तुमच्या कुटुंबासाठी आमची अनेक उत्पादने आणखी आनंददायक बनवण्यासाठी, आम्ही त्यांमध्ये स्मार्ट फिल्टर, साइट ब्लॉकर आणि आशय रेटिंग अशी खास वैशिष्ट्ये तयार करतो.
शोधणे, तयार करणे आणि वाढ होणे यात मुलांना मदत करणार्या आशयासह टॅबलेटचा अनुभव.*
Kids Space
मुलांचे कुतूहल लक्षात घेऊन डिझाइन केलेले
प्राणी असो किंवा कलेचे प्रोजेक्ट, मुले त्यांना आवडणार्या गोष्टींच्या बाबतीत छोटे तज्ञ बनतात. त्यामुळेच तुमचे मूल निवडत असलेल्या स्वारस्यांच्या आधारावर Kids Space त्यांच्यासाठी दर्जेदार आशयाची शिफारस करते. शिफारस केलेल्या आशयासह, मुले त्यांची नवीनतम आकर्षणे नवीन आणि गुंतवून ठेवणाऱ्या मार्गांनी एक्सप्लोर करू शकतात. मुले त्यांची स्वतःची पात्रे तयार करून त्यांचा अनुभव कस्टमाइझदेखील करू शकतात.
शिफारस केलेली अॅप्स, पुस्तके आणि व्हिडिओ
मूल Kids Space उघडते तेव्हा, त्यांना दर्जेदार आशयाची लायब्ररी दिसते. खेळणे आणि शिकणे यांचे नवीन मार्ग शोधण्यासाठी मुले अॅप्स, गेम, पुस्तके आणि व्हिडिओसाठी शिफारशी एक्सप्लोर करू शकतात.†
पालक नियंत्रणे वापरून सीमा सेट करा
Family Link मधील पालक नियंत्रणे वापरून, तुमच्या स्वतःच्या डिव्हाइसवरून आशय व्यवस्थापित करून, स्क्रीन वेळ मर्यादा सेट करून आणि बरेच काही करून तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या अनुभवाबाबत मार्गदर्शन करू शकता.
मुलांना ऑनलाइन व्हिडिओमार्फत त्यांची स्वारस्ये एक्सप्लोर करण्यासाठी आणखी सुरक्षित वातावरण असावे म्हणून आम्ही YouTube Kids तयार केले. तुम्ही YouTube Kids अॅप डाउनलोड करता, आम्हाला वेबवर भेट देता किंवा तुमच्या स्मार्ट टीव्हीवर YouTube Kids पाहता तेव्हा, तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरील कुटुंबासाठी अनुकूल व्हिडिओ शोधू शकता.
Google Play वरील तुमच्या मुलासाठी “शिक्षकाने मंजुरी दिलेला” आशय
तुम्हाला तुमच्या मुलासाठी योग्य असलेला आशय शोधण्यात मदत करण्यासाठी, आम्ही देशभरातल्या शिक्षणतज्ञ आणि शिक्षकांसोबत काम केले आहे. समृद्ध करणारी आणि मनोरंजक असलेली, “शिक्षकांनी मंजुरी दिलेली” अॅप्स शोधण्यासाठी Google Play Store वरील आमची मुले टॅब ब्राउझ करा. अॅप तपशील पेजवर, शिक्षक अॅप्सना उच्च रेटिंग का देतात ते तुम्ही पाहू शकता आणि अॅप वयानुसार योग्य आहे का हे समजून घेण्यासाठी आशय रेटिंग तपासू शकता. अॅपमध्ये जाहिराती आहेत का, ते अॅपमधील खरेदीला अनुमती देते का किंवा त्याला डिव्हाइस परवानग्यांची आवश्यकता आहे का हेदेखील तुम्ही पाहू शकता.
आमची Play Store साठी डेव्हलपर धोरणे यांसोबत मुलांसाठी अॅप्स तयार करणार्या डेव्हलपरकडून आम्ही अधिक उच्च मानकांची मागणी करतो.
