Google मधील सबीन बोर्से आणि डेव्हिड रॉजर हे Chrome ब्राउझरवर काम करतात

Chrome मध्ये तुमची स्वतःची जागा

Chrome ब्राउझरवरील नवीन कल्पना प्रत्यक्ष जीवनातील वापरामुळे कशी सुचली. Google Safety Engineering Center येथील सबीन बोर्से आणि डेव्हिड रॉजर त्यांच्या नवीन Chrome Profiles या वैशिष्ट्यावर मिळून केलेल्या कामाबद्दल सांगत आहेत.

नवीन Chrome Profile चा स्क्रीनशॉट

“माझे संपूर्ण कुटुंब एकाच शेअर केलेल्या काँप्युटरवर बर्‍याच काळापासून Chrome ब्राउझर वापरत आहे,” पॅरिसमध्ये Google येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणारे डेव्हिड रॉजर सांगतात. “काही वेळा, आम्ही एकाच वेळी ५० पेक्षा जास्त वेबसाइट उघडलेल्या असतात. उदाहरणार्थ, मी नुकताच पाहिलेला एखादा YouTube व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न करत असताना, मला शोध इतिहासामध्ये Minecraft व्हिडिओ क्लिपदेखील दिसतात – ज्यामुळे अगदी वैताग येतो.” ही समस्या फक्त डेव्हिड यांचीच आहे असे नक्कीच नाही. कुटुंबांतील अनेक सदस्यांनी काँप्युटर आणि एकच Chrome ब्राउझर शेअर करणे ही सामान्य गोष्ट आहे. विशेषतः कोरोनाच्या साथीदरम्यान तर ही अगदीच सामान्य बाब होती. आई-वडील, निगा ठेवणारे लोक आणि मुले एकाच वेळी वाचत आहेत, काही शोधत आहेत व मनोरंजन करून घेत आहेत. वैयक्तिक सेटिंग्ज गमावल्यावर किंवा शोधाचा इतिहास एकमेकांत मिसळल्यावर गोंधळ उद्भवू शकतो.

डेव्हिड रॉजर हे पॅरिसमध्ये Google येथे काम करतात

“बरेचदा एखादी वस्तू खूप वापरणार्‍या लोकांकडून कल्पना येतात.”

डेव्हिड रॉजर, सॉफ्टवेअर डेव्हलपर.

डेव्हिड रॉजर नेमके कशाबद्दल बोलत आहेत हे सबीन बोर्से यांना माहीत आहे. Google चे म्युनिक येथील गोपनीयता आणि इंटरनेट सुरक्षिततेसाठी जागतिक डेव्हलपमेंट केंद्र असलेल्या Google Safety Engineering Center (GSEC) येथे त्या उत्पादन व्यवस्थापक आहेत. एकदा त्यांनी ही समस्या GSEC Tech Days च्या दिवशी मांडली. GSEC Tech Days क्रॉस-फंक्शनल टीमना विविध आव्हानांवर एकत्र काम करता येवा यासाठी आयोजित केले जातात. वैयक्तिक Chrome Profile तयार करण्याची कल्पना अशाच एका दिवशी रुजवली गेली. हे वैशिष्ट्य आता Chrome मध्ये उपलब्ध आहे आणि यात प्रत्येक वापरकर्ता प्रत्येक वेळी ब्राउझर उघडल्यावर निवडता येऊ शकणारे, पर्सनलाइझ केलेले प्रोफाइल तयार करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही बॅकग्राउंडचे रंग बदलू शकता आणि बुकमार्क व पासवर्ड स्वतंत्रपणे संगतवार लावले आणि सेव्ह केले जाऊ शकतात.

सुरुवातीच्या कल्पनेपासून शेवटल्या अंमलबजावणीपर्यंत Chrome Profile तयार करण्याच्या प्रक्रियेचा आणखी सखोल वेध घेणे रोचक आहे. सबीन बोर्से यांच्यासारखे उत्पादन व्यवस्थापक दररोज Chrome ब्राउझरसारख्या विशिष्ट अ‍ॅप्लिकेशनवर काम करतात. “पुढील काही वर्षांत Chrome कसे तयार केले जावे हे आम्ही विचारात घेतो. कोणत्या प्रकारच्या समस्या हाताळल्या पाहिजेत आणि निराकरणे कशी इंटिग्रेट केली पाहिजेत याबद्दलदेखील आम्ही विचार करतो,” सबीन सांगतात. “आमचे बहुतांश काम हे आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनांत पहात असलेल्या गोष्टींवर आधारलेले असते,” डेव्हिड रॉजर सहमती दर्शवतात. “Google येथील आमचे अनेक प्रोजेक्ट या प्रकारे सुरू होतात आणि बरेचदा एखादी वस्तू खूप वापरणार्‍या लोकांकडून कल्पना येतात.”

Chrome प्रोफाइलवर काम करण्यासाठी सबीन यांना हिरवा कंदिल दाखवला गेल्यावर, त्यांनी विविध विभागांमधील दहा लोकांची टीम तयार केली, ज्यांत डेव्हिड रॉजर यांच्या टीममधील वापरकर्ता अनुभव तज्ञ आणि डेव्हलपरसुद्धा होते. डेव्हिड हे Chrome वर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ काम करत आहेत आणि वापरकर्ता इंटरफेस डिझाइनसह विविध प्रोजेक्टमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांच्या टीमने Chrome Profile चा प्रोटोटाइप तयार केला, ज्याची चाचणी खास निवडलेल्या वापरकर्ता गटाने केली.

