तुमची माहिती
खाजगी, सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यासाठी Google Assistant तयार केले आहे.

तुम्ही Google Assistant वापरता तेव्हा, तुमच्या डेटाबाबत आमच्यावर विश्वास ठेवता आणि त्याचे संरक्षण व आदर करणे ही आमची जबाबदारी आहे. गोपनीयता वैयक्तिक असते. त्यामुळेच तुमच्यासाठी काय योग्य आहे ते निवडण्यात तुम्हाला मदत करण्याकरिता आम्ही सोपी गोपनीयता नियंत्रणे तयार करतो. Google Assistant कसे काम करते, तुमची बिल्ट-इन गोपनीयता नियंत्रणे, सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे आणि आणखी बऱ्याच गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पेज एक्सप्लोर करा.

Assistant विषयीचा मुख्य व्हिडिओ

स्टँडबाय मोडमध्ये सुरू होते

Google Assistant हे अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट करेपर्यंत स्टँडबाय मोडमध्ये प्रतीक्षा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जसे की ते “Ok Google” ऐकते तेव्हा. स्टँडबाय मोडमध्ये असताना, Assistant तुम्ही बोलता ते Google ला किंवा इतर कोणाला पाठवणार नाही.

अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट केल्यावर Google Assistant हे स्टँडबाय मोडमधून बाहेर पडते आणि तुमची विनंती Google सर्व्हरना पाठवते. “Ok Google” सारखा आवाज आल्यास किंवा चुकून मॅन्युअल अ‍ॅक्टिव्हेशन झाल्यासदेखील असे घडू शकते.

Google Assistant हे ऑडिओ रेकॉर्डिंग, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीजाहिरात पर्सनलायझेशन कसे हाताळते त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

मी बोललेली प्रत्येक गोष्ट Google Assistant रेकॉर्ड करते का?

नाही. Google Assistant हे ॲक्टिव्हेशन डिटेक्ट करेपर्यंत स्टँडबाय मोडमध्ये प्रतीक्षा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जसे की ते “Ok Google” ऐकते तेव्हा. स्टँडबाय मोडमध्ये असताना, Assistant तुम्ही बोलता ते Google ला किंवा इतर कोणाला पाठवणार नाही. अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट केल्यावर Google Assistant हे स्टँडबाय मोडमधून बाहेर पडते आणि तुमची विनंती Google सर्व्हरना पाठवते. “Ok Google” सारखा आवाज आल्यास किंवा चुकून मॅन्युअल अ‍ॅक्टिव्हेशन झाल्यासदेखील असे घडू शकते.

मी Google Assistant कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे?

तुमच्या डिव्हाइसनुसार, तुम्ही Assistant काही मार्गांनी अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही “Ok Google” म्हणू शकता किंवा तुमच्या फोनचे पॉवर बटण अथवा होम बटण धरून ठेवून ते मॅन्युअली अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट झाल्यावर मला कसे कळेल?

तुमच्या डिव्हाइसवरील स्टेटस इंडिकेटर, जसे की ऑन-स्क्रीन इंडिकेटर किंवा तुमच्या डिव्हाइसच्या सर्वात वर फ्लॅश करत असलेले LED हे Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट झाल्यावर तुम्हाला कळवतात.

मला करायचे नसतानाही काही वेळा Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट का होते?

तुम्हाला करायचे नसतानाही Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट होऊ शकते, कारण तुम्हाला त्याची मदत हवी आहे असे ते चुकून डिटेक्ट करते - उदाहरणार्थ, “Ok Google” सारखा वाटणारा आवाज ऐकू आल्यास किंवा तुम्ही चुकून मॅन्युअली अ‍ॅक्टिव्हेट केल्यास. चुकून झालेली अ‍ॅक्टिव्हेशन कमी करण्यासाठी आमच्या सिस्टीम आणखी चांगल्या बनवण्याकरिता आम्ही सातत्याने काम करत आहोत.

