तुमची खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारा ईमेल.
स्पॅम, फिशिंग आणि मालवेअर तुमच्या इनबॉक्सपर्यंत पोहोचण्याआधी त्यांच्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी Gmail कठोर परिश्रम करते. आमच्या AI द्वारे वर्धित स्पॅम फिल्टरच्या क्षमता प्रत्येक मिनिटाला १० दशलक्ष स्पॅम ईमेल ब्लॉक करतात.
फिशिंगपासून संरक्षण
फिशिंगपासून संरक्षण
अनेक मालवेअर आणि फिशिंग हल्ल्यांची सुरुवात ईमेलपासून होते. Gmail हे ९९.९% हून अधिक स्पॅम, फिशिंगचे प्रयत्न आणि मालवेअर तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून ब्लॉक करते.
सुरक्षित ब्राउझिंग
सुरक्षित ब्राउझिंग
सुरक्षित ब्राउझिंग तुमच्या ईमेल मेसेजमधील धोकादायक लिंक ओळखून तुमचे संरक्षण करते आणि तुम्ही साइटला भेट देण्याआधी ती तुम्हाला चेतावणी देते.
प्रोअॅक्टिव्ह सूचना
प्रोअॅक्टिव्ह सूचना
तुमची सुरक्षा धोक्यात आणू शकणारी एखादी अटॅचमेंट डाउनलोड करण्याआधी Gmail तुम्हाला चेतावणी देते.
खाते सुरक्षितता
खाते सुरक्षितता
एकाहून अधिक सुरक्षा सिग्नलची पाहणी करून आम्ही तुमचे खाते संशयास्पद लॉग इन आणि अनधिकृत अॅक्टिव्हिटीपासून संरक्षित करतो. आम्ही लक्ष्यित हल्ल्यांचा सर्वात जास्त धोका असलेल्या खात्यांसाठी प्रगत संरक्षण प्रोग्राम देखील देतो.
गोपनीय मोड
गोपनीय मोड
तुम्ही तुमच्या मेसेजची मुदत एका सेट केलेल्या कालावधीनंतर संपवू शकता आणि मिळवणाऱ्यांसाठी तुमच्या Gmail वरून पाठवलेला मेसेज फॉरवर्ड, कॉपी, डाउनलोड किंवा प्रिंट करण्याचा पर्याय काढून टाकू शकता.
ईमेल एंक्रिप्शन
ईमेल एंक्रिप्शन
Google इंफ्रास्ट्रक्चरमध्ये, एका जागी स्थिर असताना आणि डेटा केंद्रांदरम्यान पाठवले जात असताना मेसेज एंक्रिप्ट केले जातात. तृतीय पक्ष पुरवठादाराला पाठवले जाणारे मेसेज शक्य असेल तेव्हा किंवा कॉंफिगरेशननुसार आवश्यक असेल तेव्हा वाहतूक स्तर सुरक्षा यासोबत एंक्रिप्ट केले जातात.