तुम्हाला
कधीही काळजी करावी लागणार नाही अशी सुरक्षा.

मालवेअर आणि धोकादायक साइटपासून Chrome ची सुरक्षा वैशिष्ट्ये तुमचे संरक्षण करत असताना ब्राउझ करण्याचा पुरेपूर अनुभव घ्या.

बिल्ट-इन सुरक्षा

बाय डीफॉल्ट सुरक्षित

बाय डीफॉल्ट सुरक्षित

तुमचे पासवर्ड चोरणाऱ्या किंवा तुमच्या कॉंप्युटरला हानी पोहोचवू शकणाऱ्या धोकादायक आणि फसव्या वेबसाइटपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी, Chrome बाय डीफॉल्ट सुरक्षित आहे. साइट आयसोलेशन, सॅन्डबॉक्सिंग आणि पूर्वानुमानावर आधारित फिशिंग संरक्षणे यांसारखे प्रगत तंत्रज्ञान तुम्हाला आणि तुमच्या डेटाला सुरक्षित ठेवते.

तुम्ही वेब ब्राउझ करताना क्लिष्ट आणि युनिक पासवर्ड

तुम्ही वेब ब्राउझ करताना क्लिष्ट आणि युनिक पासवर्ड

एकाहून अधिक साइटवरील तुमचा डेटा उघड करतील असे कमकुवत आणि पुन्हा वापरलेले पासवर्ड वापरू नका. Chrome क्लिष्ट आणि युनिक पासवर्ड तयार करू शकते आणि ते तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाइल फोनवर वेब ब्राउझ करता तेव्हा, ऑटोफिल करू शकते. तुमची क्रेडेंशियल धोक्यात आली असल्यास, Chrome तुम्हाला चेतावणी देऊ शकते.

नेहमी अप टू डेट राहा

दर सहा आठवड्यांनी Chrome आपोआप अपडेट केले जाते, ज्यामुळे तुम्हाला नेहमी नवीनतम सुरक्षा वैशिष्ट्ये आणि निराकरणे मिळतात. आणि सुरक्षेसंबंधी महत्त्वाच्या बगचे आम्ही २४ तासांमध्ये निराकरण करू – तुम्हाला कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही.

गोपनीयता नियंत्रणे

गुप्त मोड

गुप्त मोड

तुम्ही तुमचे डिव्हाइस मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करता तेव्हा, गुप्त मोड तुम्हाला निश्चिंत ठेवतो. गुप्त मोड मध्ये ब्राउझ करा आणि तुम्ही तुमच्या गुप्त विंडो बंद करता तेव्हा, त्यांमधील ब्राउझिंग इतिहास Chrome मधून हटवला जातो.

सुरक्षितता तपासणी

Chrome ची सुरक्षितता तपासणी तुमच्या ब्राउझ करण्याच्या अनुभवाची एकंदर सुरक्षा आणि गोपनीयता निश्चित करू शकते. ती तुम्हाला Chrome वर सेव्ह केलेले कोणतेही पासवर्ड धोक्यात असल्यास, त्याबाबत सूचना देऊ शकते, धोकादायक एक्स्टेंशन फ्लॅग करते आणि तुमची सुरक्षेसंबंधी संरक्षणे अप टू डेट असल्याची खात्री करण्यात मदत करते.

गोपनीयता नियंत्रणे

पर्सनलाइझ केलेल्या फीडपासून ते सुलभ पासवर्ड व्यवस्थापन तसेच उपयुक्त शोध परिणाम यांसह तुमचा Chrome अनुभव खास तुमच्यासाठी तयार केला जाऊ शकतो. तुमचे स्थान किंवा कॅमेराचा अ‍ॅक्सेस यांसारख्या वेबसाइट परवानग्या नियंत्रित करण्याच्या समावेशासह सिंक आणि Chrome ची गोपनीयता नियंत्रणे वापरून तुमचा अनुभव कस्टमाइझ करा.

Chrome शॉप
Chrome विषयी
अधिक जाणून घ्या.
आम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक उत्पादनामध्ये
सुरक्षितता कशी बिल्ट इन आहे ते जाणून घ्या.