लहान मुलांना ऑनलाइन जगाचे स्‍मार्ट, आत्मविश्वासू शोधक बनण्यासाठी मदत करणे

लहान मुलांना ऑनलाइन जगात अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याबाबत शिकवण्यासाठी, आम्ही त्यांना स्मार्ट कुशल, डिजिटल नागरिक बनण्यात मदत करण्यासाठी स्‍त्रोत आणि टिपा तयार केल्या आहेत.

या टिपा आणि स्‍त्रोतांसह ऑनलाइन विचारपूर्वक निवड करा

 • इंटरनेट ऑसम बना सोबत मुलांना स्मार्ट डिजिटल नागरिक बनण्यात मदत करणे

  इंटरनेटवरून बरेच काही मिळवण्यासाठी, मुलांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तयार राहण्याची गरज असते. हा प्रोग्राम मुलांना डिजिटल नागरिकत्व आणि सुरक्षेची मूलतत्त्वे शिकवतो, ज्यामुळे त्यांना इंटरनेटचे जग आत्मविश्वासाने एक्सप्लोर करता येते. चार आव्हानात्मक गेमसोबत डिजिटल सुरक्षेचे महत्त्वाचे पाठ प्रत्यक्ष सरावात आणणाऱ्या इंटरलँड या ऑनलाइन साहसासोबत मुले खेळता-खेळता इंटरनेट ऑसम बनू शकतात.

  आतापर्यंत, आम्ही हा प्रोग्राम यू.एस.आणि लॅटिन अमेरिकेत सुरू केला आहे आणि आणखी बाजारपेठांमध्ये विस्तार करणे सुरू ठेवण्याच्या आमच्या योजना आहेत. किशोरवयीन मुलांना ऑनलाइन स्मार्ट आणि सुरक्षित कसे बनावे हे शिकण्यात मदत करण्यासाठी ऑनलाइन सुरक्षा रोडशोचा भाग म्हणून आम्ही हा अभ्यासक्रम थेट यू.एस. मधील शाळांमध्येसुद्धा नेला आहे.

काळजीपूर्वक शेअर करा

कोणतीही चांगली (आणि वाईट) बातमी ऑनलाइन वेगाने पसरते आणि कोणताही विचार न करता लहान मुले आणि किशोर या अवघडलेल्या परिस्थितीत अडकून पडतात ज्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. योग्य लोकांसोबत योग्यरितीने ते कसे शेअर करावे याबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकरता टिपा तयार केल्या आहेत.

 • त्यांच्या डिजिटल फुतप्रिंटबद्दल त्यांना शिकवा

  तुमच्या मुलांसोबत, तुमच्या स्वतःसाठी किंवा त्यांना आवडणारा संगीतकार ऑनलाइन शोधा आणि तुम्हाला काय सापडले त्याबद्दल बोला. तुम्हाला परिणाम अगोदरच तपासायला हवे. या परिणामांवरून इतर लोक तुमच्याबद्दल काय जाणून घेऊ शकतात आणि तुम्ही ऑनलाइन डिजिटल फुटप्रिंट कशी डेव्हलप करता त्याबद्दल बोला.

 • सामाजिक तुलना कमी करण्यात मदत करा

  मित्रमैत्रिणी ऑनलाइन जे शेअर करतात तो संपूर्ण गोष्टीचा फक्त एक भाग आहे आणि सहसा तेच हायलाइट असतात हे मुलाला माहीत आहे याची खात्री करा. प्रत्येकाच्या जीवनात कंटाळवाणे, दुःखी किंवा लाजीरवाणे क्षणदेखील असतात जे ते शेअर करत नाही हे त्यांच्या लक्षात आणून द्या.

