आमची गोपनीयतेशी संबंधित तत्त्वे

सर्वांसाठी खाजगी डिझाइन असलेली उत्पादने तयार करणे.

खाजगी डिझाइन असलेली आणि सर्वांना वापरता येणारी उत्पादने आम्ही तयार करतो. याचाच अर्थ, आम्ही कोणता डेटा वापरतो, तो कसा वापरतो आणि संरक्षित करतो याबाबत दक्ष असतो.

डेटा खाजगी, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमच्या माहितीचे नियंत्रण तुमच्याकडे देण्यासाठी, ही तत्त्वे आमची उत्पादने, प्रक्रिया व आमच्या लोकांना मार्गदर्शन करतात.

1.

तुमची वैयक्तिक माहिती आम्ही कधीही कोणालाही विकत नाही.

महत्त्वाच्या वेळी Google उत्पादने उपयुक्त बनावी यासाठी आम्ही डेटा वापरतो. जसे की तुम्हाला जवळपासचे रेस्टॉरंट किंवा घरी जाताना अधिक इंधन बचत होईल असा मार्ग शोधण्यात मदत करणे.

जास्तीत जास्त उपयुक्त जाहिराती दाखवण्यासाठीदेखील आम्ही डेटा वापरतो. या जाहिरातींमुळे आम्हाला सर्वांसाठी उत्पादने विनामूल्य देऊ करणे शक्य होत असले, तरीही हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे, की आम्ही तुमची वैयक्तिक माहिती जाहिरातींच्या उद्देशांसाठी कधीही कोणालाही विकत नाही. आम्ही असे काहीही करत नाही.

2.

आम्ही कोणता डेटा गोळा करतो आणि का याविषयी आम्ही पारदर्शक आहोत.

आम्ही कोणता डेटा गोळा करतो, तो कसा वापरतो आणि का वापरतो हे तुम्ही जाणून घ्यावे असे आम्हाला वाटते. पारदर्शकता महत्त्वाची आहे, म्हणून आम्ही ही माहिती शोधणे आणि समजणे सुलभ बनवतो. अशा प्रकारे, तुम्ही Google उत्पादने कशी वापरावीत याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता.

3.

तुमच्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती नियंत्रित करणे आम्ही सोपे करतो .

याचा अर्थ तुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज तुम्ही सहजपणे निवडू शकता आणि तुम्हाला हवे असेल, तेव्हा तुम्ही Google सोबत शेअर केलेली वैयक्तिक माहिती नियंत्रित करू शकता - यामध्ये तुमच्या डेटाचे पुनरावलोकन करणे, तो डाउनलोड करणे व तुम्हाला हवे असल्यास, तो दुसऱ्या सेवेवर हलवणे किंवा पूर्णपणे हटवणे याचा समावेश आहे.

4.

तुमच्या गोपनीयतेचे आणखी संरक्षण करण्यासाठीआम्ही वापरत असलेला डेटा कमी करतो.

Drive, Gmail आणि Photos यांसारख्या ॲप्समध्ये तुम्ही तयार केलेला व स्टोअर केलेला आशय आम्ही जाहिरातींसाठी वापरत नाही व तुमच्याकरिता जाहिराती तयार करण्यासाठी आम्ही आरोग्य, वंश, धर्म किंवा लैंगिक अभिमुखता यासारखी संवेदनशील माहिती कधीही वापरत नाही.

तुम्ही Google खात्यासाठी साइन अप करता, तेव्हा तुम्ही शोधलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टी यांसारखा तुमच्या Google खात्याशी जोडलेला तुमचा ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी डेटा आम्हाला नियमितपणे हटवता यावा, यासाठी आम्ही ऑटो-डिलीट नियंत्रणेदेखील डीफॉल्ट केली आहेत.

5.

बाय डीफॉल्ट सुरक्षित असलेली उत्पादने तयार करून आम्ही तुमचे संरक्षण करतो.

तुम्ही आमची उत्पादने वापरता, तेव्हा तुमच्या माहितीबाबत आमच्यावर विश्वास ठेवता आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवणे ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच, तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी जगातील सर्वात प्रगत सुरक्षेच्या पायाभूत सुविधांपैकी एक आम्ही वापरतो.

बाय डीफॉल्ट, आमची उत्पादने सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत आणि आम्ही आमच्या सुरक्षा उपाययोजनांना सतत बळकट करतो, तसेच विकसित होत असलेल्या ऑनलाइन धोक्यांपासून संरक्षण करतो, जसे की चुकीचा हेतू असलेले लोक तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांना रोखणे.

6.

आम्ही प्रगत गोपनीयता तंत्रज्ञाने तयार करतो आणि ती इतरांसोबत शेअर करतो.

इंटरनेट खुले, खाजगी आणि सुरक्षित ठेवणे हे आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे. तुमची ऑनलाइन सुरक्षितता Google पर्यंत मर्यादित न राहता त्याचा विस्तार संपूर्ण इंटरनेटवर व्हायला हवा. म्हणूनच, आम्ही गोपनीयता तंत्रज्ञानामध्ये सतत अभिनव बदल करत आहोत आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देत आहोत. आम्ही आमचे शिक्षण, अनुभव आणि टूल ही भागीदार, संस्था व स्पर्धक यांच्यासोबत शेअर करतो, कारण इंटरनेट सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

सर्वांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात
Google कसे मदत करते ते एक्सप्लोर करा.