COVID‑19 च्या ऑनलाइन घोटाळ्यांपासून दूर राहण्यात तुम्हाला मदत करत आहोत

तुम्ही ऑनलाइन असता तेव्हा आम्ही तुम्हाला सुरक्षित ठेऊ इच्छितो. म्हणूनच आम्ही तयार केलेली प्रत्येक गोष्ट उत्तम अंगभूत सुरक्षा तंत्रज्ञानाने संरक्षित केलेली असते. धोके तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ते शोधण्यात आणि थांबवण्यात ते मदत करते.

अलीकडे COVID‑19 शी संबंधित ऑनलाइन घोटाळ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे घोटाळे ओळखण्यासाठी आणि टाळण्यासाठी आम्ही या टिपा देत आहोत. जेणेकरून तुम्ही ऑनलाइन सुरक्षित राहू शकाल.

COVID‑19 घोटाळ्यांचे सर्वसामान्य प्रकार

तुमच्या वैयक्तिक डेटाची चोरी

तुमची विमा पॉलिसी निश्चित करण्यासाठी किंवा बनावट संपर्क ट्रेसिंगसाठी तुमचा पत्ता, बँक खात्याचा तपशील किंवा पिन नंबर यासारखी खूप जास्त माहिती मागणारे घोटाळेबाज.

वस्तू आणि सेवांच्या बनावट ऑफर

अज्ञात तिसऱ्या पक्षाकडून मास्क किंवा ऑनलाइन करमणूक सेवांच्या सदस्यत्वांवर मोठ्या प्रमाणात सवलत.

तोतया अधिकारी

COVID‑19 बाबत माहिती देणाऱ्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रीसर्च (ICMR) यांसारख्या सरकारी संस्थांचे तोतये

फसव्या वैद्यकीय ऑफर

उपचाराच्या, तसेच टेस्ट किट, हँड सॅनिटायझर किंवा फेस मास्क यांच्या ऑफर - ज्या तुमच्यापर्यंत कधीच पोहचत नाहीत

धर्मादाय देणग्यांसाठी बनावट विनंत्या

ना-नफा रुग्णालये किंवा अन्य संस्थांना COVID‑19 चा सामना करण्यात मदत करण्यासाठी देणग्या देताना काळजी घ्या

COVID‑19 संबंधित घोटाळे टाळण्यासाठी टिपा

घोटाळेबाज आपल्यापर्यंत कसे पोहोचू शकतात हे जाणून घ्या

COVID‑19 बाबतच्या कम्युनिकेशनमध्ये वाढ झाल्याचा फायदा घेऊन घोटाळेबाज त्यांचे घोटाळे हे व्हायरसविषयीचे कायदेशीर संदेश असल्याचे भासवत आहेत. घोटाळेबाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ईमेलबरोबरच टेक्स्ट मेसेज, स्वयंचलित कॉल आणि फसव्या वेबसाइटदेखील वापरू शकतात.

थेट विश्वासार्ह स्रोत तपासा

घोटाळेबाज बहुतेकदा ते स्वतः सुप्रसिद्ध, विश्वासू आणि अधिकृत स्रोत असल्याचे भासवतात. COVID‑19 विषयी ताजी माहिती मिळवण्यासाठी थेट आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) सारख्या स्रोतांना भेट द्या.

कुणी वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती विचारल्यास सतर्कता बाळगा, थोडे थांबा आणि माहिती देण्यापूर्वी विचार करा.

माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला एखादी अनपेक्षित विनंती आल्यास त्या संदेशाबाबत विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. घोटाळेबाज सहसा लॉगिन माहिती, बँक तपशील आणि पत्ते यासारखी आवश्यकतेपेक्षा अधिक माहिती शेअर करण्याची विनंती करतात. ते बँक ट्रान्सफर किंवा व्हर्च्युअल चलनातूनही पेमेंटची विनंती करू शकतात.

ना-नफा तत्त्वावरील संस्थांद्वारे थेट देणगी द्या

काही घोटाळेबाज सद्भावनांचा फायदा घेऊन COVID‑19 बचावकार्यासाठी देणगीची विनंती करतात किंवा ना नफा संस्था असल्याचे भासवतात. पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्याऐवजी तुम्ही थेट त्यांच्या वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकता आणि तुमचा पैसा खात्रीशीररीत्या एका ना-नफा संस्थेकडे जातो आहे याची खात्री करू शकता.

क्लिक करण्यापूर्वी लिंक्स आणि ईमेल अ‍ॅड्रेस दोनदा तपासा

बनावट लिंकमध्ये बहुतेकदा अतिरिक्त शब्द किंवा अक्षरे जोडून परिचित वेबसाइटचे अनुकरण केलेले असते. जर ते "येथे क्लिक करा", लिंकवर हॉव्हर करा किंवा चुकांबद्दल URL तपासण्यासाठी मजकूर दीर्घकाळ दाबा, असे काही सांगत असेल; तर खबरदारी म्हणून क्लिक करूच नका. URL किंवा ईमेल पत्त्यातील शुद्धलेखनाच्या चुका किंवा अनाठायी अक्षरे आणि संख्यादेखील घोटाळा दर्शवू शकतात.

त्याची तक्रार केली गेली आहे का, हे सर्च करा

एखाद्याने तुम्हाला फसवणूक करणारा संदेश पाठवला असेल, तर कदाचित त्याने हा संदेश इतरांनाही पाठवलेला असू शकताे. इतरांनी याची तक्रार केली आहे का, ते तपासण्यासाठी ईमेल पत्ता, फोन नंबर किंवा मजकुराचा सर्वात संशयास्पद भाग सर्च इंजिनमध्ये पेस्ट करा.

तुमच्या खात्यात सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडा

अतिरिक्त ऑनलाइन संरक्षणासाठी, तुमच्या खात्यात २-टप्पी प्रमाणीकरण जोडा, ज्याला २-टप्पी पडताळणी असेही म्हटले जाते. खात्यात प्रवेश मिळवण्यासाठी दोन टप्प्यांची आवश्यकता असल्यामुळे हे सुरक्षिततेचा आणखी एक स्तर देते: उदाहरणार्थ, तुम्हाला माहीत असलेली एखादी गोष्ट (तुमचा पासवर्ड) आणि तुमच्या हातात प्रत्यक्ष असलेली एखादी वस्तू (जसे की, तुमचा फोन किंवा सिक्युरिटी की).

तक्रार करा

तुम्हाला काही संशयास्पद दिसल्यास, g.co/ReportPhishing किंवा g.co/ReportMalware वर त्याची तक्रार करा

COVID‑19 शी निगडीत ऑनलाइन घोटाळे टाळण्यात इतरांना मदत करा

संदेशाचा प्रसार करा आणि प्रत्येकास ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात मदत करा. या टिपा कुटुंब आणि मित्रांसह शेअर करा आणि खालील एक पानाचा सारांश डाउनलोड करा.

पीडीएफ डाउनलोड करा