तुम्हाला नियंत्रण करू देणारी
गोपनीयता टूल.
गोपनीयतेचा विषय येतो तेव्हा, एकच उपाय सर्वांसाठी लागू होत नाही हे आम्ही जाणतो. त्यामुळेच आम्ही वापरण्यास सोपी नियंत्रणे तयार केली आहेत जेणेकरून, तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज निवडू शकता.
Google खाते
वापरण्यास सोपी गोपनीयता सेटिंग्ज, सर्व एकाच ठिकाणी
तुमच्या Google खाते मध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती, गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज हे सर्व काही सापडू शकते. आम्ही डॅशबोर्ड आणि माझी अॅक्टिव्हिटी यांसारखी वापरण्यास सोपी टूल तयार केली आहेत, जी Google सेवांवरील तुमच्या अॅक्टिव्हिटीवरून गोळा केलेल्या डेटावर तुम्हाला पारदर्शकता देतात. अॅक्टिव्हिटी कंट्रोल आणि माझे Ad केंद्र यांसारखी शक्तिशाली गोपनीयता नियंत्रणेदेखील आहेत, जी तुम्हाला संपूर्ण Google तुमच्यासाठी आणखी चांगले काम कसे करू शकते हे ठरवण्यासाठी डेटाचे संकलन व वापर सुरू किंवा बंद करू देतात.
तुमची महत्त्वाची गोपनीयता सेटिंग्ज झटपट अॅक्सेस करा
Search, Maps, YouTube, Gmail आणि Assistant यांसारख्या आमच्या सर्वात लोकप्रिय सेवांमध्ये तुमचे Google खाते शोधणे नेहमी सोपे असते. फक्त तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा आणि तुमच्या खात्याची लिंक फॉलो करा.
कोणता डेटा सेव्ह केला जावा ते नियंत्रित करा
अॅक्टिव्हिटी कंट्रोल
कोणता डेटा सेव्ह केला जावा ते नियंत्रित करा
अॅक्टिव्हिटी कंट्रोल वापरून, सर्व Google सेवांवरील तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमच्या खात्यासोबत अॅक्टिव्हिटीचे कोणते प्रकार जोडले जावेत हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये तुमची Search आणि ब्राउझिंग अॅक्टिव्हिटी, YouTube इतिहास किंवा स्थान इतिहास यांसारखे डेटाचे विशिष्ट प्रकार जोडले जाण्यापासून थांबवू शकता.
अॅक्टिव्हिटी कंट्रोल वर जाऑटो-डिलीट
तुमचा डेटा आपोआप हटवा वर सेट करा
तुम्हाला आणखी जास्त नियंत्रण देण्यासाठी, ऑटो-डिलीट सेटिंग्ज तुम्हाला तुमचा अॅक्टिव्हिटी डेटा किती काळ ठेवायचा आहे त्यासाठी वेळमर्यादा निवडतात. तुम्ही निवडलेल्या मर्यादेपेक्षा जुना डेटा तुमच्या खात्यामधून सतत आणि आपोआप हटवला जाईल. यामुळे ती सेट करणे आणि विसरून जाणे तुमच्यासाठी सोपे होते, परंतु तुम्ही कधीही मागे जाऊ शकता आणि ही सेटिंग्ज अपडेट करू शकता.
तुमची अॅक्टिव्हिटी ऑटो-डिलीट करामाझी अॅक्टिव्हिटी
तुमच्या खात्यामधील डेटा कधीही हटवा
माझी अॅक्टिव्हिटी हे असे मध्यवर्ती ठिकाण आहे जेथे तुम्हाला तुम्ही शोधलेली, पाहिलेली आणि आमच्या सेवा वापरून पाहिलेली प्रत्येक गोष्ट सापडू शकते. तुम्हाला तुमची मागील ऑनलाइन अॅक्टिव्हिटी आठवणे आणखी सोपे बनवण्यासाठी, आम्ही तुम्हाला विषय, तारीख आणि उत्पादन यांनुसार शोधण्यासाठी टूल देतो. तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित असायला नको असलेल्या विशिष्ट अॅक्टिव्हिटी किंवा संपूर्ण विषयदेखील तुम्ही कायमचे हटवू शकता.