यादरम्यान, खाजगीरीत्या, ऑफिसमध्ये किंवा इतर वापरकर्त्यांसोबत Chrome वापरणार्‍या लोकांचा गट निवडण्यासाठी सबीन यांनी वापरकर्ता संशोधन तज्ञांसोबत काम केले. “या लोकांच्या अनुभवांबद्दल त्यांच्या समोरासमोर मुलाखती घेण्यासोबतच, त्यांनी Chrome Profiles कशा वापरल्या त्याची दोन महिने दैनंदिनी ठेवण्यास आम्ही त्यांना सांगितले.” वापरकर्त्यांना अ‍ॅप्लिकेशनचे न समजणारे भाग आढळल्यावर काय घडले त्याचे वर्णन करण्यासदेखील प्रोफाइल टीमने त्यांना सांगितले.

Google उत्पादन व्यवस्थापक सबीन बोर्से

“पुढील काही वर्षांत Chrome कसे तयार केले जावे हे आम्ही विचारात घेतो."

सबीन बोर्से, उत्पादन व्यवस्थापक

पॅरिसमध्ये डेव्हिड यांनी Chrome बीटा वापरकर्त्यांच्या डेटाचे विश्लेषण केले. Chrome बीटा च्या वापरकर्त्यांना इतर वापरकर्त्यांच्या आधी नवीन वैशिष्ट्ये वापरायला मिळतात आणि उत्पादन तयार करण्याच्या दृष्टीने ते वापराचा डेटा Google ला सबमिट करण्यास सहमती दर्शवू शकतात. लाखो Chrome बीटा वापरकर्त्यांकडून गोळा केलेल्या माहितीमुळे Chrome Profiles च्या संपूर्ण कामामध्ये मदत झाली. उदाहरणार्थ, काही लोकांना एखाद्या बटणावर क्लिक करण्यात अडचण आली, तर इतरांना स्पष्टीकरणात्मक मजकुराचा एखादा भाग समजला नाही. डेव्हिड सांगतात की अशा प्रकारच्या फीडबॅकच्या आधारावर उत्पादनामध्ये बदल आणि सुधारणा केल्या जाऊ शकतात आणि डिजिटल उत्पादने तयार करताना बरेचदा पुनरावृत्ती करत काम करण्याची पद्धत वापरली जाते. वापरकर्त्यांना प्रोटोटाइपचा अ‍ॅक्सेस दिला जातो आणि ते संभाव्य समस्यांबद्दल फीडबॅक देतात. त्यानंतर डेव्हलपर उत्पादनामध्ये बदल करतात आणि ते पुन्हा चाचणीसाठी सबमिट करतात.

या चाचणीदरम्यान काही समस्या समोर आल्या, जसे की स्टार्टअपच्या वेळी Chrome हळू चालत होते. यामुळे डेव्हिडने त्यांच्या डेव्हलपरना हॅकेथॉनसाठी एकत्र बोलावले. “संपूर्ण आठवडाभर आमचे सर्व प्रयत्न आम्ही ब्राउझरचा वेग वाढवण्यावर केंद्रित केले.” टीमने बर्‍याच संभाव्य पद्धती विचारात घेतल्या. “शेवटी आम्ही अनेक वेगवेगळी तंत्रज्ञाने निवडली आणि त्यांना आम्ही आमच्या म्युनिकमधील सहकार्‍यांपुढे ठेवले,” डेव्हिड पुढे सांगतात.

डेव्हिड रॉजर यांच्या स्मार्टफोनवर नवीन Chrome प्रोफाइल कशा दिसतात ते पहा

Chrome ब्राउझरमध्ये प्रत्येक वापरकर्ता वैयक्तिक प्रोफाइल तयार करू शकतो. सॉफ्टवेअर डेव्हलपर डेव्हिड रॉजर हे उत्पादन व्यवस्थापक सबीन बोर्से यांच्यासोबत केलेल्या कामाचा परिणाम दाखवत आहेत.

सबीन यांच्याकडे प्रोजेक्टच्या या टप्प्याबद्दलच्या सुखद आठवणी आहेत. “अशा वेळी आम्ही एखाद्या स्टार्ट-अपप्रमाणे काम करत असतो. आम्ही बर्‍याच गोष्टी करून पाहतो, दररोज एकमेकांशी बोलतो आणि सर्वात योग्य पद्धत शोधून काढतो.” वेगवेगळ्या Chrome प्रोफाइल वापरण्याची क्षमता नुकतीच लाइव्ह झाली आहे, पण सबीन बोर्से आणि डेव्हिड रॉजर यांच्या नेतृत्वातील टीमचे काम अजून संपलेले नाही. त्यांनी सुधारणेसाठी फीडबॅक आणि सूचना वापरून उत्पादनावर काम करणे सुरू ठेवले आहे. फीडबॅक आणि सूचना देणार्‍यांमध्ये डेव्हिड यांचे कुटुंबीय देखील आहेत, ज्यांच्याकडे आता अर्थातच त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक Chrome प्रोफाइल आहेत.

फोटो: स्टेफनी फ्यूसेनिच (४), फ्लोरियन जेनेरॉट्झ्की (३).

सायबरसुरक्षेशी संबंधित प्रगती

जगातील इतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत जास्त लोकांना आम्ही ऑनलाइन कसे सुरक्षित ठेवतो ते जाणून घ्या.

अधिक जाणून घ्या