बॅकग्राउंड तपासणी

Google इंटरनेटला आणखी सुरक्षित कसे बनवत आहे त्याविषयीच्या पडद्यामागील गोष्टी

इंफ्रास्ट्रक्चर

Google हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात सुरक्षित क्लाउड इंफ्रास्ट्रक्चरपैकी एक ऑपरेट करते. त्याची डेटा केंद्रे जगभरात आहेत आणि ती समुद्राखाली असलेल्या फायबर ऑप्टिक केबलद्वारे कनेक्ट केलेली आहेत. संपूर्ण सिस्टीमचे २४ तास काळजीपूर्वक निरीक्षण केले जाते.

Google Play Protect

Play Protect हे मालवेअर आणि व्हायरस शोधण्यासाठी दररोज साधारणतः ५० अब्ज Android अ‍ॅप्स तपासते. पुरवठादार Google Play Store वर एखादे अ‍ॅप अपलोड करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पहिली चाचणी होते. आणि वापरकर्त्यांना एखादे अ‍ॅप डाउनलोड करायचे असते किंवा ते त्यांच्या डिव्हाइसवर वापरायचे असते तेव्हादेखील Google Play Protect उपस्थित असते. ही सेवा संभाव्य हानिकारक अ‍ॅप ओळखते तेव्हा Google वापरकर्त्याला धोक्याची सूचना देते किंवा ते अ‍ॅप आपोआप काढून टाकते. अधिक माहितीसाठी, android.com ला भेट द्या.

एंक्रिप्शन

Gmail मार्फत पाठवलेले ईमेल आणि वापरकर्ते क्लाउडवर सेव्ह करतात ते फोटो संरक्षित करण्यासाठी Google, HTTPS आणि ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी यांसारखी विविध एंक्रिप्शन तंत्रज्ञाने वापरते. Google चे शोध इंजिनदेखील मानक म्हणून HTTPS प्रोटोकॉल वापरते.

डेटासंबंधी विनंत्या तपासणे

Google हे गुप्तहेर किंवा इतर शासकीय एजंसीना वापरकर्त्याच्या डेटाचा थेट अ‍ॅक्सेस देत नाही. ही गोष्ट जगातील प्रत्येक देशाप्रमाणेच युनायटेड स्टेट्स आणि जर्मनीसाठीही लागू आहे. एखाद्या प्राधिकरणाने वापरकर्त्याच्या डेटाच्या अ‍ॅक्सेससाठी विनंती केल्यास, Google त्या विनंतीची छाननी करेल आणि सबळ कारण असल्याशिवाय अ‍ॅक्सेस देणार नाही. Google ने गेली अनेक वर्षे पारदर्शकता अहवाल प्रकाशित केले आहेत, ज्यामध्ये डेटासंबंधीच्या विनंत्यांचा समावेश आहे. अहवाल वाचण्यासाठी, transparencyreport.google.com ला भेट द्या.

सुरक्षित सर्फिंग

Google Safe Browsing तंत्रज्ञान हे वापरकर्त्यांचे धोकादायक साइट आणि दुर्भावनापूर्ण अ‍ॅक्टरपासून संरक्षण करते. यासाठी संशयास्पद वेबसाइटच्या ॲड्रेसचा एक डेटाबेस तयार केलेला आहे. वापरकर्त्याने या साइटपैकी एखाद्या साइटवर जाण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना धोक्याची सूचना मिळेल. नव्याने तयार केलेल्या फिशिंग रणनितींचा सामना करण्यासाठी Google कृत्रिम बुद्धिमत्तादेखील वापरते. याविषयी अधिक वाचण्यासाठी, safebrowsing.google.com ला भेट द्या.

पळवाटा बंद करणे

Google संशोधन प्रोजेक्ट आणि "बग बाउंटी" च्या रूपात दरवर्षी लाखो डॉलरची गुंतवणूक करते. कंपनीला सुरक्षेसंबंधीच्या लपवलेल्या पळवाटा शोधण्यात मदत करतात अशा आयटीतील अतिशय निष्णात व्यक्तींना यामधून रिवॉर्ड दिली जातात. त्यांपैकी एक तज्ज्ञ म्हणजे उरुग्वेचा १८ वर्षांचा एकेकिएल परेरा, ज्याने Google ला अशा अनेक त्रुटी शोधण्यात मदत केली आहे. त्याला गेल्या वर्षी एक महत्त्वाचा शोध लावण्यासाठी $३६,३३७ चा रिवॉर्ड मिळाला.

Project Zero

हॅकर आणि चोरांना सुरक्षेसंबंधीच्या पळवाटा दिसण्यापूर्वी त्या बंद करण्यासाठी Google ची खास सुरक्षा टीम कठोर मेहनत करते. तज्ज्ञ या त्रुटींना "शून्य दिवस असुरक्षितता" असे म्हणतात, त्यामुळेच या टीमचे नाव Project Zero म्हणजे प्रोजेक्ट झीरो असे आहे. ही टीम संपूर्ण Google सेवांवरच लक्ष केंद्रित करत नाही; तर ती स्पर्धकांच्या सेवांमधील उणिवाही शोधते, ज्यामुळे ती त्यांना याबद्दल कळवू शकते आणि त्यांच्या वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यातदेखील मदत करू शकते. प्रोजेक्ट झीरोच्या कामाविषयीच्या अधिक माहितीसाठी, googleprojectzero.blogspot.com ला भेट द्या.

इतर आयटी पुरवठादारांसाठी सहाय्य

इंटरनेट सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून Google त्याच्या क्षेत्राबाहेरही त्याची सुरक्षा तंत्रज्ञाने इतर कंपनीना सातत्याने विनामूल्य उपलब्ध करून देते. उदाहरणार्थ, इतर कंपनीमधील डेव्हलपर हे असुरक्षितता शोधण्यासाठी Cloud Security Scanner वापरू शकतात. आणि Google चे Safe Browsing तंत्रज्ञान हे Apple चे Safari ब्राउझर आणि Mozilla Firefox द्वारे वापरले जाते.

AI मुळे स्पॅम संरक्षण

Gmail वापरकर्त्यांचे स्पॅमपासून संरक्षण करण्यासाठी Google मशीन लर्निंगचा वापर करते. न्यूरल नेटवर्क ही अनाहूतपणे आलेल्या किंवा नको असलेल्या अब्जावधी ईमेलचे विश्लेषण करतात आणि त्यांना स्पॅम शोधण्यात मदत करणाऱ्या पॅटर्न ओळखतात. हा दृष्टिकोन यशस्वी असल्याचे सिद्ध झाले आहे. आता, सरासरी एक हजार स्पॅम ईमेलपैकी एकापेक्षाही कमी स्पॅम ईमेल वापरकर्त्याच्या इनबॉक्समध्ये येतात आणि हा आकडा दररोज कमी होत आहे!

येथे अधिक जाणून घ्या:

safety.google

चित्रे : रॉबर्ट सॅम्युअल हॅन्सन

सायबरसुरक्षेशी संबंधित प्रगती

जगातील इतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत जास्त लोकांना आम्ही ऑनलाइन कसे सुरक्षित ठेवतो ते जाणून घ्या.

अधिक जाणून घ्या