तुमचे डिजिटल जीवन
Pixel सुरक्षित करते.

तुमचा फोन तुमच्या डिजिटल जीवनाच्या केंद्रस्थानी असतो, म्हणजेच ते असे ठिकाण असते, जेथे तुमची काही सर्वात वैयक्तिक आणि खाजगी माहिती राहते. त्यामुळेच आम्ही केंद्रस्थानी सुरक्षा आणि गोपनीयता असलेला Pixel फोन डिझाइन केला आहे.

Pixel तुमचा डेटा सुरक्षित
ठेवतो ते सर्व मार्ग.

डिझाइनद्वारे सुरक्षा

सुरक्षेच्या एकाहून अधिक स्तरांनी तुमच्या डेटाचे पूर्णपणे संरक्षण केले जाते.

ऑथेंटिकेशन

तुमच्या फोनचा अ‍ॅक्सेस फक्त तुम्हाला आहे याची खात्री करण्यात ऑथेंटिकेशन मदत करते.

Pixel बुद्धिमत्ता

ऑन-डिव्हाइस बुद्धिमत्ता तुमचा डेटा आणखी खाजगी ठेवण्यात मदत करते.

संरक्षण आणि नियंत्रणे

तुम्ही डाउनलोड, ब्राउझ आणि शेअर करत असलेल्या गोष्टींसाठी, वापरण्यास सोपी असलेली गोपनीयता नियंत्रणे आणि प्रोअ‍ॅक्टिव्ह सुरक्षा.

डिझाइनद्वारे सुरक्षा

तुमचा फोन आणि डेटा खाजगी, सुरक्षित व संरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी, आम्ही Pixel चे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र काम करण्याकरिता डिझाइन केले आहे.

Titan™ M चिप

Titan™ M चिप

तुमच्या सर्वात संवेदनशील डेटाचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी एंटरप्राइझ दर्जाची Titan M सुरक्षा चिप कस्टम पद्धतीने तयार केली गेली. Google Cloud डेटा केंद्रांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वापरत असलेल्या चिपमधूनच मिळवलेली ही चिप पासकोड संरक्षण, एंक्रिप्शन आणि अ‍ॅप्समधील सुरक्षित व्यवहार यांसारख्या तुमच्या सर्वात संवेदनशील प्रक्रिया आणि माहिती हाताळते.

ऑन-डिव्हाइस बुद्धिमत्ता

Pixel फोनसह, आमची उत्पादने आणखी उपयुक्त बनवण्यासाठी Google अनेक वर्षांपासून मशीन लर्निंग (ML) वापरत आहे. Now Playing यासारखी वैशिष्ट्ये आणि रेकॉर्डर अ‍ॅप पॉवर करण्यासाठी ऑन-डिव्हाइस बुद्धिमत्ता तुमच्या फोनवर असलेली ML मॉडेल वापरते. यामुळे तुमचा आणखी डेटा तुमच्या फोनवर आणि तुमच्यासाठी खाजगी राहतो.

तुमच्या डिव्हाइसवर तुमचा जास्त डेटा ठेवणार्‍या, ML वापरण्याच्या नवीन पद्धती आम्ही सर्वप्रथम सुरू केल्या आहेत. यांपैकी एका पद्धतीला फेडरेटेड लर्निंग म्हणतात. हा नवीन दृष्टिकोन ML मॉडेलना प्रशिक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या डिव्हाइसमधील अ‍ॅनोनिमाइझ केलेली माहिती एकत्रित करतो, ज्यामुळे आम्हाला कोणत्याही व्यक्तीबद्दल स्वतंत्रपणे न शिकता सर्वांकडून शिकण्यात मदत होते. फेडरेटेड लर्निंग तुमची गोपनीयता जपण्यात मदत करते आणि आम्हाला Now Playing सारखी आणखी उपयुक्त उत्पादने आणि सेवा तयार करू देते. अधिक जाणून घ्या

हमी आणि ऑटोमॅटिक अपडेट

तुमचा Pixel फोन किमान तीन वर्षांसाठी नवीनतम OS आणि सुरक्षा अपडेट आपोआप मिळवतो. आणि Google अ‍ॅप्स ही Google Play मार्फत अपडेट केली जाऊ शकत असल्यामुळे, तुम्हाला तुमच्या आवडत्या अ‍ॅपमध्ये नवीन वैशिष्ट्ये आणि सुरक्षा संवर्धने तयार होताच मिळतात.

