तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांमध्ये साइन इन करण्याचा आणखी सुरक्षित मार्ग.
तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांमध्ये, तुमची वैयक्तिक माहिती ॲक्सेस करण्यासाठी साइन इन करणे हा सर्वात पहिला पर्याय आहे. हा धोक्यांसाठीदेखील प्राथमिक एंट्रीपॉइंट आहे, ज्यामुळे साइन इन संरक्षित करणे महत्त्वाचे आहे.
Google आणि तुमच्या सर्व अॅप्स व सेवांमध्ये साइन इन करणे आम्ही बाय डीफॉल्ट सुरक्षित करतो. तुमचे Google खाते नवीन डिव्हाइसवरून अॅक्सेस केले जात असताना इशारा देणे यांसारखी बिल्ट-इन टूल आणि ऑटोमॅटिक संरक्षणे वापरून, आम्ही सुरक्षितरीत्या साइन इन करणे जलद व सोपे करतो.
-
क्लिष्ट पासवर्ड तुम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करतात
तुमची वैयक्तिक माहिती खाजगी ठेवण्यासाठी क्लिष्ट, आगळे-वेगळे पासवर्ड निवडणे ही महत्त्वाची पायरी आहे, पण बऱ्याच लोकांनी सांगितले आहे की ते वेगवेगळ्या साइटवर एकच, कमकुवत पासवर्ड वापरतात त्यामुळे त्या खात्यांची असुरक्षितता वाढते.
-
Google चा पासवर्ड व्यवस्थापक तुम्हाला क्लिष्ट पासवर्ड तयार करण्यात मदत करतो
तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड व्यवस्थापित कराChrome आणि Android मध्ये बिल्ट-इन असलेला, Google चा पासवर्ड व्यवस्थापक तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांसाठी पासवर्ड तयार करतो, ते सुरक्षितरीत्या सेव्ह करतो आणि भरतो.
-
ऑटोमॅटिक पासवर्ड अलर्ट तुम्हाला तुमचे पासवर्ड सुरक्षित ठेवण्यात मदत करतात
दररोज, नवीन डेटा भंग कोट्यवधी वापरकर्त्यांची नावे आणि पासवर्ड सार्वजनिकरीत्या उघड करतात. Google हे धोक्यात असलेले पासवर्ड मॉनिटर करते जेणेकरून तुमच्या सेव्ह केलेल्या पासवर्डपैकी कोणत्याही पासवर्डचा डेटा भंगामध्ये समावेश असल्याचे आढळल्यास, आम्ही तुम्हाला आपोआप सूचित करू.
-
Google Assistant वापरून तुमचे पासवर्ड अपडेट करा
लवकरच येत आहेधोक्यात असलेले पासवर्ड लवकर संरक्षित करणे महत्त्वाचे असते. Chrome हे पासवर्ड संरक्षित करण्यासाठी जलद वैशिष्ट्य रोल-आउट करत आहे: ते तुमचे धोक्यात असलेले पासवर्ड फ्लॅग करू शकते आणि Google Assistant च्या मदतीने, फक्त एका टॅपने तुमच्यासाठी पासवर्ड बदलू शकते.
-
२-टप्पी पडताळणी ही साइन-इन सुरक्षेचा दुसरा स्तर पुरवते
२-टप्पी पडताळणी सुरू करापासवर्ड धोक्यात येणे यासारख्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात घडत असतात. तुमचे खाते संरक्षित करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे अतिरिक्त पडताळणी लागू करणे. तुम्ही तुमचा पासवर्ड एंटर केल्यानंतर दुसऱ्या पायरीची आवश्यकता ठेवून ज्यांना तुमच्या खात्याचा अॅक्सेस असू नये अशा कोणालाही बाहेर ठेवण्यात २-टप्पी पडताळणी मदत करते.