माझी अॅक्टिव्हिटी वर जागोपनीयता सेटिंग्ज
निवडा.
गोपनीयता तपासणी
गोपनीयता तपासणी करा
फक्त काही मिनिटांमध्ये, तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये डेटाचे कोणते प्रकार सेव्ह केले जावेत हे निवडू शकता, तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत काय शेअर करावे किंवा सार्वजनिक करावे हे अपडेट करू शकता आणि आम्ही तुम्हाला दाखवाव्या असे तुम्हाला वाटत असलेल्या जाहिरातींचे प्रकार अॅडजस्ट करू शकता. तुम्ही ही सेटिंग्ज तुम्हाला हवे तितक्या वेळा बदलू शकता आणि नियमित रिमाइंडर पाठवले जाणेदेखील निवडू शकता.
अॅप्समधून थेट
तुमची गोपनीयता नियंत्रित करा.
गुप्त मोड
Chrome, Search, YouTube आणि Maps मध्ये गुप्त मोड सुरू करा
सर्वप्रथम Chrome मध्ये लाँच केला गेलेला गुप्त मोड, त्यानंतर आमच्या सर्वात लोकप्रिय अॅप्समध्ये उपलब्ध झाला आहे. YouTube, iOS वरील Search आणि Maps मध्ये, तो सहज सुरू किंवा बंद करण्यासाठी फक्त तुमच्या प्रोफाइल फोटोवरून टॅप करा. तुम्ही Maps आणि YouTube मध्ये गुप्त मोड सुरू करता तेव्हा, तुम्ही शोधत असलेली ठिकाणे किंवा तुम्ही पाहत असलेले व्हिडिओ यांसारखी तुमची अॅक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जाणार नाही. तुम्ही सर्व गुप्त विंडो बंद केल्यानंतर Chrome वरून तुमच्या गुप्त सेशनमधील ब्राउझिंग इतिहास आणि कुकी हटवल्या जातात.
तुमचा यामधील डेटा
तुमचा डेटा थेट तुमच्या अॅप्समधून नियंत्रित करा
तुम्ही दररोज वापरत असलेल्या Google सेवांमध्ये तुमच्या डेटाबद्दल थेट निर्णय घेणे आम्ही तुमच्यासाठी आणखी सोपे बनवले आहे. उदाहरणार्थ, Search कधीही न सोडता, तुम्ही तुमच्या अलीकडील Search अॅक्टिव्हिटीचे पुनरावलोकन करू शकता आणि ती हटवू शकता, तुमच्या Google खाते मधून संबंधित गोपनीयता नियंत्रणांचा झटपट अॅक्सेस मिळवू शकता आणि तुमच्या डेटासोबत Search कसे काम करते हे जाणून घेऊ शकता. तुम्ही Search, Maps आणि Google Assistant मध्ये ही नियंत्रणे अॅक्सेस करू शकता.
आणखी मार्ग एक्सप्लोर करा.
-
बिल्ट-इन सुरक्षाऑटोमॅटिक सुरक्षा संरक्षणांबद्दल अधिक जाणून घ्या.
-
डेटाविषयक कार्यपद्धतीजबाबदार डेटाविषयक कार्यपद्धतींसह आम्ही तुमच्या गोपनीयतेचा कसा आदर करतो त्याबद्दल अधिक जाणून घ्या.
-
सुरक्षेशी संबंधित टिपाऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी झटपट टिपा आणि सर्वोत्तम कार्यपद्धती शोधा.
-
जाहिराती आणि डेटातुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर दिसणार्या जाहिरातींबद्दल अधिक जाणून घ्या.