आम्ही सर्वांसाठी उपयुक्त अशी गोपनीयता देऊ करतो.

डेटामुळे Google सेवा अधिक उपयुक्त होण्यात मदत होते, पण आम्ही हा डेटा कसा वापरावा याबद्दलची प्रत्येकाची निवड वेगवेगळी असते. आम्ही कोणता डेटा गोळा करतो, तो कसा वापरला जातो आणि का याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत असतो. आम्ही तुमच्या Google खात्यामध्ये अतिशय प्रभावी डेटा कंट्रोल अंतर्भूत केलेले आहेत. त्यांच्या साहाय्याने तुम्ही तुम्हाला योग्य वाटतील ती गोपनीयता सेटिंग्ज निवडू शकता.

डेटा पारदर्शकता

आम्ही कोणता डेटा वापरतो आणि का हे समजून घेणे आणखी सोपे बनवणे

तुम्ही Google सेवा वापरता तेव्हा, तुमच्या डेटाबाबत तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवता. आम्ही गोळा करत असलेला डेटा आणि आमच्या सेवांनी तुमच्यासाठी आणखी चांगले काम करावे म्हणून आम्ही तो कसा वापरतो याबद्दल पारदर्शक राहणे ही आमची जबाबदारी आहे.

अधिक जाणून घ्या

गोपनीयता नियंत्रणे

तुम्ही नियंत्रक आहात

गोपनीयतेच्या बाबतीत एकच गोष्ट सर्वांना लागू होत नाही हे आम्हाला माहीत आहे, म्हणून आम्ही तुमच्या Google खात्यामध्ये प्रभावी, वापरण्यास सोपी गोपनीयता टूल बिल्ड करतो. ती तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेल्या गोपनीयता सेटिंग्जवर आणि आम्ही कोणत्या प्रकारचा डेटा गोळा करतो आणि आमच्या सेवांवर वापरतो यांवर नियंत्रण मिळवून देतात.

अधिक जाणून घ्या

जाहिराती आणि डेटा

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही विकत नाही

Google उत्पादनांमध्ये, भागीदार वेबसायटींवर आणि मोबाइल अॅप्समध्ये तुम्हाला सुसंगत जाहिराती दाखवण्यासाठी आम्ही डेटा वापरतो. या जाहिराती आमच्या सेवांना निधी पुरवण्यात आणि त्यांना प्रत्येकासाठी मोफत बनवण्यात मदत करत असल्या तरी, तुमची वैयक्तिक माहिती विक्रीसाठी नसते. आणि आम्ही तुम्हाला प्रभावी जाहिरात सेटिंग्जदेखील पुरवतो, ज्यामुळे तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसाव्यात ते तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येते.

अधिक जाणून घ्या

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.