अखंड अपडेट सुरू ठेवा

OS अपडेट इंस्टॉल करण्यासाठी तुमच्या फोनच्या वापरामध्ये व्यत्यय आणण्याऐवजी, Pixel अपडेट आपोआप डाउनलोड करते आणि ती स्टोरेजच्या पार्टिशन नावाच्या विशेष भागात स्वतंत्रपणे इंस्टॉल करते. हे पूर्णपणे बॅकग्राउंडमध्ये घडते, त्यामुळे तुम्ही तुमचा फोन कोणताही व्यत्यय न येता वापरणे सुरू ठेवू शकता. अपडेट इंस्टॉल केल्यावर आणि तुम्ही तयार असल्यावर, OS ची नवीनतम आवृत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा फोन रीस्टार्ट करावा लागेल.

पडताळणी केलेले बूट

तुम्ही प्रत्येक वेळी तुमचे Pixel सुरू करता तेव्हा, तुम्ही वापरत असलेली OS ही Google कडून आलेली आहे आणि तिच्यामध्ये छेडछाड केली गेलेली नाही याची खात्री करण्यासाठी Titan M आणि पडताळणी केलेले बूट मदत करतात. तुमच्याकडे OS ची सर्वात अलीकडील आवृत्ती असल्याचे कंफर्म करण्यासाठी पडताळणी केलेले बूट हे Titan M वर स्टोअर केलेली माहितीदेखील तपासते आणि Pixel ला त्याहून जुनी कोणतीही आवृत्ती वापरण्यापासून रोखते. यामुळे सुरक्षेचे ज्ञात धोके असू शकणार्‍या OS च्या मागील आवृत्त्या लोड करण्यापासून हल्लेखोरांना रोखण्यात मदत होते, ज्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहतो.

ऑथेंटिकेशन

Pixel हे इतरांना तुमचा फोन अ‍ॅक्सेस करण्यापासून रोखणार्‍या बिल्ट-इन ऑथेंटिकेशन सुरक्षेसह येते.

Pixel अनलॉक करणे

Pixel अनलॉक करणे

तुमचा फोन अनलॉक करणे सोपे, जलद आणि सुरक्षित असावे. Pixel 4a वरील Pixel Imprint सारखी वैशिष्ट्ये तुमच्या फोनचा अ‍ॅक्सेस फक्त तुम्हाला असल्याची खात्री करण्यात मदत करतात. ती तुम्हाला तुमच्या आवडत्या अ‍ॅप्समध्ये सुरक्षितपणे पेमेंटदेखील करू देतात. तुमचा फिंगरप्रिंट डेटा सुरक्षितपणे स्टोअर केला जातो आणि तो नेहमी तुमच्या फोनमध्येच राहतो.

Pixel 4 वरील फेस अनलॉक हे तुमच्या फोनवर प्रक्रिया केले गेलेले फेशियल रेकग्निशन वापरते, त्यामुळे तुमचा फेस डेटा कधीही क्लाउडवर अपलोड केला जात नाही किंवा इतर सेवांसोबत शेअर केला जात नाही. फेस इमेज कधीही स्टोअर केल्या किंवा राखून ठेवल्या जात नाहीत. तुमच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षेचे संरक्षण करण्यासाठी, अनलॉक करण्यासाठी वापरला जाणारा तुमचा फेस डेटा Pixel च्या Titan M सुरक्षा चिपमध्ये सुरक्षितपणे स्टोअर केला जातो आणि तो तुमच्या बाकीच्या फोनसाठी किंवा ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध नसतो.

