Family Link वापरून डिजिटल मूलभूत नियम सेट करणे
यात तुम्हाला मदत करत आहे.
तुमची मुले ऑनलाइन एक्सप्लोर करत असताना त्यांची खाती आणि डिव्हाइस व्यवस्थापित करण्यात Family Link तुम्हाला मदत करते. तुम्ही अॅप्स व्यवस्थापित करू शकता, स्क्रीन वेळेवर लक्ष ठेवू शकता आणि तुमच्या कुटुंबासाठी डिजिटल मूलभूत नियम सेट करू शकता.
-
अॅप अॅक्टिव्हिटी अहवाल
सर्व स्क्रीन टाइम समान तयार केला जात नाही. तुमचे मूल त्यांचे डिव्हाइस पुस्तक वाचण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी की गेम खेळण्यासाठी वापरत आहे यावर हे अवलंबून असू शकते. तुमचे मूल कोणती अॅप्स सर्वात जास्त वापरत आहे हे पाहण्यासाठी तुम्ही Family Link चे अॅप अॅक्टिव्हिटी अहवाल वापरू शकता आणि त्यांना कशाचा अॅक्सेस असावा याबद्दल निर्णय घेऊ शकता.
-
दैनिक अॅक्सेस मर्यादित करा
तुमच्या मुलासाठी स्क्रीन टाइमचे योग्य प्रमाण काय ते तुम्ही ठरवा. Family Link तुम्हाला दैनिक स्क्रीन टाइम मर्यादा सेट करणे, डिव्हाइस बेडटाइम सेट करणे आणि तुमच्या मुलाचे Android किंवा Chrome OS डिव्हाइस रिमोट पद्धतीने लॉक करणे हे करू देते.
-
आशय आणि खरेदी व्यवस्थापित करा
Google Play Store वरून अॅप डाउनलोडस ना आणि तुमच्या मुलाला करायच्या असलेल्या अॅपमधील खरेदीला मंजुरी द्या किंवा नकार द्या.
खाते सेटिंग्ज व्यवस्थापित करा
तुमच्या मुलाचे खाते व्यवस्थापित आणि सुरक्षित करणे
Family Link सेटिंग्जमध्ये तुमच्या मुलाची अॅक्टिव्हिटी कंट्रोल अॅक्सेस करा. तुमचे मूल पासवर्ड विसरल्यास, पालक म्हणून, तुम्ही तो बदलण्यात किंवा रीसेट करण्यात मदत करू शकता. तुमच्या मुलाची वैयक्तिक माहिती तुम्ही संपादितदेखील करू शकता किंवा तुम्हाला आवश्यक वाटल्यास त्यांचे खाते हटवूदेखील शकता. तुमच्या परवानगीशिवाय ते त्यांच्या खात्यावर किंवा डिव्हाइसवर दुसरे प्रोफाइल जोडू शकत नाहीत. अखेरीस, तुम्ही त्यांच्या Android डिव्हाइसचे स्थान तपासू शकता (ते सुरू, इंटरनेटशी कनेक्ट केलेले आणि अलीकडे अॅक्टिव्ह असेपर्यंत).
तुमच्या कुटुंबाचे डिजिटल मूलभूत नियम सविस्तर समजून घेण्यात मदत होण्यासाठी, आमचा कुटुंब मार्गदर्शक पहा. तुमच्या मुलांसोबत तंत्रज्ञानाबद्दलची संभाषणे सुरू करण्याच्या टिपांसह, तुम्ही आणि तुमचे कुटुंब एकत्रितपणे डिजिटल जग अधिक आत्मविश्वासाने नेव्हिगेट करू शकता.
-
तुमच्या मुलाला नियंत्रित केलेल्या खात्यामार्फत Google Assistant अॅक्सेस करू द्या
मुले Family Link वापरून व्यवस्थापित केलेल्या त्यांच्या स्वतःच्या खात्याने Assistant सुरू केलेल्या डिव्हाइसवर लॉग इन करू शकतात. त्यांना त्यांचा स्वतःचा पर्सनलाइझ केलेला असिस्टंट अनुभव मिळतो आणि ते कुटुंबासाठी डिझाइन केलेले गेम, अॅक्टिव्हिटी आणि गोष्टी अॅक्सेस करू शकतात. मुलांना व्यवहार करण्यापासून ब्लॉक केले जाते आणि पालक त्यांच्या मुलांना Assistant वर तृतीय पक्ष अनुभवांचा अॅक्सेस असावा का ते ठरवू शकतात.
-
Chrome सोबत तुमच्या मुलाचा वेबसाइटचा अॅक्सेस व्यवस्थापित करा
तुमचे मूल त्यांच्या Android किंवा ChromeOS डिव्हाइसवर Chrome ब्राउझर वापरत असताना, तुम्ही त्यांचा विशिष्ट वेबसाइटचा अॅक्सेस व्यवस्थापित करू शकता. तुमच्या मुलाचा अॅक्सेस फक्त तुम्हाला सोयीच्या वाटणाऱ्या वेबसाइटपुरता मर्यादित करणे किंवा त्यांनी भेट देऊ नये असे तुम्हाला वाटणाऱ्या विशिष्ट साइट ब्लॉक करणे तुम्ही निवडू शकता.
-
Search वरील भडक आशय असलेले परिणाम फिल्टर करा
संरक्षणाच्या अतिरिक्त स्तरासाठी, पोर्नोग्राफीसारखे सर्वात भडक आशय असलेले परिणाम फिल्टर करण्यात मदत होण्याकरिता तुम्ही सुरक्षितशोध सुरू करू शकता. ज्यांची खाती Family Link ने व्यवस्थापित केली असतात अशा साइन इन केलेल्या १३ वर्षांखालील (किंवा तुमच्या देशातील लागू वय) वापरकर्त्यांसाठी सुरक्षितशोध सेटिंग बाय डीफॉल्ट सुरू असते. पालकांना ते बंद करण्याचा किंवा Search चा अॅक्सेस पूर्णपणे ब्लॉक करण्याचा पर्यायदेखील असतो.