प्रत्येक Google उत्पादन
सुरक्षिततेसाठी डिझाइन केलेले आहे.
दररोज, अब्जावधी लोक विश्वासार्ह माहिती शोधण्यासाठी, त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी, प्रियजनांशी कनेक्ट करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी Google वापरतात. तुम्ही आमची उत्पादने आणि सेवा वापरता तेव्हा, तुमची वैयक्तिक माहिती खाजगी, सुरक्षित आणि संरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी असते.
सुरक्षितपणे आणि संरक्षितपणे.
-
सुरक्षित, उच्च दर्जाचे परिणाम
उच्च दर्जाचा आशय देण्याचे वचन न पाळणार्या किंवा वापरकर्त्यांसाठी हानिकारक ठरू शकणार्या युक्त्यांचा अवलंब करणार्या साइटऐवजी, तुम्हाला उपयुक्त, उच्च दर्जाचे शोध परिणाम दिसतील याची खात्री करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो. आम्ही आमच्या स्पॅम फायटिंग तंत्रज्ञानामध्ये सतत सुधारणा करत आहोत आणि उच्च दर्जाच्या, अधिक सुरक्षित वेबला सपोर्ट करण्यासाठी Google च्या बाहेरील लोकांसोबत काम करत आहोत.
-
तुमचे शोध सुरक्षित असतात
google.com वरील आणि Google अॅपमधील सर्व शोध बाय डीफॉल्ट एंक्रिप्ट केलेले असतात, ज्यामुळे तुम्ही जे शोधता ते संरक्षित असते.
-
वापरण्यास सोपी गोपनीयता नियंत्रणे
आम्ही तुमचा शोध इतिहास सुरक्षित करतो आणि गोपनीयता नियंत्रणे वापरून त्याचे पुनरावलोकन करणे व तो तुमच्या खात्यामधून हटवणे तुमच्यासाठी सोपे करतो.
-
सुरक्षित सामग्री मिळवण्यासाठी नियंत्रणे
Search हे तुम्हाला जे हवे आहे ते शोधण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. तुम्ही सुरक्षितशोध निवडून संरक्षणाचा एक स्तर जोडू शकता, ज्यामुळे तुम्हाला लैंगिकदृष्ट्या भडक परिणाम फिल्टर करण्यात मदत होऊ शकते.
-
Google ॲप वापरून इनकॉग्निटो मोडमध्ये शोधा
iOS साठी असलेल्या Google ॲपमध्ये इनकॉग्निटो मोड असतो. तो सुरू करण्यासाठी होम स्क्रीनवरून फक्त एका टॅपची गरज असते.
सुरक्षित ठेवणारा ईमेल.
-
फिशिंग पासून मजबूत संरक्षण
अनेक मालवेअर आणि फिशिंग हल्ल्यांची सुरुवात ईमेलपासून होते. Gmail हे ९९.९% हून अधिक स्पॅम, फिशिंगचे प्रयत्न आणि मालवेअर तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून ब्लॉक करते.
-
खाते सुरक्षितता
एकाहून अधिक सुरक्षा सिग्नलचे परीक्षण करून आम्ही तुमच्या खात्याचे संशयास्पद लॉग इन आणि अनधिकृत अॅक्टिव्हिटीपासून संरक्षण करतो. लक्ष्यित हल्ल्यांचा सर्वात जास्त धोका असलेल्या खात्यांसाठी आम्ही प्रगत संरक्षण प्रोग्राम हादेखील देऊ करतो.
-
ईमेल एंक्रिप्शन
Google इंफ्रास्ट्रक्चरमध्ये, मेसेज एका जागी स्थिर असताना आणि डेटा केंद्रांदरम्यान पाठवले जात असताना एंक्रिप्ट केले जातात. तृतीय पक्ष पुरवठादारांना पाठवले जाणारे मेसेज शक्य असेल तेव्हा किंवा काँफिगरेशननुसार आवश्यक असेल तेव्हा वाहतूक स्तर सुरक्षा वापरून एंक्रिप्ट केले जातात.