तसे झाल्यास व तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केलेली असल्यास, तुम्ही “Ok Google, ते तुझ्यासाठी नव्हते,” असे म्हणू शकता आणि Assistant तुम्ही काय म्हटले होते हे माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधून हटवेल. तसेच तुमच्या Assistant सोबतच्या संवादांचे तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये कधीही पुनरावलोकन करू शकता आणि ते हटवू शकता. तुम्हाला करायचे नसतानाही Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट झाल्यास व तुमचे वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग बंद केलेले असल्यास, तुमचे Assistant सोबतचे संवाद माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये स्टोअर केले जाणार नाहीत.

Google Assistant ला तुमच्या वातावरणानुसार आणखी चांगल्या प्रकारे अनुकूल करण्यासाठी, स्मार्ट स्पीकर आणि स्मार्ट डिस्प्ले यांकरिता Google Home अ‍ॅपद्वारे तुम्ही अ‍ॅक्टिव्हेशन वाक्ये (जसे की, “Ok Google”) यांसाठी Assistant किती संवेदनशील हवे ते अ‍ॅडजस्ट करणे हे करू शकता.

स्टँडबाय मोडमध्ये असताना Google Assistant काय करते?

Google Assistant हे अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट करेपर्यंत स्टँडबाय मोडमध्ये प्रतीक्षा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. स्टँडबाय मोडमध्ये अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट करण्यासाठी डिव्हाइस ऑडिओच्या लहान स्निपेटवर (काही सेकंदांच्या) प्रक्रिया करते, जसे की तुम्ही “Ok Google” म्हणता तेव्हा. कोणतेही अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट न केले गेल्यास, ती ऑडिओ स्निपेट Google ला पाठवली किंवा सेव्ह केली जाणार नाहीत.

Google Assistant ने अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट केल्यावर काय घडते?

अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट केल्यावर, Assistant स्टँडबाय मोडमधून बाहेर पडतो - यामध्ये चुकून झालेले मॅन्युअल अ‍ॅक्टिव्हेशन किंवा “Ok Google” सारख्या वाटणार्‍या आवाजाचा समावेश आहे. त्यानंतर तुमचे डिव्हाइस जे ऐकते ते रेकॉर्ड करते आणि तुमच्या विनंतीची पूर्तता करण्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंग Google सर्व्हरना पाठवते. तुमची संपूर्ण विनंती रेकॉर्ड करण्यासाठी, रेकॉर्डिंगमध्ये अ‍ॅक्टिव्हेशनपूर्वीच्या काही सेकंदांचा समावेश असू शकतो.

Google सर्व्हरना पाठवलेली कोणतीही ऑडिओ रेकॉर्डिंग्ज त्यानंतर तुमचे Google खाते यावर सेव्ह केली जावीत किंवा जाऊ नयेत हे नेहमी तुम्हीच नियंत्रित करता. बाय डीफॉल्ट, आम्ही तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करत नाही. तुम्ही तुमचे सध्याचे सेटिंग वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग अंतर्गत “व्हॉइस आणि ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश करा” चेकबॉक्स पाहून तपासू शकता.

गोपनीयतेसाठी डिझाइन केलेले

बाय डीफॉल्ट, आम्ही तुमची Google Assistant ऑडिओ रेकॉर्डिंग राखून ठेवत नाही. तुमचा डेटा Google Assistant ला तुमच्यासाठी काम करण्यात कसा मदत करतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, “Google Assistant मधील तुमचा डेटा” ला भेट द्या.

Google Assistant माझा डेटा कसा वापरते?

तुमचे म्हणणे समजून घेण्यासाठी आणि तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी, तसेच तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी, Assistant हे तुमच्या लिंक केलेल्या डिव्हाइस आणि सेवांवरून तुमच्या क्वेरी व माहिती वापरते. तुमच्या लिंक केलेल्या डिव्हाइस आणि सेवांवरील माहितीच्या उदाहरणांमध्ये स्थान, संपर्क, डिव्हाइसची नावे, टास्क, इव्हेंट, अलार्म, इंस्टॉल केलेली अ‍ॅप्स व प्लेलिस्ट यांचा समावेश आहे.   

