तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे
जगातील सर्वात प्रगत सुरक्षा
यासोबत सुरू होते.

सर्व Google उत्पादनांचे जगातील एका सर्वात प्रगत सुरक्षा इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे सतत संरक्षण केले जाते. ही बिल्ट-इन सुरक्षा ऑनलाइन धोके आपोआप शोधते आणि ते रोखते, ज्यामुळे तुमची खाजगी माहिती सुरक्षित असल्याबद्दल तुम्ही खात्री बाळगू शकता.

सातत्याने
अपडेट केलेली सुरक्षा
वापरून तुम्हाला
ऑनलाइन अधिक सुरक्षित ठेवणे.

एंक्रिप्शन

ट्रांझिटमध्ये असताना एंक्रिप्शनमुळे डेटा गोपनीय आणि सुरक्षित राहतो

एंक्रिप्शन आमच्या सेवांना आणखी वरच्या पातळीची सुरक्षा आणि गोपनीयता पुरवते. तुम्ही ईमेल पाठवता, व्हिडिओ शेअर करता, वेबसाइटला भेट देता किंवा तुमचे फोटो स्टोअर करता तेव्हा, तुम्ही तयार केलेला डेटा तुमचे डिव्हाइस, Google सेवा आणि आमची डेटा केंद्रे यांमध्ये फिरतो. HTTPS आणि ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी यांसारख्या आघाडीच्या एंक्रिप्शन तंत्रज्ञानासह, सुरक्षेचे अनेक स्तर वापरून आम्ही या डेटाचे संरक्षण करतो.

सुरक्षेसंबंधी इशारे

प्रोअ‍ॅक्टिव्ह सुरक्षा इशारे तुमच्या खाजगी माहितीचे संरक्षण करण्यात मदत करतात

ज्याबद्दल तुम्हाला माहीत व्हावे असे काही - जसे की, संशयास्पद लॉगिन किंवा दुर्भावनापूर्ण वेबसाइट, फाइल किंवा अ‍ॅप - आम्हाला आढळल्यास, आम्ही तुम्हाला स्वतःहून सूचित करू आणि तुमची सुरक्षा मजबूत करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी मार्गदर्शन करू. उदाहरणार्थ, Gmail वर, तुम्ही तुमची सुरक्षा धोक्यात आणू शकणारी एखादी अटॅचमेंट डाउनलोड करण्याआधी किंवा कोणीतरी तुमच्या खात्यामध्ये तुमच्याशी संबंधित नसलेल्या डिव्हाइसवरून लॉग इन केल्यास आम्ही तुम्हाला चेतावणी देऊ. आम्हाला तुमच्या खात्यात एखादी संशयास्पद गोष्ट आढळल्यावर, आम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये किंवा फोनवर सूचना पाठवू जेणेकरून, तुम्हाला तुमच्या खात्याचे एका क्लिकने संरक्षण करता येईल.

खराब जाहिराती ब्लॉक करणे

दुर्भावनापूर्ण आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ब्लॉक करणे

ज्यांमध्ये मालवेअर आहे, ज्या तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करत असलेला आशय झाकतात, नकली उत्पादनांचा प्रचार करतात किंवा इतर प्रकारे जाहिरात धोरणांचे उल्लंघन करतात अशा जाहिराती तुमच्या ऑनलाइन अनुभवावर परिणाम करू शकतात आणि तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. आम्ही ही समस्या अत्यंत गंभीरपणे घेतो. लाइव्ह परीक्षणकर्ते आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या संयोगाद्वारे आम्ही दर वर्षी अब्जावधी जाहिराती ब्लॉक करतो – सरासरी, १०० प्रति सेकंद. आक्षेपार्ह जाहिरातींची तक्रार करण्यासाठी आम्ही तुम्हाला टूलदेखील देतो आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या जाहिराती दिसाव्यात ते नियंत्रित करतो. आणि इंटरनेट सर्वांसाठी सुरक्षित बनवण्यात मदत करण्याकरिता आम्ही आमच्या इनसाइट आणि सर्वोत्तम पद्धती सक्रियपणे प्रकाशित करतो.

सर्वात वर Google Cloud लोगो असलेला डेटा सर्व्हरचा टॉवर

क्लाउड सुरक्षा

आमचे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर डेटाचे २४/७ संरक्षण करते

कस्टम डिझाइन केलेल्या डेटा केंद्रांपासून खंडांदरम्यान डेटा ट्रान्सफर करणाऱ्या समुद्राखालील खाजगी फायबर केबलपर्यंत, आम्ही जगातील एक सर्वात सुरक्षित आणि विश्वसनीय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेट करतो. तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी आणि तो उपलब्ध ठेवण्यासाठी त्याचे सतत परीक्षण केले जाते. व्यत्यय आल्याच्या प्रसंगी, प्लॅटफॉर्म सेवा आपोआप आणि तात्काळ एका सुविधेवरून दुसर्‍या सुविधेवर हलवल्या जातात जेणेकरून, त्या विनाव्यत्यय सुरू राहू शकतील.

ऑथेंटिकेशन टूल

तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांसाठी सुरक्षित साइन इन

ऑनलाइन खाती महत्त्वाच्या, पर्सनलाइझ केलेल्या सेवा पुरवतात, पण त्यांच्यामध्ये साइन इन करणे ही आजच्या काळातील सर्वात प्रमुख सुरक्षा जोखीमदेखील दर्शवते. डेटा भंगांमध्ये दररोज लाखो पासवर्ड उघड होतात, ज्यामुळे तुमची खाजगी माहिती धोक्यात येऊ शकते.

तुम्हाला तुमच्या आवडत्या ॲप्स व सेवांमध्ये झटपटपणे व सुरक्षितपणे साइन इन करण्यात मदत करण्यासाठी आमच्या बिल्ट-इन ऑथेंटिकेशन टूल आणि सेवा डिझाइन केलेल्या आहेत.

तुम्ही दररोज वापरत असलेली
उत्पादने आम्ही सुरक्षित करतो.
तुम्हाला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्याचे
आणखी मार्ग एक्सप्लोर करा.