-
बाय डीफॉल्ट सुरक्षित
तुम्ही Chrome वापरता तेव्हा, सुरक्षित ब्राउझिंग, सँडबॉक्सिंग आणि श्रेणीतील इतर सर्वोत्तम तंत्रज्ञानांसारखी बिल्ट-इन संरक्षणे तुमचे धोकादायक साइट, मालवेअर आणि धोक्यांपासून संरक्षण करतात.
-
ऑटोमॅटिक सुरक्षा अपडेट
Chrome दर सहा आठवड्यांनी आपोआप अपडेट होऊ शकते जेणेकरून, तुमच्याकडे नवीनतम सुरक्षा वैशिष्ट्ये आणि निराकरणे असतील, तुम्ही कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही.
-
क्लिष्ट आणि युनिक पासवर्ड
तुमची सर्व खाती अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी, क्लिष्ट आणि युनिक पासवर्ड तयार करण्यात आणि तुम्ही वेब ब्राउझ करत असताना ते तुमच्यासाठी सर्व डिव्हाइसवर भरण्यात Chrome मदत करू शकते.
-
गुप्त मोड
Chrome मधील गुप्त मोड तुम्हाला तुमची अॅक्टिव्हिटी तुमच्या ब्राउझरवर किंवा तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केली न जाता इंटरनेट ब्राउझ करणे निवडू देतो.
तुमची गोपनीयता नियंत्रित करा.
-
गुप्त मोड
Maps गुप्त मोडमध्ये वापरल्याने तुमची अॅक्टिव्हिटी तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केली जाणार नाही. Maps मध्ये तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करून गुप्त मोड सहज सुरू करा आणि रेस्टॉरंटसंबंधी शिफारशी व तुमच्यासाठी अनुकूल केलेली इतर वैशिष्ट्ये यांसह आणखी पर्सनलाइझ केलेला अनुभव मिळवण्यासाठी तो कधीही बंद करा.
-
अॅक्सेस करण्यास सोपी गोपनीयता नियंत्रणे
तुमचा डेटा पाहण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही “Maps मधील तुमचा डेटा” वापरून, तुमचे स्थान आणि इतर गोपनीयता नियंत्रणे सहज अॅक्सेस करू शकता.
तुम्हीच नियंत्रित करता.
-
जाहिरात सेटिंग्ज
आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कधीही कोणाला विकत नाही. तुमच्या जाहिरात सेटिंग्ज मध्ये तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसाव्यात हे आणखी चांगल्या प्रकारे नियंत्रित करता यावे आणि जाहिरात पर्सनलायझेशन बंद करता यावे यासाठी आम्ही जाहिरात सेटिंग्जदेखील पुरवतो.
-
गुप्त मोड
YouTube मध्ये गुप्त मोड सुरू असताना, तुम्ही पाहत असलेले व्हिडिओ यासारखी तुमची अॅक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जाणार नाही किंवा तुमच्या पाहण्याच्या इतिहासामध्ये समाविष्ट केली जाणार नाही.
-
वापरण्यास सोपी गोपनीयता नियंत्रणे
तुमचा YouTube इतिहास तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा करू शकतो आणि आशयासंबंधी शिफारशी करू शकतो. “YouTube मधील तुमचा डेटा” यावर जाऊन तुमचा YouTube इतिहास किती काळ ठेवायचा किंवा पूर्णपणे बंद करायचा ते ठरवा.
जीवनातल्या आठवणींसाठी सुरक्षित स्थान.
-
तुमची माहिती सुरक्षित ठेवणे
तुम्ही Google Photos वर बॅकअप घेतलेल्या आठवणींचे आम्ही जगातील एक सर्वात प्रगत सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चर वापरून संरक्षण करतो. तुमची माहिती तुमचे डिव्हाइस, Google सेवा आणि आमची डेटा केंद्रे यांच्यादरम्यान फिरत असल्यामुळे आम्ही ती एंक्रिप्टदेखील करतो.