Google चे गोपनीयता धोरण यामध्ये वर्णन केल्यानुसार, तुमचा डेटा Google उत्पादने आणि सेवा व मशीन लर्निंग तंत्रज्ञाने विकसित करण्यासाठी आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठीदेखील वापरला जातो. गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यात आणि Assistant मध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी, मानवी परीक्षणकर्ते तुमच्या Assistant क्वेरी व संबंधित माहिती रीड करतात, त्यावर भाष्य आणि प्रक्रिया करतात. या प्रक्रियेचा भाग म्हणून तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही पावले उचलतो. यामध्ये परीक्षणकर्त्यांनी तुमच्या क्वेरी पाहण्यापूर्वी आणि त्यांवर भाष्य करण्यापूर्वी त्या तुमच्या Google खाते पासून डिस्कनेक्ट करणे समाविष्ट आहे.  

Google Assistant तुमच्या डेटासह कसे काम करते याविषयी अधिक जाणून घ्या. Google तुमचा डेटा कसा संरक्षित करते आणि तो कसा वापरते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी Google चे गोपनीयता धोरण ला भेट द्या.

Google Assistant माझी ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करते का?

बाय डीफॉल्ट, तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग स्टोअर केली जात नाहीत. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग अंतर्गत “ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश करा” वर खूण करून तुम्ही तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करणे निवडू शकता.

माझी ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्या Google खाते मध्ये सेव्ह करण्याचा फायदा काय आहे?

आमच्या ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानामध्ये सर्वांसाठी सुधारणा करण्यात तुम्हाला मदत करायची असल्यास, तुम्ही तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग सुरक्षितपणे राखून ठेवणे आणि आमच्या स्पीच सुधारणा सिस्टीमला उपलब्ध करून देणे निवडू शकता. यामुळे Google Assistant सारख्या उत्पादनांना भविष्यात भाषा आणखी चांगल्या प्रकारे समजण्याच्या क्षमतेत सुधारणा करण्यात मदत होते. या प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घ्या.

माझ्याव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती माझी सेव्ह केलेली ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकू शकते का?

तुम्ही तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करण्याचे ठरवल्यास, आमच्या ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी त्यांच्या भागांचे पुनरावलोकन केले जाऊ शकते.

उदाहरणार्थ, Google च्या ऑडिओ पुनरावलोकन प्रक्रियेसाठी ऑडिओ रेकॉर्डिंग वापरली जाऊ शकतात. या प्रक्रियेदरम्यान, मशीनने निवडलेल्या ऑडिओ स्निपेटचा नमुना त्यांच्या Google खात्यांपासून वेगळा केला जातो. त्यानंतर प्रशिक्षित परीक्षक रेकॉर्डिंगवर भाष्य करण्यासाठी ऑडिओचे विश्लेषण करू शकतात आणि बोललेले शब्द Google च्या ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानांद्वारे अचूकपणे समजले होते की नाही याची पडताळणी करू शकतात. यामुळे Google Assistant सारख्या उत्पादनाला भविष्यात भाषा आणखी चांगल्या प्रकारे समजण्याच्या क्षमतेत सुधारणा करण्यात मदत होते.

सरकार माझी ऑडिओ रेकॉर्डिंग अ‍ॅक्सेस करू शकते का?

जगभरातील सरकारी संस्था Google ला वापरकर्त्याची माहिती उघड करण्याची विनंती करतात. ती विनंती लागू असलेल्या कायद्यांची पूर्तता करते की नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही प्रत्येक विनंतीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करतो. एखाद्या विनंतीमध्ये बऱ्याच माहितीची मागणी केली असल्यास, आम्ही ती कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि काही प्रकरणांमध्ये आम्ही कोणतीही माहिती देण्यास हरकत घेतो. आम्ही आमच्या पारदर्शकता अहवाल यामध्ये आम्हाला मिळालेल्या विनंत्यांची संख्या आणि प्रकार शेअर करतो. अधिक जाणून घ्या

तुम्ही माझ्या ऑडिओ रेकॉर्डिंगची किंवा इतर वैयक्तिक माहितीची विक्री करता का?

