उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुम्हाला ऑनलाइन संरक्षण पुरवतो.

आम्ही तयार करतो ती प्रत्येक गोष्ट प्रभावी बिल्ट-इन सुरक्षिततेच्या तंत्रज्ञानांनी संरक्षित असते जे स्पॅम, मालवेअर आणि व्हायरस यांसारखे धोके तुमच्यापर्यंत कधीही पोहोचू नयेत म्हणून ते शोधण्यात आणि ब्लॉक करण्यात मदत करतात. आम्ही ही सुरक्षा तंत्रज्ञाने आमचे भागीदार आणि स्पर्धकांसह शेअर करून सुरक्षा मानकांना आणखी उंचीप्रत नेतो आणि प्रत्येकाला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतो.

बिल्ट-इन सुरक्षा

आम्ही तयार केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुरक्षा देऊ करणे

Google सेवांना जगातील अतिप्रगत इन्फ्रास्ट्रक्चरचे संरक्षण लाभले आहे. या बिल्ट-इन सुरक्षेमुळे अॉनलाइन धोक्यांना हेरून त्यांना रोखले जाते. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित आहे याबद्दल तुम्ही खात्री बाळगू शकता.

अधिक जाणून घ्या

सुरक्षेत अग्रणी

अधिकाधिक प्रभावी सुरक्षा देऊ करण्यासाठी सहकार्य

Google गेली कित्येक वर्षे जगभरातील संस्था, स्पर्धक कंपन्या आणि भागीदारांसोबत आपले ज्ञान, सुरक्षा तंत्रज्ञाने आणि अनुभव शेअर करते आहे. सुरक्षेला अधिकाधिक धोके निर्माण होत असल्याने वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि अधिक सुरक्षित इंटरनेटची निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारचे उद्योगव्यापी सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

अधिक जाणून घ्या

सुरक्षितता टिपा

तुम्हाला ऑनलाइन आणखी सुरक्षित राहण्यात मदत करण्यासाठी टिपा

अधिक क्लिष्ट पासवर्ड तयार करणे, तुमच्या डिव्हाइसचे रक्षण करणे, फिशिंगला आळा घालणे आणि इंटरनेट सुरक्षितरीत्या ब्राउझ करता येणे यासाठी आम्ही काही टिपा आणि सूचना एकत्र केल्या आहेत.

अधिक जाणून घ्या

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.