Find My Device

तुम्ही कधीही तुमचे Pixel हरवल्यास, Find My Device मदत करू शकते. कोणत्याही ब्राउझरवर तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करून किंवा कोणत्याही Android डिव्हाइसवर Find My Device अ‍ॅप वापरून तुम्ही तुमचा फोन शोधू शकता आणि तो रिंग करू शकता.

तसेच Find My Device तुम्हाला तुमचा फोन रिमोट पद्धतीने लॉक करू देते किंवा लॉक स्क्रीनवर मेसेज डिस्प्ले करू देते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला तो सापडल्यास, कोणाशी संपर्क साधावा हे त्यांना कळते. तो कायमचा हरवला आहे याबद्दल तुमची खात्री झाल्यास, तुम्ही तुमचा सर्व डेटा रिमोट पद्धतीने मिटवू शकता. अधिक जाणून घ्या

फॅक्टरी रीसेट संरक्षण

वर्धित केलेल्या चोरीरोधक संरक्षणासाठी, प्रत्येक Pixel मध्ये फॅक्टरी रीसेट संरक्षण असते. यामुळे तुमचा पासकोड किंवा Google खाते पासवर्ड न वापरता कोणालाही तुमचा फोन पुन्हा ॲक्टिव्हेट करता येणार नाही याची खात्री करण्यात मदत होते. तुमचा फोन सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्याचा तो अनेक मार्गांपैकी एक मार्ग आहे. अधिक जाणून घ्या

Pixel बुद्धिमत्ता

तुमचा आणखी डेटा तुमच्या हाती ठेवत असतानाच, आमची ऑन-डिव्हाइस मशीन लर्निंग आणि AI यांमधील प्रगती Pixel ला आणखी उपयुक्त बनवते.

Now Playing

Now Playing

Now Playing वापरून तुमचे Pixel तुमच्या आसपास प्ले होणारे संगीत ओळखू शकते. सर्व प्रक्रिया थेट तुमच्या Pixel वर घडते, जे इतर गाणी ओळखणार्‍या सेवांमध्ये घडत नाही. त्यामुळे एखादे गाणे सुरू झाल्यावर, तुमचा फोन संगीताच्या फक्त काही सेकंदांच्या भागाची त्याच्या ऑन-डिव्हाइस संगीत डेटाबेसशी तुलना करतो आणि काय प्ले होत आहे हे त्वरित ओळखतो – सर्व काही कोणताही ऑडिओ तुमच्या फोनबाहेर न जाता केले जाते. Now Playing जलद काम करते आणि ते खाजगी आहे.

Pixel 4 वर, Now Playing हे फेडरेटेड विश्लेषण म्हटले जाणारे गोपनीयता जपणारे तंत्रज्ञान वापरते. कोणत्याही स्वतंत्र फोनवर कोणती गाणी ऐकली गेली ते उघड न करता, ते सर्व Pixel फोनवर प्रदेशानुसार सर्वात जास्त वेळा ओळखली गेलेली गाणी समजून घेते. हा एकत्रित केलेला डेटा वापरून, तुम्ही काय ऐकता ते Google ला कधीही पाहू न देता, लोक सर्वात जास्त ऐकण्याची शक्यता असलेल्या गाण्यांसह ते गाण्यांचा ऑन-डिव्हाइस डेटाबेस अपडेट करते. अधिक जाणून घ्या

Frequent Faces

हे Pixel वैशिष्ट्य तुम्ही ज्यांचे सर्वात जास्त फोटो घेता ते लोक जाणून घेते आणि ते ज्यांमध्ये हसत आहेत आणि डोळ्यांची उघडझाप करत नाहीत असे बेस्ट फोटो कॅप्चर करते. हे करण्यासाठी, तुमचे Pixel तुमच्या फोटोंमध्ये सर्वात जास्त वेळा दिसणार्‍या चेहर्‍यांबद्दलच्या माहितीवर प्रक्रिया करते आणि ती सेव्ह करते. ही माहिती प्रत्यक्ष जगातल्या कोणत्याही ओळखीशी जोडली जात नाही. हे पूर्णपणे तुमच्या डिव्हाइसवर घडते आणि कधीही Google वर अपलोड केले जात नाही, तुमच्या Google खाते शी संलग्न केले जात नाही किंवा इतर अ‍ॅप्ससोबत शेअर केले जात नाही. Frequent Faces हे बाय डीफॉल्ट बंद असते आणि ते कधीही बंद केल्यावर सर्व Frequent Faces डेटा हटवला जातो.

