सर्च करण्याचा अधिक सुरक्षित मार्ग

गेल्या 20 वर्षांमध्ये अब्जावधी लोकांनी प्रश्न विचारण्यासाठी Google सर्च वर विश्वास ठेवला आहे. बिल्ट-इन सुरक्षा तंत्रज्ञानाद्वारे विश्वासार्ह माहिती पुरवून आणि तुमची गोपनीयता सुरक्षित ठेवून तो विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.

सर्च गोपनीय राहील असे डिझाइन केलेले आहे

प्रत्येक सर्च एन्क्रिप्ट करून आणि उद्योग जगतातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून आम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो. आम्ही अशी नियंत्रणे तयार करतो ज्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज निवडू शकता. आम्ही तुमची खाजगी माहिती कधीच विकत नाही.

डेटा सुरक्षा

तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही जगातील सर्वात प्रगत सुरक्षा इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. तुमचे डिव्हाइस आणि आमच्या डेटा केंद्रांच्या दरम्यान तुमच्या डेटाची ने-आण होत असताना हे इन्फ्रास्ट्रक्चर त्याला गोपनीय आणि सुरक्षित ठेवते. जर तुम्ही तुमचा सर्चचा इतिहास तुमच्या Google खात्यामध्ये सेव्ह केला, तर तुमचा हा डेटा तुमच्या सर्व डिव्हाइसवर, Google सेवांमध्ये आणि आमच्या डेटा केंद्रांमध्ये उपलब्ध असतो. या डेटाच्या सुरक्षेसाठी आम्ही सुरक्षेचे अनेक स्तर वापरतो, ज्यांत HTTPS आणि "encryption at rest" यासारखे आघाडीचे तंत्रज्ञान सामील आहे.

डेटाची जबाबदारी

आम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी समर्पित आहोत. म्हणूनच आम्ही कधीच तुमची खाजगी माहिती विकत नाही हे मात्र नक्की.

वापरण्यास सोपी नियंत्रणे

सर्च मध्ये गोपनीयता नियंत्रणे असतात जी वापरून तुम्ही ठरवू शकता की तुमच्या Google खात्यामध्ये काय सेव्ह झाले पाहिजे. ऑटो-डिलीट सुरू करून तुम्ही तुमचा डेटा आपोआप डिलीट होत रहावा याची सोय करू शकता.

तुमच्या सर्चच्या इतिहासासाठी गोपनीयता

जर तुम्ही एखादे डिव्हाइस शेअर करत असलात, तर ते डिव्हाइस वापरणारे इतर लोक तुमच्या "माझ्या गतिविधी" मध्ये जाऊन तिथे सेव्ह केलेला सर्चचा इतिहास बघू शकणार नाहीत अशी खात्री करावी असे तुम्हाला हवे असेल. आता तुम्ही माझ्या गतिविधी साठी अधिक पडताळणी करण्याची सोय करू शकता. हे सेटिंग वापरल्याने तुमचा संपूर्ण इतिहास पाहण्यासाठी अधिक माहिती द्यावी लागेल, जसे की तुमचा पासवर्ड किंवा टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन.

तुम्ही सर्च करत असताना Google तुम्हाला सुरक्षित ठेवते

काहीही सर्च करण्यासाठी Google शोध अधिक सुरक्षित मार्ग आहे. दररोज सर्च मधील सर्चच्या परिणामांमध्ये 40 अब्जांपेक्षा अधिक स्पॅम साइटना ब्लॉक केले जाते आणि तुमच्या सर्व सर्चना एन्क्रिप्ट करून तुम्हालाही सुरक्षित ठेवले जाते. सर्च तुम्हाला अशी साधनेही देते जी वापरून तुम्ही तुमच्या परिणामांबद्दल अधिक माहिती मिळवू शकता आणि स्वतःच्या सर्च अनुभवावर अधिक नियंत्रण मिळवू शकता.

सर्च, स्वतःहून सर्चच्या परिणामांमध्ये वेबस्पॅम ब्लॉक करते

सर्च, स्वतःहून सर्चच्या परिणामांमध्ये वेबस्पॅम ब्लॉक करते

सर्च अशा वाईट वेबसाइटपासून तुमचे संरक्षण करते जिथे तुमच्या खाजगी माहितीची किंवा तुमच्या ओळखीची चोरी होण्याची शक्यता आहे. दररोज आम्ही सर्चच्या परिणामांमध्ये 40 अब्जांपेक्षा अधिक स्पॅम पेजेसना ब्लॉक करतो - यात अशा साइट सामील आहेत जिथे मालवेअर असते किंवा ज्यांना तुमच्या खाजगी माहितीची चोरी करण्यासाठीच फसव्या रीतीने तयार केले असते.

