इंटरनेटला सर्वांसाठी आणखी सुरक्षित बनवण्याकरिता Google रोज काम करते
लोकांचे, व्यवसायांचे आणि सरकारांचे संरक्षण करणे
सुरक्षा ही आमच्या उत्पादन धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. म्हणूनच, आमच्या सर्व उत्पादनांमध्ये बिल्ट-इन संरक्षणे असतात, ज्यांमुळे ती बाय डीफॉल्ट सुरक्षित बनतात.
अधिक जाणून घ्यासायबरसुरक्षेच्या धोक्यांची दखल घेण्यासाठी समाजाला सक्षम करणे
मुक्त स्रोताची क्षमता अनलॉक करण्यासाठी आम्ही समाजांना सक्षम करतो आणि व्यवस्था आणखी सुरक्षित ठेवण्याकरिता उद्योगासोबत आमचे ज्ञान व कौशल्य पारदर्शकपणे शेअर करतो.
अधिक जाणून घ्याभविष्यासाठीच्या तंत्रज्ञानांची प्रगती करणे
आम्हाला सायबरथ्रेटच्या नेक्स्ट जनरेशनपासून समाजांचे संरक्षण करायचे आहे. आमचे AI संबंधित कौशल्य वापरून, सुरक्षेसंबंधित नवीन प्रयोगांच्या सीमा विस्तारण्यासाठी आम्ही रचनांचा नवीन टप्पा डिझाइन करत आहोत.
अधिक जाणून घ्याआम्ही आमच्या उत्पादन विकासाच्या आणि क्लाउड इंफ्रास्ट्रक्चरच्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रगत सुरक्षेचा समावेश करतो. यामुळे संस्था त्यांच्या वापरकर्त्यांच्या माहितीचे संरक्षण करण्यात आणि सुरक्षितपणे इंटरनेट अॅक्सेस करण्यात त्यांना मदत करत असतानाच, त्यांची आयटी सुरक्षा आधुनिक आणि मजबूत करू शकतात.
-
हानिकारक आशयाच्या विरोधात लढा देणे
आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा बेकायदेशीर आणि हानिकारक आशय डिटेक्ट करून व काढून टाकून आम्ही गैरवर्तन रोखतो आणि वापरकर्त्यांचे विशेषतः लहान मुलांचे संरक्षण करतो. फसव्या जाहिराती, चुकीची माहिती, द्वेष, घोटाळे आणि लहान मुलांची सुरक्षितता या गोष्टींच्या समावेशासह हानीच्या सर्व वर्गवाऱ्यांच्या बाबतीत आम्ही हे करतो.
वापरकर्ता संरक्षणांना प्राधान्य देणाऱ्या, चुकीच्या माहितीच्या विरोधात लढा देणाऱ्या आणि सर्वांसाठी इंटरनेट खुले व सुरक्षित ठेवण्याकरिता धोक्यासंबंधित माहिती शेअर करणाऱ्या जागतिक मानकांची प्रगती करण्यासाठी आम्ही सायबरसुरक्षेमध्ये आघाडीवर असलेल्या व्यक्तींसोबत, सरकारांसोबत आणि सुरक्षा समुदायांसोबत भागीदारी करत आहोत.
-
सायबर वर्कफोर्स मजबूत करणे
सायबरसुरक्षेमधील आणखी करिअर — अनुभव किंवा बॅकग्राउंडच्या निरपेक्ष — लाँच करण्यासाठी आणि सर्वांसाठी आणखी सुरक्षित जग निर्माण करण्यासाठी, आम्ही आमचे कौशल्य शेअर करून, करिअरच्या मार्गांचा विस्तार करून व प्रभावी औद्योगिक आणि सरकारी भागीदारी निर्माण करून सायबर वर्कफोर्स सक्षम करत आहोत.
-
Mandiant धोक्यासंबंधित माहिती
Mandiant हे जगातील सर्वात मोठ्या संस्थांच्या सायबरसुरक्षेच्या आघाड्यांवरून मिळवलेली धोक्यासंबंधित रीअल-टाइम, सखोल माहिती आणते. हे Google Cloud च्या सुरक्षेसोबत वापरून आम्ही एंटरप्राइझना आणि सार्वजनिक क्षेत्रातील एजन्सीना सुरक्षेच्या संपूर्ण लाइफसायकलदरम्यान संरक्षित राहण्यात मदत करतो.
AI, हार्डवेअर, क्लाउड कॉंप्युटिंगमधील प्रगती आणि क्वांटम कॉंप्युटिंगसाठी आंतरराष्ट्रीय मानकांना पाठबळ देऊन, असुरक्षित वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करत असताना, त्यांचे ऑनलाइन हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी आम्ही काम करतो.
सायबरसुरक्षा हे सांघिक कार्य आहे आणि आपण एकत्र काम केल्यावर, नवीन प्रयोगांना चालना देऊ शकतो व या क्लिष्ट, झपाट्याने बदलणाऱ्या विश्वातील सर्वांसाठी फायदेशीर असतील अशा सर्वोत्तम पद्धतींची प्रगती करू शकतो.
आमच्या टीम जगभरातील गोपनीयता, सुरक्षा, आशयाची जबाबदारी आणि कुटुंबाची सुरक्षितता यासाठी काम करतात. आमची GSECs या कामामध्ये मार्गदर्शन करण्यात मदत करतात, ज्याचे नेतृत्व अनुभवी इंजिनियर, धोरणतज्ञ आणि विषय तज्ञ करतात.
आमची उत्पादने ही त्यांचा हेतू साध्य करत काम करत राहावीत आणि इंटरनेट हे एक सुरक्षित ठिकाण बनावे, यासाठी आमचा Bug Hunters चा जागतिक समुदाय आमच्या उत्पादनांच्या पडद्यामागे डोकावतो.
सरकारे, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, एंटरप्राइझ आणि लहान व्यवसायांच्या सुरक्षेला व डिजिटल रूपांतराला पाठिंबा देण्यासाठी आम्ही जगातील प्रिमीयर सुरक्षा सल्लागार टीम डिप्लॉय करतो.
आम्ही वापरत असलेले आणखी मार्ग एक्सप्लोर करा.
-
आमच्या उत्पादनांमध्येGoogle च्या सर्व उत्पादनांमध्ये तुमच्या सुरक्षिततेचे कसे संरक्षण केले जाते याविषयी जाणून घ्या.
-
सुरक्षा आणि गोपनीयताGoogle तुमची वैयक्तिक माहिती संरक्षित करणे आणि त्यावर तुमचे नियंत्रण ठेवणे हे कसे करते याविषयी जाणून घ्या.
-
कौटुंबिक सुरक्षिततातुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काय योग्य आहे ते व्यवस्थापित करण्यासाठी Google तुम्हाला कशी मदत करते ते जाणून घ्या.