स्क्रीन अटेंशन

तुम्ही तुमच्या स्क्रीनकडे पाहत असताना, स्क्रीन अटेंशन वापरून ती सुरू ठेवा. मशीन लर्निंग मॉडेल आणि समोरचा कॅमेरा वापरून, कोणीतरी स्क्रीनकडे पाहत आहे हे डिटेक्ट करून स्क्रीन अटेंशन तुमच्या फोनच्या स्क्रीनला स्लीपमध्ये जाण्यापासून रोखते. हे विश्लेषण थेट डिव्हाइसवर घडते आणि कोणताही डेटा स्टोअर, शेअर केला जात नाही किंवा Google ला पाठवला जात नाही. तुम्ही डिस्प्ले सेटिंग्ज मध्ये कधीही स्क्रीन अटेंशन सुरू किंवा बंद करू शकता.

Motion Sense

Motion Sense

जेश्चर ओळखण्यासाठी आणि एखादी व्यक्ती जवळपास असताना ते समजण्यासाठी Pixel 4 हे Soli नावाची मोशन-सेन्सिंग रडार चिप आणि युनिक सॉफ्टवेअर अल्गोरिदम वापरते. तुम्ही Motion Sense कधीही सुरू किंवा बंद करू शकता. सेन्सरच्या सर्व डेटावर थेट तुमच्या Pixel वर प्रक्रिया केली जाते. तो कधीही Google सेवा किंवा इतर अ‍ॅप्सवर सेव्ह किंवा त्यांसोबत शेअर केला जात नाही.

कॉलर आयडी आणि स्पॅमपासून संरक्षण

अज्ञात नंबरवरून येणारे काही कॉल हे घोटाळे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक Pixel हे कॉलर आयडी आणि स्पॅमपासून संरक्षणासह येते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या संपर्कांमध्ये नसलेले कॉलर किंवा व्यवसाय यांबद्दलची माहिती पाहू शकता आणि संभाव्य स्पॅम कॉलरबद्दल चेतावण्या मिळवू शकता. अधिक जाणून घ्या

Messages साठी पडताळणी केलेला एसएमएस आणि स्पॅमपासून संरक्षण

Messages साठी पडताळणी केलेला एसएमएस तुम्हाला एसएमएस पाठवणार्‍या व्यवसायाची खरी ओळख कन्फर्म करण्यात तुम्हाला मदत करेल. आशय विशिष्ट व्यवसायाने पाठवला आहे याची प्रति मेसेज तत्त्वावर पडताळणी करून हे वैशिष्ट्य काम करते. मेसेजची पडताळणी केली गेल्यावर – जे तुमचा मेसेज Google ला न पाठवता केले जाते – तुम्हाला मेसेज थ्रेडमध्ये व्यवसायाचे नाव आणि लोगो तसेच पडताळणी बॅज दिसेल.

तुम्हाला मेसेज पाठवणार्‍या व्यवसायाची पडताळणी करण्याव्यतिरिक्त, आम्ही तुमचे Messages मधील स्पॅमपासून संरक्षण करण्यासाठी काम करत आहोत. Messages साठी स्पॅमपासून संरक्षण वापरून, आम्हाला आढळलेले संशयास्पद स्पॅम आणि असुरक्षित वेबसाइट यांबाबत आम्ही तुम्हाला चेतावणी देतो. तुम्हाला Messages मध्ये संशयास्पद स्पॅमबाबत चेतावणी मिळाल्यास, ते स्पॅम आहे किंवा नाही हे आम्हाला कळवून तुम्ही आमच्या स्पॅम मॉडेलमध्ये सुधारणा करण्यात मदत करू शकता. तसेच तुम्ही Messages मधील स्पॅम एसएमएसची कधीही तक्रार करू शकता आणि संभाषण ब्लॉक करू शकता, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला मेसेज मिळणार नाहीत.

