सर्वांसाठी इंटरनेट
आणखी सुरक्षित बनवण्याकरिता
औद्योगिक मानके उंचावणे.
आमच्या वापरकर्त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता ही आम्ही करत असलेल्या सर्व गोष्टींच्या आणि आम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक उत्पादनाच्या केंद्रस्थानी असते. प्रत्येकासाठी औद्योगिक मानके उंचावणारी सुरक्षितता तंत्रज्ञाने तयार करण्यात आणि ती शेअर करण्यात आम्ही उद्योगाचे नेतृत्व करतो.
वापरकर्त्यांना ऑनलाइन आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन प्रयोग करणे.
नवीन धोके उद्भवत असताना आणि वापरकर्त्याला विकसित होण्याची आवश्यकता असताना, धोक्याच्या प्रत्येक पातळीवर, आमच्या सर्व उत्पादनांवर, प्रत्येक वापरकर्त्याच्या खाजगी माहितीचे आपोआप संरक्षण करण्यासाठी आम्ही सातत्याने नवीन प्रयोग करत आहोत.
प्रगत संरक्षण प्रोग्राम
Google ची सर्वात मजबूत सुरक्षा
धोरण तयार करणारे, मोहीम चालवणार्या टीम, पत्रकार, कार्यकर्ते आणि आघाडीचे व्यावसायिक यांसारख्या लक्ष्यित ऑनलाइन हल्ल्यांचा जास्त धोका असलेल्यांच्या वैयक्तिक आणि एंटरप्राइझ Google खात्यांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेला प्रगत संरक्षण प्रोग्राम हा Google देऊ करत असलेला सर्वात शक्तिशाली आणि उद्योगातील पहिला विनामूल्य खाते सुरक्षा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम विविध प्रकारच्या धोक्यांपासून व्यापक खाते सुरक्षा पुरवतो आणि नवीन संरक्षणे जोडण्यासाठी सातत्याने विकसित होतो.
डेटा कमी करणे
वापरलेली आणि सेव्ह केलेली वैयक्तिक माहिती मर्यादित करणे
आम्हाला असे वाटते की, उत्पादनांनी तुमची माहिती फक्त तुमच्यासाठी कामाची आणि उपयुक्त असेपर्यंतच ठेवावी – ते Maps मध्ये तुमची आवडती गंतव्यस्थाने शोधता येणे असो किंवा YouTube वर काय पाहावे याबाबत शिफारशी मिळवणे असो.
बाय डीफॉल्ट बंद असलेला स्थान इतिहास तुम्ही पहिल्या वेळी सुरू करता तेव्हा, तुमचा ऑटो-डिलीटचा पर्याय बाय डीफॉल्ट १८ महिन्यांवर सेट केला जाईल. नवीन खात्यांसाठी वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी ऑटो-डिलीटदेखील १८ महिन्यांवर डीफॉल्ट होईल. याचा अर्थ असा की, तुमचा अॅक्टिव्हिटी डेटा तुम्ही तो हटवणे निवडेपर्यंत ठेवला जाण्याऐवजी १८ महिन्यांनंतर आपोआप आणि सातत्याने हटवला जाईल. तुम्ही ही सेटिंग्ज कधीही बंद करू शकता किंवा तुमची ऑटो-डिलीट सेटिंग्ज कोणत्याही वेळी बदलू शकता.
फेडरेटेड लर्निंग
कमी डेटा असलेली उपयुक्त उत्पादने तयार करणे
फेडरेटेड लर्निंग हे सर्वप्रथम Google मध्ये तयार केलेला डेटा कमी करणे यासंबंधी तंत्रज्ञान आहे, जे मशीन लर्निंग (ML) थेट तुमच्या डिव्हाइसवर आणते. ML मॉडेलना प्रशिक्षित करण्यासाठी हा नवीन दृष्टिकोन वेगवेगळ्या डिव्हाइसवरील अॅनोनिमाइझ केलेली माहिती एकत्रित करतो. तुमच्या डिव्हाइसवर शक्य तितकी वैयक्तिक माहिती ठेवून फेडरेटेड लर्निंग तुमची गोपनीयता जपण्यात मदत करते.