 • काय शेअर करायचे त्याबद्दल कुटुंबासाठी नियम बनवा

  फोटो आणि खाजगी माहिती यांसारखे काय ऑनलाइन शेअर करायचे नाही याबद्दल तुमच्या कुटुंबासाठी स्पष्ट अपेक्षा सेट करा. काही फोटो एकत्र घेऊन सराव करा आणि जबाबदार शेअरिंग कसे दिसते त्याबद्दल बोला. उदाहरणार्थ, फोटो शेअर करण्याआधी फक्त त्यांचा स्वतःचाच नव्हे तर इतरांचाही विचार करण्यासाठी तुमच्या मुलाला प्रोत्साहन द्या. खात्री नसल्यास परवानगी मागण्याची त्यांना आठवण करून द्या.

 • त्यांना ओव्हरशेअरिंगबद्दल शिकवा

  ओव्हरशेअरिंगसाठी ब्रेनस्टॉर्म निराकरणे, जसे की जे शेअर केले होते ते काढून घेणे किंवा गोपनीयता सेटिंग्ज दुरुस्त करणे. तसे झाल्यास, गोष्टी योग्य दृष्टिकोनातून पाहण्यात मदत करा. काही लाजीरवाणे क्षण गंभीर असतात, परंतु इतर क्षणांमधून चांगल्या प्रकारे शिकता येते.

बनावट गोष्टींना बळी पडू नका

ऑनलाइन लोक आणि परिस्थिती नेहमीच दिसतात तसे नसतात याबाबत तुमच्या लहान मुलांना सावध राहण्यात मदत करणे महत्त्वाचे आहे. त्यांना खरे काय आणि खोटे काय यातील फरक ओळखण्यासाठी तुम्हाला कशी मदत करता येईल याबाबत आम्ही उपयुक्त मार्गदर्शन डेव्हलप केले आहे.

 • तोतयेगिरीबाबत समजावून सांगा

  एखाद्याला त्यांचा पासवर्ड किंवा डेटा का हवा असेल हे त्यांना समजावून सांगा. ही माहिती मिळवून, एखाद्याला त्यांचे खाते वापरता येऊ शकते आणि ते म्हणजे तुम्हीच असल्याचे भासवता येऊ शकते.

 • त्यांना फिशिंग प्रयत्न ओळखण्यात मदत करा

  तुमच्या मुलांची वैयक्तिक माहिती घेण्यासाठी लोक त्यांना फसवू शकतात याची कदाचित तुमच्या मुलांना जाणीव नसेल. त्यांना एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून खात्याची माहिती विचारणारा मेसेज, लिंक किंवा ईमेल आल्यास, किंवा विचित्र दिसणारी अटॅचमेंट आल्यास त्यांना तुमच्याकडे यायला शिकवा.

 • त्यांना घोटाळे ओळखण्यास शिकवा

  काही फसवे घोटाळे त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून येत असल्यासारखे दिसतात याची तुमच्या मुलांना माहिती द्या. अगदी कुशल प्रौढदेखील फसवले जातात! एखादा मेसेज शंकास्पद वाटल्यास, त्यांना तुमच्याशी संपर्क साधण्यास सांगा. त्यांच्या चिंतांना गंभीरपणे प्रतिसाद दिल्याने विश्वास संपादन करण्यात मदत मिळते.

 • सुरक्षिततेचे संकेत एकत्र पहा.

  एखाद्या वेबसाइटला एकत्र भेट द्या आणि सुरक्षिततेची चिन्हे शोधा. URL च्या बाजूला पॅडलॉक आहे का किंवा ती https ने सुरू होते का, ज्याचा अर्थ ती सुरक्षित आहे? URL साइटच्या नावाशी जुळते का? ते एखाद्या साइटवर गेल्यावर त्यांनी शोधावीत अशी चिन्हे दाखवण्यात मदत करा.

