तुमच्या गोपनीयतेचा आदर करणार्‍या जाहिराती.

“तुम्हाला ऑनलाइन सुरक्षित ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. बाय डीफॉल्ट सुरक्षित, खाजगी डिझाइन असलेली आणि तुम्हाला नियंत्रण देणारी उत्पादने तयार करून आम्ही हे सुनिश्चित करतो, की तुम्ही Google वर दररोज आणखी सुरक्षित आहात.”

- जेन फिट्झपॅट्रिक, वरिष्ठ उपाध्यक्ष, Google मधील मुख्य सिस्टीम आणि अनुभव

जबाबदार जाहिरातींबद्दल आमची वचनबद्धता.

इंटरनेट खुले, खाजगी आणि सुरक्षित ठेवणे हे आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा केंद्रबिंदू आहे. आम्ही जबाबदारीने जाहिराती डिलिव्हर करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जाहिरातींवर Google ची गोपनीयतासंबंधित तत्त्वे कशी लागू होतात ते येथे दिले आहे:

तुमची वैयक्तिक माहिती आम्ही कधीही कोणालाही विकत नाही.

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती जाहिरातींच्या उद्देशांसह कधीही कोणालाही विकत नाही.

आम्ही कोणता डेटा गोळा करतो आणि का याविषयी आम्ही पारदर्शक आहोत.

आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती आणि प्रायोजित आशय स्पष्टपणे लेबल करतो व विशिष्ट जाहिराती का दाखवल्या जातात, कोणती माहिती वापरली जाते आणि तुम्ही तुमचा Google जाहिरात अनुभव कसा नियंत्रित करू शकता हे समजून घेणे तुमच्यासाठी सोपे करतो.

उदाहरणार्थ, Search, YouTube आणि Discover सह, माझे Ad केंद्र तुम्हाला जाहिरातींसाठी कोणती माहिती वापरली जाते ते दाखवते व ती माहिती व्यवस्थापित करणे सोपे करते, जेणेकरून अनुभव तुमच्यासाठी योग्य असेल.

तुमच्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती नियंत्रित करणे आम्ही सोपे करतो .

तुमची माहिती आणि ती जाहिरातींसाठी कशी वापरली जाते यावर तुमचे नियंत्रण असते. Google वरील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी — जसे की तुम्ही भेट दिलेल्या साइट व तुम्ही शोधलेल्या गोष्टी — आमची सर्व उत्पादने, तसेच जाहिराती तुमच्या प्राधान्यांनुसार आणखी चांगला, अधिक उपयुक्त अनुभव देण्यासाठी वापरली जातात.

माझे Ad केंद्र तुम्हाला Google Search, Discover आणि YouTube वर तुमचे जाहिरातींचे अनुभव कस्टमाइझ करण्याची अनुमती देते व तुम्हाला आवडत असलेले ब्रँड आणि विषय जास्त दाखवते व तुम्हाला आवडत नसलेले कमी दाखवते. तुम्ही मद्य, डेटिंग, जुगार, गर्भधारणा आणि पालकत्व व वजन कमी करणे यांसारख्या काही संवेदनशील जाहिरात विषयांवरील जाहिराती कमी करणेदेखील निवडू शकता.

तुम्ही जाहिरात पर्सनलायझेशन पूर्णपणे बंद करू शकता आणि डेटा व गोपनीयता सेटिंग्ज वापरून तुमच्या खात्याशी संबंधित अ‍ॅक्टिव्हिटी डेटा कायमचा कधीही हटवू शकता.

तुमच्या गोपनीयतेचे आणखी संरक्षण करण्यासाठी आम्ही वापरत असलेला डेटा कमी करतो.

आम्ही तुमच्यासाठी जाहिराती तयार करण्याकरिता आरोग्य, वंश, धर्म किंवा लैंगिक अभिमुखता यासारखी संवेदनशील माहिती कधीही वापरत नाही.

