ऑनलाइन सुरक्षित राहण्यात तुम्हाला
मदत करण्यासाठी
टूल आणि टिपा.

उद्योगातील आघाडीची सुरक्षा वापरून आम्ही तुमच्या गोपनीयतेचे आपोआप संरक्षण करतो. तुमची ऑनलाइन सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी आणि तुमच्यासाठी संरक्षणाची योग्य पातळी निवडण्यासाठी तुम्हाला फॉलो करता येणार्‍या काही अतिरिक्त पायर्‍या आहेत.

तुमच्या Google खाते ची
सुरक्षा मजबूत करा.

सुरक्षा तपासणी

सुरक्षा तपासणी करा

तुमच्या Google खात्याचे संरक्षण करण्याचा सोपा मार्ग म्हणजे सुरक्षा तपासणी करणे. तुमच्या Google खात्याची सुरक्षा मजबूत करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी हे स्‍टेप-बाय-स्‍टेप टूल तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या आणि कृतीत आणण्यासारख्या सुरक्षा शिफारशी देते.

२-टप्पी पडताळणी

2-टप्पी पडताळणी वापरून हॅकरपासून बचाव करा

तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी तुमच्या वापरकर्ता नावाच्या आणि पासवर्डच्या वर तुम्हाला दुय्यम घटक वापरण्याची आवश्यकता ठेवून ज्यांना तुमच्या खात्याचा अ‍ॅक्सेस असू नये अशा कोणालाही बाहेर ठेवण्यात २ टप्पी पडताळणी मदत करते. लक्ष्य केलेल्या ऑनलाइन हल्ल्यांचा धोका असलेल्या आणि आणखी मजबूत संरक्षणांची आवश्यकता असलेल्या लोकांसाठी, आम्ही प्रगत संरक्षण प्रोग्राम तयार केला आहे.

तुमच्या पासवर्डबाबत
थोडीशी मदत.

मजबूत आणि युनिक पासवर्ड वापरा

प्रत्येक खात्यासाठी मजबूत, युनिक पासवर्ड तयार करणे हे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही उचलू शकत असलेले सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. तुमचे Google खाते, सोशल मीडिया प्रोफाइल आणि रिटेल वेबसाइट यांसारख्या एकापेक्षा जास्त खात्यांमध्ये लॉग इन करण्यासाठी एकच पासवर्ड वापरल्याने तुमच्या सुरक्षेला असलेला धोका वाढतो.

तुमच्या सर्व पासवर्डचा माग ठेवा

तुमच्या Google खाते मध्ये आहे त्यासारखा पासवर्ड व्यवस्थापक तुम्ही साइट आणि अ‍ॅप्सवर वापरत असलेल्या पासवर्डचे संरक्षण करण्यात व त्यांचा माग ठेवण्यात मदत करतो. तुमच्या खात्यांमध्ये सुरक्षितरीत्या आणि सहजपणे साइन इन करण्यासाठी तुमचे सर्व पासवर्ड तयार करणे, लक्षात ठेवणे आणि सुरक्षितपणे स्टोअर करणे यांत Google चा पासवर्ड व्यवस्थापक तुम्हाला मदत करतो.

सुरक्षेसंबंधी समस्यांसाठी तुमचे पासवर्ड तपासा

पासवर्ड तपासणी वापरून तुमच्या सेव्ह केलेल्या सर्व पासवर्डची क्लिष्टता आणि सुरक्षा झटपट तपासा. तुम्ही तृतीय पक्ष साइट किंवा खात्यांच्या सेव्ह केलेल्या पासवर्डपैकी कोणतेही पासवर्ड धोक्यात आले आहेत का, ते जाणून घ्या आणि आवश्यक असल्यास, ते सहजपणे बदला.

