तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांमध्ये साइन इन करण्याचा आणखी सुरक्षित मार्ग.
तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांमध्ये साइन इन करू शकाल. तुमच्या खात्याची वैयक्तिक माहिती असुरक्षित असू शकते याची काळजी न करता ते जलद आणि सोपे असावे.
आमची बिल्ट-इन ऑथेंटिकेशन टूल ही तुम्हाला तुमच्या आवडत्या ॲप्स आणि सेवांमध्ये झटपटपणे व सुरक्षितपणे साइन इन करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
-
पासवर्डशिवाय, सोपे आणि सुरक्षित साइन इन
पासकी या तुमच्या डिव्हाइसचे स्क्रीन लॉक वापरून सर्वात सोपे, सर्वात सुरक्षित साइन इन ऑफर करतात, त्यामुळे साइन इन करणे हे तुमच्या फोनकडे बघण्याइतके किंवा तुमचे फिंगरप्रिंट स्कॅन करण्याइतके सोपे आहे. पासकी हे असे औद्योगिक मानक आहे, जे तुमच्या सर्व डिव्हाइस आणि प्लॅटफॉर्मवर काम करते.
अधिक जाणून घ्या -
तुमच्या सर्व डिव्हाइसवर सोपे साइन इन
पासकी लक्षात ठेवणे किंवा टाइप करणे आवश्यक नाही. त्याऐवजी, पासवर्ड वापरण्यापेक्षा दुप्पट वेगाने साइन इन करण्यासाठी तुम्ही तुमची फिंगरप्रिंट, चेहऱ्याचे स्कॅन, पिन किंवा इतर स्क्रीन लॉक वापरू शकता. पासकी या तुमच्या Google खाते मध्ये स्टोअर केलेल्या असल्यामुळे, त्या तुमच्या सर्व सिंक केलेल्या डिव्हाइसवर उपलब्ध असतात.
-
नेक्स्ट-जनरेशन खाते सुरक्षा
FIDO Alliance आणि W3C मानकांवर आधारित, पासकी त्याच सार्वजनिक की क्रिप्टोग्राफिक प्रोटोकॉलचा लाभ घेतात जे प्रत्यक्ष सिक्युरिटी की अंडरपिन करतात, त्यामुळे त्या फिशिंग, क्रेडेंशियल स्टफिंग व इतर रिमोट हल्ल्यांपासून संरक्षित असतात.
-
तुमच्या आवडत्या अॅप्स आणि सेवांमध्ये साइन इन करण्यासाठी आणखी सुरक्षित मार्ग
तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांमध्ये साइन इन करताना तुम्ही वेग आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींसाठी पात्र आहात. तुमची साइन-इन माहिती तुमच्या Google खाते सह खाजगी, सुरक्षित आणि संरक्षित ठेवली आहे याची खात्री असल्यामुळे, तुम्ही हजारो अॅप्स व वेबसाइटवर आणखी सुरक्षितपणे व सहज साइन इन करू शकता.
Google वापरून साइन इन करा हे कसे वापरावे याबद्दल जाणून घ्या -
फक्त एकदा टॅप करून सुरक्षितपणे कुठेही साइन इन आणि साइन अप करा
Google वापरून साइन इन करा यासाठी साइन अप आणि त्यामध्ये साइन इन करून, तृतीय पक्ष ॲप्स व सेवांसाठी तुमचा पासवर्ड चोरणाऱ्या चुकीचा हेतू असलेल्या व्यक्तीपासून तुम्ही सुरक्षित असता. एखाद्या अॅप किंवा सेवेच्या बाबतीत सुरक्षेशी संबंधित घटना घडली, तरीही Google वापरून साइन इन करा हे प्रत्येक लॉग इनची युनिक पद्धतीने पडताळणी करून तुमचे संरक्षण करणे पुढे सुरू ठेवते.
-
तुमची खाती आणि कनेक्शन यांवर आणखी नियंत्रण
तुम्ही Google वापरून साइन इन करा, तुमच्या Google खाते शी लिंक केलेली खाती आणि तृतीय पक्ष कनेक्शन कशी वापरता हे व्यवस्थापित करा. तुम्ही कोणता डेटा शेअर करण्याचे निवडत आहात हे तुम्ही एकाच ठिकाणी पाहू, अपडेट आणि व्यवस्थापित करू शकता, ज्यामुळे तुम्हाला गोष्टी संगतवार लावता येतात व नियंत्रण तुमच्याकडे असते.
तुमच्या कनेक्शनचे आता पुनरावलोकन करा
-
क्लिष्ट पासवर्ड तुम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करतात
तुमची वैयक्तिक माहिती खाजगी ठेवण्यासाठी तुमच्या ऑनलाइन खात्यांकरिता क्लिष्ट, युनिक पासवर्ड निवडणे ही महत्त्वाची पायरी आहे. मात्र, बऱ्याच लोकांनी सांगितले आहे, की ते वेगवेगळ्या साइटवर एकच, कमकुवत पासवर्ड वापरतात, ज्यामुळे त्यांच्या खात्यांची असुरक्षितता वाढते.
-
Google चे Password Manager तुम्हाला पासवर्ड आणि पासकी व्यवस्थापित करण्यात मदत करते
तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड आणि पासकी व्यवस्थापित कराChrome आणि Android मध्ये बिल्ट-इन असलेले, Google चे Password Manager तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांसाठी सुरक्षितरीत्या पासवर्ड सुचवते, ते सेव्ह करते आणि भरते. पासकी या पासवर्डच्या बरोबरीने काम करतात आणि सर्व एकाच ठिकाणी सोयीस्करपणे व्यवस्थापित केल्या जातात.
-
ऑटोमॅटिक पासवर्ड अलर्ट तुम्हाला तुमचे पासवर्ड सुरक्षित ठेवण्यात मदत करतात
दररोज, नवीन डेटा भंग कोट्यवधी वापरकर्त्यांची नावे आणि पासवर्ड सार्वजनिकरीत्या उघड करतात. Google हे धोक्यात असलेले पासवर्ड मॉनिटर करते जेणेकरून तुमच्या सेव्ह केलेल्या पासवर्डपैकी कोणत्याही पासवर्डचा डेटा भंगामध्ये समावेश असल्याचे आढळल्यास, आम्ही तुम्हाला आपोआप सूचित करू.
पासवर्ड तपासणी करून तुमची सर्व ऑनलाइन खाती संरक्षित करा. तुमच्या पासवर्डच्या क्लिष्टतेची चाचणी करा, तुम्ही कोणताही पासवर्ड एकाहून अधिक वेळा वापरला आहे का हे तपासा आणि कोणताही पासवर्ड धोक्यात आला आहे का हे जाणून घ्या.
आणखी मार्ग एक्सप्लोर करा.
-
गोपनीयता नियंत्रणेतुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज निवडा.
-
डेटाविषयक कार्यपद्धतीजबाबदार डेटाविषयक कार्यपद्धतींसह आम्ही तुमच्या गोपनीयतेचा कसा आदर करतो त्याबद्दल अधिक जाणून घ्या.
-
सुरक्षेशी संबंधित टिपाऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी झटपट टिपा आणि सर्वोत्तम कार्यपद्धती शोधा.
-
जाहिराती आणि डेटातुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर दिसणार्या जाहिरातींबद्दल अधिक जाणून घ्या.