तुम्ही तयार केलेला आशय आम्ही कधीही वापरत आणि स्टोअर करत नाही व जाहिरातींच्या उद्देशांसाठी Drive, Gmail आणि Photos यांसारख्या अ‍ॅप्समध्ये स्टोअर करत नाही. आणि तुमच्या गोपनीयतेचे आणखी संरक्षण करण्यासाठी, आम्ही आमच्या मुख्य अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग्‍जसाठी ऑटो-डिलीट डीफॉल्‍ट केले आहे. याचा अर्थ तुमच्या खात्याशी संबंधित अ‍ॅक्टिव्हिटी डेटा तुम्ही हटवण्याचे निवडण्यापर्यंत ठेवण्याऐवजी तो १८ महिन्यांनंतर आपोआप आणि सतत हटवला जाईल.

आम्ही नेहमी लहान मुलांना ऑनलाइन आणखी सुरक्षित ठेवण्याचे मार्ग शोधत असतो आणि ज्या लहान मुलांचे वय १८ वर्षांखालील आहे हे आम्हाला माहीत आहे त्यांच्यासाठी जाहिराती पर्सनलाइझ करण्याला अनुमती देत नाही.

बाय डीफॉल्ट सुरक्षित असलेली उत्पादने तयार करून आम्ही तुमचे संरक्षण करतो.

तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे आणि तुमचा डेटा सुरक्षित करणे हा Google च्या कार्याचा मुख्य भाग आहे. म्हणूनच सर्व Google उत्पादने जगातील सर्वात प्रगत सुरक्षा पायाभूत सुविधांपैकी एकाद्वारे सतत संरक्षित केली जातात. ही बिल्ट-इन सुरक्षा उत्क्रांत होणारे ऑनलाइन धोके शोधण्यात आणि प्रतिबंधित करण्यात मदत करते, तसेच घोटाळे व फसव्या जाहिरातींद्वारे वैयक्तिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न यांपासून तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यात मदत करते.

याव्यतिरिक्त, तुम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी, आम्ही जागतिक स्तरावर जाहिरातदारांची पडताळणी करतो आणि चुकीचा हेतू असलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी व स्वतःचे चुकीचे वर्णन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा घालण्यासाठी काम करतो. तुम्ही Ads Transparency Center वापरून पडताळणी केलेल्या जाहिरातदारांकडून दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिरातींच्या शोधण्यायोग्य हबला भेट देऊन अधिक जाणून घेऊ शकता.

आम्ही प्रगत गोपनीयता तंत्रज्ञाने तयार करतो आणि ती इतरांसह शेअर करतो.

कोणती वैयक्तिक माहिती गोळा केली जाते आणि कोणाद्वारे गोळा केली जाते याची काळजी न करता तुम्हाला तुमच्या ऑनलाइन अनुभवाचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणूनच Google वरील टीम प्रायव्हसी सॅंडबाॅक्स उपक्रम राबवण्यासाठी व्यापक उद्योगाशी सहयोग करत आहेत, ज्याचा उद्देश सध्याच्या ट्रॅकिंग यंत्रणा कालबाह्य करणे आणि फिंगरप्रिंटिंगसारख्या गुप्त ट्रॅकिंग तंत्रांना ब्लॉक करणे आहे.

तुमच्यासाठी योग्य अशा जाहिरातींचा अनुभव निवडा.

तुम्हाला दिसणाऱ्या जाहिरातींना नियंत्रित करण्याचे सोपे नवीन मार्ग.

तुमचा जाहिरातीचा अनुभव तुमच्या मनासारखा करण्याची नियंत्रणे दाखवणारा 'माझे जाहिरात केंद्र' या हब पेजचा नमुना

Google वर जाहिरात नियंत्रण

'माझे जाहिरात केंद्र' वरून तुम्हाला Google शोध, YouTube, आणि Discover वर दिसणाऱ्या जाहिरातींना नियंत्रित करणे आणखीच सोपे झाले आहे.