-
डेटा जबाबदारीने हाताळणे
Google Photos तुमचे फोटो, व्हिडिओ किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही विकत नाही आणि आम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ जाहिरातीसाठी वापरत नाही. फेस ग्रुपिंगसारखी वैशिष्ट्ये तुमचे फोटो शोधणे आणि व्यवस्थापित करणे सोपे करत आहेत. मात्र, फेस ग्रुप आणि लेबल फक्त तुम्हाला दिसतात आणि आम्ही सर्वसाधारण उद्देशासाठी असलेले फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान व्यावसायिकरीत्या उपलब्ध करून देत नाही.
-
तुम्हाला नियंत्रण करू देणे
आम्ही तुमचा Google Photos अनुभव नियंत्रित करण्यात तुम्हाला मदत करणारी वापरण्यास सोपी टूल तयार करतो. तुम्हाला क्लाउडवर स्टोअर केले जायला हवे असलेल्या निवडक फोटोंचा तुम्ही बॅकअप घेऊ शकता, तुमचे फोटो सुरक्षितपणे शेअर करू शकता, ते तुमच्या खात्यामधून हटवण्यासाठी फेस ग्रुप आणि लेबल बंद करू शकता आणि स्थान माहिती संपादित करू शकता.
Pixel सुरक्षित करते.
-
ऑन-डिव्हाइस बुद्धिमत्ता
तुमच्या डिव्हाइसवर तुमचा जास्त डेटा ठेवणार्या, मशीन लर्निंग (ML) वापरण्याच्या नवीन पद्धती आम्ही सर्वप्रथम सुरू केल्या आहेत. फेडरेटेड लर्निंग हा ML मॉडेलना प्रशिक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या डिव्हाइसमधील अॅनोनिमाइझ केलेली माहिती एकत्रित करणारा नवीन दृष्टिकोन आहे, ज्यामुळे आम्हाला कोणत्याही व्यक्तीबद्दल स्वतंत्रपणे जाणून न घेता सर्वांकडून शिकण्यात मदत होते. आणखी उपयुक्त उत्पादने आणि सेवा तयार करत असतानाच, फेडरेटेड लर्निंग तुमची गोपनीयता जपण्यात मदत करते.
-
Titan™ M चिप
Google Cloud डेटा केंद्रांचे संरक्षण करणारी सुरक्षा चिप हीच तुमच्या सर्वात संवेदनशील माहितीचे संरक्षण करते. यामध्ये पासवर्ड संरक्षण, एंक्रिप्शन आणि व्यवहार सुरक्षा यांचा समावेश आहे.
-
ऑटोमॅटिक OS अपडेट
Pixel सोबत, तुम्हाला तीन वर्षांसाठी नवीनतम OS आणि सुरक्षेसंबंधी अपडेट आपोआप मिळतात.1 यामुळे तुम्हाला लगेच नवीन वैशिष्ट्ये अॅक्सेस करण्यात आणि सुरक्षा संवर्धनांकडून फायदे मिळवण्यात मदत होते.
1 यू.एस. मध्ये Google Store वर डिव्हाइस सर्वप्रथम उपलब्ध झाल्यापासून किमान तीन वर्षांसाठी Android आवृत्तीचे अपडेट. तपशिलांसाठी g.co/pixel/updates पहा.
गोपनीयतेसाठी डिझाइन केलेले आहे.
-
स्टँडबाय मोडमध्ये सुरू होते
Google Assistant हे अॅक्टिव्हेशन डिटेक्ट करेपर्यंत स्टँडबाय मोडमध्ये प्रतीक्षा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जसे की ते “Ok Google” ऐकते तेव्हा. स्टँडबाय मोडमध्ये असताना, Assistant तुम्ही बोलता ते Google ला किंवा इतर कोणालाही पाठवणार नाही.