अॅनोनिमायझेशन
अॅनोनिमायझेशनद्वारे गोपनीयता संरक्षणे मजबूत करणे
आमच्या सेवांना तुमच्यासाठी आणखी चांगले काम करायला लावतानाच तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आघाडीची अॅनोनिमायझेशन तंत्रज्ञाने वापरतो. उदाहरणार्थ, आम्ही लाखो वापरकर्त्यांकडून डेटा एकत्रित करतो आणि तो अॅनोनिमाइझ करतो जेणेकरून, तुम्ही एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी ते किती व्यग्र असेल हे तुम्हाला पाहता येईल.
वर्धित सुरक्षित ब्राउझिंग
वर्धित सुरक्षित ब्राउझिंग हे आणखी प्रोअॅक्टिव्ह होण्यासाठी आमच्या सध्याच्या सुरक्षित ब्राउझिंग संरक्षणांच्या पलीकडे जाते आणि तुमच्या वैयक्तिक आवश्यकतांसाठी अनुकूल केले जाते. Chrome मध्ये वर्धित सुरक्षित ब्राउझिंग सुरू करणे निवडणार्यांसाठी, फिशिंग, मालवेअर आणि वेबवर आधारित इतर धोक्यांपासून आणखी प्रोअॅक्टिव्ह व अनुकूल केलेली संरक्षणे पुरवण्याकरिता, तुम्हाला वेबवर सामोर्या येणार्या धोक्यांच्या आणि तुमच्या Google खाते वरील हल्ल्यांच्या सकल दृश्याचे Google आपोआप मूल्यांकन करेल. वर्धित सुरक्षित ब्राउझिंग याबद्दल अधिक जाणून घ्या.
आणखी सुरक्षित ठेवणे.
वेब ही सर्वांसाठी आणखी सुरक्षित जागा बनवण्याकरिता आम्ही वचनबद्ध आहोत. हे करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही आमची अनेक तंत्रज्ञाने मुक्त स्रोत करतो आणि डेव्हलपर व संस्थांसाठी आमचे स्रोत अॅक्सेसिबल करतो.
HTTPS एंक्रिप्शन
एंक्रिप्शनद्वारे संपूर्ण वेबवरील साइट सुरक्षित करण्यात मदत करणे
आमच्या सेवांना HTTPS एंक्रिप्शनचे साहाय्य दिल्याने तुम्ही साइटशी सुरक्षितपणे कनेक्ट करू शकता आणि क्रेडिट कार्ड नंबरसारखी तुमची खाजगी माहिती कोणीही मध्येच हिरावून न घेता एंटर करू शकता याची खात्री केली जाते. आमच्या साइट आणि सेवा बाय डीफॉल्ट आधुनिक HTTPS पुरवतील याची खात्री करण्यासाठी आम्ही गुंतवणूक करणे सुरू ठेवू तसेच सर्व डेव्हलपरना टूल आणि स्रोत पुरवून आम्ही उर्वरित वेबलादेखील HTTPS वर जाण्यात मदत करू.
सुरक्षित ब्राउझिंग
संपूर्ण वेबवरील धोकादायक साइट, अॅप्स आणि जाहिरातींपासून तुमचे संरक्षण करणे
वेब वापरकर्ते धोकादायक वेबसाइटना भेट देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना इशारा देऊन मालवेअर आणि फिशिंगच्या प्रयत्नांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आमचे सुरक्षित शोध तंत्रज्ञान तयार केले आहे. सुरक्षित ब्राउझिंग फक्त Chrome वापरकर्त्यांचेच नव्हे, तर इतर बऱ्याच गोष्टींचे संरक्षण करते – प्रत्येकासाठी इंटरनेट सुरक्षित करण्याकरिता, Apple चे Safari आणि Mozilla चे Firefox यांसह, इतर कंपन्यांसाठी त्यांच्या ब्राउझरमध्ये वापरण्याकरिता आम्ही हे तंत्रज्ञान विनामूल्य केले आहे. आज, चार अब्जांपेक्षा जास्त डिव्हाइस सुरक्षित ब्राउझिंग द्वारे संरक्षित केलेली आहेत. वेबसाइट मालकांच्या साइटमध्ये सुरक्षेसंबंधी दोष असतात तेव्हा आम्ही त्यांनादेखील इशारा देतो आणि समस्या झटपट सोडवण्यात त्यांना मदत करण्यासाठी विनामूल्य टूल देऊ करतो.
