तुमच्या गोपनीयतेचे
डेटाविषयक जबाबदार कार्यपद्धतींनी संरक्षण केले जाते.

तुम्ही दररोज वापरत असलेली उत्पादने आणि सेवा आणखी उपयुक्त बनवण्यात डेटा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा डेटा जबाबदारपणे हाताळण्यासाठी आणि कठोर प्रोटोकॉल व नाविन्यपूर्ण गोपनीयता तंत्रज्ञानांसह तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

डेटा कमी करणे

वापरलेली आणि सेव्ह केलेली वैयक्तिक माहिती मर्यादित करणे

आम्हाला असे वाटते की, उत्पादनांनी तुमची माहिती फक्त तुमच्यासाठी कामाची आणि उपयुक्त असेपर्यंत ठेवावी – ते Maps मध्ये तुमची आवडती गंतव्यस्थाने शोधता येणे असो किंवा YouTube वर काय पाहावे याबाबत शिफारशी मिळवणे असो.

बाय डीफॉल्ट बंद असलेला स्थान इतिहास तुम्ही पहिल्या वेळी सुरू करता तेव्हा, तुमचा ऑटो-डिलीटचा पर्याय बाय डीफॉल्ट १८ महिन्यांवर सेट केला जाईल. नवीन खात्यांसाठी वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी ऑटो-डिलीटदेखील १८ महिन्यांवर डीफॉल्ट होईल. याचा अर्थ असा की, तुमचा अ‍ॅक्टिव्हिटी डेटा तुम्ही तो हटवणे निवडेपर्यंत ठेवला जाण्याऐवजी १८ महिन्यांनंतर आपोआप आणि सातत्याने हटवला जाईल. तुम्ही ही सेटिंग्ज कधीही बंद करू शकता किंवा तुमची ऑटो-डिलीट सेटिंग्ज कोणत्याही वेळी बदलू शकता.

अ‍ॅक्सेस ब्लॉक करणे

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कधीही विकत नाही आणि अ‍ॅक्सेस कोणाला असावा ते तुम्हाला नियंत्रित करू देतो

तुमच्या डेटाचे तृतीय पक्षांपासून संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळेच तुमची वैयक्तिक माहिती कधीही कोणालाही न विकण्याबाबत आमचे कठोर धोरण आहे. तुम्ही आम्हाला तसे करण्यासाठी सांगितले नसल्यास, तुमचे नाव किंवा ईमेल यांसारखी तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखणारी माहिती आम्ही जाहिरातदारांसोबत शेअर करत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला जवळपासच्या फ्लॉवर शॉपची एखादी जाहिरात दिसल्यास आणि तुम्ही “कॉल करण्यासाठी टॅप करा” बटण निवडल्यास, आम्ही तुमचा कॉल कनेक्ट करू आणि कदाचित तुमचा फोन नंबर फ्लॉवर शॉपसोबत शेअर करू. तुम्ही Android डिव्हाइस वापरत असल्यास, तुमचे फोटो, संपर्क किंवा स्थान यांसारखा ठरावीक प्रकारचा डेटा अ‍ॅक्सेस करण्यासाठी तृतीय पक्ष अ‍ॅप्सनी तुमची परवानगी मागण्याची आम्हाला आवश्यकता आहे.

गोपनीयतेसंबंधी नवीन प्रयोग

प्रगत गोपनीयता तंत्रज्ञाने तुमची वैयक्तिक माहिती खाजगी ठेवण्यात मदत करतात

आमच्या उत्पादनांवरील तुमच्या अनुभवांवर परिणाम होऊ न देता तुमच्या खाजगी माहितीचे संरक्षण करणार्‍या तंत्रज्ञानांबाबत आम्ही सातत्याने नवीन प्रयोग करत आहोत.

फेडरेटेड लर्निंग हे सर्वप्रथम Google मध्ये तयार केलेले डेटा कमी करणे यासंबंधी तंत्रज्ञान आहे, जे शब्द पूर्वानुमानांसारख्या आमच्या अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांना पॉवर करणार्‍या मशीन लर्निंग मॉडेलना थेट तुमच्या डिव्हाइसवर प्रशिक्षण देते. हा नवीन दृष्टिकोन तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या डिव्हाइसवर ठेवत असतानाच आमच्या सर्व उत्पादनांवर उपयुक्त अनुभव पुरवून तुमच्या गोपनीयतेचे जतन करण्यात मदत करतो.