Google कधीही तुमच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची किंवा इतर वैयक्तिक माहितीची विक्री करत नाही.

Google Assistant तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करते याबद्दल अधिक जाणून घ्या.

वापरण्यास सोपी गोपनीयता नियंत्रणे

कोणते संवाद स्टोअर केले जावेत हे नियंत्रित करण्यासाठी, फक्त “Ok Google, मी या आठवड्यात काय म्हटले ते हटव” यासारखे काहीतरी म्हणा आणि Google Assistant ते संवाद “माझी अ‍ॅक्टिव्हिटी” मधून हटवेल.

मला माझी गोपनीयता नियंत्रणे कुठे सापडतील?

गोपनीयता आणि सुरक्षा यांसंबंधी सर्वात सामान्य प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी, Google Assistant ला फक्त “मला माझी गोपनीयता सेटिंग्ज कुठे बदलता येतील?” यांसारखे प्रश्न विचारा. किंवा तुमची गोपनीयता नियंत्रणे अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुम्ही “Assistant मधील तुमचा डेटा” ला कधीही थेट भेट देऊ शकता.

मला माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये माझे Assistant सोबतचे संवाद हटवता येतात असे तुम्ही नमूद केले आहे. ते कसे काम करते?

तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधून किंवा “Ok Google, मी या आठवड्यात काय म्हटले ते हटव” असे म्हणून तुमच्या Assistant सोबतच्या संवादांचे पुनरावलोकन करू शकता आणि ते हटवू शकता. अतिरिक्त नियंत्रणे अ‍ॅक्सेस करण्यासाठी, तुमच्या Assistant सेटिंग्ज ला भेट द्या.

मला माझा डेटा ऑटो-डिलीट करण्यासाठी सेट करता येतो का?

होय, तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधून तुमचा अ‍ॅक्टिव्हिटी डेटा ऑटो-डिलीट करू शकता. तुम्हाला तुमचा अ‍ॅक्टिव्हिटी डेटा तेथे किती कालावधीसाठी सेव्ह केला जावा असे वाटते, त्याची वेळमर्यादा निवडा – ३, १८ किंवा ३६ महिने – आणि त्यापेक्षा जुना असलेला कोणताही डेटा माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधून आपोआप सतत हटवला जाईल.

माझा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी Google Assistant डेटाचा वापर कसा करते?

तुमच्या Google खाते मधील डेटा तुमचा Google Assistant संबंधीचा अनुभव पर्सनलाइझ करू शकतो आणि Assistant ला तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनवू शकतो.

असे काही प्रश्न असतात ज्यासाठी Google Assistant ला तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या डेटाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, तुम्ही “माझ्या आईचा वाढदिवस कधी आहे?” असे विचारल्यास, Assistant ला "आई" कोण आहे जाणून घेण्यासाठी आणि तिचा वाढदिवस शोधण्यासाठी तुमच्या संपर्कांचा संदर्भ आवश्यक असतो. किंवा तुम्ही “उद्या पाऊस पडेल का?” असे विचारल्यास, तुम्हाला सर्वात उपयुक्त उत्तर देण्यासाठी Assistant तुमचे सध्याचे स्थान वापरते.

तुम्हाला प्रोअ‍ॅक्टिव्ह सूचना देण्यासाठीदेखील Google Assistant डेटा वापरते. उदाहरणार्थ, तुमच्या नेहमीच्या मार्गांवर प्रचंड रहदारी असते तेव्हा, तुमचे स्थान वापरून Assistant तुम्हाला सूचित करू शकते.

Google Assistant तुमच्या Google खाते मधील अ‍ॅक्टिव्हिटी वापरून तुमच्या परिणामांमध्ये सुधारणा करू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही "आज रात्रीच्या जेवणासाठी मी काय बनवू?" असे विचारल्यास, Assistant पर्सनलाइझ केलेल्या पाककृतीच्या शिफारशी देण्यासाठी मागील शोध इतिहास वापरू शकते.