कॉल स्क्रीन

Pixel मध्ये कॉल स्क्रीन हे वैशिष्ट्य असते, जे तुम्ही कॉल घेण्‍यापूर्वी कोण कॉल करत आहे आणि का हे जाणून घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी Google Assistant वापरते. ते तुम्हाला वेळ वाचवण्यात आणि नको असलेले कॉल टाळण्यात मदत करते. तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी, तुमच्या कॉलचे ट्रान्सक्रिप्शन पूर्णपणे तुमच्या डिव्हाइसवर होते. अधिक जाणून घ्या

Gboard

Pixel चा डीफॉल्ट कीबोर्ड तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबाशी वेगवेगळ्या पद्धतींनी संवाद साधू देतो – ज्यांमध्ये ग्लाइड टायपिंग, व्हॉइस आणि जेश्चरचा समावेश आहे. तुम्ही ९००+ भाषांदरम्यान टॉगल करू शकता आणि अ‍ॅप्स स्विच न करता GIF, इमोजी, स्टिकर व बरेच काही शेअर करू शकता. तुम्ही टाइप करत असलेले खाजगी ठेवण्यासाठी, Gboard हे फेडरेटेड लर्निंग नावाचा मशीन लर्निंग दृष्टिकोन वापरते. ऑटोकरेक्ट, शब्द सूचना आणि इमोजी सूचना Gboard वर कसे काम करतात त्यामध्ये Google ला तरीही सुधारणा करू देतानाच, ते तुमचे मेसेज डिव्हाइसवरच राहतील याची खात्री करते. अधिक जाणून घ्या

लाइव्ह कॅप्शन

एकाच टॅपने, लाइव्ह कॅप्शन तुमच्या फोनवरील मीडिया आणि फोन कॉल आपोआप ट्रान्सक्राइब करते. तुम्ही ते फोन कॉलसाठी आणि व्हिडिओ, पॉडकास्ट व तुम्ही स्वतः रेकॉर्ड केलेल्या गोष्टींसह, ऑडिओ मेसेज यांवर वापरू शकता. लाइव्ह कॅप्शन तुमच्या डिव्हाइसवर काम करते, ज्यामुळे स्पीच डिटेक्ट केले जाताच तुमच्या स्क्रीनवर कॅप्शन दिसतील. सर्व डेटा तुमच्या फोनवरच राहतो.

बेस्ट फोटो

बेस्ट फोटो सुरू केल्यावर, ऑन-डिव्हाइस काँप्युटर व्हिजन मॉडेल हे प्रकाशयोजना, भावना आणि रचना यांसारख्या गुणवत्तांच्या आधारावर तुमच्या फोटोमधील सर्वोत्तम फ्रेम ओळखते. त्यानंतर बेस्ट फोटो तुम्हाला सर्वोत्तम इमेजची शिफारस करते. हे सर्व थेट तुमच्या फोनवर घडते आणि कोणतेही पर्यायी शॉट तुम्ही ते सेव्ह करणे न निवडल्यास, कधीही क्लाउडवर अपलोड केले जात नाहीत.

Google Assistant

Google Assistant हे तुमचा आवाज वापरून बरेच काही करण्यात तुम्हाला मदत करते. तुमच्या Pixel चे Google Assistant हे “Ok Google” या कमांडसारखे अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट केले जाईपर्यंत स्टँडबाय मोडमध्ये प्रतीक्षा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. Google Assistant स्टँडबाय मोडमध्ये असताना, ते तुम्ही काय म्हणता हे Google ला किंवा इतर कोणाला पाठवणार नाही.

संरक्षण आणि नियंत्रणे

तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी Pixel प्रोअ‍ॅक्टिव्ह पावले उचलते आणि तुम्ही शेअर करत असलेल्या गोष्टींवर तुम्हाला तपशीलवार नियंत्रणे देते.