'माझे जाहिरात केंद्र' तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाणारी माहिती नियंत्रित करणे सोपे करते. यामध्ये तुमच्या Google खात्याशी संबंधित माहिती आणि तुम्ही ऑनलाइन असताना काय करता यावर आधारित तुमच्या आवडी-निवडींचा आम्ही बांधलेला अंदाज हे सर्व काही असते. तुम्ही 'माझे जाहिरात केंद्रा'चा वापर तुमचा जाहिरातीचा अनुभव तुमच्या मनासारखा करण्यासाठीही वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला आवडणारे ब्रँड तुम्हाला जास्त दिसतील आणि न आवडणारे कमी. याशिवाय तुम्ही तुमच्या खात्याशी संबंधित ऑनलाइन गतिविधींचा डेटा केव्हाही कायमचा हटवू शकता.

Google शिवाय इतर जाहिरात नियंत्रणे

तृतीय पक्षांच्या साइट आणि ॲप यावरील जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'जाहिरात सेटिंग' वापरा

तुमच्या ऑनलाइन अनुभवामध्ये तुम्हाला काही वेबसाइट आणि ॲप वर अशा व्यवसायांच्या जाहिराती दिसू शकतात जे जाहिरात करण्यासाठी Google वापरतात. या जाहिराती नियंत्रित करण्यासाठी जाहिरात सेटिंग वर जाऊन जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाणारी माहिती तुम्ही सहजपणे व्यवस्थापित करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या Google खात्यावर जोडलेली माहिती, तुम्ही ऑनलाइन असताना काय करता यावर आधारित तुमच्या आवडी-निवडींचा आम्ही बांधलेला अंदाज आणि जाहिराती दाखवण्यासाठी आमचा जाहिरात प्लॅटफॉर्म वापरणार्‍या इतर जाहिरातदारांसोबत परस्परसंवाद हे सर्व असते.

तुम्हाला पाहिजे तेव्हा वैयक्तिकृत जाहिराती बंद करा

तुम्ही वैयक्तिकृत जाहिराती संपूर्णपणे बंद देखील करू शकता. तुम्हाला तरीही जाहिराती दिसतील, पण त्या तुमच्या आवडी-निवडींशी कमी जुळणार्‍या असण्याचीच शक्यता असेल. तुमची सेटिंग अशा सर्व ठिकाणी वापरण्यात येईल जिथे तुम्ही Google खात्यावरून साइन इन केलेले असेल.

तुम्हाला दिसणाऱ्या
जाहिरातींबद्दल अधिक जाणून घ्या.

हीच जाहिरात का

जाहिराती दाखवण्यासाठी आम्ही कोणता डेटा वापरतो ते पहा

"हीच जाहिरात का" हे वैशिष्ट्य तुम्हाला एखादी जाहिरात का दिसत आहे हे समजून घेण्यात तुमची मदत करते. उदाहरणार्थ, तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कॅमेर्‍याची जाहिरात दिसते आहे कारण तुम्ही यापूर्वी कॅमेर्‍यांबद्दल शोधले होते, फोटोग्राफीच्या वेबसाइटवर गेला होता किंवा कॅमेर्‍यांच्या जाहिरातींवर क्लिक केले होते.

'माझे जाहिरात केंद्र' मधील "या जाहिरातीसाठी कोणी पैसे दिलेत" या पेजचा नमुना दाखवला आहे ज्यात एका जाहिरातीसाठी जाहिरातदाराने किती पैसे दिलेत हे दाखवले आहे

जाहिरातदारांच्या ओळखीची पडताळणी

तुम्हाला दिसणार्‍या जाहिराती देणाऱ्या जाहिरातदारांची माहिती घ्या

तुम्हाला कोण जाहिराती दाखवत आहे याबद्दल आणखी माहिती पुरवण्यासाठी, आमच्या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातदारांच्या ओळखीची पडताळणी करण्याकरिता आम्ही काम करत आहोत. या उपक्रमाचा भाग म्हणून, Google कडून जाहिराती खरेदी करण्यासाठी जाहिरातदारांनी पडताळणी प्रोग्राम पूर्ण करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला जाहिरातदाराचे नाव आणि देश सूचीबद्ध करणारी जाहिरात डिस्क्लोजर दिसतील.

तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास – जसे की ठरावीक प्रदेशामध्ये कोणत्या जाहिराती दाखवल्या गेल्या किंवा जाहिरातीचा फॉरमॅट – तुम्ही Ads Transparency Center ला भेट देऊ शकता, हा YouTube, Search आणि Display वरील पडताळणी केलेला जाहिरातदारांच्या सर्व जाहिरातींचा शोधण्यायोग्य हब आहे. तुम्ही Ads Transparency Center थेट किंवा तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींच्या बाजूला थ्री डॉट मेनूद्वारे माझे Ad केंद्र ला भेट देऊन अ‍ॅक्सेस करू शकता.

Ads Transparency Center ला भेट द्या

जाहिरातींबद्दल लोक विचारत असलेल्या प्रश्नांबद्दल अधिक जाणून घ्या

जाहिरातींसाठी Google कोणता डेटा वापरते?

जाहिरातींसह आमच्या सर्व उत्पादनांवर चांगला, आणखी उपयुक्त अनुभव देण्यासाठी, तुम्ही भेट देता त्या साइट, तुम्ही वापरता ती अ‍ॅप्स आणि तुम्ही शोधलेल्या गोष्टी व स्थानासारखी संबंधित माहिती यांसारखी Google वरील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी आम्ही वापरतो.

तुम्हाला दिसणाऱ्या जाहिराती अनुकूल करण्यासाठी आम्ही आरोग्य, वंश, धर्म किंवा लैंगिक अभिमुखता यांसारखी संवेदनशील माहिती कधीही वापरत नाही. आणि आम्ही जाहिरातींसाठी Drive, Gmail आणि Photos मधील डेटा वापरत नाही.

जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी कोणती माहिती वापरली जाते हे तुम्ही माझे Ad केंद्र याद्वारे नियंत्रित करू शकता आणि इथे तुमची जाहिरात प्राधान्ये व्यवस्थापित करू शकता.

Google माझी माहिती जाहिरातीसाठी का वापरते?

Google तुमची माहिती तुम्हाला तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या आधारे, तुमच्या स्वारस्यांशी सुसंगत वाटत असलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी किंवा तुम्हाला काहीतरी नवीन शोधण्यात मदत करण्याकरिता वापरते.

उदाहरणार्थ, तुम्ही नवीन कारबद्दल माहिती शोधत असल्यास, बाल्कनी फर्निचर किंवा पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांसाठी सामान्य जाहिराती पाहण्यापेक्षा स्थानिक कार डीलरच्या जाहिराती पाहणे अधिक उपयुक्त आहे.

तुम्ही नेहमी वापरण्यासाठी सोपी गोपनीयता नियंत्रणे वापरून तुमच्या डेटावर नियंत्रण ठेवता आणि Google सोबत माहिती शेअर करणे व ती जाहिरातींसाठी कशी वापरली जाते हे ठरवणे नेहमीच तुमची निवड असते.

मला जाहिराती दाखवण्यासाठी Google माझे ईमेल वाचते किंवा माझे फोन कॉल ऐकते का?

नाही. तुमचा ईमेल आणि तुमची संभाषणे वैयक्तिक व खाजगी आहेत. तुम्ही तुमच्या ईमेलमध्ये काय लिहिता, फोनवर काय बोलता किंवा Google Drive सारख्या सेवांमध्ये काय स्टोअर करता यावर आधारित आम्ही तुम्हाला कधीही जाहिराती दाखवत नाही.

Google माझी माहिती जाहिरातदारांना विकते का?

नाही.

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कधीही कोणालाही विकत नाही.

मी पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती पूर्णपणे बंद करू शकेन का?

होय. तुमची प्राधान्ये अपडेट करण्यासाठी किंवा जाहिराती पर्सनलायझेशन बंद करण्यासाठी तुम्ही माझे Ad केंद्र ला भेट देऊ शकता.

तुम्ही पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती न पाहणे निवडल्यास, तुम्हाला अजूनही जाहिराती दिसतील, पण त्या कमी संबंधित असतील.

तुम्हाला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्याचे
आणखी मार्ग एक्सप्लोर करा.