मुक्त स्रोत गोपनीयता तंत्रज्ञाने
आमची गोपनीयता संरक्षणे आणि नवीन प्रयोग शेअर करणे
आम्ही देऊ करत असलेल्या गोपनीयता संरक्षणांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी आणि ही प्रगती इतरांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. म्हणूनच भेददर्शी गोपनीयता, फेडरेटेड लर्निंग आणि प्रायव्हेट जॉइन अँड काँप्युट यांसारखी आमची प्रगत अॅनोनिमायझेशन आणि डेटा कमी करणे यासंबंधी तंत्रज्ञाने आम्ही मुक्त स्रोत केली आहेत. वैयक्तिक गोपनीयतेचे संरक्षण करत असतानाच ही मुक्त स्रोत टूल प्रत्येकाला लाभदायक असणार्या इनसाइट निर्माण करण्यात मदत करतील अशी आम्हाला आशा आहे.
सर्व खाते संरक्षण हे आम्ही तुमच्या Google खाते मध्ये ठेवलेल्या सुरक्षा संरक्षणांचा तुम्ही Google साइन-इन वापरून साइन इन करत असलेल्या अॅप्स आणि साइटपर्यंत विस्तार करते. अॅप्स आणि साइटनी सर्व खाते संरक्षण लागू केल्यावर, आम्हाला सुरक्षा इव्हेंटबद्दल – उदाहरणार्थ खाते अपहरण – त्यांना माहिती पाठवता येते जेणेकरून, त्यांना तुमचेदेखील संरक्षण करता येईल. हे आघाडीचे तंत्रज्ञान डेव्हलप करण्यासाठी, सर्व अॅप्सना लागू करणे सोपे जावे याकरिता आम्ही इतर प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या आणि मानकांसंबंधी समुदायासोबत काम केले.
Google मध्ये, आम्ही आमच्या सेवांमधील असुरक्षितता शोधण्यासाठी स्वतंत्र संशोधकांना पैसे देणाऱ्या असुरक्षितता रिवॉर्ड उपक्रमांची सुरुवात केली. आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यात आम्हाला मदत करणाऱ्या सर्व अत्याधुनिक बाह्य योगदानांना रिवॉर्ड देण्यासाठी, प्रत्येक वर्षी आम्ही संशोधन अनुदान आणि बग बाउंटीच्या रूपात लाखो डॉलरचे पुरस्कार देतो. आम्ही सध्या Chrome आणि Android यांसह आमच्या अनेक उत्पादनांसाठी असुरक्षितता रिवॉर्ड देतो.
स्वतंत्र संशोधकांचे साहाय्य घेण्याव्यतिरिक्त, आमच्याकडे प्रोजेक्ट झीरो नावाची इंजिनीयरची टीमदेखील आहे, जी इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमधील सुरक्षेतील दोषांचा माग ठेवते आणि त्यांवर उपाय करते.
वेबवर शक्य तितक्या मजबूत साइन-इन आणि ऑथेंटिकेशन मानकांची सहनिर्मिती करण्यात किंवा त्यांचा अंगीकार करण्यात आम्ही नेहमीच आघाडीवर राहिलो आहोत. केंद्रीकृत वेब मानके डेव्हलप करून आम्ही संपूर्ण उद्योगक्षेत्रात सहयोग करतो आणि तंत्रज्ञाने शेअर करतो. FIDO Alliance या ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेसोबत केलेल्या अशा एका भागीदारीअंतर्गत वापरकर्ते, कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी यांनी वापरण्यासाठी, प्रत्येकासाठी सुरक्षित खाते अॅक्सेसची खात्री करून नवी औद्योगिक मानके सेट करण्यासाठी व त्यांचे उपयोजन करण्यासाठी काम केले गेले.
