डब्लिनमध्ये जबाबदारीपूर्ण आशय याच्याशी संबंधित उचललेली पावले.
आमच्या युरोपियन मुख्यालयात स्थित असलेले GSEC डब्लिन हे बेकायदेशीर आणि हानिकारक आशयाच्या प्रसारावर आळा घालण्याचे काम करणाऱ्या Google तज्ज्ञांचे प्रादेशिक केंद्र आहे आणि हे असे ठिकाण आहे जिथे आम्ही हे काम धोरण निर्माणकर्ते, संशोधक आणि नियामक संस्थांसोबत शेअर करतो.
नवीनतम तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यासह लोकांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी काम करणाऱ्या धोरणतज्ञ, विशेषज्ञ आणि विश्लेषकांसह डब्लिन हे आमच्या विश्वास आणि सुरक्षितता टीमचे केंद्र आहे. हे उपक्रम त्यांच्या कामात अतिरिक्त पारदर्शकता आणतात.
YouTube कसे काम करते
आमची धोरणे, उत्पादने आणि कृतींवर एक नजर
दररोज, लाखो लोक माहिती मिळवण्यासाठी, प्रेरित होण्याकरिता किंवा आनंद मिळवण्यासाठी YouTube वर येतात. कालांतराने, YouTube कसे काम करते याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत, म्हणून आम्ही काही उत्तरे देण्यासाठी आणि आमचा समुदायातील वापरकर्ते, आशय निर्माणकर्ते आणि कलाकार ज्यावर अवलंबून राहू शकतात अशा जबाबदार प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काय करत आहोत हे स्पष्ट करण्यासाठी ही साइट तयार केली आहे.
लहान मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित टूल
लहान मुलांसोबत गैरवर्तन आणि ऑनलाइन शोषण यांच्या विरोधातील लढा
ऑनलाइन बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित आशय (CSAM) याविरोधात लढण्यासाठी आणि आमचे प्लॅटफॉर्म वापरून अशा प्रकारच्या आशयाचा प्रसार करण्यावर प्रतिबंध करण्यासाठी Google वचनबद्ध आहे. आम्ही लहान मुलांच्या ऑनलाइन शोषणाविरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतो आणि आमच्या प्लॅटफॉर्मवरील गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी आमच्या मालकीचे तंत्रज्ञान वापरतो. आम्ही आमच्या तांत्रिक कौशल्याचा वापर इतर संस्थांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून CSAM शोधण्यात आणि काढून टाकण्यात मदत करण्यासाठी टूल डेव्हलप करण्यात आणि शेअर करण्यातदेखील करतो.
पारदर्शकता अहवाल
माहिती ॲक्सेस करण्याशी संबंधित डेटा शेअर करणे
सरकारची व कॉर्पोरेशनची धोरणे आणि कृती कशाप्रकारे गोपनीयता, सुरक्षा आणि माहितीचा ॲक्सेस या गोष्टींवर परिणाम करतात यावर प्रकाश टाकण्यासाठी, २०१० पासून Google ने नियमितपणे पारदर्शकता अहवाल शेअर केला आहे. आमच्या पारदर्शकता अहवालाच्या साईटवरील डेटामध्ये सरकारकडून मिळालेल्या आशय काढून टाकण्याच्या विनंत्या, कॉपीराइटमुळे आशय काढून टाकणे, YouTube समुदाय मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी आणि Google वरील राजकीय जाहिराती इत्यादींसारख्या डेटाचा समावेश आहे.
Google Safety Engineering Center टीममध्ये शेकडो विश्लेषक, इंजिनिअर, धोरणतज्ञ, संशोधक आणि इतर तज्ज्ञ आहेत, यातील सर्व लोक सर्वोत्कृष्ट आणि अधिक सुरक्षित इंटरनेट तयार करण्यात गुंतलेले आहेत.
“GSEC डब्लिन हे नियामकांना, धोरण निर्माणकर्त्यांना आणि संशोधकांना हे समजून घेणे सुलभ करेल की आम्ही आशयाच्या सुरक्षिततेवर कसे काम करतो."
Amanda Storey
DIRECTOR OF TRUST & SAFETY
“आमची उत्पादने वापरणाऱ्या लोकांचे संरक्षण करणे, आम्ही जेथे सेवा देतो तेथील आमच्या भागीदारांचा आणि समुदायांचा विश्वास संपादित करणे आणि गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य करणाऱ्या लोकांच्या एक पाऊल पुढे राहण्यात Google ला मदत करणे हे आमचे ध्येय आहे.”
Helen O’Shea
HEAD OF CONTENT RISK & COMPLIANCE
“आम्हाला तज्ज्ञ स्रोतांकडून अधिकृत माहिती शोधण्यात लोकांना मदत करणे, तसेच स्पष्टपणे धोकादायक आणि हानिकारक आशयापासून आमच्या वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यात आमचे पद्धतशीर प्रक्रिया फ्रेमवर्क मदत करते.”
Mary Phelan
DIRECTOR OF TRUST & SAFETY
"आमच्या प्लॅटफॉर्मवर माहितीचा ॲक्सेस कसा सुलभ करावा, तसेच त्याचवेळी ऑनलाइन हानी आणि संभाव्य ऑफलाइन हानी अशा दोन्हीकडील गैरवर्तन आणि हानीपासून त्या प्लॅटफॉर्मचे आणि तो वापरणाऱ्या लोकांचे संरक्षण कसे करावे, या प्रश्नावर आमच्या टीम दररोज काम करत आहेत."
Claire Lilley
CHILD ABUSE ENFORCEMENT MANAGER
"GSEC द्वारे, आमच्या आशय नियंत्रण सिस्टीम आणि इतर तंत्रज्ञाने व्यवहारामध्ये कशा काम करतात याविषयी नियामकांना अधिक माहिती ॲक्सेस करता येईल, तसेच वापरकर्त्यांच्या माहितीच्या गोपनीयतेचे संरक्षण करणाऱ्या अशा सुरक्षित ठिकाणी त्यांना हे काम करता येईल."
Brian Crowley
DIRECTOR OF GLOBAL ADS AND CONTENT INVESTIGATIONS
"आमच्या प्लॅटफॉर्मवरील आशयाबद्दल बोलायचे झाले, तर आमची उत्पादने वापरणाऱ्या लोकांचे आणि व्यवसायांचे संरक्षण करणे, तसेच यासाठी स्पष्ट, पारदर्शक धोरणे आणि प्रक्रिया बाळगणे ही आमची जबाबदारी आहे."
Nuria Gómez Cadahía
TECHNICAL PROGRAM MANAGER
"डब्लिन हे या क्षेत्रामधील आमच्या विश्वास आणि सुरक्षा टीमचे केंद्र आहे, जिथे अनेक विविध धोरणांशी संबंधित तज्ज्ञ, विशेषज्ञ आणि इंजिनिअर नवीनतम तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून लोकांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत आहेत."
Ollie Irwin
STRATEGIC RISK MANAGER
-

पडद्यामागील हालचाली
आम्ही संपूर्ण जगातील लोकांशी बोलतो आणि इंटरनेट सुरक्षिततेबद्दल त्यांची काळजी समजून घेतो. ऑनलाइन सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील पिढीची समाधाने तयार करण्यासाठी आम्ही आमच्या इंजिनिअर्सना योग्य स्वातंत्र्य, प्रेरणा आणि मदत देतो.