तुमची गुपिते सुरक्षित करा

वैयक्तिक गोपनीयता आणि सुरक्षितता ऑफलाइनइतकीच ऑनलाइनदेखील महत्त्वाची असते. तुमच्या लहान मुलांच्या डिव्हाइसला, प्रतिष्ठेला आणि संबंधांना हानी पोहोचणे टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्या मौल्यवान माहितीचे संरक्षण कसे करावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 • अंदाज लावण्यास कठीण असे पासवर्ड तयार करा

  एखादे लक्षात राहणारे वाक्य क्लिष्ट पासवर्डमध्ये कसे बदलायचे ते त्यांना शिकवा. किमान आठ मिश्र केस अक्षरे वापरा आणि काही अक्षरे चिन्हे आणि संख्यांमध्ये बदला. उदाहरणार्थ, “My younger sister is named Ann” चे myL$1Nan बनते. कमकुवत पासवर्ड कसा असतो हे समजून घेण्यात त्यांना मदत करा जसे की, तुमचा स्वतःचा पत्ता, वाढदिवस, 123456 किंवा “password”, ज्याचा अंदाज लावणे एखाद्यासाठी सोपे असते.

 • त्यांची खाजगी माहिती खाजगीच ठेवा.

  त्यांनी कोणती माहिती खाजगी ठेवावी त्याबद्दल बोला – जसे की त्यांच्या घराचा पत्ता, पासवर्ड किंवा त्यांची शाळा. त्यांना यासारखी माहिती विचारली गेल्यास त्यांना तुमच्याकडे येण्यास प्रोत्साहन द्या.

 • पासवर्ड चांगल्या प्रकारे कसा हाताळावा ते शिकवा

  कुठेही पासवर्ड एंटर करण्यापूर्वी दोनदा विचार करण्यास आणि ते योग्य अॅप किंवा साइट आहे हे परत तपासण्यास त्यांना शिकवा. शंका असल्यास, काहीही एंटर करण्याआधी त्यांनी तुमच्याशी बोलावे. त्यासोबतच, वेगवेगळ्या अॅप्स आणि साइटसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्याकडे एक मुख्य पासवर्ड असू शकतो ज्यात प्रत्येक अॅपसाठी ते काही अक्षरे जोडू शकतात.

 • खोड्या टाळण्यात त्यांना मदत करा

  त्यांचे पासवर्ड खाजगी ठेवून ते खोटे किंवा लाजीरवाणे मेसेज पाठवण्यासाठी त्यांची खाती अॅक्सेस करण्यापासून इतरांना रोखू शकतात हे त्यांच्या लक्षात आणून द्या.

दयाळू असणे चांगले असते

इंटरनेट एक शक्तिशाली अँप्लिफायर आहे जे सकारात्मकता किंवा नकारात्मकता पसरवण्यासाठी वापरता येऊ शकते. इतरांसाठी सकारात्मक प्रभाव निर्माण करून आणि गुंडगिरीचे वर्तन प्रभावहीन करून, तुमच्या लहान मुलांच्या ऑनलाइन कृतींना “इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच इतरांशी वागा” ही संकल्पना लागू करून त्यांना योग्य ती गोष्ट करण्यात मदत करा.

 • ऑनलाइन गुंडगिरीभोवती एक संवाद तयार करा

  ऑनलाइन छळवणूक किंवा इतरांना हेतूपूर्वक दुखवण्यासाठी लोक ऑनलाइन टूल वापरतात त्या प्रसंगांबद्दल बोला. तुमच्या मुलांनी ते पाहिल्यास किंवा त्याचा अनुभव घेतल्यास त्यांनी कोणाकडे यावे त्याची योजना करा. त्यांनी किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींनी ऑनलाइन नीचपणाचा अनुभव घेतला आहे का ते विचारा. तुम्हाला विचारता येतील असे काही प्रश्न: त्याचे स्वरूप कसे होते? ते कसे वाटले? कदाचित एखाद्याला एखाद्या नीच टिप्पणीबद्दल सांगितल्याने ते थांबवण्यात मदत करण्याची तुमच्याकडे क्षमता आहे असे तुम्हाला वाटते का?