-
फोनवर केलेले ऑथेंटिकेशन हे सोपे आणि सुरक्षित असते
तुमच्या ऑनलाइन खात्यांमध्ये साइन इन करताना तुमचा फोन यासारखी ऑथेंटिकेशनची निश्चित पद्धत वापरणे हे पासवर्ड वापरण्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे, कारण पासवर्ड हा सहजरीत्या धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच, ऑथेंटिकेशनचे पर्यायी मार्गांचा पुरस्कार करण्यासाठी आम्ही इतरांपेक्षा जास्त मेहनत घेत आहोत. Google सूचना वापरून, फक्त टॅप करून तुमचे खाते ऑथेंटिकेट करता येईल.
-
खात्याची सुरक्षा ही आधीपेक्षा आणखी अखंड करत आहोत
ऑथेंटिकेशन हे अखंड सुरू ठेवण्यासाठी आणि पासवर्डपेक्षादेखील आणखी सुरक्षित करण्यासाठी, आम्ही Android मध्ये सिक्युरिटी की व iOS मध्ये Google Smart Lock अॅप यांसारखी प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानेदेखील तयार करत आहोत. वापरकर्त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा रिकव्हरी फोन किंवा ईमेल असल्यास, आम्ही लवकरच २-टप्पी पडताळणी यामध्ये वापरकर्त्यांची नोंदणी आपोआप करण्यास सुरुवात करू. सुरक्षा तपासणी वापरून तुमचे खाते तपासा.
-
तुमच्या आवडत्या अॅप्स आणि सेवांमध्ये साइन इन करण्यासाठी आणखी सुरक्षित मार्ग
तुमच्या ऑनलाइन खात्यांमध्ये साइन इन करता तेव्हा, तुम्ही सोयीसाठी सुरक्षिततेची जोखीम घेण्याची आवश्यकता नाही. पारदर्शक गोपनीयता पर्याय एकाच ठिकाणी व्यवस्थापित करून, वेबवरील हजारो साइट आणि सेवांवर आणखी सुरक्षितरीत्या व सहजरीत्या साइन इन करण्यासाठी तुम्ही तुमचे Google खाते वापरू शकता.
-
फक्त एका टॅपने, कुठेही सुरक्षितरीत्या साइन इन करा
तुमची इतर खात्यांमधील वैयक्तिक माहिती संरक्षित करण्यासाठी, आम्ही Google ची उद्योगातील आघाडीची सुरक्षा आणि सर्वोत्तम सुविधा एकत्र करतो. Google वापरून साइन इन करणे हे तुम्हाला प्रत्येक सेवेसाठी निराळ्या पद्धतीने ऑथेंटिकेट करते. जेणेकरून, तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही साइट किंवा सेवांवर डेटा भंग झाल्यास, तुमची इतर सर्व खात्यांमधील वैयक्तिक माहिती हॅकरपासून सुरक्षित राहते.
-
तुमची खाती आणि कनेक्शन यांवर आणखी नियंत्रण
Google वापरून साइन इन करणे सुरू करातुम्ही Google वापरून कसे साइन इन करता हे तुम्ही तुमच्या Google खात्यातूनच पाहू आणि व्यवस्थापित करू शकता. हे तुम्हाला कनेक्ट केलेल्या सर्व खात्यांचा अॅक्सेस एकाच ठिकाणी व्यवस्थापित करण्याची किंवा तो मागे घेण्याची अनुमती देते ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण नियंत्रण मिळते.
सुरक्षा तपासणी करून तुमचे Google खाते संरक्षित करा. तुमच्या Google खात्याची सुरक्षा मजबूत करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी हे स्टेप-बाय-स्टेप टूल तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या आणि कृतीत आणण्यासारख्या सुरक्षा शिफारशी देते.
आणखी मार्ग एक्सप्लोर करा.
-
गोपनीयता नियंत्रणेतुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज निवडा.
-
डेटाविषयक कार्यपद्धतीजबाबदार डेटाविषयक कार्यपद्धतींसह आम्ही तुमच्या गोपनीयतेचा कसा आदर करतो त्याबद्दल अधिक जाणून घ्या.
-
सुरक्षेशी संबंधित टिपाऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी झटपट टिपा आणि सर्वोत्तम कार्यपद्धती शोधा.
-
जाहिराती आणि डेटातुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर दिसणार्या जाहिरातींबद्दल अधिक जाणून घ्या.