म्युनिक केंद्राने गोपनीयता आणि
सुरक्षा इंजिनिअरिंग
साठी उचललेली पावले.

GSEC म्युनिक हे युरोपच्या मध्यभागी स्थित असलेले Google च्या गोपनीयता आणि सुरक्षा इंजिनियरींगचे जागतिक केंद्र आहे. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्रामध्ये ३०० हून अधिक समर्पित इंजिनियर अशी उत्पादने आणि टूल तयार करण्यासाठी काम करतात, जी लोकांना सर्व ठिकाणी ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात व त्यांची माहिती खाजगी आणि सुरक्षित ठेवण्यात मदत करतील.

GSEC म्युनिक चे उपक्रम यांचे बारकाईने निरीक्षण करणे.

GSEC म्युनिक अशी उत्पादने आणि टूल तयार करते जी लाखो लोकांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात मदत करतात. ही वापरण्यासाठी सोपी असलेली नियंत्रणे, बिल्ट-इन संरक्षण आणि ओपन सोर्स तंत्रज्ञाने सर्वांना सर्वोत्तम दर्जाची गोपनीयता आणि सुरक्षा एकसारख्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.

पासवर्ड व्यवस्थापक

तुमचे पासवर्ड व्यवस्थापित करण्याचा आणखी सुरक्षित मार्ग

आमचा पासवर्ड व्यवस्थापक हा Chrome, Android आणि iOS वरील Chrome साठी बिल्ट-इन आहे आणि हा तुमची सर्व खाती ऑनलाइन संरक्षित करण्याचा सुरक्षित मार्ग आहे. तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड Google च्या ऑटोमेटेड संरक्षणांद्वारे २४/७ संरक्षित केले जातात आणि तुम्ही पासवर्ड सेव्ह केलेली साइट किंवा ॲप धोक्यात आहे असे आम्हाला आढळल्यास, आम्ही तुम्हाला कळवू. तसेच, नवीन साइट किंवा ॲपवर साइन इन करत असताना, पासवर्ड व्यवस्थापक आपोआप युनिक किचकट पासवर्ड जनरेट करू शकतो आणि तुमच्या पुढील लॉगिनच्या वेळेस तो तुमच्यासाठी आपोआप भरलेला असू शकतो.

GSEC म्युनिक तयार करणाऱ्या लोकांना भेटा.

म्युनिकमध्ये स्थित असलेल्या केंद्रात GSEC म्युनिकचे जर्मनी आणि इतर देशांमधील ३०० हून अधिक इंजिनियर, संपूर्ण जगासाठी इंटरनेट सुरक्षित करण्याच्या दिशेने काम करत आहेत.

वर्नर अंटरहॉफर यांचा फोटो

"आम्ही खात्री करतो, की डेटा गोळा करण्यासाठी वापरकर्ते त्यांना सोयीस्कर वाटत असलेली पातळी निवडू शकतील - आणि त्यांना तसे करायचे असल्यास त्यांना डेटा हटवण्यासाठी टूल देतो."

Werner Unterhofer

TECHNICAL PROGRAM MANAGER

यान-फिलिप वेबर

"गोपनीयता आणि सुरक्षा या गोष्टी आवश्यक आणि अतिशय खाजगी आहेत आणि दोन्ही गोष्टी सहज मिळाल्या पाहिजेत.”

Jan-Philipp Weber

SOFTWARE ENGINEER

एलिस बेलमी

“वापरकर्त्यांना Google सोबत शेअर करण्यासाठी सोयीस्कर वाटणारा डेटा निश्चित करण्यासाठी आणि तो डेटा किती काळ उपयुक्त मानण्यात यावा, हे निवडण्यासाठी नियंत्रणे देऊन सुसज्ज करण्याचे आमचे ध्येय आहे. वापरण्यास सोपे असे डिझाइन वापरकर्त्यांसाठी त्यांचा डेटा आणि गोपनीयता प्राधान्ये शोधणे, वापरणे आणि व्यवस्थापित करणे सोपे करते.”

Elyse Bellamy

INTERACTION DESIGNER

योकन आयसिंजर

“आमची इच्छा आहे की वापरकर्त्यांनी कोणतीही काळजी न करता त्यांच्या ऑनलाइन गोपनीयता आणि सुरक्षेवर नियंत्रण ठेवावे. वापरकर्त्यांना इंटरनेट ब्राउझ करायचे असते आणि ते तसे करतात तेव्हा त्यांना सुरक्षित आणि वाजवी डीफॉल्ट सेटिंग्ज पुरवणे आमचे काम आहे.”

Jochen Eisinger

DIRECTOR OF ENGINEERING

ऑड्री ॲन

“संसाधने किंवा तांत्रिक कौशल्य विचारात न घेता प्रत्येकाला गोपनीयतेचा अधिकार आहे. आमचे ध्येय अशी टूल तयार करणे आहे जी प्रत्येकाला त्यांच्यासाठी काय योग्य आहे आणि ते याक्षणी काय करत आहेत हे निवडू देणे सक्षम करतात.”

Audrey An

PRODUCT MANAGER

सबीन बोर्से

“लोक त्यांच्या अनुभवावर नियंत्रण ठेवून सुरक्षितपणे इंटरनेट ब्राउझ करू शकले पाहिजेत. मजबूत डीफॉल्ट संरक्षण आणि वापरण्यास सोपी असलेली गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज ऑनलाइन वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा पाया आहेत आणि हीच आमची दैनंदिन महत्त्वाकांक्षा आहे.”

Sabine Borsay

PRODUCT MANAGER

Google Safety Engineering Center मधील
पडद्यामागील हालचाली

आम्ही संपूर्ण जगातील लोकांशी बोलतो आणि इंटरनेट सुरक्षिततेबद्दल त्यांची काळजी समजून घेतो. ऑनलाइन सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील पिढीची समाधाने तयार करण्यासाठी आम्ही आमच्या इंजिनिअर्सना योग्य स्वातंत्र्य, प्रेरणा आणि मदत देतो.

सायबरसुरक्षेसंबंधित प्रगती

आम्ही जगातील इतर कोणाच्याही तुलनेत जास्त लोकांना ऑनलाइन असताना सुरक्षित कसे ठेवतो हे जाणून घ्या.