवीन ऑफिसचे बांधकाम सध्या सुरू आहे. कोरोनाच्या साथीमुळे तुमच्या योजना बदलल्या आहेत का?

या साथीच्या आधी, आमचा बहुतांश वेळ आम्ही ऑफिसमध्ये घालवत होतो, जिथे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून एकत्रितपणे नवीन गोष्टींची निर्मिती करण्यासाठी अनेक कॅफे, मीटिंग रूम व रेस्टॉरंट आहेत. साहजिकच साथीच्या काळात काम करण्याच्या या पद्धतीत मोठा बदल झालेला आहे आणि आता आमच्या Arnulfpost या नवीन व चित्तवेधक प्रोजेक्टच्या प्लॅनिंगमध्ये आम्ही गेल्या वर्षभरातील आमच्या अनेक अनुभवांचा उपयोग करत आहोत.

रिमोट पद्धतीने काम करतानादेखील तशीच वातावरण निर्मिती करणे शक्य आहे का?

आमच्या कंपनीचा जन्मच मुळी क्लाउडमध्ये झाला, क्लाउड काँप्युटिंगच्या क्षेत्रातच ती लहानाची मोठी झाली आणि आता आमचे आयुष्यच क्लाउड काँप्युटिंगमय झालेले आहे. म्हणूनच आम्ही कर्मचाऱ्यांना ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये किंवा मुक्त व्हिडिओ कॉंफरन्समध्ये ऑनलाइन संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करतो. मात्र आम्हाला असे वाटते की आम्ही एवढ्या वर्षांमध्ये कमावलेले सामाजिक भांडवल नेहमी कामी येणार नाही. सध्या आमच्याकडे असेही अनेक लोक आहेत ज्यांनी अद्याप आमच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्षात पाऊल ठेवलेले नाही. प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन काम करणे हे सर्व व्यवस्थापकांसाठी एक मोठे आव्हानच आहे.

विशेषतः म्युनिकमध्ये GSEC येथे यापुढे कशा पद्धतीने काम होईल?

नाविन्यपूर्ण कल्पना सुचण्यासाठी गरजेचे असे वातावरण निर्माण करण्यासाठी ऑफिसमध्ये लोकांना एकत्र आणणे महत्त्वाचे आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे, त्यामुळे आम्ही १०० टक्के व्हर्च्युअल राहणार नाही. पण प्रत्येकासाठी कामाचे निश्चित ठिकाण असणे गरजेचे आहे का असा प्रश्नही आम्हाला पडलेला आहे. आमच्या विक्री विभागातील टीम आधीपासून त्यांच्या सोयीनुसार काम करू शकतात. आमच्या इंजिनियरची बहुतांश डेव्हलपमेंट टूल क्लाउडवर हलवली जात आहेत. यापुढे प्रत्येक टीम स्वतः ठरवू शकेल, की त्यांना किती वर्कस्टेशन त्यांच्या सोयीनुसार हलवता येणारी पाहिजेत आणि किती विविक्षित ठिकाणी पाहिजेत. काम करण्याच्या आणखी सोयीस्कर रचनेमध्ये आणि कामाच्या जागेशी संबंधित वैयक्तिक प्राधान्यांच्या व शेड्युलच्या आधारावर टीमना एकत्रितपणे काम करू देतील अशी डेस्क अ‍ॅलोकेशनची अ‍ॅजाइल टूल आणि सहयोगासाठी नवीन जागा देऊन, काम करण्याचे नवीन मार्ग आम्ही सध्या एक्सप्लोर करत आहोत.

फोटो: सीमा देगानी

सायबरसुरक्षेशी संबंधित प्रगती

जगातील इतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत जास्त लोकांना आम्ही ऑनलाइन कसे सुरक्षित ठेवतो ते जाणून घ्या.

अधिक जाणून घ्या