आमचे सुरक्षा तंत्रज्ञान इतरांसाठी मूल्य पुरवू शकते असे आम्हाला वाटते तेव्हा आम्ही ते शेअर करतो. उदाहरणार्थ, आम्ही आमचे Google क्लाउड वेब सुरक्षा स्कॅनर डेव्हलपरना विनामूल्य उपलब्ध करून देतो जेणेकरून, त्यांना त्यांची वेब अॅप्लिकेशन सुरक्षेसंबंधी धोक्यांसाठी स्कॅन करता येतील. आम्ही अंतर्गतरीत्या डेव्हलप केलेली एकाहून अधिक सुरक्षा टूल इतरांनी वापरण्यासाठी मुक्त स्रोत म्हणून कंट्रिब्युट केली आहेत.
ऑनलाइन सुरक्षित कसे रहायचे हे जाणून घेण्यासाठी जगभरातील लोकांना आम्ही शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण आणि टूल पुरवतो. आमची पोहोच टीम दर वर्षी ऑनलाइन सुरक्षितता स्रोत आणि प्रशिक्षणासोबत १०० दशलक्षांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचते – ज्यांमध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक, वयस्कर लोक आणि अपंगत्व असलेल्या लोकांचा समावेश आहे.
प्रोजेक्ट शील्ड ही बातम्या, मानवाधिकार संस्था, निवडणुकीसंबंधी साइट, राजकीय संस्था आणि मोहिमा व उमेदवार यांचे वितरित सेवा देण्यास नकार (DDoS) हल्ल्यांपासून संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी आमचे सुरक्षा तंत्रज्ञान वापरणारी सेवा आहे. हे हल्ले म्हणजे वेबसाइट काढून घेण्याचे आणि वापरकर्त्यांना फसव्या ट्रॅफिकने दडपून टाकून त्यांना अत्यावश्यक माहिती अॅक्सेस करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न असतात. वेबसाइटचा आकार किंवा हल्ल्याचे प्रमाण कसेही असो, प्रोजेक्ट शील्ड नेहमीच विनामूल्य असते.
लोकांना संपूर्ण वेबवरील त्यांचा डेटा हलवण्यात आणि नवीन ऑनलाइन सेवा पुरवठादार सहजपणे वापरून पाहण्यात मदत करण्यासाठी आम्ही मुक्त स्रोत डेटा पोर्टेबिलिटी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे आणि Apple, Microsoft, Facebook व Twitter यांसारख्या कंपन्यांशी सहयोग करणे सुरू ठेवले आहे.
संपूर्ण वेबवर विनामूल्य, अॅक्सेसिबल आशयाला सपोर्ट करत असतानाच वापरकर्ता गोपनीयतेचे संरक्षण करणारा खुल्या मानकांचा संच डेव्हलप करण्यासाठी गोपनीयता सॅंडबॉक्स यासारख्या सहयोगपर जागा तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि वेब समुदायासोबत काम करत आहोत. आमचे स्रोत आणि प्लॅटफॉर्म शेअर करून, अधिक खाजगी वेबच्या दिशेने होणार्या प्रगतीला प्रोत्साहन मिळेल अशी आम्हाला आशा आहे.
संपर्काचा माग ठेवणे
मदत करत असताना वापरकर्ता गोपनीयतेचे रक्षण करणे
COVID-19 च्या जागतिक साथीशी लढण्यात शासनांना मदत करण्यासाठी, Google आणि Apple यांनी एकत्रितपणे डिझाइनच्या केंद्रस्थानी गोपनीयता आणि सुरक्षा असलेली, लागणीबद्दलच्या सूचना देणारी सिस्टम यांसारखी संपर्काचा माग ठेवण्यासंबंधी तंत्रज्ञाने तयार केली. डेव्हलपर, शासने आणि सार्वजनिक आरोग्यसेवा पुरवठादार यांच्यासोबत निकट सहकार्य आणि सहयोग करून, वापरकर्ता गोपनीयतेच्या उच्च मानकांचे संरक्षण करत असतानाच, जागतिक समस्यांचे निराकरण करणे सुरू ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आम्हाला आशा आहे.