तुमचा डेटा पाहण्यासाठी किंवा हटवण्यासाठी, तुमची सध्याची सेटिंग्ज तपासण्यासाठी आणि उपलब्ध असलेल्या नियंत्रणांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही कधीही "[Google Assistant मधील तुमचा डेटा] (https://myaccount.google.com/yourdata/assistant)” ला भेट देऊ शकता.

Google तुमचा डेटा कसा संरक्षित करते आणि वापरते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, Google च्या [गोपनीयता धोरण] (https://policies.google.com/privacy) ला भेट द्या.

Google Assistant तुमच्या डेटासोबत कसे काम करते याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google Assistant ने मला वैयक्तिक परिणाम देणे, मी नियंत्रित करू शकतो/ते का?

होय. Google Assistant एकाहून अधिक वापरकर्त्यांसाठी प्रत्येकाने शेअर केलेल्या डिव्हाइसवर पर्सनलाइझ केलेले अनुभव घेणे सोपे करते. ऑफिसला जाण्यासाठी दिशानिर्देश किंवा पर्सनलाइझ केलेल्या पाककृतीच्या शिफारशी यांसारखे वैयक्तिक परिणाम मिळवण्यासाठी Assistant तुमचा आवाज ओळखते तेव्हाच, या पायऱ्या फॉलो करून Voice Match सेट करा. Family Link वापरकर्ते Google Assistant द्वारे या पायऱ्या फॉलो करून वैयक्तिक परिणामदेखील मिळवू शकतात.

मोबाइल आणि स्पीकर यांसारख्या शेअर केलेल्या डिव्हाइसवर तुमची सेटिंग्ज बदलून तुम्ही वैयक्तिक परिणामांचा अ‍ॅक्सेस नियंत्रित करू शकता. आणि मोबाइलवर, तुमच्या लॉक स्‍क्रीनवर वैयक्तिक परिणाम कसे दिसतात हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

कुटुंबांसाठी तयार केलेले

तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना अप टू डेट ठेवण्यासाठी Google Assistant विविध प्रकारचे मार्ग ऑफर करते. तुमचे कुटुंब Assistant सोबत कसा संवाद साधते हे व्यवस्थापित करण्यासाठी Family Link यांसारखी टूल तुम्हाला मदत करू शकतात.

Google Assistant हे कुटुंबस्नेही आशय कसा पुरवते?

Google Assistant हे गोष्टी, गेम, तसेच तृतीय पक्ष डेव्हलपरने पुरवलेल्या काही आशयासह लहान मुले आणि कुटुंबांसाठी शैक्षणिक टूलपर्यंत विविध प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटी पुरवते. Assistant वर कुटुंबांसाठी आशय प्रकाशित करण्याकरिता, या डेव्हलपरना शिक्षकांनी मंजूर केलेले अ‍ॅप मिळवून किंवा त्यांच्या कुटुंबस्नेही Action साठी Google सोबत भागीदारीचा करार करून पात्र ठरणे आवश्यक आहे. तृतीय पक्ष डेव्हलपरने पुरवलेल्या लहान मुलांसाठी उद्देशित असलेल्या सर्व Action साठी आमची मानक Action धोरणे यांसोबतच Actions for Families या आमच्या प्रोग्रामच्या विशिष्ट आवश्यकता यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. Google Assistant मध्ये साधारणतः उपलब्ध होण्यापूर्वी या Actions आमच्या धोरणांचे आणि आवश्यकतांचे पालन करत असल्याचे तपासण्यासाठी आम्ही त्यांचे पुनरावलोकन करतो.

माझ्या कुटुंब सदस्यांना Google Assistant द्वारे कोणता आशय मिळावा हे मला कसे व्यवस्थापित करता येईल?