Google Assistant च्या मदतीने संपूर्ण कुटुंबासाठी मौज
संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे आनंद घेण्यासाठी मनोरंजन शोधणे Assistant सोपे बनवते. आमच्या कुटुंबांसाठी कृती प्रोग्रामद्वारे तयार केले गेलेले कुटुंबासाठी अनुकूल गेम आणि अॅक्टिव्हिटी शोधा किंवा फक्त Assistant ला तुम्हाला गोष्ट सांगायला लावून झोपण्याआधी तुमच्या आवडत्या गोष्टी ऐका. तुम्ही फिल्टर सेट केल्यावर संपूर्ण कुटुंबाला आनंद घेता येईल असे संगीत ऐका आणि अनप्लग करण्यासाठी व तुमच्या एकत्रित वेळेचा अधिकाधिक आनंद घेण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवरील डाउनटाइम वापरा.
मानवी परीक्षणकर्त्यांनी आमच्या प्रत्येक कुटुंबांसाठी कृती अॅक्टिव्हिटीचे कुटुंबासाठी अनुकूलतेकरिता परीक्षण केले आहे, परंतु कोणतीही सिस्टम परिपूर्ण नसते. अयोग्य आशय निसटून आत येऊ शकतो, त्यामुळे आम्ही आमच्या संरक्षक योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहोत.
विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आणखी सुरक्षित ऑनलाइन शिक्षण यासाठी टूल देणे.
Google Workspace
वर्गांसाठी शिक्षणासंबंधी अधिक सुरक्षित वातावरण तयार करणे
Google Workspace for Education हे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सर्व डिव्हाइसवर सुरक्षितपणे परस्परसंवाद साधण्यात मदत करते. त्याच्या कोअर सेवांमध्ये जाहिराती नसतात आणि जाहिराती लक्ष्य करण्यासाठी आम्ही प्राथमिक ते माध्यमिक (K–12) शाळांमधील वापरकर्त्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती वापरत नाही. योग्य अॅक्टिव्हिटीबाबत धोरणे सेट करण्यात अॅडमिनिस्ट्रेटरना मदत करण्यासाठी आम्ही टूलदेखील पुरवतो आणि शाळेची Google खाती वापरणाऱ्या विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यात मदत करतो. Google Workspace for Education सेवा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी शाळांना आवश्यक असलेली टूल आणि स्रोत पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
लाखो विद्यार्थी वर्गामध्ये Chromebook – Google चे लॅपटॉप – वापरतात. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार जास्त किंवा कमी कार्यक्षमता अथवा अॅक्सेस देण्यासाठी अॅडमिनिस्ट्रेटर गट सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकतात. आमची गोपनीयता आणि सुरक्षा वैशिष्ट्ये मुलांची वैयक्तिक माहिती संरक्षित ठेवण्यात मदत करतात आणि त्यांनी यू.एस. च्या K–12 शाळांमध्ये तसेच इतर देशांतील अनेक शाळांमध्ये Chromebook ही टॉप निवड करण्यात मदत केली आहे.
* Google Kids Space साठी तुमच्या मुलाकरिता Google खाते आवश्यक आहे. पालक नियंत्रणांसाठी, सपोर्ट असलेल्या Android, Chromebook किंवा iOS डिव्हाइसवर Family Link अॅप असणे आवश्यक आहे.
† पुस्तके आणि व्हिडिओ आशय सर्व प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही. व्हिडिओ आशय हा YouTube Kids अॅपच्या उपलब्धतेच्या अधीन आहे. Books आशयासाठी Play Books अॅपची आवश्यकता आहे. अॅप्स, पुस्तके आणि व्हिडिओ आशय यांची उपलब्धता सूचनेशिवाय बदलू शकते. Google Kids Space मध्ये Google Assistant उपलब्ध नाही.
पालक नियंत्रणे
डिजिटल मूलभूत नियम सेट करण्यात आणि ऑनलाइन निकोप सवयी तयार करण्यात Google कुटुंबांना कसे मदत करते त्याबद्दल जाणून घ्या.