Google Assistant ने अॅक्टिव्हेशन डिटेक्ट केल्यावर, ते स्टँडबाय मोडमधून बाहेर पडते आणि तुमची विनंती Google सर्व्हरना पाठवते. “Ok Google” सारखा ऐकू येणारा आवाज आल्यास किंवा चुकून मॅन्युअल अॅक्टिव्हेशन झाल्यासदेखील असे घडू शकते.
-
गोपनीयतेसाठी डिझाइन केलेले
बाय डीफॉल्ट, आम्ही तुमची Google Assistant ऑडिओ रेकॉर्डिंग राखून ठेवत नाही. तुमचा डेटा Google Assistant ला तुमच्यासाठी काम करण्यात कशा प्रकारे मदत करतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी “Google Assistant मधील तुमचा डेटा” ला भेट द्या.
-
वापरण्यास सोपी गोपनीयता नियंत्रणे
कोणते संवाद स्टोअर केले जावेत हे नियंत्रित करण्यासाठी, फक्त “Ok Google, मी या आठवड्यात काय म्हटले ते हटव” यासारखे काहीतरी म्हणा आणि Google Assistant ते संवाद “माझी अॅक्टिव्हिटी” मधून हटवेल.
प्लॅटफॉर्म.
-
Google Play Protect
Google Play Protect हे तुमची अॅप्स सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी ती आपोआप स्कॅन करते. तुम्हाला एखादे खराब अॅप आढळल्यास, आम्ही तुम्हाला त्वरित सावध करू आणि ते अॅप तुमच्या डिव्हाइसवरून कसे काढून टाकायचे याबाबत सूचना देऊ.
-
अॅप परवानग्या
तुम्ही डाउनलोड करत असलेली अॅप्स त्यांची कार्यक्षमता आणखी उपयुक्त बनवण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवरील डेटा वापरतात. एखादे अॅप तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क, फोटो आणि स्थान यांसारखा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा अॅक्सेस करू शकते का आणि तो कधी करू शकते यावर अॅप परवानग्या तुम्हाला नियंत्रण देतात.
-
फिशिंगपासून संरक्षण
एखादी व्यक्ती तुम्हाला फसवून तुमची खाजगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते तेव्हा फिशिंग घडते. Android तुम्हाला स्पॅमरबाबत इशारा देते आणि कॉल स्क्रीन तुम्ही फोन घेण्यापूर्वी कोण कॉल करत आहे हे तुम्हाला विचारू देते.
अधिक सुरक्षित मार्ग.
-
प्रत्येक खरेदीपूर्वी ऑथेंटिकेट करा
Google Pay फक्त तुमचे डिव्हाइस तुमचे फिंगरप्रिंट, पॅटर्न किंवा पिन वापरून अनलॉक केले गेल्यावर काम करते* – त्यामुळे फक्त तुम्हाला तुमचा फोन वापरून पैसे देता येतात.
*अनलॉकच्या आवश्यकता देशानुसार बदलतात.
-
तुमच्या कार्डचे तपशील शेअर केले जात नाहीत
तुमचे कार्ड स्वाइप करण्यापेक्षा पैसे देण्यासाठी टॅप करणे अधिक सुरक्षित असते कारण, व्यापार्यांना तुमचा प्रत्यक्ष कार्ड क्रमांक मिळत नाही. Google Pay तुमच्या पेमेंटसंबंधी माहितीचे संरक्षण करणारा आभासी खाते क्रमांक वापरते.
-
तुमचा फोन कुठूनही लॉक करा
तुमचा फोन कधीही हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, तो रिमोट पद्धतीने लॉक करण्यासाठी, तुमच्या Google खाते मधून लॉग आउट करण्यासाठी किंवा तुमचा डेटा पूर्णपणे मिटवण्यासाठी तुम्ही Google Find My Device वापरू शकता.