आमच्या सेवांना तुमच्यासाठी आणखी चांगल्या प्रकारे काम करायला लावत असतानाच तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आघाडीची अ‍ॅनोनिमायझेशन तंत्रे वापरतो. उदाहरणार्थ, तुम्हाला अधिक जलद घरी पोहोचवू शकणारे पर्यायी मार्ग सुचवण्यासाठी आम्ही लाखो वापरकर्त्यांकडून डेटा एकत्रित करतो आणि तो अ‍ॅनोनिमाइझ करतो.

Maps मध्ये ठिकाणाची व्यग्रता यासारखी वैशिष्ट्ये देऊ करण्यासाठी, तुम्हाला वैयक्तिकरीत्या ओळखण्यासाठी तुमची माहिती वापरता येऊ नये यासाठी तिच्यावर नॉइझ जोडणारे भेददर्शी गोपनीयता नावाचे प्रगत अ‍ॅनोनिमायझेशन तंत्रज्ञान आम्ही लागू करतो.

गोपनीयता परीक्षणे

प्रत्येक उत्पादन डेव्हलप केले जात असताना कठोर
गोपनीयता प्रोटोकॉलचे पालन केले जाते

उत्पादन डेव्हलपमेंटच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणार्‍या कठोर गोपनीयता मानकांसह, गोपनीयता ही आम्ही आमची उत्पादने कशी तयार करतो त्याच्या केंद्रस्थानी असते. प्रत्येक उत्पादन आणि वैशिष्ट्य हे व्यापक गोपनीयता परीक्षणांमार्फत लागू केल्या जाणार्‍या या गोपनीयता मानकांचे पालन करते. आमचे गोपनीयता धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या.

डेटा पारदर्शकता

तुमचा डेटा पाहणे आणि हटवणे सोपे करणे

आमची उत्पादने आणि सेवा तुम्ही कशा वापरता ही तुमच्यावर अवलंबून असलेली वैयक्तिक निवड आहे. कोणता डेटा सेव्ह केला जावा, शेअर केला जावा किंवा हटवला जावा याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, कोणता डेटा गोळा केला जातो आणि का हे समजून घेणे आम्ही सोपे करतो.

उदाहरणार्थ, डॅशबोर्ड वापरून, तुम्हाला तुम्ही वापरत असलेली Google उत्पादने आणि तुमचे ईमेल व फोटो यांसारख्या तुम्ही स्टोअर करत असलेल्या गोष्टी यांचे अवलोकन करता येते. तसेच, माझी अ‍ॅक्टिव्हिटी वापरून, तुम्ही शोधलेल्या, बघितलेल्या व पाहिलेल्या गोष्टींसह संपूर्ण Google सेवांवरील तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीमधून गोळा केलेला डेटा पाहणे आणि हटवणे सोपे झाले आहे.

डेटा पोर्टेबिलिटी

तुमचा डेटा तुमच्यासोबत नेता येण्यासाठी तुम्हाला सक्षम करणे

प्रत्येक वापरकर्त्याला त्यांनी आमच्यासोबत शेअर केलेल्या आशयाचा कधीही आणि कोणत्याही कारणासाठी अ‍ॅक्सेस असला पाहिजे. त्यामुळेच आम्ही तुमचा डेटा डाउनलोड करा हे तयार केले – जेणेकरून, तुम्ही तुमचे फोटो, ईमेल, संपर्क आणि बुकमार्क डाउनलोड करू शकता. तुमच्या डेटाची प्रत बनवणे, त्याचा बॅकअप घेणे किंवा तो दुसऱ्या सेवेवरदेखील हलवणे ही तुमची निवड आहे.

तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेल्या डेटाचे नियंत्रण नेहमी तुमच्याचकडे असते. येथे अधिक जाणून घ्या.

लागू डेटा संंरक्षण कायद्यांचे पालन
करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत

आम्ही नेहमी लागू गोपनीयता नियमनांचे पालन करत राहण्यासाठी काम करतो. गेल्या काही वर्षांत, आम्ही जगभरातील डेटा संरक्षण प्राधिकाऱ्यांसोबत काम केले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन प्रतिबिंबित करणारी मजबूत गोपनीयता संरक्षणे अमलात आणली आहेत. तसेच जगभरात गोपनीयतेसंबंधी कायदे कृतीत आणले जात असताना आम्ही आमच्या सिस्टम आणि धोरणे अपग्रेड करण्यासाठी लक्षणीय गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे.

अधिक जाणून घ्या
तुम्हाला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्याचे
आणखी मार्ग एक्सप्लोर करा.