दररोज
पैसे देण्याचा अधिक सुरक्षित मार्ग.

प्रत्येक पेमेंटच्या आधी, दरम्यान आणि नंतर तुमचे संरक्षण करण्यासाठी बिल्ट इन सुरक्षेसह, तुमचे कार्ड स्वाइप करणे किंवा रोख रकमेत पैसे देणे यांपेक्षा Google Pay वापरणे अधिक सुरक्षित आहे.

तुमची पेमेंट संबंधी माहिती सुरक्षित ठेवा

तुमची पेमेंट संबंधी माहिती सुरक्षित ठेवा

तुम्ही पैसे देण्यासाठी टॅप करता तेव्हा, Google Pay हे व्यापार्‍याला तुमच्या प्रत्यक्ष कार्ड क्रमांकाऐवजी आभासी खाते क्रमांक पाठवते – त्यामुळे तुमची पेमेंट माहिती सुरक्षित राहते.

तुम्ही पैसे देण्यापूर्वी बिल्ट-इन संरक्षण

तुम्ही पैसे देण्यापूर्वी बिल्ट-इन संरक्षण

Google Pay सोबत सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडण्यासाठी स्क्रीन लॉक सेट करा. पैसे देण्यासाठी टॅप करण्यापूर्वी तुम्हाला वैयक्तिक पिन,* पॅटर्न किंवा फिंगरप्रिंट वापरून तुमचे डिव्हाइस अनलॉक करावे लागेल – त्यामुळे तुमची खरेदी अधिक संरक्षित राहते.

*अनलॉकच्या आवश्यकता देशानुसार बदलतात.

तुमचा फोन कुठूनही लॉक करा

तुमचा फोन कुठूनही लॉक करा

तुमचा फोन कधीही हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, तो रिमोट पद्धतीने लॉक करणे, तुमच्या Google खाते मधून लॉग आउट करणे किंवा तुमचा डेटा मिटवणे यांसाठी तुम्ही Google Find My Device वापरू शकता. यामुळे तुमची पेमेंट माहिती सुरक्षित राहते.

उद्योगातील आघाडीची सुरक्षा

उद्योगातील आघाडीची सुरक्षा

तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धती Google च्या खाजगी सर्व्हरवर सुरक्षितपणे स्टोअर केल्या जातात. तुम्ही ऑनलाइन पैसे देता तेव्हा, Google Pay तुमचा डेटा एंक्रिप्ट करते, ज्यामुळे तुमचे पेमेंट ट्रांझिटमध्ये असताना सुरक्षित राहते.

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कधीही विकत नाही

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही विकत नाही. तुम्ही Google Pay वापरून पैसे देता तेव्हा, तुमची वैयक्तिक माहिती तृतीय पक्षांना विकली जाणार नाही.

Google Pay
Google Pay हा पैसे देण्याचा जलद, सुलभ आणि सुरक्षित मार्ग आहे.
आम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक उत्पादनामध्ये
सुरक्षितता कशी बिल्ट इन आहे ते जाणून घ्या.