ऑनलाइन जग अधिक सुरक्षित
करण्यात मदत करत आहे.
प्रत्येकासाठी तंत्रज्ञान तयार करणे याचा अर्थ ते वापरणार्या प्रत्येकाला संरक्षण देणे. आमच्या वापरकर्त्यांचे संरक्षण करणारी गोपनीयता आणि सुरक्षा तंत्रज्ञाने तयार करणे आणि शेअर करणे व उद्योग पुढे नेणे यांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
नवीन धोके उद्भवत असताना आणि वापरकर्त्याला विकसित होण्याची आवश्यकता असताना, धोक्याच्या प्रत्येक पातळीवर, आमच्या सर्व उत्पादनांवर, प्रत्येक वापरकर्त्याच्या खाजगी माहितीचे आपोआप संरक्षण करण्यासाठी आम्ही सातत्याने नवीन प्रयोग करत आहोत.
फेडरेटेड लर्निंग
कमी डेटा असलेली उपयुक्त उत्पादने तयार करणे
फेडरेटेड लर्निंग हे सर्वप्रथम Google मध्ये तयार केलेला डेटा कमी करणे यासंबंधी तंत्रज्ञान आहे, जे मशीन लर्निंग (ML) थेट तुमच्या डिव्हाइसवर आणते. ML मॉडेलना प्रशिक्षित करण्यासाठी हा नवीन दृष्टिकोन वेगवेगळ्या डिव्हाइसवरील अॅनोनिमाइझ केलेली माहिती एकत्रित करतो. तुमच्या डिव्हाइसवर शक्य तितकी वैयक्तिक माहिती ठेवून फेडरेटेड लर्निंग तुमची गोपनीयता जपण्यात मदत करते.
प्रगत संरक्षण प्रोग्राम
ज्यांना सर्वाधिक आवश्यकता आहे त्यांच्यासाठी, Google ची सर्वात मजबूत सुरक्षा
पत्रकार, कार्यकर्ते, आघाडीचे व्यावसायिक आणि राजकीय मोहिमा चालवणार्या टीम यांसारख्या लक्ष्यित ऑनलाइन हल्ल्यांचा जास्त धोका असलेल्या लोकांची वैयक्तिक Google खाती यांचे प्रगत संरक्षण प्रोग्राम संरक्षण करतो. हा प्रोग्राम विविध प्रकारच्या धोक्यांपासून व्यापक खाते सुरक्षा पुरवतो आणि नवीन संरक्षणे जोडण्यासाठी सातत्याने विकसित होतो.
आणखी सुरक्षित बनवण्याकरिता
औद्योगिक मानके उंचावत आहे.
फक्त Google उत्पादने आणि सेवा यांचीच नव्हे तर, संपूर्ण इंटरनेटची सुरक्षा मजबूत करून, आमचे वापरकर्ते ऑनलाइन असतात तेव्हा आम्हाला त्यांचे संरक्षण करायचे आहे. आम्ही जगातील काही सर्वात प्रगत गोपनीयता आणि सुरक्षा तंत्रज्ञाने तयार करतो आणि इतरांनी त्यांचा अवलंब करावा यासाठी त्यांपैकी अनेक तंत्रज्ञाने उघडपणे शेअर करतो.
HTTPS एंक्रिप्शन
प्रगत एंक्रिप्शन वापरून संपूर्ण वेबवरील साइटना सुरक्षित करण्यात मदत करत आहे
आमच्या सेवांना HTTPS एंक्रिप्शनचे साहाय्य दिल्याने तुम्ही साइटशी सुरक्षितपणे कनेक्ट करू शकता आणि क्रेडिट कार्ड नंबरसारखी तुमची खाजगी माहिती कोणीही मध्येच हिरावून न घेता एंटर करू शकता याची खात्री केली जाते. आमच्या साइट आणि सेवा बाय डीफॉल्ट आधुनिक HTTPS पुरवतील याची खात्री करण्यासाठी आम्ही गुंतवणूक करणे सुरू ठेवू तसेच सर्व डेव्हलपरना टूल आणि स्रोत पुरवून आम्ही उर्वरित वेबलादेखील HTTPS वर जाण्यात मदत करू.
भेददर्शी गोपनीयता
भेददर्शी गोपनीयता हे आमच्या वापरकर्त्यांचे अनामिकत्व धोक्यात न आणता आम्हाला डेटामधून इनसाइट मिळवू देणारे प्रगत अॅनोनिमायझेशन तंत्रज्ञान आहे. जगातील सर्वात मोठी भेददर्शी गोपनीयता अल्गोरिदम लायब्ररी तयार करण्यासाठी आम्ही एका दशकाहून अधिक काळ घालवला आहे आणि संस्थांना त्यांच्या डेटावर तीच गोपनीयता संरक्षणे सहज लागू करता येण्यात मदत करण्यासाठी आम्ही लायब्ररी मुक्त स्रोत केली आहे.
भविष्य डिझाइन करत आहे.
Google Safety Engineering Center चे नेतृत्व इंजिनिअर्सच्या एका अनुभवी टीमकडे आहे आणि हे Google च्या इंटरनेट सुरक्षिततेसंबंधी कामाचे जागतिक हब आहे. समस्या समजून घेऊन, त्यांवर उपाय तयार करून, इतरांसोबत भागीदारी करून आणि सर्व ठिकाणच्या वापरकर्त्यांना सक्षम करून, आम्ही सर्वांसाठी आणखी चांगले, आणखी सुरक्षित इंटरनेट तयार करू शकतो.