-
सुरक्षितता वैशिष्ट्ये बाय डीफॉल्ट सुरू असतात
मीटिंग सुरक्षित ठेवण्यासाठी, Google Meet मध्ये बाय डीफॉल्ट सुरू असणारी गैरवापरविरोधी वैशिष्ट्ये आणि सुरक्षित मीटिंग नियंत्रणे आहेत आणि ते सिक्युरिटी कीसह, २-टप्पी पडताळणीच्या एकाहून अधिक पर्यायांना सपोर्ट करते.
-
ट्रांझिटमध्ये एंक्रिप्शन बाय डीफॉल्ट सुरू असते
ट्रांझिटमध्ये असताना सर्व व्हिडिओ मीटिंग एंक्रिप्ट केल्या जातात. Meet हे डेटाग्राम ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी (DTLS) च्या IETF सुरक्षा मानकांचे पालन करते.
-
सुलभ सुरक्षित डिप्लॉयमेंट
वेबवर Meet वापरण्यासाठी आम्हाला प्लग इनची आवश्यकता नाही. ते पूर्णपणे Chrome आणि इतर ब्राउझरमध्ये काम करते, त्यामुळे ते सुरक्षा धोक्यांपासून कमी असुरक्षित असते. मोबाइलवर, तुम्ही Google Meet अॅप इंस्टॉल करू शकता.
म्हणजे खाजगी घर.
-
गोपनीयता नियंत्रणे
आमचे डिस्प्ले आणि स्पीकर यांमध्ये प्रत्यक्ष मायक्रोफोन म्यूट स्विच आहेत आणि तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये स्टोअर केलेला ऑडिओ आणि व्हिडिओ अॅक्सेस करणे, त्याचे पुनरावलोकन करणे आणि तो हटवणे यांसह तुमचा डेटा कधीही व्यवस्थापित करू शकता.
-
सेन्सरची पारदर्शकता
आमच्या उत्पादनांमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते कसे काम करतात हे आम्ही तुम्हाला कळवतो. आमच्या डिव्हाइसच्या तांत्रिक तपशिलांमध्ये आम्ही सुरू केलेले किंवा न केलेले सर्व ऑडिओ, व्हिडिओ, पर्यावरणीय आणि अॅक्टिव्हिटी सेन्सर सूचीबद्ध करतो. हे सेन्सर Google ला कोणत्या प्रकारचा डेटा पाठवतात ते आमचा सेन्सर मार्गदर्शक स्पष्ट करतो आणि त्यामध्ये तो डेटा कसा वापरला जातो याची उदाहरणे आहेत.
-
डेटाचा जबाबदारीने केलेला वापर
Google Nest डिव्हाइस ही आणखी उपयुक्त घर तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. आमच्या डिव्हाइसमधील व्हिडिओ, ऑडिओ आणि पर्यावरणीय सेन्सर डेटा उपयुक्त वैशिष्ट्ये आणि सेवा सुरू करण्यासाठी वापरला जातो. आम्ही हा डेटा जाहिरात पर्सनलायझेशन पासून वेगळा कसा ठेवू ते आम्ही येथे स्पष्ट केले आहे.
आम्ही वापरत असलेले आणखी मार्ग एक्सप्लोर करा.
-
सुरक्षा आणि गोपनीयताGoogle तुमची वैयक्तिक माहिती संरक्षित करणे आणि त्यावर तुमचे नियंत्रण ठेवणे हे कसे करते याविषयी जाणून घ्या.
-
कौटुंबिक सुरक्षिततातुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काय योग्य आहे ते व्यवस्थापित करण्यासाठी Google तुम्हाला कशी मदत करते ते जाणून घ्या.
-
सायबरसुरक्षेसंबंधित प्रगतीआम्ही जगातील इतर कोणाच्याही तुलनेत जास्त लोकांना ऑनलाइन असताना सुरक्षित कसे ठेवतो हे जाणून घ्या.