सेफ ब्राऊझिंग

सेफ ब्राऊझिंग

Google च्या सेफ ब्राऊझिंग मुळे चार अब्जांपेक्षा अधिक डिव्हाइसची सुरक्षा होते आणि जेव्हा याला Chrome मध्ये सुरू केले जाते, तेव्हा हे धोक्याची सूचना देऊन तुम्हाला सांगते की तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करत आहात ती वेबसाइट बहुधा असुरक्षित आहे. अशा इशार्‍यांमुळे मालवेअर आणि फिशिंग स्कॅमपासून तुमची व तुमच्या खाजगी माहितीची सुरक्षा होण्यात मदत होते.

सर्व सर्च एन्क्रिप्शन करून सुरक्षित केले जातात

Google.com आणि Google ॲपवरील सर्व सर्च डिफॉल्ट स्वरूपाने एन्क्रिप्टेड असतात, अशाने या डेटाची चोरी करू पाहणाऱ्यांपासून तुमची माहिती सुरक्षित असते.

सेफ सर्च

Google सर्च मध्ये पोर्नोग्राफी किंवा स्पष्टपणे दाखवलेली हिंसा असलेला विविक्षित आशय ओळखण्यासाठी सेफ सर्च तयार केले गेले आहे. जर तुम्हाला तुमच्या सर्चच्या परिणामांमध्ये अशी विविक्षित सामग्री पहायची नसेल, तर तुम्ही Filter वापरून त्या सामग्रीला ब्लॉक करू शकता किंवा Blur वापरून अशा इमेजेसना ब्लर करू शकता.

जर Google च्या सिस्टिमला कळले की तुमचे वय 18 पेक्षा कमी असू शकते, तर सेफ सर्च मध्ये Filter आपोआप सेट केले जाते.

तुमच्या खात्यातून सर्चचा इतिहास डिलीट करणे किंवा सर्चचा इतिहास सेव्ह न करणे सोपे आहे.

तुमचा सर्चचा इतिहास तुमच्या Google खात्यावर कशा प्रकारे सेव्ह केला जावा यावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला सोपे आहे - तुम्हाला ते अजिबात सेव्ह करायचे नसेल तर त्यासहित.

"माझ्या गतिविधी" मधील तुमचा सर्चचा इतिहास डिलीट करा

जेव्हा तुम्ही "वेब व ॲप गतिविधी" चालू ठेवलेले असताना Google वर सर्च करता, तेव्हा तुमच्या Google खात्यामध्ये तुमचा सर्चचा इतिहास आणि या सारख्या इतर गतिविधी सेव्ह केल्या जातात. तुमच्या सेव्ह केलेल्या गतिविधींचा वापर करून आम्ही संपूर्ण Google सेवांमध्ये तुम्हाला ॲप आणि आशयाच्या शिफारसी यासारखे अधिक वैयक्तिकृत केलेले अनुभव देत असतो. तुम्ही "माझ्या गतिविधी" मध्ये जाऊन तुमच्या Google खात्यामध्ये सेव्ह केलेल्या सर्चच्या इतिहासापैकी काही भाग किंवा संपूर्ण इतिहास डिलीट करू शकता. इथे तुम्ही Google ने तुमच्या कुठल्या गतिविधी सेव्ह कराव्यात आणि Google ने तुमच्या सेव्ह केलेल्या गतिविधी केव्हा ऑटो-डिलीट कराव्यात यासारख्या सेटिंग बदलू शकता.

लक्षात ठेवा की तुमचा सर्चचा इतिहास जरी तुमच्या Google खात्यामध्ये सेव्ह केलेला नसेल किंवा तुम्ही त्याला "माझ्या गतिविधी" मधून डिलीट केले असेल, तरीही तुमच्या ब्राउझरमध्ये तो अजून सेव्ह केलेला असू शकतो. तुमच्या ब्राउझरचा इतिहास कसा डिलीट करावा याबद्दल माहिती मिळवण्यासाठी ब्राउझरच्या सूचना पहा.

ऑटो-डिलीट नियंत्रणे वापरा

ऑटो-डिलीट नियंत्रणे वापरा

तुम्ही तुमचा सर्चचा इतिहास आणि इतर "वेब व ॲप गतिविधी" तुमच्या खात्यामधून सतत डिलीट करत राहण्यासाठी Google ला सांगू शकता, हे काम तीन, 18 किंवा 36 महिन्यांने केले जाते. नवीन खाते तयार करताना वेब व ॲप गतिविधीचे ऑटो-डिलीट डिफॉल्ट स्वरूपात 18 महिन्यांवर सेट केलेले असते, पण पाहिजे असल्यास तुम्ही तुमचे सेटिंग केव्हाही अपडेट करू शकता.

Google सर्च बद्दल
अधिक माहिती मिळवा
आम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक उत्पादनामध्ये
सुरक्षितता कशी बिल्ट इन आहे ते जाणून घ्या.