जीवनातील आठवणींसाठी
सुरक्षित घर.
Google Photos हे तुमच्या आपोआप संगतवार लावलेल्या आणि शेअर करण्यास सोप्या असलेल्या सर्व फोटो आणि व्हिडिओंचे घर आहे. तुम्हाला तुमच्या आठवणी सुरक्षितपणे स्टोअर आणि शेअर करता याव्यात यासाठी आम्ही प्रगत सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चर आणि वापरण्यास सोप्या नियंत्रणांमध्ये गुंतवणूक करतो.
सुरक्षित स्टोरेज
Google सेवांचे जगातील सर्वात प्रगत सुरक्षा इंफ्रास्ट्रक्चरद्वारे सतत संरक्षण केले जाते. ही बिल्ट-इन सुरक्षा ऑनलाइन धोके शोधते आणि ते रोखण्यात मदत करते, ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित आहे याबाबत तुम्ही खात्री बाळगू शकता.
एंक्रिप्शन
ट्रांझिटमध्ये असताना एंक्रिप्शनमुळे डेटा खाजगी आणि सुरक्षित राहतो. तुम्ही तुमचे फोटो स्टोअर करता तेव्हा, तुम्ही तयार केलेला डेटा तुमचे डिव्हाइस, Google सेवा आणि आमची डेटा केंद्रे यांमध्ये फिरतो. HTTPS आणि एंक्रिप्शन अॅट रेस्ट यांसारख्या आघाडीच्या एंक्रिप्शन तंत्रज्ञानासह, सुरक्षेचे अनेक स्तर वापरून आम्ही या डेटाचे संरक्षण करतो.
फेस ग्रुपिंग
फेस ग्रुपिंग हे सारखे चेहरे आपोआप ग्रुप करते आणि ते तुमच्यासाठी क्रमाने लावते ज्यामुळे तुमचे फोटो शोधणे आणि व्यवस्थापित करणे सोपे होते. फेस ग्रुप आणि लेबल फक्त तुम्हाला दिसतात. फेस ग्रुपिंग सुरू असावे की बंद हे तुम्ही नियंत्रित करता आणि तुम्ही ते बंद केल्यास, तुमच्या खात्यामधून फेस ग्रुप हटवले जातील. आम्ही सर्वसाधारण उद्देशासाठी असलेले फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान व्यावसायिकरीत्या उपलब्ध करून देत नाही. अधिक जाणून घ्या.
भागीदार उपक्रम
Google Photos API वापरणारे भागीदार आणि डेव्हलपर तुमचा Google Photos अनुभव वर्धित करण्यासाठी अर्थपूर्ण इंटिग्रेशन तयार करत असल्याची खात्री करण्यासाठी, आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. आम्ही ज्या भागीदारांसोबत काम करतो त्यांनी आमच्या धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे आणि ते तुमच्या परवानगीशिवाय कोणताही डेटा अॅक्सेस करू शकत नाहीत.
कोणत्याही जाहिराती नाहीत
Google Photos तुमचे फोटो, व्हिडिओ किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही विकत नाही आणि आम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ जाहिरातीसाठी वापरत नाही.
निवडक बॅकअप
तुम्ही तुमचे सर्व फोटो आणि व्हिडिओ Google Photos मध्ये बॅकअप करू शकता किंवा जर तुम्हाला फक्त निवडक फोटोंचा बॅकअप तुमच्या Google खात्यामध्ये स्टोअर करावयाचा असेल, तर तसे करा.
आठवणी
तुमच्यासाठी खाजगीरीत्या सादर केलेले तुमचे सर्वोत्तम क्षण पुन्हा जगा. ठराविक लोकांच्या आठवणी किंवा ठराविक कालावधी यांची निवड रद्द करण्याचा पर्याय आणि हे वैशिष्ट्य पूर्णपणे बंद करण्याची सोय तुमच्याकडे आहे.
नकाशा
फक्त तुम्हाला दिसणार्या परस्परसंवादी नकाशावर तुमचे फोटो स्थानानुसार पहा. हे नकाशा दृश्य तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला स्थान डेटा वापरून भरले जाते. photos.google.com वरील नकाशा भरण्यासाठी वापरलेली स्थान माहिती तुम्ही संपादित करू आणि काढून टाकू शकता. तुम्हाला तुमचे भविष्यातील फोटो या नकाशा दृश्यावर संगतवार लावलेले पाहणे नको असल्यास, तुम्ही तुमच्या कॅमेरा अॅपमधील स्थान इतिहास आणि स्थान डेटा बंद करू शकता.
Google Assistant
Google Assistant ला फोटो शोधण्यात, पाहण्यात किंवा शेअर करण्यात तुम्हाला मदत करण्यास सांगा. तुम्हाला तुमच्या Google Nest Hub किंवा कोणत्याही Android फोनसारख्या Assistant डिव्हाइसवरून काय दाखवायचे आणि शेअर करायचे आहे ते तुमच्या Assistant सेटिंग्जमध्ये तुम्ही निवडू शकता. विशिष्ट स्मार्ट डिस्प्ले किंवा कास्ट कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवर दिसणारे फोटो निवडण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी, तुम्ही तुमच्या Home अॅपमध्ये स्वतंत्र डिव्हाइस सेटिंग्ज वापरू शकता.
अल्बम शेअरिंग
तुम्ही अल्बम शेअर करता तेव्हा, तो विशिष्ट व्यक्तीसोबत किंवा लोकांसोबत त्यांच्या Google खाते मार्फत शेअर करणे हा डीफॉल्ट पर्याय असेल. यामुळे अल्बमवर कोण जोडले जावे त्यावर तुम्हाला अधिक नियंत्रण मिळते. तुमच्याकडे तरीही लिंकमार्फत शेअर करण्याचा पर्याय असतो, ज्यामुळे Google Photos न वापरणार्या किंवा Google खाते नसणार्या लोकांसोबत फोटो शेअर करणे सोपे होते. तुम्ही कधीही तुमच्या अल्बमची शेअरिंग सेटिंग्ज अपडेट करू शकता आणि प्रत्येक अल्बमचा अॅक्सेस कोणाला असावा ते नियंत्रित करू शकता.
थेट शेअरिंग
तुम्ही एकदाच फोटो आणि व्हिडिओ शेअर करता, तेव्हा ते अॅपमधील सुरू असलेल्या, खाजगी संभाषणामध्ये जोडण्याचा पर्याय तुमच्याकडे असेल.
शेअरिंग अॅक्टिव्हिटी
तुम्ही Google Photos मार्फत शेअर केलेल्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी ठेवल्या जातात जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर केलेले सर्व क्षण तुम्हाला शोधता येतात.
एक्सप्लोर करा.