Google चा पासवर्ड व्यवस्थापक याबद्दल अधिक जाणून घ्या
तुमची डिव्हाइस सुरक्षित ठेवा.
वेब सुरक्षितपणे ब्राउझ करा.
कनेक्शन सुरक्षित आहे अशी सूचना दाखवणारा फोन
ऑनलाइन घोटाळे
आणि फिशिंगचे प्रयत्न टाळा

स्कॅमर तुम्हाला कसे गाठू शकतात ते जाणून घ्या

स्कॅमर त्यांचे घोटाळे हे वैध मेसेज असल्याची बतावणी करून नावलौकिकाचा फायदा घेऊ शकतात. तुमचे शोषण करण्यासाठी स्कॅमर हे ईमेलसोबतच एसएमएस, ऑटोमेटेड कॉल आणि दुर्भावनापूर्ण वेबसाइटदेखील वापरू शकतात.

संशयास्पद URL किंवा लिंक नेहमी तपासून घ्या

फिशिंग म्हणजे तुम्हाला फसवून पासवर्ड किंवा बँक तपशील यांसारखी महत्त्वाची वैयक्तिक अथवा आर्थिक माहिती उघड करण्यास लावण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. त्याची अनेक स्वरूपे असू शकतात, जसे की, फसवे लॉगिन पेज. फिश केले जाणे टाळण्यासाठी, शंकास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका; वेबसाइट किंवा अ‍ॅप वैध असल्याची आणि URL ची सुरुवात “https” ने होत असल्याची खात्री करण्यासाठी लिंकवर कर्सर फिरवून किंवा मोबाइलवरील मजकूर दाबून ठेवून URL परत तपासा.

तोतयेगिरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवा

स्कॅमर हे शासन किंवा ना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्था यांसारख्या वैध संस्था असल्याचे भासवू शकतात. विश्वासार्ह स्रोत असल्याचा दावा करणार्‍या एखाद्या व्यक्तीकडून आलेले मेसेज वाचताना नेहमी सावधगिरी बाळगून पुढे जा. तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ईमेल पाठवल्यास, परंतु मेसेज विचित्र वाटत असल्यास, त्याचे खाते हॅक झालेले असू शकते. ईमेल वैध असल्याचे तुम्ही कंफर्म करू शकत नसल्यास, मेसेजला उत्तर देऊ नका किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. पैशासाठी तातडीच्या विनंत्या, परदेशात अडकून पडल्याबद्दलच्या रडकथा किंवा फोन चोरीला गेल्याचा आणि त्यामुळे त्यांना कॉल केले जाऊ शकत नसल्याचा दावा करणारी व्यक्ती यांसारख्या गोष्टींवर नजर ठेवा.

ईमेल घोटाळे किंवा वैयक्तिक माहितीच्या विनंत्यांपासून सावध रहा

अनोळखी लोकांकडून आलेले मेसेज संशयास्पद असू शकतात आणि तुमच्या बँकेसारख्या तुमचा विश्वास असलेल्या एखाद्याकडील संवाददेखील तोतयेगिरी असू शकते. वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या संशयास्पद ईमेल, झटपट मेसेज किंवा पॉप-अप विंडोंना उत्तर देऊ नका. कधीही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा शंकास्पद फॉर्म अथवा सर्वेक्षणांमध्ये वैयक्तिक माहिती एंटर करू नका. ना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेसाठी देणगी मागितली गेल्यास, तुम्हाला पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्यापेक्षा देणगी देण्यासाठी थेट संस्थेच्या वेबसाइटवर जा.

डाउनलोड करण्यापूर्वी फाइल परत तपासा

काही अत्याधुनिक फिशिंग हल्ले हे इन्फेक्ट झालेले दस्तऐवज आणि पीडीएफ अटॅचमेंटमधून होऊ शकतात. तुम्हाला एखादी संशयास्पद अटॅचमेंट आल्यास, ती उघडण्यासाठी Chrome किंवा Google Drive वापरा. आम्ही फाइल आपोआप स्कॅन करू आणि आम्हाला व्हायरस आढळल्यास, तुम्हाला चेतावणी देऊ.

तुम्हाला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्याचे
आणखी मार्ग एक्सप्लोर करा.