तुम्ही Google Home अ‍ॅपमधील Digital Wellbeing नियंत्रणे वापरून, स्मार्ट डिस्प्ले यांसारख्या तुमच्या घरातील शेअर केलेल्या डिव्हाइससाठी आशय नियंत्रणे सेट करू शकता. ही सेटिंग्ज वापरून, तुम्ही डाउनटाइम शेड्यूल, आशय फिल्टर करण्याची सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता आणि फोन कॉल यांसारख्या ठरावीक अ‍ॅक्टिव्हिटी मर्यादित करू शकता. ही सेटिंग्ज अतिथी आणि Family Link वापरून व्यवस्थापित केलेली सुपरवाइझ केलेली खाती यांना लागू होतात की त्या डिव्हाइसच्या सर्व वापरकर्त्यांना हेदेखील तुम्ही ठरवू शकता.

Family Link मध्ये ऑफर केलेली पालक नियंत्रणे वापरून तुम्ही प्रत्येक लहान मुलासाठी स्वतंत्ररीत्या मर्यादा सेट करू शकता. शेअर केलेल्या डिव्हाइसवर, तुम्ही Voice Match वापरून तुमच्या लहान मुलाचे खाते डिव्हाइसशी लिंक करू शकता जेणेकरून Assistant ला त्यांना ओळखता येईल. तुमच्या लहान मुलाची नोंदणी केल्यावर, ते फक्त “कुटुंबांसाठी” असा बॅज असलेल्या, Google च्या नसलेल्या Action अ‍ॅक्सेस करू शकतात आणि Assistant मार्फत खरेदी करणे यांसारख्या ठरावीक कृती करण्यापासून त्यांना रोखले जाते. त्यांची नोंदणी झाली आहे अशा सर्व Google Assistant डिव्हाइसवर या मर्यादा लागू होतात. Google Home आणि Assistant सोबत Family Link खाते कसे काम करते याविषयी अधिक माहितीसाठी, Google for Families मदत पहा.

Google Assistant लहान मुलांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण कसे करते?

Google हे Actions for Families च्या पुरवठादारांसोबत तुमच्या लहान मुलाचे नाव, ईमेल अ‍ॅड्रेस, आवाजाचे रेकॉर्डिंग किंवा विशिष्ट स्थान यांसारखी वैयक्तिक माहिती शेअर करत नाही. हे पुरवठादार वापरकर्त्यांच्या Google Assistant सोबतच्या संभाषणांमधून वैयक्तिक माहितीची मागणी न करण्यासदेखील सहमती दर्शवतात. या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही Action आम्हाला आढळल्यास, आम्ही कारवाई करतो.

Google Assistant हे लहान मुलांच्या वैशिष्ट्यांमधील ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करते का?

आम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश करणे निवडलेले, Family Link वापरून व्यवस्थापित केलेले Google खाते यासाठी तसे करण्याची संमती नसल्यास, आम्ही कुटुंबांसाठी कृती यामधील अ‍ॅक्टिव्हिटी किंवा YouTube Kids व्हिडिओ यांसारख्या लहान मुलांच्या वैशिष्ट्यांसोबतच्या संवादांमधील ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करत नाही. अधिक तपशिलांसाठी, आमची गोपनीयता सूचना पहा.

मला माझ्या लहान मुलाच्या Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटीमधून कोणताही डेटा काढून टाकता येतो का?

होय. Family Link वापरून व्यवस्थापित केलेल्या त्यांच्या खात्यामध्ये साइन इन करून, तुम्ही तुमच्या लहान मुलाची सेव्ह केलेली अ‍ॅक्टिव्हिटी अ‍ॅक्सेस करू शकता, एक्स्पोर्ट करू शकता आणि हटवू शकता. तुम्ही Family Link अ‍ॅपद्वारे किंवा families.google.com ला भेट देऊन आणि लहान मुलाच्या प्रोफाइलवर क्लिक करूनदेखील तुमच्या लहान मुलाची अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता. अधिक तपशिलांसाठी, g.co/childaccounthelp वर जा.

Google Assistant
Google Assistant विषयी
अधिक जाणून घ्या.
आम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक उत्पादनामध्ये
सुरक्षितता कशी बिल्ट इन आहे ते जाणून घ्या.