Google Play Protect

Google Play Protect

Google Play Store मधील सर्व अ‍ॅप्स मंजुरी दिली जाण्यापूर्वी कठोर सुरक्षा चाचण्यांमधून जातात. तुमचे डिव्हाइस, डेटा आणि अ‍ॅप्स मालवेअरपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आमची मशीन लर्निंग सिस्टम पडद्यामागे सतत काम करून, दररोज १०० अब्ज पर्यंत अ‍ॅप्स स्कॅन करते. तुम्ही तुमची अ‍ॅप्स कुठूनही डाउनलोड करत असलात तरीही, ती तुमची अ‍ॅप्स डाउनलोड करण्याआधी, त्यादरम्यान आणि त्यानंतर स्कॅन करते. अधिक जाणून घ्या

सुरक्षित ब्राउझिंग

तुम्ही धोकादायक साइटवर नेव्हिगेट करण्याचा किंवा धोकादायक फाइल डाउनलोड करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला चेतावण्या दाखवून, Google चे सुरक्षित ब्राउझिंग तंत्रज्ञान तुमच्या Pixel चे फिशिंग हल्ल्यांपासून संरक्षण करण्यात मदत करते. तसेच वेबमास्टरच्या वेबसाइट दुर्भावनापूर्ण अ‍ॅक्टरमुळे धोक्यात आल्या असताना सुरक्षित ब्राउझिंग त्यांना सूचित करते आणि समस्येचे निदान व निराकरण करण्यात मदत करते.

सुरक्षित ब्राउझिंग हे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करत असतानाच तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ते फ्लॅग केलेल्या साइटची सूची तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर करते. तुम्ही सूचीमध्ये असलेल्या साइटला भेट दिल्यास, तुमचा ब्राउझर Google ला साइटच्या URL ची आंशिक प्रत पाठवतो जेणेकरून, आम्हाला कृती करता येईल. तुम्ही शेअर केलेल्या माहितीवरून तुम्ही प्रत्यक्षात कोणत्या साइटला भेट दिली हे Google ला समजत नाही. अधिक जाणून घ्या

परवानग्या

तुम्ही डाउनलोड करत असलेल्या अ‍ॅप्सनी तुमचे फोटो किंवा स्थान यांसारखा संवेदनशील डेटा अ‍ॅक्सेस करण्यापूर्वी तुमची परवानगी मिळवणे आवश्यक आहे. परवानगी विनंत्या संदर्भीय असण्यासाठी डिझाइन केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या क्षणी त्यांची आवश्यकता असेपर्यंत त्या मिळणार नाहीत. तुम्ही कधीही तुमचा विचार बदलल्यास, तुम्ही सेटिंग्ज मध्ये कोणत्याही वेळी परवानग्या बंद करू शकता. तुमच्या स्थान डेटासाठी, विशिष्ट अ‍ॅप्सना बॅकग्राउंडमध्ये तुमच्या स्थानाचा अ‍ॅक्सेस देणे, फक्त अ‍ॅप वापरत असताना अ‍ॅक्सेस देणे किंवा अ‍ॅक्सेस अजिबात न देणे यांकरिता तुमच्याकडे अतिरिक्त नियंत्रणे असतात.

Google खाते सेटिंग्‍ज

YouTube, Search आणि Google Maps यांसारखी Google उत्पादने आणि सेवा आणखी उपयुक्त आणि सुसंगत होण्यासाठी तुमचा अ‍ॅक्टिव्हिटी डेटा वापरतात. परंतु, आम्ही ही माहिती कशी वापरावी यावरील नियंत्रण ही तुमची वैयक्तिक निवड असते. आम्ही कोणता डेटा गोळा करतो, तो कसा वापरला जातो आणि का याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत असतो. तसेच आम्ही तुमच्या Google खाते मध्ये वापरण्यास सोपी डेटा नियंत्रणे तयार केली आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज निवडू शकता. अधिक जाणून घ्या

Pixel फोन
Google Store
मध्ये Pixel खरेदी करा.
आम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक उत्पादनामध्ये
सुरक्षितता कशी बिल्ट इन आहे ते जाणून घ्या.