 • तुमची ऑनलाइन कौटुंबिक मूल्ये स्थापित करा

  त्यांनी ऑनलाइन कसे वागावे याबाबतीत तुमच्या अपेक्षांबद्दल स्पष्ट रहा. लोकांनी त्यांच्याशी जसे वागावे असे त्यांना वाटते तसेच त्यांनी लोकांशी वागावे आणि ते समोरासमोर जे बोलतील तेच त्यांनी ऑनलाइन बोलावे ही सर्वोत्तम सुरुवात आहे.

 • एखाद्याच्या शब्दांमागील अर्थाबद्दल बोला आणि सकारात्मकतेला प्रोत्साहन द्या

  आवाजातील चढउतारांबद्दल बोला आणि ऑनलाइन एखाद्याच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावणे सोपे आहे हे तुमच्या मुलांच्या लक्षात आणून द्या. त्यांना चांगला उद्देश गृहित धरण्यास आणि एखाद्याचे म्हणणे नीट समजले नसल्यास मित्रमैत्रिणींशी थेट बोलण्यास प्रोत्साहन द्या. ऑनलाइन सकारात्मक मेसेज पाठवणे आणि मिळवणे किती चांगले वाटते याबद्दल बोला. तुमचे स्वतःचे एखादे अॅप एकत्र वापरून सकारात्मक टिप्पणी किंवा मेसेज पाठवून बघा.

शंका असेल तेव्हा ती बोलून दाखवा

डिजिटल प्रकारच्या कोणत्याही आणि सर्व संघर्षांना लागू होणारा एक धडा: तुमची लहान मुले एखाद्या शंकास्पद गोष्टीला सामोरे जातात तेव्हा एखाद्या विश्वासू प्रौढ व्यक्तीसोबत बोलताना त्यांना सहजपणा जाणवला पाहिजे. घरात मनमोकळ्या संवादाला चालना देऊन तुम्ही या वर्तनाला सपोर्ट करू शकता.

 • ते ऑनलाइन काय करतात त्यावर चर्चा करा

  तुमचे कुटुंब तंत्रज्ञान कसे वापरते याबद्दल बोला. तुमची मुले सर्वात जास्त वापरत असलेल्या अॅप्समध्ये रस दाखवा आणि टूरची मागणी करा. त्यांची अॅप्स ते कसे वापरतात आणि त्यांबद्दल त्यांना काय आवडते ते माहीत करून घ्या.

 • काही काळाने बदलू शकतील अशा मर्यादा सेट करा

  तुमच्या मुलांच्या खात्यांसाठी नियम सेट करा, जसे की आशय फिल्टर आणि वेळ मर्यादा, आणि तुमच्या मुलांचे वय वाढेल तसतसे त्या बदलू शकतील याची तुमच्या मुलांना माहिती द्या. काही काळाने सेटिंग्जमध्ये सुधारणा व्हाव्यात. फक्त “सेट करा आणि विसरून जा” असे करू नका.

 • असे लोक ओळखण्यात त्यांना मदत करा ज्यांच्याकडून त्यांना मदत मागता येईल

  ऑनलाइन त्यांना अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींना सामोरे गेल्यास ते ज्यांच्याशी संपर्क साधू शकतात असे तीन विश्वासू लोक ओळखा. त्यांनी काय पाहिले त्याचे विश्लेषण करण्यात आणि भविष्यात त्यासारखे आणखी काही पाहणे रोखण्यात विश्वासू व्यक्ती त्यांना मदत करू शकते.

 • ऑनलाइन गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्यास सपोर्ट करा

  त्यांना क्रिएटिव्हिटी किंवा प्रश्न सोडवणारी कौशल्ये शिकवणारे गेम आणि अॅप्स वापरण्यासाठी प्रोत्साहन द्या.

आमच्या सुरक्षिततेच्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता

उद्योगातील अग्रेसर सुरक्षिततेसह आम्ही तुमचे ऑनलाइन संरक्षण करतो.

तुमची गोपनीयता

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता देऊ करतो.

कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन काय योग्य आहे हे व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.